व्यायाम / जिम/ कार्डिओ फिटनेस लेव्हल

Submitted by सामो on 30 August, 2021 - 05:41

सात आठ महीने झाले अ‍ॅपल वॉच घेउन. बरेच उपयोगी आहे.
आठवडा झाला जिम जॉइन करुन. अचानक अ‍ॅपल वॉचवरती नोटिफिकेशन्स येऊ लागली - कार्डीओ फिटनेस लेव्हल अति कमी (Poor) आहे.
https://www.whyiexercise.com/VO2-Max.html
इथे वाचनात आले माझ्या वयाला, स्त्रियांची कार्डिओ फिटनेस लेव्हल अगदी Poor - २१-२४ आहे.
माझी तर १९ दाखवते. त्यामुळे हादरले आहे.
---------------------------------------------------------
अचानक जिममध्ये ३-३ कार्डिओ मशिन्स सुरु केलेली आहेत. पूर्वी फक्त ४० मिनिटे स्टेशनरी सायकल किंवा चालणे होत असे. गेल्या आठ दिवसात अचानक वॉकिंग, रोईंग बोट मशिन, एलिप्टिकल मशिन्स वगैरे सुरु केलेले आहे. ४० ते ५० मिनीटे व्यायाम होतो.
पण फायद्याऐवजी तोटाच होतो आहे असे जाणवले. कारण बरोब्बर त्या ८ दिवसातच कार्डिओ फिटनेस लेव्हल पार तळाला गेलेली आहे. म्हणजे पूर्वी Poor होती = २० ती आता Very Poor = १९ दाखवते.
---------------------------------------------------------
वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल हा समग्र्/संपूर्ण आरोग्याचा फार म्हणजे प्रचंड महत्वाचा गुणांक (इंडिकेटर) असतो. हृदयाचे आरोग्य, मधुमेह, डिमेन्शिआ व अल्झाईमर्स आदि धोकेही या गुणांकावरुन कळू शकतात. हे खरे आहे का? तसेच काही औषधांमुळेही कार्डिओ फिटनेस लेव्हल कमी होत असावी - असा माझा कयास आहे. असे वाचनात आले की कार्डीओ फिटनेस लेव्हल जरी अगदी ३.५ गुणांकाने वाढली तरी अकाली मृत्युची टक्केवारी १३% नी घटते. You'd get similar health benefits by reducing your waist by 7 cm or lowering your blood pressure by 5 points.
-----------------------------------------------------------
माबोवर व्यायाम विषयक, पुढील धागे सापडले -
https://www.maayboli.com/node/43628
https://www.maayboli.com/node/55942
https://www.maayboli.com/node/37573

अजुन एक केदार यांच्या धाग्यात = https://www.maayboli.com/node/55942 , पुढील प्लॅन दिलेला आहे- अगदीच सुरूवात करणार्‍यांसाठी रोजचा प्लान.
सोमवार - रेस्ट
मंगळ - वर्क आउट
बुध - वर्क आउट
गुरू - रेस्ट
शुक्र - वर्क आउट
शनि - वर्क आउट
रवी - रेस्ट
पण माझा प्रॉब्लेम हा आहे की एक दिवस जरी व्यायाम चुकवला ना तरी दुसर्‍या दिवशी प्रचंड कंटाळा येतो.
-------------------------------------------------
व्यायाम कसा व कितपत सुरु करावा हे अर्थात वय, वजन, जीवनशैली यावर अवलंबुन असेल. परंतु तरी कोणी काही पॉइन्टर्स देउ शकता का? अचानक जोरशोरसे व्यायाम सुरू केल्याने काही धोके संभवतात का? आपले अनुभव मांडले तर उत्तमच. तसेच कार्डिओ फिटनेस लेव्हल बद्दल माहीती दिली तर दुधात साखर. अजुन एक - व्यायामानंतर शवासन वगैरेही मी करत नाही. कारण वेस्ट ऑफ टाईम वाटते. रेस्टलेस वाटते वगैरे. बहुतेक असा आराम न केल्यानेही काही तोटे होत असावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतेय. व्यायामानंतर शवासन/Relaxation नक्की करा. मी पण रोज नियमित व्यायाम करते. चालणे/योगासने/प्राणायाम/जिना चढणं-उतरणं इतकाच.हे सगळं धरून दिवसभरात २ तास होतो.

