Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?
Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पांढरी टोपी टोप्या फिरविण्यात
पांढरी टोपी टोप्या फिरविण्यात वस्ताद आहे
फार एंड, WHITEHAT प्रतिसाद
फार एंड, WHITEHAT प्रतिसाद आवडले
फक्त एक: डाव्या गुंडगिरीच्या घटना हल्ली त्यामानाने कमी असतात. उजवी गुंडगिरी मात्र खूप वाढते आहे.
सामान्य मुसलमान भयग्रस्त आहेत हेही खरे आहे.
सामान्य मुसलमान भयग्रस्त आहेत
सामान्य मुसलमान भयग्रस्त आहेत हेही खरे आहे.>>>>>
इतर मुद्द्यांबाबत काही बोलणार नाही परंतु वरील वाक्याशी १००% असहमत (Disagree)!
>> पांढरी टोपी टोप्या
>> पांढरी टोपी टोप्या फिरविण्यात वस्ताद आहे
टीकेचा आणि चर्चेचा रोख व्हॉटअबॉट्री करून भलतीकडे न्यायची जुनीच ट्रिक आहे. राईट विंगच्या उघड चुकांचा निःसंदिग्ध विरोध न करता येण्यामागे त्यांची मजबुरी आहे.
असू द्या हो व्हाईटहॅट आपण फिल्मीचं घर उन्हात बांधू. तुम्ही तुमचं जर तर पण किंतु परंतु चालू ठेवा
दिवाळीच्या कार्यक्रमाला
दिवाळीच्या कार्यक्रमाला इर्शाद म्हणणे मला पटलेले नाही. पण म्हणून तो कार्यक्रम बंद करावा असे मी आजिबात म्हणणार नाही. तसे त्यांना कोण म्हणाले का? निदान तसे वाचलेले नाही.
पण दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणार्या दागिन्यांच्या जाहिराती सुतकी, दिवाळीच्या कुठल्याही प्रतिकाशिवाय, हिंदू धार्मिक प्रतिके दिसणार नाहीत ह्याची काटेकोर काळजी घेऊन बनवल्या गेल्या तरी कुठल्याही हिंदूला वाईट वाटता कामा नये. त्याने/तिने तसे सोशल नेटवर्क वर लिहिणे हे महापाप. जाहिराती कितीही नावडल्या तरी सर्वधर्म समभाव, सहिष्णूता वगैरे मंत्र म्हणत निमूटपणे त्या दागिन्याच्या दुकानात सालाबादाप्रमाणे खरेदी केलीच पाहिजे हा पुरोगामी आग्रह अनाठायी नाही का?
ग्राहक राजा असतो वगैरे वाक्ये काय फक्त नावालाच का?
आकाश कंदिल चीनमधून आले का आकाशातून पडले, फटाके चीनमधून आले का अरबस्तानातून आले , वगैरे मुद्दे मला हास्यास्पद वाटतात. गेले शंभर वर्षे जनमानसात दिवाळी ह्या सणाची जी प्रतिमा आहे त्याला अनुसरून लोकांना काही अपेक्षा असल्या तर काय चूक आहे?
दिवाळीच्या प्रत्येक जाहिरातीत आकाश कंदिल, फटाके, फराळ, दिवे, आरास, किल्ले, लक्ष्मी, हे सगळे आलेच पाहिजे असे शेफालीबाईंनी म्हटलेले नाही.
शेफालीबाई ह्या भाजप वा कुठल्या पक्षाच्या पदाधिकारी नाहीत, त्यांनी रस्त्यावर उतरा वगैरे आगलावे विचार मांडलेले नाहीत, दुकानाची मोडतोड , जाळपोळ करावी असे दुरुनही सुचवलेले नाही. मी अशा लोकांकडून खरेदी करणार नाही असे म्हटल्या आहेत त्या. त्यांना तसे म्हणण्याचा आणि तो त्यांना आवडेल त्या व्यासपीठावर मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि अर्थात ह्या विचाराला नाके मुरडण्याचा इतरांनाही अधिकार आहे. पण ह्यावरून थेट भारताचा तालिबान झाल्याचा कांगावा करणे हास्यास्पद आहे. खरोखर तालिबान काय आहे हे माहित नसल्याचा परिणाम असावा. जसे नावडत्या माणसाला हिटलर म्हणण्याची फ्याशन आहे तशी तालिबान ही शिवी वाट्टेल तिथे भिरकावून द्यायची फ्याशन बनू घातली आहे.
