सात आठ महीने झाले अॅपल वॉच घेउन. बरेच उपयोगी आहे.
आठवडा झाला जिम जॉइन करुन. अचानक अॅपल वॉचवरती नोटिफिकेशन्स येऊ लागली - कार्डीओ फिटनेस लेव्हल अति कमी (Poor) आहे.
https://www.whyiexercise.com/VO2-Max.html
इथे वाचनात आले माझ्या वयाला, स्त्रियांची कार्डिओ फिटनेस लेव्हल अगदी Poor - २१-२४ आहे.
माझी तर १९ दाखवते. त्यामुळे हादरले आहे.
---------------------------------------------------------
अचानक जिममध्ये ३-३ कार्डिओ मशिन्स सुरु केलेली आहेत. पूर्वी फक्त ४० मिनिटे स्टेशनरी सायकल किंवा चालणे होत असे. गेल्या आठ दिवसात अचानक वॉकिंग, रोईंग बोट मशिन, एलिप्टिकल मशिन्स वगैरे सुरु केलेले आहे. ४० ते ५० मिनीटे व्यायाम होतो.
पण फायद्याऐवजी तोटाच होतो आहे असे जाणवले. कारण बरोब्बर त्या ८ दिवसातच कार्डिओ फिटनेस लेव्हल पार तळाला गेलेली आहे. म्हणजे पूर्वी Poor होती = २० ती आता Very Poor = १९ दाखवते.
---------------------------------------------------------
वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल हा समग्र्/संपूर्ण आरोग्याचा फार म्हणजे प्रचंड महत्वाचा गुणांक (इंडिकेटर) असतो. हृदयाचे आरोग्य, मधुमेह, डिमेन्शिआ व अल्झाईमर्स आदि धोकेही या गुणांकावरुन कळू शकतात. हे खरे आहे का? तसेच काही औषधांमुळेही कार्डिओ फिटनेस लेव्हल कमी होत असावी - असा माझा कयास आहे. असे वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल जरी अगदी ३.५ गुणांकाने वाढली तरी अकाली मृत्युची टक्केवारी १३% नी घटते. You'd get similar health benefits by reducing your waist by 7 cm or lowering your blood pressure by 5 points.
-----------------------------------------------------------
माबोवर व्यायाम विषयक, पुढील धागे सापडले -
https://www.maayboli.com/node/43628
https://www.maayboli.com/node/55942
https://www.maayboli.com/node/37573
अजुन एक केदार यांच्या धाग्यात = https://www.maayboli.com/node/55942 , पुढील प्लॅन दिलेला आहे- अगदीच सुरूवात करणार्यांसाठी रोजचा प्लान.
सोमवार - रेस्ट
मंगळ - वर्क आउट
बुध - वर्क आउट
गुरू - रेस्ट
शुक्र - वर्क आउट
शनि - वर्क आउट
रवी - रेस्ट
पण माझा प्रॉब्लेम हा आहे की एक दिवस जरी व्यायाम चुकवला ना तरी दुसर्या दिवशी प्रचंड कंटाळा येतो.
-------------------------------------------------
व्यायाम कसा व कितपत सुरु करावा हे अर्थात वय, वजन, जीवनशैली यावर अवलंबुन असेल. परंतु तरी कोणी काही पॉइन्टर्स देउ शकता का? अचानक जोरशोरसे व्यायाम सुरू केल्याने काही धोके संभवतात का? आपले अनुभव मांडले तर उत्तमच. तसेच कार्डिओ फिटनेस लेव्हल बद्दल माहीती दिली तर दुधात साखर. अजुन एक - व्यायामानंतर शवासन वगैरेही मी करत नाही. कारण वेस्ट ऑफ टाईम वाटते. रेस्टलेस वाटते वगैरे. बहुतेक असा आराम न केल्यानेही काही तोटे होत असावेत.
पूर्वी गणेशोत्सवाच्या
पूर्वी गणेशोत्सवाच्या जाहिराती फक्त गप्पांच्या वाहत्या पानांवर यायच्या. आजकाल ट्रेण्ड बदल रहा है असे दिसते.
***
माझे २ पैसे.
व्यायाम का करीत आहात, ते ठरवा.
