इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोलेबाईंच्या चर्चेत आरक्षण हा मुद्दा कधी आला नव्हता.
पटेल, जाट , मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीमागचा खरा हेतू sc st obc आरक्षण रद्द व्हावं हा आहे हे मी तेव्हाही लिहिलं होतं. आताही लिहितो.
जातिभेद हा विषय आला की आरक्षणाचा मुद्दा आलाच पाहिजे.
किनइ आरक्षण नसतं तर आम्हांला जात म्हणजे काय हे कळलं सुद्धा नसतं.

खोलेबाईंची जात फक्त एकाच व्यक्तीने काढलीय.
बाकीचे फक्त त्यांचं जातियवादी वागणं हायलाइट करताहेत .
Victim card चा हा पॅटर्न आता कंटाळवाणा झालाय.

<< MD चं राहू दे- तुम्ही ती वरची 2013 ची लिंक बघितली का? त्यात वर्णन केलेलं वागणं तुम्हाला स्वतःला नॉर्मल वाटलं का? जी व्यक्ती लहान मुलांविरुद्ध पोलीस तक्रार करते- ती काहीही random विचित्र तक्रारी करतच राहणार.
पण ती व्यक्ती ही ब्राम्हण समाजाची सुयोग्य प्रतिनिधी आहे तसेच तिचं वागणं ब्राम्हण समाजाचं प्रातिनिधिक वागणं आहे असं ठासून सांगितल्याने तुम्हाला आरक्षण ५०%हून अधिक वाढवता येणार असेल, ब्राम्हणांचं criminalization करणं सोपं जाणार असेल तर चालू ठेवा तसं.
हजारो ब्राम्हण कुटूंबात विविध जातीच्या स्त्रिया स्वयंपाकी, पोळ्यांच्या मावशी म्हणून कार्यरत असतात,विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मदत होते आणि यात कुठेही जातीचा इश्यू नसतो हा झाला norm. पण आपण एका one off, questionable mental state असलेल्या व्यक्तीला प्रतिनिधी बनवून गरळ ओकू.
नवीन Submitted by WHITEHAT on 11 December, 2022 - 01:24 >>

------ IMD चे का राहू दे?
तिथे त्या अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. Scientist F पर्यंत पोहोचणे म्हणजे साधी गोष्ट नाही... दमछाक होते. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली संस्था एका मनोरुग्णाला एव्हढ्या मोठ्या महत्वाच्या पदावर ( पगार किमान रुपये १३०,००० महिन्याला) जबाबदारीचे काम करायला ठेवेल यावर इयत्ता चौथीचा विद्यार्थी पण विश्वास ठेवणार नाही.

https://www.researchgate.net/profile/Medha-Khole
येथे त्यांच्या संशोधन कामाबद्दल महत्वाची माहिती मिळते. त्यांच्या नावावर ४६+ शोध निबंध प्रसिद्ध आहेत. पैकी काही शोध निबंध हे २०१३ - २०१७ या काळांतले आहेत.

समोर दिसत असलेल्या माहिती वरुन त्या मनोरुग्ण आहेत याला कुठलाही पुसटसाही पुरावा नाही. त्या तशा आहेत हे दाखविणे म्हणजे खर्‍या मनोरुग्णांवर घोर अन्याय करण्यासारखे आहे.

उदय , त्या मनोरुग्ण असतील तर हवामान खात्यात त्यांचे काम करणे ही देशाच्या सुरक्षिततेच्या आणि सामरिक दृष्टीने फार गंभीर बाब आहे. आपले लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्र मोदीजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करताना हवामानाचाही विचार करतात. अशा वेळी त्यांना चुकीची माहिती पुरवली गेली तर लष्करी कारवाई फसू शकते.

विचित्र वागणे म्हणजे काय व्यक्ती मनोरुग्ण आहेच असे नसते. त्यामुळे उगाच कोणालातरी मनोरुग्ण म्हणणे बेजबाबदार आहे. (डिफेन्स म्हणून असेल तरी.)

<< विचित्र वागणे म्हणजे काय व्यक्ती मनोरुग्ण आहेच असे नसते. त्यामुळे उगाच कोणालातरी मनोरुग्ण म्हणणे बेजबाबदार आहे. (डिफेन्स म्हणून असेल तरी.) >>

------ खोले यांच्या गुन्हेगारी कृत्याचे गांभिर्य कमी करण्याच्या कुटिल उद्देशाने त्या मनोरुग्ण आहे हे खोटे पुढे रेटायचे होते. या आधी पण अनेकदा खोटे लिहीलेले उघडे पडले आहे. खोले यांनी अनेक शोध निबंध ( co author आहेत) लिहेले आहेत, पैकी काही २०१३, २०१५ या काळांतले आहेत.
https://www.researchgate.net/profile/Medha-Khole

त्या आजही भारत सरकारच्या सेवेत उच्च पदावर ( Scientist F) कार्यरत आहेत, त्या काळांतही होत्याच.

Pages