आणि हो, ह्या शेफालीताईंच्या शुद्ध अहिंसक आंदोलनाला थोडेबहुत यश मिळत आहे. अनेक सराफ आपल्या जाहिराती थोड्या हिंदू वाटतील इतपत बदलत आहेत. मग एक टिकली फोटोशॉप करुन का लावेनात!
सातीची पोस्ट >>> एक क्षण भीती
सातीची पोस्ट >>> एक क्षण भीती वाटली वाचुन
फारएन्ड+१००
फारएन्ड+१००
शेंडेनक्षत्र यांचे म्हणणे
शेंडेनक्षत्र यांचे म्हणणे पटले. वैद्यबाईंना बोलायचा हक्क आहे आणि त्यांना बावळट म्हणायचा हक्क आम्हाला आहे. शिंपल.
दिवाळी पहाट म्हणजे मूठभर
दिवाळी पहाट म्हणजे मूठभर उच्चभ्रू लोकांचे भरल्या पोटचे चोचले सोडून दुसरं काय आहे! कधी जाऊन पाहिलं नाही काय असतं ते. आणि त्याच्या शीर्षकावरून इतक्या प्रदीर्घ intellectual चर्चा घडतात.
दलितांच्या गाव सोडण्याबद्दल अशीच तावातावाने चर्चा करण्याइतका आपला समाज सुसंस्कृत नाही. >>
तुम्ही धागा काढला असतात तर चर्चा घडली असती. मला दोन्ही तिन्ही बातम्या इथेच कळल्या.
आणि मध्यमवर्गाचे चोचले म्हणून बघू नका - हा बदलत्या समाजाचा आरसा आहे आ णि बदल भयावह आहे.
एखाद्या समुदायाला जातीवरून गाव सोडून जावं लागलं हे ही भयावह आहेच, पण त्याने ह्या प्रकाराची भीषणता इग्नोर करा असे म्हणता येणार नाही.
जे काही चाललय ते फार अ स्वस्थ करणारं आहे. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रूप मधेही ह्याचं समर्थन करणारे लोक आहे त, हे फार अस्वस्थ करणारं आणि आश्चर्यकारक वाटतं.
हरचंद पालव ह्यांची एक आणि फारेंड ची भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे आणि योग्य आहे हे पटतं का वाली पोस्ट आवडली.
स्वाती साती ह्यांची पोस्ट बघूनही - अगदी अगदी असे वाटले.
हा येवढा बदल, एकांगी विचार सोशल मिडियामुळे होतोय का? का इतके वर्ष सप्रेस्ड राहिल्याची भावना ह्या सर्व वर्षात दबून राहिलेली?
माझे भारताबाहेरचे मित्र मैत्रिणी जे आधी मध्यम मार्गी होते, ते ही असाच विचार करताना दिसतात, विशेशतः युके मधले - ते म्हणतात तुम्ही इथली परिस्थिती बघितली नाहिये - तसं व्हायचं नसेल तर अॅग्रेसिव होणं गरजेचे आ हे असे त्यांचे मत दिसते.
मला त्या दुसर्या धर्माचा ए कांगी पणाही आवडत नाही. तसा आपला धर्म होऊ नये असे वाटते.
वाद घालून थकायलाही होतं आणि लोकांच्या मतात काही फरकही पडत नाही. पण आत्ता मत नोंदवत राहिलं नाही तर आपणही साथीदार असल्यासारखं वाटत राहिल.
हे भाषाप्रलोक/धर्मप्रेमी/देशप्रेमी लोक आपल्या मुलांना मराठीतच शिकवत असतील, आपल्याच देशात रहात असतील आणि देशात राहिल्यास देशासाठी काही काम करत असतील असे सांगता येत नाही - हा भाग अलहिदा.
