गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.
तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात
तर आता जे मित्र अजूनही एकमेकांच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आहेत त्यांच्या महिन्या दर महिन्याला मैहफिली रंगतच असतात. पण सर्व वर्गातल्या पोरांची मिळून वर्षाला साधारण एखादी किमान वन नाईट स्टे करायची पिकनिक निघते. गेले सहा सात वर्षे हे चालत आलेय. दर पिकनिकला साधारण तीस चाळीस जण असतात.
मी माझ्या क्लोज ग्रूपच्याच शालेय मित्रांनाच साधारणपणे वर्षातून एकदा भेटतो. पण पुर्ण क्लासची जी पिकनिक निघते त्यात आजवर एकदाही गेलो नाही.
सुरुवातीला एक दोन वर्षे कोणी काही म्हटले नाही. पण तिसर्या वर्षापासून मित्रांच्या लक्षात येऊ लागले की बाकी सारे एकदा ना एकदा तरी पिकनिकला आले आहेत. पण हा रुनम्याच अजून एकदाही आला नाही.
ग्रूपमधील निम्मी मुले परदेशात आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर. तरी ते सुद्धा एक दोन वर्षा आड का होईना त्या काळात भारतात/ मुबईत येऊन पिकनिकला उपस्थिती नोंदवून गेली आहेत. मग यालाच का जमत नाही असे त्यांना वाटत असल्याने मला दरवर्षी न जाण्याचे काहीतरी दणदणीत कारण द्यावे लागते.
यावर्षी तर ठरवून त्यांनी चार महिने माझ्या मागे लागून लागून माझ्याकडे कुठला पर्यायच राहणार नाही हे पाहिले. तारीख वेळ स्थळ काळ सारे काही माझ्या मतानुसार सोयीनुसारच ठरवून घेतले. सुरुवातही माझ्याकडूनच काँट्रीब्यूशन घेऊन केली. आणि बघता बघता पिकनिक तोंडावर आली तसे आता खरेच जावे लागणार या विचाराने मला टेंशन आलेय.
भरलेले पैसे गेले तरी चालतील. अर्थात ते नंतर मला परत करतीलच. माझ्याच शाळेचे संस्कार आहेत, कोणाचा फुकटचा एक पैसा खाणार नाहीत.
पण आता आयत्या वेळी काय कारण देऊ जे त्यांना निरुत्तर करेल. वा झाल्यास तेच मला म्हणतील बघ मग नसेल जमत तर नको येऊस...
तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता?
तुम्ही कितीही कारणे दिली तरी
तुम्ही कितीही कारणे दिली तरी ती कशी चुकीची आहेत हेच तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल तेव्हा करणे देण्यात वेळ घालवू नका लोकहो.
कोविडचा धोका संपलेला नसताना .
कोविडचा धोका संपलेला नसताना .......
Submitted by वावे
असे धंदे करायचे मग मोठी लाट आली की सरकारला दोष द्यायचा.....
Submitted by मानव पृथ्वीकर
>>>>>
आमचे ऑफिस आलमोस्ट रेग्युलर सुरू केलेय या आठवड्यापासून.
जवळपास १०० लोकं रोज एका फ्लोअरवर बसून काम करतात, कॉमन टॉयलेट, कॉमन कॅंटीन वापरतात. यातले कित्येक पब्लिक ट्रान्सपोर्टने गर्दीतून येतात.
याला परवानगी सरकारनेच दिली आहे.
याला सरकारचा नाईलाज म्हणावे तर गेले वर्ष दिड वर्षे आमचे वर्क फ्रॉम होम सेट अप छान बसून कसलाही तोटा न होता कंपनी सुरळीत चालू होती. तरीही ऑफिस उघडलेय.
माझ्याकडे ऑफिसला जायचा नकार द्यायचा पर्याय नाही. कंपनी सरळ सुट्टी टाका म्हणते.
त्यामुळे कोरोनाला फाट्यावर मारून आवश्यक नसतानाही कामाला जुंपायचे आणि कोणी पिकनिकला जातेय म्हटले तर आता सरकारला दोष देऊ नका म्हणायचे हि क्रूर थट्टा आहे असे मला वाटते. पण असो, नाही देत सरकारला दोष.
बाकी यावर वेगळा धागा काढतो नंतर. यातच चर्चा अडकली तर मला पिकनिकला टांग द्यायचे कारण मिळणार नाही.