अचानक जोरशोरसे व्यायाम सुरू केल्याने काही धोके संभवतात का?>> हो. तुम्ही इन जनरल एकदम इम्पल्सिव्ली करू नका. आधी डॉक्ट र चा सल्ला नक्की घ्या. त्या ही आधी. ( हे मी भारतातले लिहीत आहे.) पन तुमच्या तिथे काय असेल ते . पॅथॉलोजी लॅब मधून रक्ताची कार्डिअ‍ॅक तपासणी प्रोफाइल करून घ्या. त्या रिझल्ट नुसार डॉक्ट्र पुढे सजेस्ट करेल तर टु डी एको. स्ट्रेस टेस्ट वगैरे कार्डिएक प्रोफाइल करून घ्या. पन्नाशी पुढे ओव्हर ऑ ल हेल्थ बघा. आता डोले शोले बिस्किट मसल्स बनवाय्चे दिवस नाहीत तरी हे सर्व करून मग ट्रेनर च्या सल्ल्यानेच पुढे जा.

वॉर्म अप व स्ट्रेचिन्ग मस्ट आहे. बरोबरीने आयर्न व इतर ब्लड वर्क पण करून घ्या. कॅल्शिअम व बोन डेन्सिटोमेट्री, डी व्हिट. डेफि. टेस्ट करून घ्या व त्या अनुसार गोळ्या घ्या नाहीतर जिम व्यायमाने हाडे दुखावू शकतात.

@सामो खुप स्टॅट्स आणि वाॅच च्या मागे पडु नका

मेडिटेशन सुरु करा,आपले शरीर सर्वात आधी वाँर्निंग देत असते आपण ती एकायला या टेक्नॉलॉजीच्या जंजाळात अडकून तयार नसतो. डोळे मिटून मेंदु पासुन पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाकडे लक्ष देत रहा साधारण १०-१५ मिनिटात हे होईल. काही गडबड असेल त्या भागातली सगळी जाणिव तुम्हाला जाणवेल

जिम कार्डिओ हे अगदी गरज असेल तरच करा नाहीतर तुमच्या हार्ट स्पेशालिस्ट व गायनॅक शी बोलून फिटनेस प्लॅन बनवून घ्या.

योग केले तर सोपे पडेल. व सर्वांगीण व्यायम होईल. बरोबरीने आहार सुधारा. तुमचा गोल काय आहे? वजन कमी करने का फिटनेस लेव्हल वाढवणे? आधीच्या काही कंडिशन आहेत का? हार्मोन थेरपी चालू आहे का?

अमा, बन्या - सल्ल्याबद्दल आभारी आहे.
आज सुरुवातीला, २५ मिनीटे स्ट्रेचिंग केले. कारण एकदम कार्डिओ केला की सर्व उर्जा खर्ची पडते व नंतर काहीही करण्यास उर्जा रहात नाही - असा अनुभव तसेच असेच वाचनातही आले
तर २५ मिनीटे स्ट्रेचिंग नंतर १५ मिनीटे एलिप्टिकल केले. आणि आज चक्क nauseous वाटले. अगदी मळमळले नाही पण फार nauseous वाटले.
आज डॉक्टरांची अपॉइन्टमेन्ट घेणार आहे.
>>>>>पॅथॉलोजी लॅब मधून रक्ताची कार्डिअ‍ॅक तपासणी प्रोफाइल करून घ्या. त्या रिझल्ट नुसार डॉक्ट्र पुढे सजेस्ट करेल तर टु डी एको. स्ट्रेस टेस्ट वगैरे कार्डिएक प्रोफाइल करून घ्या. पन्नाशी पुढे ओव्हर ऑ ल हेल्थ बघा.
होय अमा, हेच विचारेन आज की काय टेस्टस करायला हव्या. व्यायामाला, कशी सुरुवात करावी तदुपरान्त.