पण ह्यावरून थेट भारताचा
पण ह्यावरून थेट भारताचा तालिबान झाल्याचा कांगावा करणे हास्यास्पद आहे. खरोखर तालिबान काय आहे हे माहित नसल्याचा परिणाम असावा. जसे नावडत्या माणसाला हिटलर म्हणण्याची फ्याशन आहे तशी तालिबान ही शिवी वाट्टेल तिथे भिरकावून द्यायची फ्याशन बनू घातली आहे. >> सुरुवात अशीच असते. ते १००% सत्तेवर नसतात तो पर्यंत सर्वसामान्यांना आपलंस वाटेल असंच त्यांच रूप असतं - धर्माचे तारणहार ही भूमिका असते.
शेफाली वैद्य बावळट नाही.
शेफाली वैद्य बावळट नाही. अत्यंत चलाख आहे.
"सुरुवात अशीच असते.." अगदी
"सुरुवात अशीच असते.." अगदी अगदी. आणि ही सुरुवात नाही आहे. ह्या चळवळीची सुरुवात कधीच झाली आहे आणि तिने चांगलेच बाळसे धरले आहे.
पण आत्ता मत नोंदवत राहिलं
पण आत्ता मत नोंदवत राहिलं नाही तर आपणही साथीदार असल्यासारखं वाटत राहिल.>>+१. तुम्ही विरोधात जा अथवा सोबत. इथे तिसरा पर्याय नाही. ज्यांना अजूनही तटस्थ राहता येईल असे वाटत आहे ते देखील असे तटस्थ राहण्याचे प्रिव्हीलेज हळूहळू निघून जाताना पाहत आहेत. तर ढोंग आवरा आणि बाजू निवडा
ज्यांना अजुनही वाटतंय की हे
ज्यांना अजुनही वाटतंय की हे सर्व प्रकार मुसलमानांची खोड मोडायला आहेत, ते फारच निरागस आहेत. मुसलमान तो सिर्फ बहाना हय. खरा हेतु हिंदुंनाच कंट्रोल करून लायनीवर आणायचा आहे. घटनादत्त स्वातंत्रयाचा गळा आवळून जुनाट प्रथांप्रमाणे वागणं भाग पाडणं. हळूहळ होणारं तालैबनायझेशन. वरती साती स्वातीची पोस्ट एकदम बरोबर आहे. जे लोक आजही याविरूद्ध तोंड उघडायला कचरतात किंवा समर्थन करतात ते स्वतःही व्हिक्टीम असणारेत. सबका टाइम आएगा.
मुसलमानांचं काही वाकडं होणार नाही कारण ते तसेही बुरसटलेलेच आहेत मोस्टली. शिवाय मायनाॅरिटी म्हणून त्यांच्यावरच्या अन्यायाची दखल घ्यायला जगभर संस्था आहेत. हिंदुवरच्या या अशा जबरदस्ती, अन्यायाला जागतिक स्तरावर कोण वाचा फोडणार? आणि जे फोडतात/फोडतील त्यांनाच हे लोक सेडिशन चार्जेस लावून अटक करतात. कोण तारणार हिंदुंना??
आज टिकलीची जबरदस्ती, उद्या साडीची, मग परवा अजून कशाची. ही यादी कुठे थांबणार? जे म्हणताय की जबरदस्ती करतच नाहीये कोणी, ते मग कंपन्यानी जाहिराती बदलल्या म्हणून कशासाठी उन्मादाने नाचताय? "आमच्यापुढे" कंपन्या नमल्या म्हणूनच ना? तसंच लोकांचंही केलं जाणार.
बिंदी व्हायरसचं हे म्यूटेशन
बिंदी व्हायरसचं हे म्यूटेशन कसं वाटतंय?
विधवेने बिंदी लावली तर काय शिक्षा आहे?
शेफाली - मी कुठे असं म्हणतेय? लोकांनी असे अर्थ लावले तर मी कशी जबाबदार? मी काही कोणत्या पदावर नाही.
सुनिती, प्रतिसाद पटला.
सुनिती, प्रतिसाद पटला.
सुनीती, प्रतिसाद पटला, साती
सुनीती, प्रतिसाद पटला, साती यांची पोस्ट भितीदायक पण prescient आहे. असल्या विचारांना पाठिंबा देणार्या महिलांची अवस्था Turkeys cackling for an early thanksgiving सारखी होणार आहे. तवलीन सिंग अधून मधून अनुभव घेत असतातच.