कोरोनाबाबत म्हणायचे झाल्यास कोणाला स्वत:ला वा घरच्यांना बरे नसल्यास त्यांनी येऊ नये असे ठरवले आहे. तसेच सारे जण किमान एक वॅक्सिन घेतलेले आहेत. तिसरी लाट येणार असेल तर त्याआधी हि पिकनिक सर्वांना उरकायची आहे.
@ सुनिधी, हीरा
@ सुनिधी, हीरा
हो, विचार येतो मध्येच की जावे एकदा आणि पडताळून पहावे. पण एखादी ती एक्साईटमेण्ट आतून येत नाही तिथे जाणे मी टाळतो. कारण आधीही काही वेळा सिमिलर अनुभवात बोअर झालो आहे. ज्यात मायबोलीचा एक वर्षाविहारही जोडा. याऊलट मला माझ्या पोरांसोबत गार्डनमध्ये वा नाक्यावर फिरून यायला सांगितले तर मी तब्येत बरी नसतानाही लगेच ऊठून पॅंट चढवतो.
चला ते बोअर होणेही एकवेळ परवडते. पण जिथे बोअर होतो पण तसे ईतरांना दाखवायचे नसते तेव्हा फारच अवघड होऊन जाते.
कसला Inferiority Complex
कसला Inferiority Complex (न्यूनगंड) आहे का ते हवं तर एकदा तपासून बघा.
>>>>
@ निरू,
या शक्यतेबद्दल धन्यवाद.
ते आत्मपरीक्षणात तपासून झालेय.
एकेकाळी ईंग्रजी फाडफाड बोलणाऱ्यांसमोर यायचा. स्पेशली नवीन जॉबला लागलो होतो तेव्हा. पण आता तो गेलाय. यावर खरे तर एक वेगळा धागा काढायला हवा.
असो, पण ईथे सारे मित्र मराठी मिडीयमचे त्यामुळे तो प्रश्न नाही.
पण दुसरा कुठलाही न्यूनगंड नाही.
किंबहुना आता जसा माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झालाय ते पाहता तशी शक्यताही नाही. जगात काही लोकांकडे काही गोष्टी आपल्यापेक्षा भारी असणारच. ईटस ओके. ना त्याची खंत ना लाज. उद्या मी माझ्या फॅमिलीसह हॉटेलात गेलो असताना अंबानी परीवार जरी शेजारच्या टेबलवर येऊन बसले तरी काहीही ऑकवर्ड न वाटता ते त्यांचे खातील, मी माझे खाईन म्हणून नॉर्मल वागू शकतो.
कसला Inferiority Complex
कसला Inferiority Complex (न्यूनगंड) आहे का ते हवं तर एकदा तपासून बघा.
अगदी बरोबर. सोशल मीडियावर हायपर ऍक्टिव्ह असणारे लोक बऱ्याच वेळेला वैयक्तिक आयुष्यात मुखदुर्बल, कमी आत्मविश्वासाचे आणि न्यूनगंडाने पछाडलेले असतात. ह्या न्यूनगंडामधून मग दुसऱ्या यशस्वी लोकांबद्दल असूया निर्माण होते.
आमचे ऑफिस आलमोस्ट रेग्युलर
आमचे ऑफिस आलमोस्ट रेग्युलर सुरू केलेय या आठवड्यापासून...
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2021 - 10:50
>> ऑफिसची गोष्ट वेगळी आणि पिकनिकची वेगळी.
किती तरी लोकांना वर्क फ्रॉम होम करणंच शक्य नाही. ते नेहमीच ऑफिसला जातायत. उदा. बँकेचे कर्मचारी. ऑफिसला जाणं आवश्यक असेल तर गेलंच पाहिजे. पिकनिकला जाणं ज्यांना आवश्यक वाटतंय (उदा. तुझे क्लासमेट्स) ते जातच आहेत ना. तुला जायचं नाहीये असं दिसतंय. आणि अशी पिकनिक काढणं बरोबरही नाही. ( दुसरी लाट येण्यापूर्वी पुण्यातल्या ओळखीच्या काही बायका सातआठजणी मिळून एक गाडी करून पुण्याजवळ एक दिवस पिकनिकला गेल्या होत्या. आल्यावर त्यातल्या तिघीजणी कोविडने आजारी पडल्या. एकीच्या मुलालाही झाला नंतर. सुदैवाने कुणी गंभीर आजारी झालं नाही)
तिसरी लाट येण्यापूर्वी >>> लाटेत आजारी पडतात ती माणसंच असतात आपल्यासारखी. आपण मजा करायला म्हणून जी कृती करतो त्यामुळे आपण कुणाला तरी ( उदा. एखाद्या घरातल्या आजीआजोबांना) धोक्यात टाकत असू शकतो हे भान ठेवलं पाहिजे.
