इर्शाद

Submitted by स्वाती_आंबोळे on 27 October, 2021 - 12:46

संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?

असे आक्षेप घेणारी मंडळी दिवाळीत रेशमी कपडे, फटाके, आकाशकंदिल यांतलं काही वापरत नाहीत का? या तीनही गोष्टी मूळच्या चिनी आहेत, माहीत आहे ना?
सनईचे मंगल सूर ऐकताना ती बिसमिल्लाह खान यांनी वाजवली आहे हेच आठवत असेल का अशांना?

Happy Diwali लिहिलेली शुभेच्छापत्रं चालतात, आणि ‘इर्शाद’ चालत नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईर्शाद हे नाव त्या कार्यक्रमाला आधीपासूनच आहे.
>>>>>

ओके, मग पब्लिसिटी स्टंट नसावा. मला वाटले आता ठेवलेले नाव आहे. सध्याचे वातावरण पाहता लोहा गरम है, मार दो हतोडा टाईप्स Happy

बाकी आक्षेप घेणारे उथळ पब्लिसिटीसाठी करतात आणि सध्या जे देशात धार्मिक कट्टरतेचे वारे वाहताहेत ते चिंताजनक आहे याबद्दल शंका नाही.
पण त्याचवेळी राजकारणतही असतात ना, जे सेक्युलरपणाचे ढोंग करत आपली पोळी भाजून घेतात तशी शंका आलेली.

मूळ पोस्ट पुन्हा वाचली. त्या शेफाली वैद्य यांनाही बहुधा आधी असेच वाटलेले की यंदाचे नाव आहे. सुरुवातीला लेटेस्ट अपडेट लिहिलेय त्यात.
<<<<<<<< अपडेट
मला आत्ताच कळलं की इर्शाद हे नाव मटा कल्चर क्लबने ठेवलेलं नाहीये, ते ह्या कवींच्या प्रोग्रॅमचं आधीपासूनचं नाव आहे. मला वाटलं की हा थोडा दिवाळीला जश्न-ए-रिवाज म्हणण्यासारखा प्रकार आहे. तसा तो नाहीये, त्यामुळे काही लोकांना खालची खिल्ली कदाचित जरा जास्तच वाटू शकते. >>>>

अर्थात तरीही फेसबूक पोस्ट पाडायची गरज नव्हती म्हणा..

प्रतिसादांत अजून एक वाचले, की नाव बदलले आहे
<<< काव्यपहाट असं नवीन नामकरण केल्याचं मला आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. >>>

जर ईर्शाद २०१८ पासून होते तर मग आता नाव बदलायची काय गरज होती? काय राडा झाला असता हे एकदा बघायचे तरी होते. त्या फेसबूकपोस्ट पलीकडे हे प्रकरण जास्त चिघळले होते का?

वैभवने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट -

काव्य रसिकहो,
सप्रेम नमस्कार !
'इर्शाद' हा कार्यक्रम गेले सुमारे 5 वर्षांपासून, रसिकांच्या भरभरून प्रतिसादासह सादर होतो आहे. भारतात आणि भारताबाहेरही याचे प्रयोग संपन्न झाले आहेत.
कुठल्याही निमित्ताने नव्हे तर प्रामुख्याने मराठी कवितांसोबतच हिंदी, उर्दू कविताही यात सादर होत असल्याने, काव्यमैफिलीला समर्पक अशा 'इर्शाद' या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा आहे !! कुठल्याही दिवशी वा प्रसंगी ही मैफिल आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी व प्रायोजकांनी याची दखल घ्यावी, ही नम्र विनंती !
5 नोव्हेम्बर 2021 च्या कार्यक्रमाविषयी सांगायचे तर विचारांती नाव न बदलण्याचे ठरल्यावर हा कार्यक्रम आणि त्या नुसार साहजिकच पुढील जाहिरात रद्द करावी असे ठरले व त्या प्रमाणे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिरात आली नाही !
बदललेल्या नावासह सोशल मीडिया वर प्रसिध्द झालेली जाहिरात ही मुळात कशी आली व कुणी केली हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे , परंतु ती सर्वसंमतीने झालेली official जाहिरात नाही, याची कृपया नोंद घ्यावी !!
या साऱ्या पार्श्वभूमीवर, 5 नोव्हेंबर 2021चा कार्यक्रम दुर्दैवाने रद्द झाला आहे. रसिकांच्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत !! परंतु आपलं नातं हे शब्दांतून जुळलेलं आणि शब्दांपल्याड पोचलेलं आहे, या विश्वासासह लवकरच भेटू अशी आशा व्यक्त करतो !!
सर्व कलाप्रेमी रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

