सात आठ महीने झाले अॅपल वॉच घेउन. बरेच उपयोगी आहे.
आठवडा झाला जिम जॉइन करुन. अचानक अॅपल वॉचवरती नोटिफिकेशन्स येऊ लागली - कार्डीओ फिटनेस लेव्हल अति कमी (Poor) आहे.
https://www.whyiexercise.com/VO2-Max.html
इथे वाचनात आले माझ्या वयाला, स्त्रियांची कार्डिओ फिटनेस लेव्हल अगदी Poor - २१-२४ आहे.
माझी तर १९ दाखवते. त्यामुळे हादरले आहे.
---------------------------------------------------------
अचानक जिममध्ये ३-३ कार्डिओ मशिन्स सुरु केलेली आहेत. पूर्वी फक्त ४० मिनिटे स्टेशनरी सायकल किंवा चालणे होत असे. गेल्या आठ दिवसात अचानक वॉकिंग, रोईंग बोट मशिन, एलिप्टिकल मशिन्स वगैरे सुरु केलेले आहे. ४० ते ५० मिनीटे व्यायाम होतो.
पण फायद्याऐवजी तोटाच होतो आहे असे जाणवले. कारण बरोब्बर त्या ८ दिवसातच कार्डिओ फिटनेस लेव्हल पार तळाला गेलेली आहे. म्हणजे पूर्वी Poor होती = २० ती आता Very Poor = १९ दाखवते.
---------------------------------------------------------
वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल हा समग्र्/संपूर्ण आरोग्याचा फार म्हणजे प्रचंड महत्वाचा गुणांक (इंडिकेटर) असतो. हृदयाचे आरोग्य, मधुमेह, डिमेन्शिआ व अल्झाईमर्स आदि धोकेही या गुणांकावरुन कळू शकतात. हे खरे आहे का? तसेच काही औषधांमुळेही कार्डिओ फिटनेस लेव्हल कमी होत असावी - असा माझा कयास आहे. असे वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल जरी अगदी ३.५ गुणांकाने वाढली तरी अकाली मृत्युची टक्केवारी १३% नी घटते. You'd get similar health benefits by reducing your waist by 7 cm or lowering your blood pressure by 5 points.
-----------------------------------------------------------
माबोवर व्यायाम विषयक, पुढील धागे सापडले -
https://www.maayboli.com/node/43628
https://www.maayboli.com/node/55942
https://www.maayboli.com/node/37573
अजुन एक केदार यांच्या धाग्यात = https://www.maayboli.com/node/55942 , पुढील प्लॅन दिलेला आहे- अगदीच सुरूवात करणार्यांसाठी रोजचा प्लान.
सोमवार - रेस्ट
मंगळ - वर्क आउट
बुध - वर्क आउट
गुरू - रेस्ट
शुक्र - वर्क आउट
शनि - वर्क आउट
रवी - रेस्ट
पण माझा प्रॉब्लेम हा आहे की एक दिवस जरी व्यायाम चुकवला ना तरी दुसर्या दिवशी प्रचंड कंटाळा येतो.
-------------------------------------------------
व्यायाम कसा व कितपत सुरु करावा हे अर्थात वय, वजन, जीवनशैली यावर अवलंबुन असेल. परंतु तरी कोणी काही पॉइन्टर्स देउ शकता का? अचानक जोरशोरसे व्यायाम सुरू केल्याने काही धोके संभवतात का? आपले अनुभव मांडले तर उत्तमच. तसेच कार्डिओ फिटनेस लेव्हल बद्दल माहीती दिली तर दुधात साखर. अजुन एक - व्यायामानंतर शवासन वगैरेही मी करत नाही. कारण वेस्ट ऑफ टाईम वाटते. रेस्टलेस वाटते वगैरे. बहुतेक असा आराम न केल्यानेही काही तोटे होत असावेत.
