गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.
तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात
तर आता जे मित्र अजूनही एकमेकांच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आहेत त्यांच्या महिन्या दर महिन्याला मैहफिली रंगतच असतात. पण सर्व वर्गातल्या पोरांची मिळून वर्षाला साधारण एखादी किमान वन नाईट स्टे करायची पिकनिक निघते. गेले सहा सात वर्षे हे चालत आलेय. दर पिकनिकला साधारण तीस चाळीस जण असतात.
मी माझ्या क्लोज ग्रूपच्याच शालेय मित्रांनाच साधारणपणे वर्षातून एकदा भेटतो. पण पुर्ण क्लासची जी पिकनिक निघते त्यात आजवर एकदाही गेलो नाही.
सुरुवातीला एक दोन वर्षे कोणी काही म्हटले नाही. पण तिसर्या वर्षापासून मित्रांच्या लक्षात येऊ लागले की बाकी सारे एकदा ना एकदा तरी पिकनिकला आले आहेत. पण हा रुनम्याच अजून एकदाही आला नाही.
ग्रूपमधील निम्मी मुले परदेशात आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर. तरी ते सुद्धा एक दोन वर्षा आड का होईना त्या काळात भारतात/ मुबईत येऊन पिकनिकला उपस्थिती नोंदवून गेली आहेत. मग यालाच का जमत नाही असे त्यांना वाटत असल्याने मला दरवर्षी न जाण्याचे काहीतरी दणदणीत कारण द्यावे लागते.
यावर्षी तर ठरवून त्यांनी चार महिने माझ्या मागे लागून लागून माझ्याकडे कुठला पर्यायच राहणार नाही हे पाहिले. तारीख वेळ स्थळ काळ सारे काही माझ्या मतानुसार सोयीनुसारच ठरवून घेतले. सुरुवातही माझ्याकडूनच काँट्रीब्यूशन घेऊन केली. आणि बघता बघता पिकनिक तोंडावर आली तसे आता खरेच जावे लागणार या विचाराने मला टेंशन आलेय.
भरलेले पैसे गेले तरी चालतील. अर्थात ते नंतर मला परत करतीलच. माझ्याच शाळेचे संस्कार आहेत, कोणाचा फुकटचा एक पैसा खाणार नाहीत.
पण आता आयत्या वेळी काय कारण देऊ जे त्यांना निरुत्तर करेल. वा झाल्यास तेच मला म्हणतील बघ मग नसेल जमत तर नको येऊस...
तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता?
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकराना साष्टांग नमस्कार
म्हणजे सिरीयसलीच नमस्कार>>
मी देखील आमचा कॉलेजचा मिक्स
मी देखील आमचा कॉलेजचा मिक्स ग्रुप सोडुन पस्तावलेय पण काय्ये ना तिथे मला फार नकारात्मक अनुभव आला. उगाच ट्रोलिंग करणे, एखाद्याला (मला) टार्गेट करणे. फालतू जोक्स करणे. खोटे बोलणे. सोडुन दिला मी मग.
मैत्रिणिंचा देखील होता पण तिथेही मुलाबाळांविषयी गप्पांचा अतिरेक होता. माझे मन रमले नाही. समान शील व्यसनेषु सख्यम असे कोणी फारसे मिळत नाहीत.
ऋन्मेष, मला तुमचे धागे आवडतात
ऋन्मेष, मला तुमचे धागे आवडतात कारण ते हलकेफुलके व इन्टरॅक्टिव्ह असतात. तिथे व्यक्त होता येते. मध्यंतरी मी कटु बोलले असेन तर (म्हणजे बोललेलेच एकदा) माफ करा. सर्वच धागे एकदम प्रकांडपंडीती माहीतीपर किंवा ललित-निबंध, कविता असे निघू लागले तर व्यक्त होणार कसे? तेव्हा असे धागे वेलकम आहेतच.
मला शीर्षक वाचून आधी वाटलं
मला शीर्षक वाचून आधी वाटलं होतं की पिकनिकला चाललेत आणि याच्याकडे नॉनव्हेज मधील एक डिश आणण्याचे काम दिलेय, तेव्हा तंडगी कबाब की लेग पीस की पाया सूप वगैरे चर्चा असेल. मग धागा वाचल्यावर मी हे विसरूनच गेलो होतो. आता टांग वरून अस्मिताची पोस्ट पाहून आठवलं.
सामो, मला आठवतही नाही तुम्ही
सामो, मला आठवतही नाही तुम्ही कुठे काही कटू बोललेले. मी कटू पोस्ट वाचल्यावर त्यामागचा आयडी कधी लक्षात ठेवत नाही. त्याने आपल्याही नकळत मनात एक डूख धरला जातो. अर्थात जे सातत्याने आपल्याला टार्गेट करतात ते लक्षात राहतातच, त्याला नाईलाज असतो. पण बहुतांश लोकं जे आपल्याला टारगेट करत नसून आपण काढलेल्या त्या धाग्याला, त्या विषयाला टारगेट करत असतात त्यांच्याबद्दल मनात उगाच काही किल्मिष राहत नाही. त्यामुळे फार विचार करू नका. तो मला करू द्या. उद्या पिकनिकला मित्रांना टांग कशी द्यायची
तेव्हा तंडगी कबाब की लेग पीस
तेव्हा तंडगी कबाब की लेग पीस की पाया सूप वगैरे चर्चा असेल. >>> वॉव ईसकू बोलते है मांसाहार प्रेमी
मित्रांना सांगा की मागे
मित्रांना सांगा की मागे पिकनिकला गेलो होतो तेव्हा माबो नावाच्या साईटवर डुप्लीकेट आयडी द्वारे माझ्या चारित्र्यहननाचा कट रचण्यात आला होता. तेव्हापासुन मला माबोवर तळ ठोकुन रहावे लागते. सो नो पिकनिक. सॉरी.