संदीप खरे,वैभव जोशी आणि रसिक साहित्य

कलाकाराचे काही expression विचार असतात जे त्यांच्या कार्यक्रमाच्या शीर्षकातून प्रकट होत असतात. पण या एकारलेल्या मेंदूंना ते कळणार नाही.
शेफाली ताईंचे उपद्रवमूल्य आता इतके वाढले आहे की त्यांनी एक सुंदर कार्यक्रम घरबसल्या रद्द करून दाखवला. हेच ते रामराज्य खरे _/\_

काही मुद्दे ज्यावर विचार व्हावा,
- सगळी मुसलमान लोकं मेन स्ट्रीम मध्ये आहेत का भारतात की ते स्वतःची वेगळी आयडेंटिटी जपतात? तसं नसेल तर मगच 'ईर्शाद' शब्द ठिक आहे.
- मुळात मराठी भाषेत कविता वाचनाला दुसरा शब्द नसल्यासारखे का वागत आहेत लोकं? एकीकडे मराठी भाषा समृद्ध करावी, जोपासावी असे हीच कलाकार मंडळी ओरडत फिरत असतात ना ?
- उद्या दिवाळीला जश्न ए दिये म्हणायला सुरवात केली तरी हरकत नाही असाच सूर दिसतोय एकंदरीत इथल्या मंडळींचा

जश्न ए दिये म्हणायला सुरवात केली तरी हरकत नाही >>> कश्याला घ्यायची हरकत. तसे म्हटल्याने आपल्या घरात लावलेले दिवे विझणारेत का? कि फराळाची चव बिघडणार आहे?
आनंद घ्या, आनंद द्या. हॅपी डिवाली!

कार्यक्रम रद्द झाला याची थोडी खंत आहे. मात्र या दोघांनी आणि टीमने जो स्टँड घेतला त्याबद्दल अत्यंत आनंद झालेला आहे. हा बाणा टिको, असाच कणा आणि प्रिव्हीलेज सगळ्यांना लाभो या शुभेच्छा!

उद्या दिवाळीला जश्न ए दिये म्हणायला सुरवात केली तरी हरकत नाही असाच सूर दिसतोय एकंदरीत इथल्या मंडळींचा

हरकत नाही. नाहीतरी फेस्टिव्हल ऑफ लाईट्स म्हणतातच ना, सातासमुद्रापल्याड वरून आलेले इंग्लिश चालते पण इथेच जन्मलेली उर्दू चालत नाही.

उर्दू ही मुसलमान लोकांची भाषा नाही. उर्दू ही मराठी इतकीच भारतीय भाषा आहे. इर्शाद कार्यक्रमात मराठी आणि ऊर्दू साहित्याचे वाचन होत आहे म्हणून हे छान शीर्षक आहे.
उद्या जर मराठी साहित्य आणि तमिळ साहित्य असे दोन्ही सादर करणारा कार्यक्रम असेल तर कुठला तरी तमिळ साहित्यातला शब्द शीर्षक म्हणून शोभेल.

Sad एकट्या शेफालीच्या नावाने बिल फाडून कसे चालेल, जि? दोघे कलाकार तितकेच जबाबदार आहेत. "मराठी बाणा" "कलाकाराचे स्वातंत्र्य" वगैरे ठीक आहे पण आज ह्या कार्यक्रमावर लोकांचे पोट अवलंबून होते. साऊंड, केटरर इ अनेक मंडळी असतात. भंसाळी नाही करत असं - पद्मावतची काँट्रोवर्सी झाली तरी अर्थकारणावर लक्ष ठेवून असतो तो. हे असं वागण फक्त मराठी माणूसच करू शकतो... मिडल पाथ जमला पाहिजे. तापदायक असल्या तरी दुसर्‍या पार्टीशी मिटींग्ज घ्यायला पाहिजेत, कार्यक्रम करायला पाहिजे. "इर्शाद नववर्षासाठी" किंवा तत्सम काही टॅगलाईन घेऊन - आपला मुद्दा सोडायचा नाही पण दुसर्‍याचा स्वीकारायची तयारी दोन्ही बाजूने हवी.

वैभव, संदीप आणि टिमचे अभिनंदन!!