सोशल मीडियावर हायपर ऍक्टिव्ह
सोशल मीडियावर हायपर ऍक्टिव्ह असणारे लोक बऱ्याच वेळेला वैयक्तिक आयुष्यात मुखदुर्बल, कमी आत्मविश्वासाचे आणि न्यूनगंडाने पछाडलेले असतात. ह्या न्यूनगंडामधून मग दुसऱ्या यशस्वी लोकांबद्दल असूया निर्माण होते.>> याला प्राथमिक अवस्था म्हणता येईल. यापुढे जाऊन ती व्यक्ती सोशल मिडीयावर अनेक चेहऱ्यांनी वावरायला लागते. त्याही पुढे जावुन सोशल मिडीयावरच्या आपल्या वावरावर कोणीतरी पाळत ठेवुन आहे, आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी खोडसाळपणे आपले चारित्र्यहनन करत आहे असेही भास त्या व्यक्तीला होऊ शकतात. (यापुढच्या अवस्थांवर जाणकारांनी प्रकाश टाकावा, जेणेकरुन माबो वर अशी एखादी व्यक्ती असलीच तर तिला वेळीच सावरता येईल आणि हा धागा कारणी लागेल.)
असेही भास त्या व्यक्तीला होऊ
असेही भास त्या व्यक्तीला होऊ शकतात.
मायबोलीवर कोणी समुपदेशक असतील तर त्यांनी अशा लोकांचे वेळीच समुपदेशन करावे. आभासी आणि खरे जग ह्यातली सीमारेषा धूसर झाल्यास ही समस्या अजून वाढू शकते.
आभासी आणि खरे जग ह्यातली
आभासी आणि खरे जग ह्यातली सीमारेषा धूसर झाल्यास ही समस्या अजून वाढू शकते.> +१११
Submitted by ऋन्मेऽऽष on 30
Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2021 - 11:00 >>>
येणाऱ्या लाटेत शक्य तेवढे कमीत कमी लोक बाधीत व्हावे हे पहायला पाहिजे. आमचे अजूनही वर्क फ्रॉम होम सुरू आहे, आठवड्यातून एक कधी दोन दिवस ऑफिस.
आवश्यक गोष्टी सोडून बाहेर फिरणे टाळा याची ट्यून फोनवर अजूनही सुरू आहे.
तुमच्या ऑफिसने हट्टीपणा केला तर मग आता कोणालाही कुठंही कितीही गर्दी करू द्या हे काय लॉजिक झाले?
वावे, कोरोना मी टाळतच होतो या
वावे, आणि मानव कोरोना मी टाळतच होतो या धाग्यात. पण अर्थात ती चर्चा होणारच होती.
तरी त्यावर मी सर्वसमावेशक वेगळा धागा दोनचार दिवसात काढतोच. आधी या पिकनिकचे काय करावे हे समजत् नाहीये. कारण आता फक्त १५-१६ तासांचाच अवधी माझ्या हातात शिल्ल्लक आहे...
वीरू छान मुद्दा उचललात.
वीरू छान मुद्दा उचललात. त्यावर होणारी चर्चा नक्कीच तुम्ही म्हणता तसे कोणालातरी फायदेशीर ठरेल. तरी. ईतक्या छान चर्चेला स्वतंत्र धागा हवा. तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही काढा. अन्यथा मी सुद्धा काढू शकतो. याबाबत वैयक्तिक अनुभवही बराच गाठीशी आहे.
@ पिकनिक, सध्या मी माझ्या
@ पिकनिक, सध्या मी माझ्या मनात काय चालू आहे हे जराही एक्सपोज न करता छान केसदाढी करतानाचा सलूनमध्येच फोटो काढून ग्रूपवर आणि व्हॉटसप स्टेटसवर सुद्धा टाकला आहे. जेणेकरून पुढे टांग द्यायला जमले तर बघा मी तर ईतकी तयारी केलेली. ईतका उत्सुक होतो यायला असे सांगता येईल.
तुम्हाला घ्यायला आले कि झोपून
तुम्हाला घ्यायला आले कि झोपून राहा, ते उठवतील तेव्हा आरामात उठा, सकाळची आन्हिक आवरा. मग अंघोळीला जाऊन मस्त अर्धा तास घ्या. पुन्हा कपडे भेटत नाहीत हा बनाव रचा. अर्धा एक तास उशीर झाला कि मित्रच तुम्हाला टांग देतील.
