मित्रांना पिकनिकला टांग कशी द्यावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2021 - 10:38

गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.

तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात Happy

तर आता जे मित्र अजूनही एकमेकांच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आहेत त्यांच्या महिन्या दर महिन्याला मैहफिली रंगतच असतात. पण सर्व वर्गातल्या पोरांची मिळून वर्षाला साधारण एखादी किमान वन नाईट स्टे करायची पिकनिक निघते. गेले सहा सात वर्षे हे चालत आलेय. दर पिकनिकला साधारण तीस चाळीस जण असतात.
मी माझ्या क्लोज ग्रूपच्याच शालेय मित्रांनाच साधारणपणे वर्षातून एकदा भेटतो. पण पुर्ण क्लासची जी पिकनिक निघते त्यात आजवर एकदाही गेलो नाही.

सुरुवातीला एक दोन वर्षे कोणी काही म्हटले नाही. पण तिसर्‍या वर्षापासून मित्रांच्या लक्षात येऊ लागले की बाकी सारे एकदा ना एकदा तरी पिकनिकला आले आहेत. पण हा रुनम्याच अजून एकदाही आला नाही.

ग्रूपमधील निम्मी मुले परदेशात आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर. तरी ते सुद्धा एक दोन वर्षा आड का होईना त्या काळात भारतात/ मुबईत येऊन पिकनिकला उपस्थिती नोंदवून गेली आहेत. मग यालाच का जमत नाही असे त्यांना वाटत असल्याने मला दरवर्षी न जाण्याचे काहीतरी दणदणीत कारण द्यावे लागते.

यावर्षी तर ठरवून त्यांनी चार महिने माझ्या मागे लागून लागून माझ्याकडे कुठला पर्यायच राहणार नाही हे पाहिले. तारीख वेळ स्थळ काळ सारे काही माझ्या मतानुसार सोयीनुसारच ठरवून घेतले. सुरुवातही माझ्याकडूनच काँट्रीब्यूशन घेऊन केली. आणि बघता बघता पिकनिक तोंडावर आली तसे आता खरेच जावे लागणार या विचाराने मला टेंशन आलेय.

भरलेले पैसे गेले तरी चालतील. अर्थात ते नंतर मला परत करतीलच. माझ्याच शाळेचे संस्कार आहेत, कोणाचा फुकटचा एक पैसा खाणार नाहीत.

पण आता आयत्या वेळी काय कारण देऊ जे त्यांना निरुत्तर करेल. वा झाल्यास तेच मला म्हणतील बघ मग नसेल जमत तर नको येऊस...

तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स Lol मला खरंच खदखदून हसू येत आहे हे वाचून.

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऋ ला पिकनिक ला नेणाऱ्या मित्रांसाठी Happy
हल्ली कुठे कुणाला कुणासाठी एवढा फरक पडतो?

ऋन्मेषजी, एका ओळखीच्या गृहस्थांना त्यांच्या नवीन चित्रपटासाठी तुमच्या लेखांवर आधारीत पटकथा लिहायची आहे. तुमचा होकार / नकार लवकरात लवकर कळवणेसाठी इथेच कळवतो आहे. कृपया त्वरीत संपर्क साधावा ही विनंती. नाहीतर ते दुस-या प्रकल्पावर काम सुरू करतील.

होकार च दे रे बाबा रुनमेश
उद्या सई पेक्षा मोठा स्टार झालास तर आम्ही ही कॉलर ताठ करू हा आमचा मित्र म्हणत

ऑलम्पिक पेक्षा जास्त या पिकनिक चे काय झाले याची उत्सुकता लागली आहे...>>>>च्रप्स++11111

आता तर मला असं वाटतंय की ऋन्मेश पिकनिक ला जाणारच होता पण गेल्यावेळी त्याच्या अनुपस्थित तोतया रूनमेशमुळे जे त्याचे चारित्र्यहनन झाले होते तसे पुन्हा होऊ नये म्हणून याने हा धागा काढला होता. कारण प्रतिसादात त्या धाग्यांचा विषय निघणार आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून मी माबोवर लक्ष ठेवणार असे preplanned करून ऋन्म्याने आधीच दक्षता घेतली असावी.

कोंबडी खुराड्यात बसली की मालक दर तासाला येऊन बघतो , अंडे दिले का. तसे ऋन्म्याचे आहे. दर धाग्याला रतीब घालायचा, दर प्रतीसादाला प्रतीसाद देऊन आपलाच धागा कसा वर पहिल्या पानावर राहील याला अनन्य साधारण महत्व द्यायचे. मग तिकडे हपिसाता काय का होईना.

गेलो नाही....
उचललो गेलो
पहाटे पहाटे पोटात कळ लागली
बाथरूममध्ये गेलो. पण बाहेर आलो तसे डावीकडून काड्कन डोक्यावर काहीतरी आदळले आणि शुद्ध हरपली.
त्यानंतर डोळे उघडले ते माळशेज घाटाचे थंड बोचरे पावसाळी वारे तोंडाला टोचू लागले तेव्हाच...
पुढे जे घडले ते अभूतपुर्व होते. लाईफ चेंजिंग मोमेंट.. सविस्तर वृत्तांत लवकरच....

सविस्तर वृत्तांत लवकरच....>>>>>भोआकफ Lol

सविस्तर वृत्तांत लवकरच....>>>>>भोआकफ Lol>>>>> Rofl Rofl

Submitted by धनुडी on 2 August, 2021 - 14:06
फेकाड्या d ग्रेड चे मुव्ही पहाणे आधी बंद कर :lol:

Submitted by अनिश्का on 2 August, 2021 - 14:09>>>>>>>>>> Rofl Rofl

पळा पळा लपाsssss (असं कोणीतरी ओरडताना ऐकु येतंय उगीचच) Lol

शुद्ध हरपली? म्हणजे हे स्वप्नातले पिकनिक होते की काय? स्वप्नमय स्वप्नील स्वप्निल....

हे भगवान!!! ऐसे कैसे हो गया!
बचा लो प्रभु !.
अस मी आता मला येणार्‍या " तुमच बँकेच कार्ड/क्रे.कार्ड ब्लॉक झालय सुरु ठेवायच असेल तर या या नंबरवर कॉल करा" मेसेजवर प्रतिमेसेज लिहुन पाठवतो. :)) :)) :))

मी ऋन्मेष च्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला टाळतो. पण आज वाटतंय किती ते attention-seeking behavior!

प्रसंग, टाईमलॅप्स, खाणे, फिरणे कितीजण्/जणी, जागा, कर्म आणी यात कुठे गॅप राहु नये याची जुळवाजुळव चालली आहे.
थोडा धीर धरा.

Pages