हा प्रकार कन्यादान च्या आलिया
हा प्रकार कन्यादान च्या आलिया भट च्या जाहीरातीपासुन सुरु झाला. त्या आधीही मुस्लीम परिवारातील हिंदू सुनेच्य डोहाळजेवणाच्या जाहीरातीबद्दल ही असाच गदारोळ उडाला होता. तेव्हा हे असे सो कॉल्ड बदल नेहेमी हिंदुंच्याच बाबतीतच का दाखवले जातात असा एक मतप्रवाहही सामान्या हिंदुंमध्ये असल्यास काही नवल नसावे. ह्या भावनेला शेफाली वैद्याच्या नो बिंदी नो बिझनेस ह्या टॅगलाईनने एका चळवळीत बदलले. त्यात ह्या नवरात्रीत बांग्लादेशात झालेल्या दंग्याने आणि हिंदुच्या हत्येने एरवी काठावर असलेल्यांना ही त्यात ओढले. (पुढे भारताचा पाकिस्तानने केलेला टी २० मधला पराभव पाहुन हात धुवुन घेण्याची संधी हुडकणार्यांना आयतीच संधी दिली.) बाकी इर्शाद च्या बाबतीत थोडे कठोरच झाले असे म्हणता येईल पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुरोगामीत्वाचा टेंभा मिळवणार्या वृत्तपत्ताने उगाच पानभर झैरात देऊन मुद्दामुन आगाऊपण केला असे वाटते. म्हणजे कार्यर्कम हिंदुंच्या मुख्य सणाच्या पहिल्या दिवशी,प्रेक्षक बहुतांश हिंदुच असणार पण पाहा नाव न बदलता आम्ही कसे सेक्युलर आहोत असे दाखवण्याचा अगोअचरपणा केला असे वाटले.एरव्हीही हाच कार्यक्रम कधी भल्या पहाटे केला असता का ? असे वाटुन गेले.
शेफाली वैद्य यांची पोस्ट
शेफाली वैद्य यांची पोस्ट दुर्लक्ष करा वा रिकामटेकडे धंदे आहेत असे म्हणणार्यांसाठी :
गेल्या दोन दिवसात व्हॉट्सॅपवर खरे जोशी यान्च्या कार्यक्रमा विरोधात मोठाल्या पोस्टी येत आहेत. त्यात ऑडियन्स नुसार वेगवेगळा अॅन्गल दिसतो. काहींमध्ये हिंदु अॅन्गल, काही पोस्टमध्ये ब्राह्मण अॅन्गल (यान्च्या काही कविता ब्राह्मणांची टिन्गल करणार्या आहेत अश्या अर्थाचे). इतरही अॅन्गलचे मेसेज फिरत असतील.
थोडक्यात कोणी एका/कीने एक मुद्दा ‘माझे मत‘ म्हणुन मांडायचा. मग ऑनलाइन आर्मीने सुनियोजित पद्धतीने तो भडकवत उग्र करत न्यायचा. ही मोडस ऑपरांडि आहे. मग अजुन तिसर्याच कोणितरी रस्त्यावर उतरायचे वा धमक्या द्यायच्या.
आपल्या बाब्याला भिकारचोट म्हणताना वेदना होतात पण किमान स्वतःशी प्रामाणिक असल्याचे समाधान मिळते इतकेच.
हिंदू संस्कृती ही एकसंध नाही.
हिंदू संस्कृती ही एकसंध नाही. त्यामुळे दिवाळीच्या जाहिराती ज्यात दिवाळी दिसत नाही त्यावर बहिष्कार घालणे हे तालिबानीकरणाकडे वाटचाल वगैरे फार हास्यास्पद दावे आहेत. आपले मत मांडायचे नाही, कायम मुरड घालायची, कुठल्याही परंपरा जरी दुरान्वयाने हिंदू धार्मिक असतील तर त्या टिकाव्यात असे वाटू द्यायचे नाही. अशी तारेवरची कसरत आमचा तालिबान होऊ नये म्हणून करायची हा एक मूर्ख, बिनबुडाचा विचार आहे.