वयाच्या ४५-५० नंतर मेन्टेनन्स डोसमधे व्यायाम पुरतो. ३० च्या आधी एड्यूरन्स्/बॉडी बिल्डिंग व्यायाम असतो.
यंत्राने दिलेले स्टॅट्स फसवे असतात. कितीही महागाचे घड्याळ घेतले तरी तुमच्या जीपीएस लोकेशन मधे किती व कसा बदल झाला यावर ते स्टेप्स वगैरे मोजणार अन पल्स वगैरे मनगटावर मोजण्यापेक्शा मेडीकल सेन्सर्स वेगळ्या प्रकारे मोजणार.
हे पहा अन व्यायामाचे प्रमाण ठरवा.
जिम मधले ट्रेनर्स हे नॉर्मली पैलवान क्याटेगरितले असतात. फक्त 'हुप्पा हुय्या हे बजरंगा' करत मुद्गल फिरवणे त्यांना उत्तम येते. १८ वर्षांच्या पोराला देतील तेच रेजिम ५०शीच्या माणसाला देतात, अन म्हातार्याला पोरांशी काँपीट करायला भारी वाटतं म्हणुन तो पण जिवाची कुत्तरोढ करून घेतो. (जनरलायझेशन आहे, अपवादांनी माफ करा)
व्यायाम करा. पण आपल्याला अर्नॉल्ड श्वार्झ्नेग्गर व्हायचे नाहिये, होता येणार नाहिये हे लक्षात ठेवा. झेपेल तितका अन आपला स्टॅमिना, उत्साह वाढवेल इतकाच व्यायाम करा.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम यूस्लेस आहे. १ पोळी खाऊन क्यालर्या मिळतात तितक्यात आपले शरीर ८-१० किमि सायकल चालवते. भयंकर एनर्जी एफिशियंट मशीन आहे. इनटेक कमी कराल तरच चरबी जळेल.
उपाशी, भुकेले असणे ही शरीराची नॉर्मल स्टेट आहे. आजकाल अन्नाची अती उपलब्धता मेद वाढवणारी आहे.
बग रिपोर्ट
बग रिपोर्ट
@ वेमा, अॅड्मिन
function at() {
[native code]
}अ
अर्थात a व t ही अक्षरे लागोपाठ काँप्युटर कीबोर्डवर टाईपल्यास वर दिसते तसे दिसते आहे.
आरारा, उपयुक्त सल्ला!
आरारा, उपयुक्त सल्ला!
आरारांनी दाखवलेली एरर मला
आरारांनी दाखवलेली एरर मला आठ पंधरा दिवस येत आहे. पण माझ्या ऑफिसचया लॅप टॉपच्या माउस चा नेहमी काहीतरी इशू असतो. कधी कधी टाइपलेलेपण नाहिसे कर्तो. तसलेच काहीतरी असेल म्हणून मी सोडून दिलेले.
function at() {
function at() {
[native code]
}अ..,... Are हीच एरर आधी 15 दिवस येत होती.मला वाटले माझा की बोर्ड बिघडla म्हणून.पण गेले 2 दिवस येत नाहीये.
मला गेले १५ दिवस झाले, अ
मला गेले १५ दिवस झाले, अ तिशय हा शब्द सलग लिहीता येत नाही. अ आणि ति एकत्र आले की ही एरर येते आहे.
आ.रा.रा. नाही वजन कमी
आ.रा.रा. नाही वजन कमी करण्याकरता नाही करते व्यायाम. इन जनरल फिट रहावे म्हणुनच करते आहे. पण मग हेतू साध्य होतो आहे की नाही ते क्वांटिफाय कसे करावे? हां उत्साह वाटतो आहे. अ तिरिक्त झोप कमी झाली आहे.
>>>>>झेपेल तितका अन आपला स्टॅमिना, उत्साह वाढवेल इतकाच व्यायाम करा.
येस्स्स!!! तोच हेतू आहे.
>>>>>>>>>इनटेक कमी कराल तरच चरबी जळेल.
सौ टके की बात
>>>>उपाशी, भुकेले असणे ही शरीराची नॉर्मल स्टेट आहे. आजकाल अन्नाची अती उपलब्धता मेद वाढवणारी आहे.