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकराना साष्टांग नमस्कार
म्हणजे सिरीयसलीच नमस्कार
(No subject)
जायचं ठरलं तर सेवेचा लाभ
जायचं ठरलं तर सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती
https://www.google.com/travel/hotels/entity/CgoIlMSp5q7q87ZVEAE/lightbox...
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकराना साष्टांग नमस्कार
म्हणजे सिरीयसलीच नमस्कार
Submitted by आशुचँप on 30 July, 2021 - 16:40
एकदम सहमत
(No subject)
त्यांना टांग का द्यायची
त्यांना टांग का द्यायची त्यांच्या आपापल्या टांगा नाहीत का ? किती जणांना पुरणार अशी एक टांग तरी , त्यामुळे खरे सांगून टाकावे.
खरे सांगा. कशाला
खरे सांगा. कशाला अप्रामाणिकपणा हवा. तरीसुद्धा जे मागे लागतील त्यांना स्पष्ट समज द्या. दे नीड टु रिस्पेक्ट युअर चॉइस.
स्व जो hahaha
स्व जो hahaha
क़ाय तो मेकप
रुनमेश ही असाच दिसतो जरा जरा नै?
Submitted by अनिश्का on 30
Submitted by अनिश्का on 30 July, 2021 - 19:45
आरारारा
पापडपोल का काय तरी लागायचं ना
पापडपोल का काय तरी लागायचं ना त्यात होता असावाला स्व.जो.
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद
या धाग्यावर सिरियसली प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकराना साष्टांग नमस्कार
म्हणजे सिरीयसलीच नमस्कार
>>>>>>>
तुम्हाला नक्की काय असत्य वाटतेय यात? आणि ते कसे सत्य सिद्ध करता येईल मला जे तुम्हाला पटेल हे सांगा. मी जमल्यास ते करतो.
उगाच हवेत भुंगा सोडण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा विडा उचला.
रुनमेश ही असाच दिसतो जरा जरा
रुनमेश ही असाच दिसतो जरा जरा नै? >>> माझा लूक दर सहा महिन्याला बदलत राहतो. आणि यावर मी वेगळा धागाही काढू शकतो. किंबहुना आता जश्या अवांतर पोस्ट येणार तसे मी पुढच्या आठवड्यात ते ते धागे काढणार. ईथे एक तर १० तासांचा वेळ शिल्लक आहे आणि काही सुचत नाहीये अजून
दे नीड टु रिस्पेक्ट युअर चॉइस
दे नीड टु रिस्पेक्ट युअर चॉइस
>>>>
नुकताच एक फार मोठा सीन झालाय ग्रूपवर.
एकजण असाच फारसा अॅक्टीव्ह नसणारा सभासद ग्रूपमधून बाहेर पडला. पण गप्प बाहेर पडायचे ना, तर नाही. जाताना पोस्ट लिहिली की ईथली सबस्टॅण्डर्ड चर्चा माझ्या काही उपयोगाची नाही. मला ईतरही कामे आहेत करायला तर मी ग्रूप लेफ्टतो.
झाले, पोरे चिडली. जे साहजिकच होते. सगळे आज आपल्या आयुष्यात आजा छान सेटल आहेत आणि हा त्यांच्या कट्ट्यावर मारल्या जाणार्या मैत्रीच्या गप्पांना सबस्टॅण्डर्ड चर्चा बोलतोय... कोणाला आवडणार
त्यामुळे मला आता असा कुठलाही भावनिक सीन करून कोणाला दुखवायचे नाहीये.
Sounds good.
Sounds good.
मला ईतरही कामे आहेत करायला तर
मला ईतरही कामे आहेत करायला तर मी ग्रूप लेफ्टतो
अशा लोकांमुळेच जगाचं रहाटगाडं चालू आहे.
अशा लोकांमुळेच जगाचं रहाटगाडं
अशा लोकांमुळेच जगाचं रहाटगाडं चालू आहे.
>>>>>
हा एक वेगळा धागा आहे. नोंद करतो. सोशलसाईटला लेफ्टणारे लोकं जगाचा रहाडगाडं चालवतात आणि सोशलसाईटवर सक्रिय असणारे लोकं बिनकामाचे असतात वा बिनमहत्वाची कामे करत असतात असा एक साधारण समज आढळतो. जो तुटणे गरजेचे आहे.
Pages