>>>मेडिटेशन सुरु करा,आपले शरीर सर्वात आधी वाँर्निंग देत असते आपण ती एकायला या टेक्नॉलॉजीच्या जंजाळात अडकून तयार नसतो.
सत्य आहे. हे करुन पाहीन.

>>>व्यायामानंतर शवासन/Relaxation नक्की करा.
आजही केले नाही. पण उद्यापासून नक्की करेन.

२५ मिनीटे स्ट्रेचिंग >> इतके नाही हो करत व वर्क आउट झाल्यावर करतात. पहिले वॉर्म अप १० मिनिटे असते. व वर्क आउट झाल्यानंतर ट्रेनर स्ट्रेचिन्ग करून देतो. ते ही दहा मिनिटे. मी तळव ळ कर जिम मध्ये वर्क आउट केले आहेत पर्सनल ट्रेनर बरोबर.

मळमळल्या सारखे होते आहे ते हार्ट ला एकदम कामाला लावल्याने होत असेल का ते बघा. बायकांची हार्ट अ‍ॅटॅ क ची चिन्हे वेगळी असतात. ती डॉक्ट र ला विचारून घ्या.

एक साधे लक्षात घ्या की शरीर हळू हळू वॉर्म अप करत करत हायर कार्डिओ स्टेटला आणावॅ लागते व तसेच ते हळू हळू कमी कमी करत रेस्टिन्ग
हार्ट बीट ला आणा वे लागते. त्यासाठी शवासन करायला सांगतात. इट इज पार्ट ऑफ द वर्काउट इटसेल्फ. वेस्ट ऑफ टाइम नाही.

>>>>इतके नाही हो करत व वर्क आउट झाल्यावर करतात.
बरीच योगासने होती अमा. मळमळीबद्दल डॉक्टरांशीच बोलेन. एखाद्या ट्रेनरचाही सेशन घेइन.

कॉम्प्लिमेन्टरी सेशनमध्ये इतका चम्या ट्रेनर दिलेला होता ना. एका पोझला म्हणाला, ह्या पोझला म्हणे मी 'डॉग पी' पोझ म्हणतो का तर तशी दिसते ती पोझ. व्हॉट द फ*
बरच स्ट्रेचिंग शिकवलं पण मशिन्स कोणतीच माहीती नव्हती त्याला. कॉम्प्युटर इंजिनीअर होता असे माहीतीत सांगीतले. एकंदर व्यायामविषयक ज्ञान कमी होते असे आढळले.

>>>>>एक साधे लक्षात घ्या की शरीर हळू हळू वॉर्म अप करत करत हायर कार्डिओ स्टेटला आणावॅ लागते व तसेच ते हळू हळू कमी कमी करत रेस्टिन्ग
हार्ट बीट ला आणा वे लागते. त्यासाठी शवासन करायला सांगतात. इट इज पार्ट ऑफ द वर्काउट इटसेल्फ. वेस्ट ऑफ टाइम नाही.

ओह ओके. हेच जरी कॉमन सेन्स असले तरी लक्षात आलेले नाही Sad चूका बर्‍याच होतायत असे दिसते आहे.

कॉम्प्लिमेन्टरी सेशनमध्ये इतका चम्या ट्रेनर दिलेला होता ना. एका पोझला म्हणाला, ह्या पोझला म्हणे मी 'डॉग पी' पोझ म्हणतो का तर तशी दिसते ती पोझ. व्हॉट द फ*>> शक्यतो एफ वर्ड इथे वापरू नये.

त्याचे ज्ञान तितके च असावे. व डॉग ओनर्स ना ते फनी वाटू शकते. आमच्या कडे डाउन्वर्ड डॉग पोझि शन करतो आमचा डॉगी. आम्ही पण तिच्या बरोबर करतो.

चांगला ट्रेनर घ्या. खरे तर जिम पेक्षा ४५ मिन्ट ब्रिस्क वॉक पुरेसा आहे रोज. बरोबरीने एक वेट ट्रेनिग्न पण करा मसल टोन साठी.

