व्यायाम / जिम/ कार्डिओ फिटनेस लेव्हल

Submitted by सामो on 30 August, 2021 - 05:41

सात आठ महीने झाले अ‍ॅपल वॉच घेउन. बरेच उपयोगी आहे.
आठवडा झाला जिम जॉइन करुन. अचानक अ‍ॅपल वॉचवरती नोटिफिकेशन्स येऊ लागली - कार्डीओ फिटनेस लेव्हल अति कमी (Poor) आहे.
https://www.whyiexercise.com/VO2-Max.html
इथे वाचनात आले माझ्या वयाला, स्त्रियांची कार्डिओ फिटनेस लेव्हल अगदी Poor - २१-२४ आहे.
माझी तर १९ दाखवते. त्यामुळे हादरले आहे.
---------------------------------------------------------
अचानक जिममध्ये ३-३ कार्डिओ मशिन्स सुरु केलेली आहेत. पूर्वी फक्त ४० मिनिटे स्टेशनरी सायकल किंवा चालणे होत असे. गेल्या आठ दिवसात अचानक वॉकिंग, रोईंग बोट मशिन, एलिप्टिकल मशिन्स वगैरे सुरु केलेले आहे. ४० ते ५० मिनीटे व्यायाम होतो.
पण फायद्याऐवजी तोटाच होतो आहे असे जाणवले. कारण बरोब्बर त्या ८ दिवसातच कार्डिओ फिटनेस लेव्हल पार तळाला गेलेली आहे. म्हणजे पूर्वी Poor होती = २० ती आता Very Poor = १९ दाखवते.
---------------------------------------------------------
वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल हा समग्र्/संपूर्ण आरोग्याचा फार म्हणजे प्रचंड महत्वाचा गुणांक (इंडिकेटर) असतो. हृदयाचे आरोग्य, मधुमेह, डिमेन्शिआ व अल्झाईमर्स आदि धोकेही या गुणांकावरुन कळू शकतात. हे खरे आहे का? तसेच काही औषधांमुळेही कार्डिओ फिटनेस लेव्हल कमी होत असावी - असा माझा कयास आहे. असे वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल जरी अगदी ३.५ गुणांकाने वाढली तरी अकाली मृत्युची टक्केवारी १३% नी घटते. You'd get similar health benefits by reducing your waist by 7 cm or lowering your blood pressure by 5 points.
-----------------------------------------------------------
माबोवर व्यायाम विषयक, पुढील धागे सापडले -
https://www.maayboli.com/node/43628
https://www.maayboli.com/node/55942
https://www.maayboli.com/node/37573

अजुन एक केदार यांच्या धाग्यात = https://www.maayboli.com/node/55942 , पुढील प्लॅन दिलेला आहे- अगदीच सुरूवात करणार्‍यांसाठी रोजचा प्लान.
सोमवार - रेस्ट
मंगळ - वर्क आउट
बुध - वर्क आउट
गुरू - रेस्ट
शुक्र - वर्क आउट
शनि - वर्क आउट
रवी - रेस्ट
पण माझा प्रॉब्लेम हा आहे की एक दिवस जरी व्यायाम चुकवला ना तरी दुसर्‍या दिवशी प्रचंड कंटाळा येतो.
-------------------------------------------------
व्यायाम कसा व कितपत सुरु करावा हे अर्थात वय, वजन, जीवनशैली यावर अवलंबुन असेल. परंतु तरी कोणी काही पॉइन्टर्स देउ शकता का? अचानक जोरशोरसे व्यायाम सुरू केल्याने काही धोके संभवतात का? आपले अनुभव मांडले तर उत्तमच. तसेच कार्डिओ फिटनेस लेव्हल बद्दल माहीती दिली तर दुधात साखर. अजुन एक - व्यायामानंतर शवासन वगैरेही मी करत नाही. कारण वेस्ट ऑफ टाईम वाटते. रेस्टलेस वाटते वगैरे. बहुतेक असा आराम न केल्यानेही काही तोटे होत असावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्प्स मस्त आहे की तुमचं रुटीन. >> +१०० रोज दोन गुलाबजाम स्केड्युलमध्ये देणारा कोण हा डायटीशियन?? सिरीयसली, मला पत्ता द्या Lol

रोज नाही, जेंव्हा इच्छा असेल तेंव्हा दोन गुलाबजाम, नाही तर आईस्क्रीम, एखादी स्वीट डिश...

मीच तयार केलाय डायट...

आईस्क्रीम, गुलाबजाम खातात आणि बलक फेकून देतात.. फारच प्रगत आहारशास्त्र आहे म्हणायचे हे.

