जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली.
हिरोशिमावरील अण्वस्त्र हल्ल्यात सुमारे 1,40,000 हजार आणि नागासाकीवरच्या हल्ल्यात सुमारे 70,000 लोकांचा बळी गेला होता. दोन्ही शहरे तर बेचिराख झाली होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 6 ऑगस्टला ‘हिरोशिमा दिन’ पाळला जातो.
राखेतून उभा राहिलेला जपान आज जगातील प्रमुख 7 विकसित देशांपैकी एक बनला आहे. पण अण्वस्त्रांच्या बाबतीत तो अतिशय संवेदनशील आहे.
भारताचा आजवरचा अणुइतिहास, अण्वस्त्रप्रसारबंदी, अण्वस्त्रांचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण याबाबतची भूमिका व जबाबदार आण्विकशक्ती या बाबी टोकियोने विचारात घ्याव्यात आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करावे असे भारताला वाटते. कारण भारत ‘अण्वस्त्रमुक्त जग’ या तत्वाशी कायम बांधिलकी व्यक्त करत आला आहे.
हा विषय सविस्तर खालील लिंकवरही आहे.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_6.html?m=1
चांगला आढावा थोडक्यात घेतला
चांगला आढावा थोडक्यात घेतला आहे. द बाँब नावाची एक फिल्म आहे यु ट्युब वर ती ही छान आहे.
नेट फ्लिक्स वरील वर्ल्ड वॉर इन कलर मध्ये पण ह्या वर आहे. रिचर्ड फाइनमन च्या पुस्तकात ह्या प्रॉजे क्ट चा उल्लेख आहे.