तालिबान कसे निर्माण झाले? अफगाणिस्तानात रमजान ईदला खिरीचे साहित्य विकणार्या कुठल्या वाण्याने जाहिरातीत ईदचा उल्लेख केला नव्हता म्हणून त्याच्यावर कुण्या अफगाणी महिलेने बहिष्कार घातला आणि हळूहळू तालिबान फोफावले अशी कुणाची माहिती असल्यास सांगा!
माझ्या माहितीनुसार सोव्हिएत ने अफ्गानिस्तानवर हल्ला केला आणि तो देश हस्तगत केला. ह्याला उत्तर म्हणून अमेरिक आणि अनेक श्रीमंत अरब राष्ट्रे ह्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा आणि अन्य सामग्री आणि अरबी धर्मयोद्धे अफगाणिस्तानात आणले. अरबांनी आणलेला कडवा वहाबी इस्लाम आणि स्थानिक टोळ्यांमधील मागास विचार ह्यातून तालिबान निर्माण झाला अशी माझी माहिती आहे.
>>आपल्याकडचे सोशली
>>आपल्याकडचे सोशली काँसर्व्हेटिव्ह=राईट विंग असे समीकरण आहे. And social conservatism is the worst and dumbest aspect of being RW.<<
"आपल्याकडे" लिहिल्याबद्दल धन्यवाद. कारण इथेच बरेच महाभाग या गैरसमजुतीत आहेत. असो. राइट विंगची फाउंडेशनल फिलासफि आहे - फ्री एंटर्प्राय्ज. आय्रनी हि आहे कि त्याच फिलासफि नुसार अमेरिकेत आलेले त्याला विरोध करताना दिसतात...
बाकि, चालू द्या...
अरबांनीऐवजी हिंदुत्ववाद्यांनी
अरबांनीऐवजी हिंदुत्ववाद्यांनी, वहाबी इस्लामऐवजी हिंदुत्व आणि टोळ्यांजागी समाज टाकून वाचलं तर काय जन्माला येतं?
अरबांनीऐवजी हिंदुत्ववाद्यांनी
अरबांनीऐवजी हिंदुत्ववाद्यांनी, वहाबी इस्लामऐवजी हिंदुत्व आणि टोळ्यांजागी समाज टाकून वाचलं तर काय जन्माला येतं?
<<
वास्तव हे गणितासारखे सोपे नसते हो. क्ष च्या जागी य टाका आणि परिणाम पहा असे नसते. हिंदुत्व आणि इस्लाम एकसारखे नाहीत. नव्हते आणि नसतील. एक प्रेषित, एक धर्मग्रंथ, एक विचार असे हिंंदू धर्मात नाही. त्यामुळे त्याचा इस्लाम होणे शक्य नाही. दोन्ही धर्माचा पुरेसा अभ्यास नसणारे, सर्व धर्म सारखेच ह्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे अशा प्रकारे विचार करू शकतात.
दुसरे, टोळ्यांच्या जागी समाज घालताच येणार नाही. टोळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे उरलेल्या जगापासून वेगळे रहाणे. भारतातील समाज अशा प्रकारे अलिप्त नाही आणि नव्हता.
अहो इथे जागतिक हिंदुत्त्ववादी
अहो इथे जागतिक हिंदुत्त्ववादी सर्व सोशल नेटवर्क्स वर "बघा ते कसे त्यांच्या धर्मात..." हे पालुपद वापरून त्यांचे "मॉडेल बिहेवियर" बनवत आहेत. कोणाच्याही फेबुवर बघा. इव्हन इथे बघा "त्यांच्या कार्यक्रमाला भजन नाव ठेवतील का" वगैरे विचारले जाते. त्यांना काय करायचे ते करू दे. हिंदू लोकांनी जणू काय ते आदर्श धार्मिक वागणे आहे असे समजून त्यांची कॉपी कशाला करायला हवी?
आणि पुन्हा पुन्हा लोक पूर्ण न माहिती काढता ठाम मते लिहीत आहेत. त्या कार्यक्रमाचे हेच नाव आहे आणि या आधीही तो होत होता. जे काही सर्कल असेल त्यात तो बर्यापैकी प्रसिद्ध आहे. तो सादर करणारे लोक हिंदूविरोधी वगैरे तर नाहीतच, असलेच तर काकणभर उजव्या बाजूलाच असतील. तो कार्यक्रम मटाने ठरवला, तर त्यात कसला अगोचरपणा?