अंड्याच्या बलकात खूप कोलेस्ट्रॉल असतं. पांढ्र्यात नसतं.>> second hand माहिती वरून बलक न खाण्याचे ठरवले असेल तर माहिती तपासून पहा.
एक माननीय डॉक्टर आहेतच इथे त्यानाच विचारून बघा हवे तर.

आईस्क्रीम, गुलाबजाम खातात आणि बलक फेकून देतात.. फारच प्रगत आहारशास्त्र आहे म्हणायचे हे.
>> शास्त्र काय त्यात.. पिवळा भाग आवडत नाही, गुलाबजाम आवडतो... रोज नाही खात, जेंव्हा अव्हेलेबल असेल तेंव्हा... बाकीचे वाचलेत का..

पूर्वी साध्यासुध्या मेडिकल टेस्टस असत. त्यातून आरोग्य कसे आहे हे डॉक्टरांना कळायचे. ( इंटरव्यू पास झाल्यावरची मेडिकल) आता यासाठी यंत्रे आली आणि त्याचे रीडिंग कागदावर लिहिले की डेटा तयार होतो. तो दरवर्षी तुलनात्मक पाहता येतो.
तर असे एआइ वापरून वॉचमध्ये कार्डिओ फिटनेस लेवल संख्या आली असणार.
पण हीसुद्धा तुलनात्मकच पाहायला हवी. म्हणजे जास्ती/कमी/उत्तम/धोकादायक इत्यादी. म्हणजे एकाच व्यक्तीची २०-२५-३०-३५-४०.... वयाची हिस्ट्री हवी.

साताठ महिन्यापूर्वी २० होती आणि आता १९ म्हणजे आता खूप कमी नाही. ओके. थोड्या हालचाली करून ,आहार बदल करून ठीक होईल आणि नोटिफिकेशन रेडमधून ब्लू ग्रीन होईल. कारण पुन्हा हिस्ट्रीच. १९ वरून २० म्हणजे सुधारणा.

बाकी apple watch मध्ये सेन्सरस आहेत 1.accelerometer, 2.orientation,३. gps,4.heart beats,5.pressure वगैरे. घड्याळ हातावर आहे, फक्त पायांचे व्यायाम केल्यावर क्र 1,2 मध्ये काय फरक होणार? पण 4,5 वाढणार.
पोहणे,धावणे केल्यास मात्र सर्वच बदलणार. थोडक्यात सेन्सरांचे रीडिंगज आणि एआइ याची काही सांगड घालून कॉम्पोझिट नंबर 'कार्डिओ फिटनेस लेवल' दर्शवत असणार.

>>>> (३०-४० मिनिटे) हार्ट बीट(२००-तुमच वय) याच्या ८० टक्के इतका जास्तीत जास्त पोचला पाहिजे.
माझा बराच वर जातोय. मॅक्स = १५५ होता आज. अ‍ॅव्हरेज = ११३ - १२० होता

(२००-४८) = १५२
१५२ चे ८०% म्हणजे (१५२ * ८०) /१०० = १२१

बघते त्रास झाला तर बंद करेन. अद्याप त्रास झालेला नाही.

कंपनीनेसर्व इम्पोईजना चालणे एडव्हाईज केले आहे

एक एप दिले आहे , ते पावलेमोजते , पेसर

पण मी पाहिले तर , आपण एक पाऊल ठेवतो , मग पुढचे पाऊल मध्ये फुटभर जागा सोडून ठेवतो

तर ते एप 2 की 3 पावले मोजते , मग 7 वंडर्स टार्गेट आहे, म्हणजे या महिन्यात मुंबई ते ताजमहाल इतके अंतर सर्वांचे मिळून व्हावे इत्यादी असते

ह्यांचे मोजण्याचे गणित कसे असते ?

आपले एक पाउल किती लांबीचे, सेन्सिटिव्ह कमी ठेवायचे का जास्त हे सेटिंग मधून बदलता येते.म्हणजे सिग्नल ला गाडी हळू झाली तर स्टेप म्हणून मोजले गेले इतके सेन्सिटिव्ह किंवा मग अगदी जोरात हात हलवून चालले तरच पाऊल मोजले गेले इतके कमी सेन्सिटिव्ह पण.
कोणते ऍप आहे सांगा.माझ्याकडे असेल तर स्क्रीनशॉट देते.