जिम मध्ये इंजरी होउ शकते हे लक्षात असू द्या पन्नाशीत हाडे कमकुवत असतात.

>>>>>शक्यतो एफ वर्ड इथे वापरू नये.
नोटेड.
>>>>खरे तर जिम पेक्षा ४५ मिन्ट ब्रिस्क वॉक पुरेसा आहे रोज.
मलादेखील तेच वाटू लागले आहे. माईल्ड व्यायाम आणि सर्व व्यायामांचा राजा.

>>>>पन्नाशीत हाडे कमकुवत असतात.
सत्य आहे. जरी डी व्हायटॅमिन नियमित घेत असले तरी एकदा कॅल्सिअम चेक केले पाहीजे. नॉर्थ ईस्ट मध्ये फार ढगाळ वातावरण असल्याने, डी व्हायटॅमिनची फार गरज असते.

>>>चांगला ट्रेनर घ्या.
होय ३ एक सेशन्स घेइनच.

>>>>एक वेट ट्रेनिग्न पण करा मसल टोन साठी.
हेच त्या चम्याला विचारलेले पण त्याला माहीत नव्हते. कॉम्प्लिमेन्टरी सेशन्स्मध्ये बहुतेक नवख्या ट्रेनर्स चे ट्रेनिंग करुन घेतात अशी दाट दाट शंका आलेली आहे. काय हे इतके पैसे घेउन ही सर्व्हिस Sad

आज मिळाली तर डॉक्टरांची अपॉइन्ट्मेन्ट घेणारच आहे. इथे सांगेनच. सर्वांना फायदा होवो.

>>>>आमच्या कडे डाउन्वर्ड डॉग पोझि शन करतो आमचा डॉगी. आम्ही पण तिच्या बरोबर करतो.
होय अमा योगासनां मध्ये ही डाउनवर्ड डॉग पोझिशन आहे.

डॉग या शब्दा पेक्षा माझा पी या शब्दाला आक्षेप होता. अर्थात इच ऑन हिज ओन. त्यामुळे ते दुर्लक्षणिय आहे पण एक इम्प्रेशन जरा बिघडलं इतकच.

मला वाटतं तू अचानक एका दिवसापासून ट्रेनरने सांगितले म्हणून हेवी वर्कआऊटला सुरुवात केली आहेस.
शरीराला व्यायामाची सवय नसल्यास अगदी काही मिनिटांच्या वर्कआऊटने सुरुवात करुन नंतर व्यायामाचा वेळ व इंटेन्सिटी वाढवत न्यावी. यामुळे कुठले व्यायाम/इन्स्ट्रुमेंट्स शरीराला सोसत आहेत किंवा नाहीत याचाही अंदाज यावा.

ट्रेनरने सांगीतले म्हणुन नाही वर्षा. घरात व्यायामास पोषक वातावरण आहे. मी ४० मिनीटे सायकल किंवा चालणे करतच होते. पण इतकी सारी मशिन्स पाहून एकदम कॅन्डीशॉप मध्ये गेल्यासारखे झाले आहे. हे करु की ते करु. हां ४० मिनीटात स्टॅमिना ढुस्स होतोय ते वेगळं.

मी तुम्हाला एकदम फार माहिती देत आहे त्या बद्दल सॉरी पण हार्ट तसेच बोन स्ट्रक्चर हे फार महत्वाचे सिस्टिम आहेत. तुम्हाला हार्ट अ‍ॅटेक येउ नये व दुखापत होउन हाडे तुटू नयेत म्हणून जास्त डिटेल मध्ये लिहीले. कार्डिओ हा फक्त एक भाग झाला. आहार मेडी टेशन, सप्लिमेंट टोनिन्ग मसल स्ट्रेन्ग्थ हे ही तितकेच महत्वाचे आहे. माझे म्हणने होलिस्टिक अप्रोच घ्या. इथून पुढे एज ७५ परेन्त हीच बॉडी नीट चालवायची आहे तर सर्व काळजी घ्या. इतकेच.