असे उसने अवसान आणून हिंदू
असे उसने अवसान आणून हिंदू धर्माचा इस्लाम आणि तोही वहाबी होऊच शकत नाही. हिंदू धर्म एकसंध नाही. तमिळ लोकांचा गणपती आणि मराठी लोकांचा गणपती वेगळे आहेत. बंगालमधे काली वगैरे भयंकर देवींचे प्रस्थ आहे ते महाराष्ट्रात नाही. खंडोबा, म्हसोबा वगैरे देव बाकी भागात अज्ञात आहेत. अनेक देव मानणारा धर्म हा मुळातच सौम्य प्रकृतीचा असतो. सेमेटिक धर्म हे जास्त कडवे आणि आक्रमक असतात.
उगीच बागुलबुवा निर्माण करू नये.
हल्ली हिंदूत्त्व हे प्रबळ आहे ह्याचे मुख्य कारण इतर अल्पसंख्य धर्मांना डोक्यावर बसवायचे आणि हिंदूना तुच्छ लेखायचे असे सत्ताधारी पक्षाचे धोरण ५०-६० वर्षे राहिले आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून ते घडत आहे. पण हा प्रकार दीर्घकाल टिकणार नाही. कारण हिंदू धर्माचा तो स्वभाव नाही.
एक प्रेषित, एक धर्मग्रंथ, एक
एक प्रेषित, एक धर्मग्रंथ, एक विचार असे हिंंदू धर्मात नाही. त्यामुळे त्याचा इस्लाम होणे शक्य नाही.
हे एक अजब तर्कट आहे. आणी हे पेश करणारे उच्चवर्णीयच असतात. अगदी आजही "दलित नवरदेवाने घोडीवर बसून वरात काढल्याने मारहाण", "दलिताने मंदिरात प्रवेश केल्याने गोमुत्राने शुद्धीकरण", "गोमांसाच्या संशयावरून लिंचिंग", ई ई घटना घडतात.
"अ फ्यू गूड मेन " या सिनेमात एक प्रसंग आहे, जॅक निकोल्सन चा वकील मिलिटरी चे जाडजूड मॅनुअल पेश करतो व त्यात "कोड रेड" कुठे आहे अस प्रश्न करतो. ज्या अर्थी मॅनुअल मध्ये ते नाही त्या अर्थी ते अस्तित्वातच नाही असा दावा असतो. मग तॉम क्रुझ तेच मॅनुअल दाखवून यात सैनिकाच्या रूम पासून जेवणाच्या मेस ला कसे जायचे हेही लिहिलेले नाही असे दाखवतो. त्यावर ते सैनीक म्हणतात "We go with the crowd"
गेल्या दोन दिवसात व्हॉट्सॅपवर
गेल्या दोन दिवसात व्हॉट्सॅपवर खरे जोशी यान्च्या कार्यक्रमा विरोधात मोठाल्या पोस्टी येत आहेत. त्यात ऑडियन्स नुसार वेगवेगळा अॅन्गल दिसतो. >>> टण्या, टोटली. आणि प्रतिक्रियांचा दर्जाही अफलातून आहे. "यांचे आईवडील सुद्धा खान असतील म्हणून हे असली नावे देतात" छाप.
एक विचित्र टोन असतो आजकाल सोशल नेटवर्क वर. हे लोक काही एन्जॉय करूच शकत नाहीत असे वाटते. आजकाल प्रत्येक गोष्ट ही "हिंदू धर्मावर आक्रमण" होउ लागली आहे. अगदी जुन्या जुन्या पिक्चर मधून काहीतरी खोट उकरून काढणे सुरू आहे. एकतर बहुतेकांची हिंदू धर्म व संस्कृती याची समज फक्त समविचारी सर्कल्स मधले जे ग्रूपथिंक आहे तितकीच आहे. त्यापुढे काही वेगळे वाचायचे नाही, विरोधी मते ऐकायची नाहीत. एक्झॅक्टली आपल्यासारखी राजकीय व सामाजिक मते असलेलीच मंडळी लिस्ट मधे आणि तसेच व्हॉटसअॅप ग्रूप्स. त्यामुळे चर्चा वगैरे होण्याचा चान्सच नाही. सगळेच प्रीचिंग आणि सगळेच कन्व्हर्ट्स.