इथे थोडं अवांतर आहे पण तरीही विचारते-माझ्या पावणे पाच वर्षांच्या मुलाला 15 दिवसापासून pull up आणि push up ची खूप आवड निर्माण झाली आहे,
Push up 20 आणि pull up 10 करण्याचा प्रयत्न करतो तो,pull up sathi झोपळ्याचा बार आहे
तर इतक्या लवकर हे सुरू करून काही त्रास नाही न होणार?

मुलं खेळताना असं लटका-लटकी करतातच. जोवर स्वतःहून काही दुखतंय म्हणत नाही, तोवर काही त्रास आहे असं वाटत नाही.

पेसर मध्ये स्टेप साईझ चे नाहीय.आता पूर्ण सेटिंग चाळून पाहिले.मी आधी एक वापरायचे त्यात होतं.बहुतेक व्हॅनटेज फिट असेल.

Steps counter आणि पावले मोजणे यापेक्षा किती अंतर ( किमी/miles) चाललो दाखवणारी असंख्य apps आहेत मोबाइलात. तीच वापरावीत. ( १ किमी = २००० पावले हा ढोबळ हिशोब.) पाच मिटरस रेझलूशनवाला जीपीएस यास पुरतो.
खेळाडु लोकांनाच एक ते तीन मिटर रेझलूशनचा भारी जीपीएस लागेल.

वेग : अगदी संथपणे रमतगमत म्हणजे एका तासात तीन किमी चाल.
ठीकठाक चाल म्हणजे एका तासात चार किमी.
जलद तरातरा चाल म्हणजे तासात पाच किमीपेक्षा अधिक वेग.

जी पी एस आणि पावलं असं दोन्ही हवं.पेसर, एम आय फिट वगैरे मध्ये दोन्ही आहे.
मी कधीकधी भाजी होईपर्यंत घरात किंवा मग गच्चीवर चालते.अश्यावेळी मग नुसतंच जी पी एस बघणारी ऍप नीट नोंद करत नाहीत.

अरे अशी बियर लगेच बंद नका करायला लाऊ अरारा. आमचं कसं व्हायचं मग! Lol बियर मध्ये कॅलरी, कार्ब्स खुप असतात हे कबूल आहे पण लाईट, अति चिल्ड आणि क्रिस्प अशा ड्राफ्ट बियर ला तोड नाही. त्यात कॉकटेल्स किंवा रम/व्हिस्की वगैरे मध्ये अल्कोहोल प्रचंड असते आणि ते सगळ्यांनाच सुट होईल असं नाही. लिव्हरला ते पण घातकच आहे की? त्या मानाने लाईट बियर केव्हाही चांगली.

च्रप्स, रुटिन चांगलं आहे पण बहुतेक तुमचा व्यायाम भरपूर होत असावा म्हणून येवढया चालत आहेत कॅलरिज. दिवसातून खुप वेळा खाणं मला मॅनेज नाही करता येत आणि घरात डायबिटिस आहे त्यामुळे मी जास्तीत जास्त ३ वेळा खातो. कार्डियो आजकाल सकाळी जमतोय करायला त्यामुळे जवळ जवळ ७ मधले ५ दिवस तरी बर्‍यापैकी चालणं होतं. वेट्सचा व्यायाम आठवड्यातून ३ वेळा. त्यात खाडे होतात थोडे पण जास्त त्याचा लोड नाही घेत. चांगलं जमतय हे रुटिन.

एच आर लोकांना रिकाम टेकडी कामे मिळाली आहेत

कामाची वेबसाईट 1 , पासवर्ड 1

आणि ह्या असल्या ऍप , वेबसाईट , स्वतंत्र 'फेसबुक ' , मानजमेंट कोर्सेस व्हिडीओ ह्यांचे पासवर्ड 8 झालेत. प्रत्येक लॉगिन पासवर्डचा मॅनेजर वेगळा आहे.त्यांच्या जोड्या जुळवण्यात महिनाभर जाईल

कागद व्हेरिफाय करा, एड्रेस व्हेरिफाय करा, पोलीस इनकवायरी ह्यातच महिनाभर गेला, अजून आयडी आलाच नाही, मग ते ऑटोमॅटिक दार आत घेत नाही म्हणे , अजून कंपनीत गेलोच नाही. अजून एकही पेशंट बघितलेला नाही. congratulation for completing 15 days असा मेलही आला तोवर .

तेवढ्यात हे एप 12 किलोमीटर चालून झाले , असे दाखवत आहे.

ह्या 15 दिवसाच्या पगारातून कपाट घेऊन त्यावर स्पॉन्सरड बाय .... असे लिहावे म्हणतो, नुसता घरी 12 किमी चालायचा पगार मिळणार

Proud

Pages