वर्णिता धन्यवाद. बर्‍याच जणांना हा धागा उपयोगी व्हावा अशी आशा आहे, मग ते इनडायरेक्टली - व्यायाम सुरु करने असो की अ‍ॅपल वॉच मॉनिटर करणे असो. डायरेक्टली - व्यायामाच्या टिप्स संकलित झाल्या तर उत्तमच.

ओके Happy
>>डायरेक्टली - व्यायामाच्या टिप्स संकलित झाल्या तर उत्तमच.
+१

डॉक्टर म्हणाले - गॅजेट्स कडे लक्ष देउ नका. व्यायाम काराच करा. फक्त , अतिरेक नको, मॉडरेशनमध्ये करा. ४५ मिनीटे पण छान फक्त धाप लागेल इतक्या इन्टेन्सिटीने करु नका.

माझ्या अनुभवानुसार, व्यायाम अथवा कुठलीही जीवनशैली शाश्वत असावी. आणि ३५ नंतर, नुसते कार्डिओ करून मला तरी फायदा न्हवता होत.
त्यामुळे, मी मिक्स अँड मॅच करायला लागले.
माझे दिवस असतात. आज फक्त चालणं , मग ते बागेत असो, मॉल मध्ये असो, भाजी बाजार...
मग योगा असनाचे( दोन वेळा आठवड्यातून) मला सोसतात ते प्रकार.
मग वेट ट्रेनिंग( दोन वेळा आठवड्यात)
स्ट्रेचिंग रोजच.
आणि नाच जेव्हा वाटेल तेव्हा. आहार तसाही नेमका व मोजकाच आहे. खात नाही( दूध, मैदा, ब्रेड, साखरेचे प्रकार, गूळ, मध, रस वगैरे नाहीच). नाईट शेड भाज्या(मला चालत नाही म्हणून).
फार बोरींग होत नाहीये अश्याने रूटीन. हे मी ५ वर्षे केलेय. एखादा आठवडा पुढे मागे होते. पण बर्‍याच गोष्टी मी करते प्रवास असला तरी.

सर्वानी निरोगी, सूदृढ, आनंदी रहा आणि दिर्घायुषी व्हा ! व्यत्यय नक्की सुरुवात कर हं व्यायामाला, मी येतोय लवकरच तुमच्याशी चर्चा करायला ....
***** मायबोली गणेशोत्सव २०२१ *****

Mi yetoy-2- with logo-final-latest.jpg

चांगला धागा.
मी कोरोनाच्या आधी चालायला जायचे.
लॉकडाऊन पासून योगासने, सूर्य नमस्कार कंटिन्यु आहे.
योगा ट्रेनर ने सांगितले होते, सुरूवातीला warm up आणि शेवटी relaxation/शवासन गरजेचे आहे. योगा करताना हि दमणूक नाही झाली पाहिजे. श्वास पुर्ववत आल्यावरच पुढचा प्रकार करावा. रूट एनर्जी वाया नाही घालवायची. आसने करून फ्रेश वाटायला हवे.
माझे रोजचा तासभर योगा आणि नो लिफ्ट इतका व्यायाम आहे. पण चालणं नाही होतंए.
मधे एका धाग्यावर चर्चा केली होती ट्रेड मिल घेणे कितपत फायद्याचे आहे,जुने धागे पण वाचले होते. जास्त उपयोगात येत नाही असा एकंदरीत निष्कर्ष होता.
इथेच विचारू का? जीमला न जाता घरीच जर इतर व्यायाम प्रकार करायचे असतील तर कुठले इन्स्ट्रुमेन्ट्स फायद्याचे आहेत दोघांसाठीही? (वेटलॉस नाही, फिटनेस साठी)

आँ....... इतर धागे सोडून फक्त फिटनेसच्या धाग्यावर गणपती!!!!!!!!! बस्स... सिक्स पॅक नि डोले-शोलेवाला गणपती बघायचा राहिला ह्या म्हातारीचा.....
चित्र सुरेखा आहे, संयोजक! मोरया!!

Pages