पेसर एपवर पावले , अंतर , वेग,
पेसर एपवर पावले , अंतर , वेग, जाळलेल्या कॅलरी सगळे समजते
तुमचे एकूण अंतर , आणि कंपनी / ग्रुप चेही सगळे कळते , कोण किती चालला इ
Step Set Go
Step Set Go
साइट डाऊन मेसेज येतोय. उद्या बघू.
पेसर अॅपमध्ये दोन पावलांतलं अंतर व इतर गोष्टी कशा सेट कराव्या
पण आपणच आपले एक किमी = किती पावले काढू शकतो.
१)जीपीएस, वापरून एक किमी चालायचं.
२) तिथून परत येताना पावलं मोजायची.
हाच प्रयोग पाचशे मिटरला,दोनशे मिटरला वेगवेगळ्या ठिकाणी करून सरासरी काढायची. मग काय पावलं मोजायला नकोच. फक्त मिटरस कळले की झालं.
गच्चीची किंवा घरातल्या खोलीत फेऱ्या मारतो त्याची लांबी आणि किती फेऱ्या अंदाजे याप्रमाणे एक्सेल शीटमध्ये टाकून पुढच्या कॉलममध्ये पावलांचा फॉर्मुला टाकायचा. मग त्यावर कलेंडर सोपस्कार,मिनिमम,अवरेज, इत्यादी . हे मुलांना गंमत म्हणून काम देता येईल. एक्सेल आपलीच आहे.
आजकाल चालणे होते आहे. माईल्ड
आजकाल चालणे होते आहे. माईल्ड व्यायामाने, मूड खूपच उल्हासित रहातो. आजूबाजूची फुले टिपत केलेला व्यायाम खूप आनंद देतो.
काय सुंदर आहेत फुलं.
काय सुंदर आहेत फुलं.
सामो, फुलांचे फोटो
सामो, फुलांचे फोटो मस्त आहेत. छन्दिफन्दि यांच्या रस्त्याने जाता जाता अशा काहीशा नावाच्या धाग्यावर ते अधिक योग्य आहेत. त्यांनी इतरांनाही त्या धाग्यावर फोटो द्यायला सुचवलं आहेच.
हा धागा वर आला आणि आठवलं की ध्यान हेही स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. मानसिक ताण तणावामुळे शारीर क्रिया बिघडतात. त्यावरचा एक उपाय ध्यान. मी ब्रह्मविद्येचा कोर्स केलाय आणि त्यात ध्यान शिकवलं होतं. त्यानंतर मी कधी केलं नाहीए. आता मला ते करणं शक्य आहे, तेव्हा मलाच रिमाइंडर आणि चॅलेंज म्हणून इथे लिहून ठेवतो.
बाकी माझा व्यायाम सध्या ऑल्मोस्ट बंद आहे. आता फक्त स्ट्रेचिंग करतोय. जेव्हा करायचो तेव्हा सकाळी सहाला चालायला जाणं -३५-४० मिनिटे. मग घरी येऊन स्ट्रेचिंग ; बॉडि वेट् , लाइट वेट्स वापरून घरीच दर दिवशी एक भाग याप्रमाणे सेट्स आणि रिपिटिशन्स . हे कंटाळवाणं होऊ लागलं आणि चॅलेंज संपलं ( रिपिटिशन्स, डिफिकल्टी वाढवायचे नाहीत) म्हणून 8 fit या अॅपप्रमाणे एक सेशन. आणि शेवटी ब्रह्मविद्येचे श्वास+ शरीराचे व्यायाम प्रकार. हे थोडेफार tai chi सारखे आहेत. पूर्ण लक्ष देऊन केलं तर रिलॅक्सिंगही आहेत. सगळं मिळून दीड - दोन तासांचं रूटिन आहे.
यंदा उकाडा इतका भयंकर होता की सकाळीही व्यायाम नकोसा वाटे. आता पावसाळा सुरू झालाय तर बाहेर चालणं सोडून बाकीचे करेन. बोट वेव्हला दर तासाला किमान ३०० पावलं चालायचं रिमांइडर लावून ठेवलंय. त्याकडे दुर्लक्ष करायचं बंद करेन.