सर्वांना जश्न -ए - दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा!!

कार्यक्रम का रद्द केला?
एनी पब्लिसिटी ईज गूड पब्लिसिटी. जी आयती मिळालेली. ती कॅश करायची सोडून कार्यक्रम कसले रद्द करताहेत.

पब्लिसिटी "कॅश" केली नाही तरी कार्यक्रम करायला हवा होता. एक कार्यक्रम असला की लोकल इकॉनॉमीला चालना मिळते - झब्बा/साडी लाँड्रीत देतात, रिक्षा/ओला-उबर ने जातात, नंतर काही खाणे-पिणे होते इ इ. दोन्ही पार्टीजना असं वागून काय मिळालं? आपल्याच लोकांचे नुकसान झाले.

सी, मी असते तर मी ही रद्दच केला असता. उगीच दिवाळीच्या दिवशी सर्वांना टेन्शन मध्ये ठेवून पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम करण्यापेक्षा एखाद्या रविवारी मस्तपैकी कार्यक्रम करता येईलच. उगाच कशाला आ बैल मुझे मार!
त्यांचा स्वतःचा भरपूर श्रोतृवर्ग आहेच आधीपासून.

ईर्शाद हा कदाचित जास्त चपखल, जास्त लोकांना समजणारा, आवडणारा शब्द असेल म्हणून तो वापरला. तितकाच समर्पक शब्द मराठीत आहे का? तो ईर्शाद इतकाच जास्त चपखल, जास्त लोकप्रिय आहे का? नाही? का नाही?

आजहि लोक महाराष्ट्रात, पुण्यात, मराठी लोकांच्या समुदायात राहूनहि मराठीत योग्य शब्द असतानाहि इंग्रजी किंवा इतर भाषातले शब्द सहज वापरतातच. असे का? इतर भाषांतले शब्द मराठीत जास्त लोकप्रिय होतातच का? हिंदी चित्रपटच जास्त का चालतात महाराष्ट्रात? त्यातलेच संवाद लोकांच्या जास्त लक्षात का रहातात?
मराठी साहित्य, मराठी चित्रपट हे सर्व जास्त प्रसिद्ध का होत नाहीत?
अजूनहि शेक्स्पियर वगैरे लोकांचे गोडवे गायले जातात. मराठीत काय कमी चांगले साहित्यिक होऊन गेले? ते कुठे गेले?
जाउ द्या झाले. असले प्रश्न उगाचच मनाला पडतात. म्हणून लिहीले. जास्त लक्ष देऊ नका.
उगाचच इतर इतके लोक लिहितात तर मीच का नको म्हणून लिहीले?

मग जर कलाकारांनाच दिवाळीची पडलेली नाही नि "मस्त रविवारी" आणि दिवाळीच्या दिवशी म्हणजे सारखचं असेल तर शेफालीच्या नावावर बिल कशाला फाडायचं? तिने बरोबर त्यांच्या वैचारिक गाभ्याला हात घातला. सगळे दिवस सारखेच असतील तर ज्यांना ते सारखे नाहीत त्यांच्या मनासारखं होऊ दे. कॉन्फ्लिक्ट का येते? When two or more parties want the same thing. If you don't then it's fair to take turns. दिवाळी करणारे दिवाळी करतील मग मस्त रविवार वाले रविवार करतील...

>>>इ इ. दोन्ही पार्टीजना असं वागून काय मिळालं? आपल्याच लोकांचे नुकसान झाले.

सीमांतीनीजी , तुमच्या या वाक्यातून असे ध्वनित होते कि दोन्ही पार्टीज रिझनेबल होत्या आणी both were acting in good faith. तसे काही नाही. एखाद्या दुकानात स्थानीक गुंड आले व दहा हजार रुपये खंडणी मागू लागले तर तुम्ही पाच हजारावर तडजोड करा असे म्हणाल का?

असो, मुनव्वर चा मुंबईतला शो ही रद्द झाला.

एखाद्या दुकानात स्थानीक गुंड आले व दहा हजार रुपये खंडणी मागू लागले तर तुम्ही पाच हजारावर तडजोड करा असे म्हणाल का? >> जर त्या दुकानावर लोक अवलंबून असतील तर असे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात. चांगले/योग्य नाही पण लाँग टर्म सोल्यूशन शोधयला वेळ विकत घ्यावा लागतो.
असो, दुसर्‍याने कसे वागावे हे सांगणे नेहमीच सोपे असते. कलाकार व शेफालीबाई त्यांच्या त्यांच्या तत्त्वाशी प्रामाणिक राहिले बद्दल त्यांनाही शुभ दिपावली.