हे लक्षात ठेवेन. परत ये रे माझ्या मागल्या होणार आहेच.
>>>>>आँ....... इतर धागे सोडून
>>>>>आँ....... इतर धागे सोडून फक्त फिटनेसच्या धाग्यावर गणपती!!!!!!!!!
सी या चिंताळू धाग्यावरती, माझी चिंता मिटावी म्हणुन आलाय बाप्पा.
वाच ना - सगळ्या चिंता मिटतील.
सामो, ऋजुता दिवेकरांचे Don't
सामो, ऋजुता दिवेकरांचे Don't lose out, work out हे व्यायामावरती चांगले पुस्तक वाटले मला. त्यात छान माहिती लिहिलेली आहे.
अश्विनी धन्यवाद. पुस्तक घेइन
अश्विनी धन्यवाद. पुस्तक घेइन की नाही ते माहीत नाही पण व्हिडिओज, लेख जरुर वाचेन.
बेसिकली 'कार्डीओ फिटनेस
बेसिकली 'कार्डीओ फिटनेस लेव्हल' कमी का आहे/ कशी वाढवावी आदि प्रश्न होते. पण डॉक्टरांना बहुधा (ब-हु-धा) माहीत नसावे. कारण मी तो शब्द सांगीतल्यावर त्यांना कळलाच नाही मला सांगावे लागले की अॅपल वॉचमध्ये असे काही फीचर आहे. नंतर ते म्हणाले - भारतिय लोकांत जरा कमीच असते म्हणे.
आता एकतर तो शब्द कळला नाही त्यामुळे दाट शंका आहे की त्यांना माहीत नसावा तो प्रकार.
आ.रा.रा आपण डॉक्टर आहात बहुतेक (असे वाचल्यासारखे वाटते). ही टर्म= कार्डीओ फिटनेस लेव्हल, सर्रास वापरातली आहे का?
कायच्या काय धागा..apple watch
कायच्या काय धागा..apple watch नसते तर इतका स्ट्रेस आला असता का? द्या फेकून...
खरं आहे. आज कोलेस्ट्रॉलचा
खरं आहे. आज कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट आलाय. बरच हाय आहे पण त्याचा स्ट्रेस आलेला नाही जितका फिटनेस लेव्हलचा आलेला होता/आहे. कारण या लेव्हलचा संबंध हार्ट अॅटॅक, डायबेटिस, डि मेन्शिआ, अल्झाईमर्स सगळ्याशी जोडलाय , नेटवरील काही लेखांमध्ये. सापडले की देते. - https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5894933/
आ.रा.रा +१ Well said.
आ.रा.रा +१
Well said.
अहो अॅपलवाल्या विंजिनिअरांनी
अहो अॅपलवाल्या विंजिनिअरांनी बळंच 'कार्डिओ फिटनेस लेव्हल' नावाचा फॅक्टर जन्माला घातला असेल. त्याचं काय इतकं मनावर घेता!
मी आणि आमच्या ह्या खालील
मी आणि आमच्या ह्या खालील प्रमाणे व्यायाम करतो. आधी जीम मधे जायचो आता घरीच .
कुठल्याही लेव्हलला असलात तरी हे फॉलो करून बघा.
सोमवार - वॉर्म अप, कार्डियो, कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
मंगळ - वॉर्म अप, स्ट्रेंग्थ अप्पर बॉडी ( बॅक आणि बायसेप ६- ७ प्रकार, दोनदा, प्रत्येकी ८ ते १२ वेळा), कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
बुध - वॉर्म अप, कार्डियो, कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
गुरू - वॉर्म अप, स्ट्रेंग्थ अप्पर बॉडी ( चेस्ट आणि शोल्डर ६- ७ प्रकार, दोनदा, प्रत्येकी ८ ते १२ वेळा), कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
शुक्र - वॉर्म अप, कार्डियो, कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
शनि - वॉर्म अप, स्ट्रेंग्थ लोअर बॉडी (लेग्ज ६- ७ प्रकार, दोनदा, प्रत्येकी ८ ते १२ वेळा), कूल डाउन आणि स्ट्रेचिंग
रवी - रेस्ट (हा चीट डे नाही, विश्रांती आवश्यक)
वॉर्म अप (५ मिनिटे) साठी लाईट कार्डिओ.