आयोवा राज्यातील एका म्हातार्याची मुलाखत परवा पाहिली. त्याचा समज असा आहे की ट्रम्पच अजून सत्तेवर आहे. बायडेन वगैरे हे सगळे फेक मीडीयाने बनवलेले आहे. प्रत्यक्षात एअर फोर्स वन मधून ट्रम्प अजून फिरतो. तो, व मिलिटरी(!) हे सत्तेवर आहेत. अगदी ठामपणे. एखाद्या कट्ट्यावरचा एखादा "माहितीची उणीव आवाजाने भरून काढणारा" जितक्या ठामपणे काहीही फेकतो तसेच. मग त्याला "तसे असेल तर अफगाणिस्तान बद्द्लचा दोष ट्रम्पकडेच जातो ना?" विचारले की त्याची पंचाईत होते. कारण आपले जे बिलिफ्स आहेत त्याबद्दल असे प्रश्न विचारायची सवय बंद झालेली असते. तो ज्या ग्रूपमधे फिरतो तेथे हे कोणी विचारत नाही. एखाद्याने विचारले तर हाकलून देतात. मग तेथे जे बोलले जाते तेच त्यांच्या दृष्टीने सत्य असते. तसलाच प्रकार सगळीकडे सुरू आहे.
हे एक अजब तर्कट आहे. आणी हे
हे एक अजब तर्कट आहे. आणी हे पेश करणारे उच्चवर्णीयच असतात. अगदी आजही "दलित नवरदेवाने घोडीवर बसून वरात काढल्याने मारहाण", "दलिताने मंदिरात प्रवेश केल्याने गोमुत्राने शुद्धीकरण", "गोमांसाच्या संशयावरून लिंचिंग", ई ई घटना घडतात.
<<
एक चिमणी दिसली म्हणून वसंत ऋतू सुरु होत नाही अशा अर्थाची इंग्रजी म्हण आठवली. समाजात जातीव्यवस्थेचे अवशेष आहेतच. त्यातून अशा घटना होतात हे नाकारत नाही. परंतू खरोखर इस्लामशी तुलना करायची असेल तर किती देश कुराणावर आधारित संविधान मानतात? सौदी, नायजेरिया, पाकिस्तान आणि आता अफ्गाणिस्तान. भारतात संविधान अशा प्रकारे कुठल्याजुनाट धर्मग्रंथाला प्रमाण मानून लिहिले आहे का?
अस्पृश्य, गोमांस ह्याबद्दल भारतीय सरकारने कायदे केले आहेत का? सौदी सरकारने धर्मावर आधारित जाचक कायदे बनवले आहेत.
काही व्यक्ती कायदा हातात घेऊन काही निंदनीय करतात आणि सरकार अशा प्रकारचे कायदे करते ह्यात प्रचंड फरक आहे. ह्यात कृपया गल्लत करू नये.
महंमद, कुराण ह्यावर टीका केल्यास मृत्यूदंड अशी कायदेशीर तरतूद पाकिस्तान, सौदी आणि अनेक देशात आहे. भारतात असे कुठले कायदे आहेत का? वर्तमान सरकार तसे कायदे करण्याच्या प्रयत्नात आहे का?
भारतात असे कुठले कायदे आहेत
भारतात असे कुठले कायदे आहेत का? वर्तमान सरकार तसे कायदे करण्याच्या प्रयत्नात आहे का? >> आल्यास आपले समर्थन असेल का ?
आज एक लाख दलित लोकांनी विविध
आज एक लाख दलित लोकांनी विविध देवळांत जाऊन देवाचे दर्शन घेतले.
आज एका दलिताला एका सवर्णाने देवळात जाण्यापासून रोखले.
ह्यातील बातमीचे चमकदार शीर्षक म्हणून पत्रकार कुठले निवडेल? अर्थातच दुसरे. त्यामुळे बाकी एक लाख घटना चांगल्या घडत असल्या तरी प्रसिद्धी एका वाईट घटनेलाच दिली जाते आणि त्यावरून तमाम सवर्ण हिंदू तमाम दलितांना देवळात जाण्यापासून रोखत आहेत असे सर्वसामान्यांचे मत बनले तर आश्चर्य नाही.
Pages