"मराठी बाणा" "कलाकाराचे स्वातंत्र्य" वगैरे ठीक आहे पण आज ह्या कार्यक्रमावर लोकांचे पोट अवलंबून होते. साऊंड, केटरर इ अनेक मंडळी असतात. भंसाळी नाही करत असं >>> त्यांनी फक्त त्या दिवशीचा कार्यक्रम रद्द केलाय ना. बाकी गेले ५ वर्षे हा कार्यक्रम भरभरून प्रतिसादासह सादर होतो आहे तर पुढेही चालूच राहील. दिवाळी पहाटेला नाही केला कार्यक्रम तरी बाकी ३६४ पहाट आहेतच.

आता दगडफेक करणाऱ्या कंत्राटी लोकांचा जॉब गेला, थिएटर जळलं असतं तर किमान १०० २०० जॉब नवीन तयार झाले असते. ते ही वर्ष दीड वर्षासाठी. गवंडी, सुतार, प्लंबर, एलेक्त्रिशियन... बऱ्याच लोकांना कामं मिळाली असती. अशी हवा गेलेली पोस्ट म्हणजे पेज व्हू ची बोंब. ते आणखीच वेगळं अर्थकारण. टेररिस्ट शी निगोशियट करणार्यांना ही जॉब मिळाला असता त्या वैद्य काकूंशी निगोशियट करायला ते वेगळंच.

मिडल पाथ जमला पाहिजे. >>

इथे मिडल पाथ म्हणजे अर्धा कार्यक्रम ईर्शाद नावाने करायचा आणि अर्धा काव्यपहाट नावाने करायचा. इंटरव्हलच्या आधी ईर्शाद आणि नंतर काव्यपहाट. पहा बुवा.

अमितव, भास्कराचार्य Happy मस्त सॅर्काझम!! आवडल्या पोस्टी. पण माझ्यासारख्या मध्यममार्ग शोधणार्‍यांची नेहमी पंचाईत असते, दोन्ही पार्टीजना मध्यममार्गी पोस्टी अप्रिय, निर्बुद्ध इ इ वाटतात. पण अवघडातल्या अवघड सिच्यूएशन मध्ये लोकं निगोशिएट करतात. प्रयत्न करायला हरकत नव्हती. यशस्वी झाले ही नसते पण 'गुड फेथ' आहे का नाही हे दोन्ही बाजूकडून एकमेकांना संधीच दिली नाही.

मग जर कलाकारांनाच दिवाळीची पडलेली नाही नि "मस्त रविवारी" आणि दिवाळीच्या दिवशी म्हणजे सारखचं असेल तर शेफालीच्या नावावर बिल कशाला फाडायचं?>>
मुळात हा कार्यक्रम काही दिवाळी पहाट पुरता मर्यादित कार्यक्रम नाही. संयोजकांनी तो दिवाळी पहाट निमित्ताने निवडला होता. मात्र याचे इतर वेळीही कार्यक्रम होत असतात. जर का ईर्शाद नावाने हा कार्यक्रम ठेवणे संयोजकाना नको असेल तर, इतर काही सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला असेल तर कार्यक्रम रद्द होणे स्वाभाविक आहे.
कलाकारांनी नाव बदलायला नकार देवून त्यांच्या बाजूने निर्णय घेतलाय. आर्थिक नुकसानाबाबत बोलायचे तर ही ध्रुविकरणामुळे मोजायला लागलेली किंमत आहे. त्याचे बील सातत्याने ध्रुविकरणासाठी झटणार्‍यांवर नाही फाडायचे तर मग कुणावर?

नतद्रष्ट लोकांच्या मूर्खपणाला बळी पडण्यापेक्षा कार्यक्रम रद्द केला हे ठीकच. पण त्याहीपेक्षा नाकावर टिच्चून ‘ईर्शाद’ हेच नाव ठेवून कार्यक्रम केला असता तर आणखीन बरं वाटलं असतं.

अमितव & भास्कराचार्य लोल!!! Lol Lol

>>>>>इंटरव्हलच्या आधी ईर्शाद
हे म्हणजे परकिय भाषेला प्राधान्य दिल्यासारखे आहे. पहीलं इर्शाद का?? पहीलं काव्यपहाट का नाही. Wink

Pages