मुख्य कार्डिओसाठी (३०-४० मिनिटे) हार्ट बीट(२००-तुमच वय) याच्या ८० टक्के इतका जास्तीत जास्त पोचला पाहिजे.
स्ट्रेन्ग्थ वेटस (३० - ४० मिनिटे) घेउन करताना कुठलही वजन तुम्हाला कमित कमी आठ वेळेस जास्त त्रास न होता तो व्यायाम प्रकार सहज करता आला पाहिजे. जमत नसेल तर वजन कमी करा. जमत असेल तर पुढच्या वेळेस १०-१२ पर्यंत वाढवा. बारा वेळा करता यायला लागले की मगच पुढचे वजन घ्या. आठवड्यापेक्षा जास्त गॅप पडली तर पुनः खालच्या वजना पासून चालू करा. हे महत्वाचे आहे. जीममधे तुम्हाला प्रत्येक मसल ग्रूपचे १० तरी प्रकार सांगतील. त्यांच्या सूचना व वरील नियमाप्रमाणे फॉलो करा. ट्रेनरच ऐकून उगाच जास्त वजन जास्त वेळा करू नका.
कूल डाउन (५ मिनिटे) साठी पुनः लाउट कार्डिओ.
स्ट्रेचिंग ( ५ ते १० मिनिटे) साठी योगासने .
मुख्य म्हणजे तुमच्या शरिराच्या सूचना ऐका ( आळशीपणाच्या नाही, ) व तो व्यायाम काही दिवस टाळा. ( कुठे दुखत असेल तर).
कुठल्याही परिस्थितीत एकदाही वॉर्म अप, कूल डाउन आणि स्ट्रेचिंग टाळू नका. एक मसल टाइप एका आठवड्यात एकदाच करा. एखाद्या दिवशी वेटस करण नको वाटल तर कार्डिओ करा.
हे केल्यास दुखापत होणार नाही. स्त्रियांना सुद्धा स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आवश्यकच आहे.
बदल केल्याने कंटाळा ही येणार नाही. वजन कमी झाल नाही ( कारण ते डाएट आणि त्याच्या वेळा यावर खूप अवलंबून आहे) तरी तुम्हाला दोन आठवड्यात खूप छान वाटेल.
शुभेच्छा.
आणि आरारा आणि च्रप्स यांच ऐका
आणि आरारा आणि च्रप्स यांच ऐका.
होय विक्रमसिंह
होय विक्रमसिंह
>>>>>>>>मुख्य कार्डिओसाठी (३०-४० मिनिटे) हार्ट बीट(२००-तुमच वय) याच्या ८० टक्के इतका जास्तीत जास्त पोचला पाहिजे.
माझा एक्झॅक्ट १५२-१५३ जातोय. वय ४८ म्हणजे यापेक्षा जास्त नको.
>>>>>>>>>कुठल्याही परिस्थितीत एकदाही वॉर्म अप, कूल डाउन आणि स्ट्रेचिंग टाळू नका.
होय.
>>>एखाद्या दिवशी वेटस करण नको वाटल तर कार्डिओ करा.
वेटस अजुन सुरु केलेले नाहीत. लवकरच करणार आहे.
>>कायच्या काय धागा..apple
>>कायच्या काय धागा..apple watch नसते तर इतका स्ट्रेस आला असता का? द्या फेकून...<<
आय्ला च्रप्स, आत्तापर्यंत मी तुम्हाला टेक्नालजीत काम करता असं समजत होतो. वेरेबल गॅजेटने दिलेल्या पुर्वसुचनेचा संबंध तुम्ही स्ट्रेसशी जोडत असाल तर धन्य आहात. अॅपलवॉच ने किती लोकांचे अशा सुचना देउन प्राण वाचवले ते एकदा गुगल करा. अलर्ट्स सोडा, हि गॅजेट्स वेळोवेळी जो डेटा जमा करतात त्याचा उपयोग/इंपॅक्ट तुमच्याच "क्वालिटि ऑफ लाइफ" वर कसा होतो, याबाबतीत बहुतेक तुम्हि अजुन अंधारात आहात. असो...
आमच्यात एक म्हण आहे - इफ यु डोंट मेजर, यु कॅनॉट मॅनेज...