भरत ,
भरत ,
आज कुठला व्यायाम केला असा धागा आहे का ? नुसत्या रिमाईन्डरचा, टोचणी हवी आहे. वाहताही चालेल. नसाल तर काढता का ? काढावा का ?
फुलं छान आहेत सामो.
केदार जाधव यांचा धागा आहे.
केदार जाधव यांचा धागा आहे.
https://www.maayboli.com/node/69600
व्यायाम + आहार.
ओके, थॅंक्स. बम्प अप करू
ओके, थॅंक्स. बम्प अप करू त्यालाच. नाही सापडला. ते धागे वजन कमी करण्याच्या संदर्भात आहेत. सुटसुटीत आजचा मेनू टाईप हवा होता.
सर्वांचे आभार. केदार जाधव
सर्वांचे आभार. केदार जाधव यांचा धागा पहाते.
अस्मिता, वर लिंक दिलीय तो
अस्मिता, वर लिंक दिलीय तो आजचा मेन्यु टाइपच आहे. स्वतःला दहापैकी गुण द्यायचे आहेत.
हा धागा पण छान आहे.
हा धागा पण छान आहे.
केदार जाधव ह्यांचं धागा आणि गुणांक देण्याची सिस्टीम ज्यात व्यायाम आणि आहार दोन्हींचा समावेश आहे. ती खूप sensible Ani sustainable वाटली.
माय two cents for cardio.
Mi pan khup weak / low level la aahe tyat.
पण आमच्याकडे जे फिटनेस freak आहेत त्यांच्याकडून मिळालेले and verified Gyan.
१. सूर्यनमस्कार १२-२०, repeatation मध्ये
२. स्टेप्स ( अमेरिकेत ह्याची कमी असते)
३. Jumping jacks, wall kicks, mountain climbing, plank, squats, dying turtle ह्यातलं आलटून पालटून २-३ च repeatation करायचं.
चालण्यापेक्षा हे वराचे घरच्या घरी करायचे exercises जास्त cardio intensive आहेत. कमी वेळेत जास्त exercise hya दृष्टीने.
अगदीच सोपं काही करायचं तर चालायला जायचं. किंवा biking करायचं.
मी बहुदा चुकीची असेन पण हे
मी बहुदा चुकीची असेन पण हे watches mala khup जास्त reliable NAHI वाटत
त्यात sensitivity adjust करता येते, नाहीतर तुम्ही जाता हलवला तरी स्टेप्स count होतात. बरेच जणांकडून १०००० स्टेप्स मग आरामात होतात. पण actually १०,००० steps प्रत्यक्षात itkyaa aramat पण nahi होत.
Just majh ek observation
बहुदा २००६-७ दरम्याने. एक GM
बहुदा २००६-७ दरम्याने. एक GM डाएट म्हणून मी नवीन ऐकलेल. ऑफिस मध्ये दोघी तिघींनी केलेल.
७-८ दिवसांचा प्लॅन असतो
१ल दिवस - फक्त भाज्या
२ duwas- फक्त फळ
३ दिवस - भाज्या फळं
४ दिवस - केळी आणि दूध
५diwas- tomatoes Ani थोडासा भात
६ दिवस -
७ दिवस
आणि विशिष्ट पद्धतीने बनविलेले सूप असते ते कितीही घेऊ शकतो.
आता इतक्या वर्षानंतर मला पूर्ण sequence आठवत नाहीये नीट. पण असच crash diet.
त्यात तुमचं वजन/ फॅट्स दोन्ही कमी होतात. पण तुमची भूकच खूप कमी होते. Don ek महिने तरी त्यात जातात पूर्ववत भूक लागायला.
खूप कठीण होत विशेषकरून केळी - दूध आणि tomatoes che diwas.
Won't recommend it to anyone... On त्यावेळी हे एकदम बेस्ट वाटलेल.
इन्टरमिटन्ट फास्टिंगचा मला
इन्टरमिटन्ट फास्टिंगचा मला प्रहचंड उपयोग झालेला आठवतो. ते सुरु केलं पाहीजे.
Pages