वीरू
वीरू
अरे देवा... हे लक्षात च नाही
अरे देवा... हे लक्षात च नाही आले
गेल्यावेळी दारूचा कट.. यावेळी माझा राज कुंद्राच करतील
वीरू धन्यवाद हा धोका वेळीच दाखवल्याबद्दल, हे कारण पिकनिक नाकारायला तर त्यांना देऊ शकत नाही. पण जावेच लागले मनाविरुद्ध पिकनिकला तर निदान एक डोळा माबोवर ठेवता येईल
त्यांना म्हणावं बायकोच्या गटग
त्यांना म्हणावं बायकोच्या गटग ला तुम्हीदेखील गेला होतात त्यामुळे बायको अडून बसली आहे तुमच्या पिकनिक ला तुमच्या सोबत यायला...
काय ठरलं?
काय ठरलं?
पिकनिक चे photo share करा
पिकनिक चे photo share करा
मित्रांना टांग देणार नाही ह्याची खात्री आहे
त्यामुळे बायको अडून बसली आहे
त्यामुळे बायको अडून बसली आहे तुमच्या पिकनिक ला तुमच्या सोबत यायला...
>>>>>
तो पर्याय तर त्यांनी स्वतःच दिला आहे...
बायाकापोरांना सोडून कुठे जायचे नसेल तर ये घेऊन त्यांना सोबत, तुला वेगळा फॅमिली रूमही देतो हवे तर हा पर्यायही त्यांनी खुला ठेवलाय..
सकाळी सहाला उठायचेय, आणि मी ईथे मायबोलीवर रात्रीचे दिड वाजता झोपायचे सोडून पॅकिंग न करता अजूनही कोणीतरी काहीतरी सल्ला देईल या आशेवर आहे
तीन वाजले.. अजूनही आशेवर..
तीन वाजले.. अजूनही आशेवर.. सकाळी काही सोनेरी किरणे उगवतील.. शुभरात्री
एका ट्रक च्या मागे मेसेज
एका ट्रक च्या मागे मेसेज लिहिलेला
हो सके तो पास कर नही तो बरदास कर
What is the update
What is the update
गेले बहुतेक ते ट्रिपला.
गेले बहुतेक ते ट्रिपला.
व्यत्यय
व्यत्यय
तुम्ही 'टांग' दिल्यावर ती
तुम्ही 'टांग' दिल्यावर ती टांग स्वीकारणारे कुठलं गाणं म्हणतील?
(मामी यांचं 'गाणी ओळखा' धाग्यावर अश्या अर्थाचं कोडं आणि मानव ह्यांनी सोडवलं, तिथून साभार).
'पाय' लिया हो हो हो हो!
(No subject)
मित्रांना टांग देणार नाही
मित्रांना टांग देणार नाही ह्याची खात्री आहे Happy
इतक्या सहजासहजी नव्या धाग्याची ठिणगी कशी वाया जावु द्यायची.
नाहीच जाता आलं किंवा गेलं तर माबोवर स्वतःच एक मिळताजुळता आयडी काढुन वर्जिन (किंवा वर्जित) विषयावर काडी-धागा काढुन होळीची बोंब ठोकायची.
प्रतिसाद
प्रतिसाद
टांग मारता मारता केलेल्या ट्रिपच्या वृत्तांताच्या प्रतीक्षेत .
गेलास कारे
गेलास कारे
पिकनिक तरी खरी आहे का?
पिकनिक तरी खरी आहे का?
बहुतेक ते धाग्याला टांग मारून
बहुतेक ते धाग्याला टांग मारून पिकनिक ला गेलेले दिसतात
गेलास कारे Proud
गेलास कारे Proud
हेमां (हेमाच) मातारानी.............................
बहुतेक ते धाग्याला टांग मारून पिकनिक ला गेलेले दिसतात
धागा काय कुठे पळुन जात नाही. गेलेच पिकनिकला तर परत येवुन लोकं आहेतच मामु १०० करायला.
सुबह का भूला शाम को वापस आये
सुबह का भूला शाम को वापस आये तो उसे पिकनिक नहीं कहते
मला तर बाई गंमतच वाटते ....
मला तर बाई गंमतच वाटते .... मित्रांची अन माबोकरांची! इतके धागे काढतो ..... फुस्क्या पाद्र्या गोष्टींसाठी .... त्याचे चाहते तर प्रतिसाद देतातच देतात पण हेटर्सही देतात अन तोही त्यांना पुरून उरतो. कुछ तो खास है! नो बडी इग्नोर हिम ना मित्र ना माबोकर्स. रुन्म्या म्हणजे निव्वळ करमणूक!
शाहरुखच्या वळणावर गेलाय
शाहरुखच्या वळणावर गेलाय
आलास का रे? कशी झाली पिकनिक?
आलास का रे? कशी झाली पिकनिक?
Pages