>>>>>आमच्यात एक म्हण आहे - इफ
>>>>>आमच्यात एक म्हण आहे - इफ यु डोंट मेजर, यु कॅनॉट मॅनेज...
करेक्ट म्हणुनच मी आरारांना विचारले व्यायामाचा फायदा क्वांटिफाय कसा करायचा
>>>>आ.रा.रा. नाही वजन कमी करण्याकरता नाही करते व्यायाम. इन जनरल फिट रहावे म्हणुनच करते आहे. पण मग हेतू साध्य होतो आहे की नाही ते क्वांटिफाय कसे करावे? हां उत्साह वाटतो आहे. अ तिरिक्त झोप कमी झाली आहे.
घरच्या घरी व्यायामाचे सोपे
घरच्या घरी व्यायामाचे सोपे व्हिडीओ आहेत. Body fit by Amy आणि Leslie Sansone त्याचा मला फार उपयोग झाला शिवाय रामदेवबाबा यांचे योगा फॉर फ्लेक्सिबिलिटी पण छान आहे. मी खूप वर्षे नियमितपणे काही नं काही करते , बदल करत रहाते. खाणं एक मील व्होल फूड ठेवा व ध्यान विस मिनिटे व विपरीत करणी म्हणजे भिंतीला पाय लावून पडून रहायचं , त्याने फ्लुईडस प्रवाही रहातात म्हणे. शिवाय माझे hamstrings फार कडक होतात त्यालाही फायदा होतो. ... सगळं रोज नाही झाले तरी चालते. प्रयत्न करत रहायचं. दरवाजाला स्ट्रेचिंग चे bands लावून ठेवलेत. हँडी आणि सोप ठेवलं तरच आपण करतो नाही तर एक्स्यूजेस असतातच. भूक नसेल तर खायचं नाही त्याने उगाच अवयवांवर ताण येतो.
All the best सामो.
टर्म= कार्डीओ फिटनेस लेव्हल,
टर्म= कार्डीओ फिटनेस लेव्हल, सर्रास वापरातली आहे का?
<<
आपले हृदय किती चांगल्या प्रकारे काम करते आहे, त्याला म्हणायचे "कार्डिओ फिटनेस लेव्हल"
हे नक्की काय ते पाहू.
शारिरीक कष्ट करताना स्नायूंना अधिक रक्तपुरवठा लागतो. उदा. घाईत जिने चढून प्लॅटफॉर्मवर पळून लोकल पकडणे. हे करताना धडधड वाढणारच, श्वासांची गती वाढणारच. जेणेकरून योग्य लेव्हलने रक्त/ऑक्सिजन्/ग्लुकोज पुरवठा गरजेच्या स्नायूंना व्हायला हवा.
आता, हे करताना, (पळत जाऊन गाडी पकडणे) अस्वस्थ वाटेल इतपत दम लागतो आहे का? हृदयाचे ठोके वाढलेत, ते जाणवताहेत, पण ते अनियमित किंवा अन्कम्फर्टेबल वाटताहेत का? छातीत दुखते वगैरे आहे का?
अन मुख्य म्हणजे, डोके हलके वाटतेय, चक्कर आल्यासारखे वाटतेय का? इथे मेंदूला जाणारा पुरवठा कमी करून स्नायूंकडे गेलेला आहे.
हे अस्लए काही होत असेल, तर तुमच्या रक्ताचा पंप पुरेश्या एफिशियन्सीने काम करीत नसावा, अर्थात कार्डिओ फिटनेस कमी पडतो आहे. इथे व्यायामाने फिटनेस वाढवायचा प्रयत्न करण्याआधी डॉक्टरला दाखवा. ट्रेडमिल टेस्ट तरी केलीच पाहिजे.
अनेकदा, 'अन-अकस्टम्ड फिजिकल एक्ससाईज' अर्थात सवयीचा नसलेला व्यायाम वा अॅक्टीव्हिटी केल्याने नेहेमी वापरात नसलेल्या स्नायूंच्या फटीगने वरीलप्रमाणे चिन्हे दिसू शकतील, पण त्यात रिकव्हरी टाईम हा अती छोटा असतो, व श्वास-धडधड सामान्यतः फार अस्वस्थ न वाटता पूर्ववत होते.
व्यायाम करताना, अॅक्टीव्ह व पॅसिव्ह असे दोन प्रकारे असतात, अर्थात मी चालणे, वि. पायाला मालिश करून घेणे.
तसेच, कार्डिओ अन मसल बिल्डिंग असे दोन प्रकार वेगळे आहेत. हे दोन्ही अॅक्टिव्ह आहेत, कार्डिओ मधे दम-श्वास, उर्फ स्टॅमिना वाढविणे हा भाग येतो. दुसर्यात स्नायूंची शक्ती वाढविणे येते. यातही बॉडीवेट व मशिन एक्सरसाईज असे उपप्रकार आहेत. ज्यात वेगवेगळ्याप्रकारे शरीराचे मसल ग्रूप वापरात आणले जातात.
तिसर्या प्रकारात शरीराचे को-ऑर्डिनेशन वाढविणे येते. यात योगासने, टेटे-बॅडमिंटनसारखे क्विक रिस्पॉन्स टाईम गेम्स, हस्तकला इ. येते.
या व्यतिरिक्त, मेंदूलाही व्यायाम गरजेचा आहे. कोडी सोडविणे, वादविवाद करणे, वाचन-मनन-चिंतन, याही बाबी गरजेच्या आहेत.
नुसती कार्डिओ उपयोगाची नाही.
अनेक मॅरिथॉन रनर कार्डिऑलॉजिस्ट लोकही हार्ट अॅटॅकला सामोरे गेलेले ठाऊक आहेत.
शेवटी, व्यायाम हा प्रत्येक व्यक्ती/शरीरासाठी बेतलेला टेलरमेड असायला हवा. सगळीकडे लागू होईल असे सोल्युशन नाही.
कार्डिओ च्या नादी एक्स्ट्रीम स्पोर्ट्स उर्फ मॅरॅथॉन, सायकलिंग, स्विमिंग इ. डिकॅथलॉन स्टाईल करणार्यांबद्दल आदर आहेच, पण अती व्यायाम नको, असेच पुन्हा एकदा म्हणतो.
अन हो, ता.क.
सगळ्यात महत्वाचे, अती नको म्हणजे व्यायाम नको नाही. व्यायाम हा प्रत्येकाने केलाच पाहिजे.
हे केल्यास दुखापत होणार नाही.
हे केल्यास दुखापत होणार नाही. स्त्रियांना सुद्धा स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आवश्यकच आहे.
<<
विक्रमसिंह यांचा प्रतिसाद योग्य आहे.
व्यायाम करताना स्वतःस दुखापत करून घेणार्यांचे प्रमाण मोठे आहे.
स्त्रियांच्या स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग बद्दल +१.
छोटे डम्ब बेल वापरा, किंवा पाण्याची भरलेली बाटली वापरून डम्ब बेल सारखे वापरा. १ लिटर पाणी = १ किलो वजन. पण हे कराच. हाडे मजबूत होतात.
अॅपलवॉच ने किती लोकांचे अशा
अॅपलवॉच ने किती लोकांचे अशा सुचना देउन प्राण वाचवले ते एकदा गुगल करा.
<<
अमेरिकन खाणे, अन देवाचे देणे.
अॅपलने मोबिलिटी स्कूटर्स म्यानुफ्याक्चर सुरू केलंय की नाही अजून? लय मार्केट आहे तिथल्या ओव्हरवेट लोकांत.
आ.रा.रा, अस्मिता धन्यवाद.
आ.रा.रा, अस्मिता धन्यवाद.
>>>>>अमेरिकन खाणे, अन देवाचे देणे.
पोर्शन साईझ फार मोठा असतो. ते एक वेळ कंट्रोल करता येइल पण दूधात वगैरे घातलेले हार्मोन्स
या हार्मॉन्स्मुळे, येथिल मुलं/ली लवकर वयात येतात असे ऐकून आहे. खखोदेजा.
मी ऍपल वॉच घेताना ऍपल
मी ऍपल वॉच घेताना ऍपल शोरूमच्या सेल्समननी, हे फीचर्स मेडिकल असोसिएशननी अप्रूव्ह केलेले नाहीत असं सांगितल्याने मी SE सिरीज घेतली. सो टेक इट (स्टॅट्स) विथ या पिंच ऑफ सॉल्ट !
व्यायाम नक्की करा, मस्त खा आणि स्वस्थ राहा.
>>>व्यायाम नक्की करा, मस्त खा
>>>व्यायाम नक्की करा, मस्त खा आणि स्वस्थ राहा.
येस्स्स्स.
धन्यवाद. ही महिती सर्वांनाच
धन्यवाद. ही महिती सर्वांनाच उपयोगी पडणारी आहे. मला Complete Heart Block आहे. त्याकरिता ३ महिन्यांपूर्वी पेसमेकर बसवला आहे. मी पहिल्या पोस्टीत लिहील्याप्रमाणे ७ ही दिवस साधारण २ तास व्यायाम करते. पण तो चालणे,जिना चढणे-उतरणे,जॅागिंग, योगासने,प्राणायाम अशा स्वरूपाचा हलका आहे. आता मला व्यायामाबाबतीत कोणतीही बंधने नाहीत. तर मी कोणता व्यायाम add करू शकते?डंबेल्स उचलणे आपले आपण सुरू केले तर चालते का? असेल तर कितीवजनापासून? त्याचा नक्की काय फायदा होतो?
धन्यवाद.
गेले 7 महिने मी खालील डायट वर
गेले 7 महिने मी खालील डायट वर आहे.. आणि भरपूर फायदा झाला आहे... फिटनेस लेव्हल भरपूर वाढला आहे आणि मसल्स देखील छान डेव्हलप झाल्यात...
सकाळी 6 am -
कारडीओ ( 1 तास चालणे/20 मिन रंनिंग/35 मिन एलिप्तिकल किंवा 15 माईल सायकल )
वेट ट्रेनिंग 40 मिन..
नाश्ता -
5 एग व्हाइट ऑम्लेट + 2 ब्राउन ब्रेड/ आलू पराठा नो बटर/ चिला / ढोकळा जे असेल ते
एक कप चहा आणि 4 बिस्किटे
दुपारी 1 वाजता -
एक वाटी भात आणि डाळ
2 चपाती + एक कप चिकन/पालेभाजी
एक कप व्हॅनिला आईस्क्रीम/ दोन गुलाबजामुन/कोणतीही स्वीट डिश
4 वाजता -
चहा आणि चार पाच बिस्कीट किंवा सफरचंद/मँगो/ऑरेंज जे फ्रुटस असतील ते..
रात्री 9 वाजता डिनर
भात आणि भाजी शक्यतो चिकन
कधी बियर घेतलीच तर दोन पेक्षा जास्त नाही, शक्यतो वीकेंड लाच.. आणि जितके जमेल तितके बियर अवोईड करून कॅलरी कमी असल्यामुळे स्कॉच किंवा रम ला प्राधान्य... कोकटेल्स मोस्टली अवोईड...
बियर बंद करा.
बियर बंद करा.
फक्त सो कॉल्ड "हार्ड ड्रिन्क्स".
२.
function at() {
[native code]
}ई (हे असं दिसलं की मी "अती" हा शब्द टाईप केलाय असे समजून घ्या. अजिब्बात एडिट करणार नाहिये मी. मोबाईल फ्रेंडली करण्याच्या नादात मायबोलीची वाट लावून ठेवली आहे साहेबांनी.)
तर, function at() {
[native code]
}इ प्रोटीन नको. ते व्हे प्रोटीन नावाच्या भंपक पावडरी जो तुमचा जिमवाला रेकमेंड करतो, ते भयंकर डेंजरस आहे. "आमच्या जिम मधे येणारी पोरं कशी सुडौल बाडी बिल्डर बनतात" अशी जाहीरात करण्याच्या हव्यासापायी पोरांना अँड्रोजेनिक स्टिरॉईड्स खाऊ घालण्याचा तो प्रकार आहे.
क धी ही प्रोटीन पावडर आणून खाऊ नका. आपल्याला माहिती असलेले प्रोटीन सोर्स वापरा. उदा. कडधान्ये, नॉनव्हेज.
function at() {
[native code]
}ई प्रोटीन खाण्याने किडनीवर ताण येतो तो वेगळा.
Pages