रात्रीच्या अंधारात धागे काढायचो,,,,
रात्रीच्या अंधारातच सोडून जातोय,,,,
जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते.
अन्न आहे तोंडात खोटे नाही बोलणार, जेव्हा जेव्हा माझ्या धाग्यांची विडंबने बनली आहेत तेव्हा तेव्हा सर्वात जास्त मीच ती आवडीने वाचली आहेत.
ही काही पहिली वेळ नव्हती अशी विडंबने पचवायची, पण पारंबीचा आत्मा यांनी लिहिलेले खरेच खूप छान होते. जणू ऋन्मेष म्हणून मी जे काही जगलो त्याचे सारे सारच चारच पॅराग्राफमध्ये मांडले होते. जणू सारांशात माझीच बायोग्राफी वाचत आहे असे मला वाटले. आयुष्यात जेव्हा आत्मचरीत्र लिहायची वेळ येईल तेव्हा मी पहिली विनंती पारंबीचा आत्मा यांनाच करेन. जर त्यांनी ती धुडकावली तर नाईलाजाने मीच लिहेन. पण लिहेन जरूर. कारण प्रत्येकाचे आत्मचरीत्र लिहिले गेले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आलेय. प्रत्येक माणूस स्पेशल असतो. प्रत्येकात निसर्गाने काहीतरी वेगळेपण बनवले आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाने ते कागदावर ऊतरवले पाहिजेत. अन्यथा ते एक दिवस तुमच्यासोबतच नष्ट होऊन जातील. म्हटले तर ते अनुभव वरवर साधारण वाटणारे असतील. पण तरीही लिहावे. कदाचित येणार्या पिढीसाठी तो अनमोल ठेवा ठरू शकतो.
ईथे स्वानुभावांवर धागे काढण्यामागे माझा हाच हेतू होता. कोणाला आवडायचे, कोणाला नाही, कोणी तिथे प्रतिसाद देत व्यक्त व्हायचे, तर कोणी फक्त प्रतिसादच वाचायचे. राग लोभ, स्तुती निंदा, ऊपकार अपकार, फायदा तोटा, यातले कश्याचेही गणित न मांडता माझा धाग्यांचा कारखाना अविरत चालू होता. पण आज त्याला खीळ बसली. आणि ती खीळ मलाच घालावीशी वाटली. त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले.... आणि ज्याने मायबोलीवर ईयत्ता दुसरी पास केली आहे त्यालाही हे ठाऊक असावे की त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होणारच होते.
पण तरीही वाटले आता बस्स झाले !!
भले काळजात एकदम ठस्स झाले !!
कारण हा निर्णय मी कसा झेलणार, उद्या माझे काय होणार, ऊद्या मला पुन्हा मायबोलीची आठवण येईल का, ऊद्या मला पुन्हा ईथे काहीतरी लिहावेसे वाटेल का, किमान डोकावावेसे तरी वाटेल का, याच धाग्यावर काय प्रतिसाद येतील ते तरी उद्या बघावेसे वाटतील का, काय अवस्था होणार आहे उद्या माझी, याची मला आज जराही कल्पना नाही....
पण तरीही आता खरेच बस्स झाले.. धावता धावता कुठेतरी बसायची वेळ आता आली आहे. भले आपण माश्यासारखे पाण्यात पोहत असू, पण तेच पाणी माश्यासारखे पिता येत नाही. त्यासाठी कुठेतरी थांबावेच लागते. ते पाणी पिण्यासाठी थांबायची वेळ आता झाली आहे..
जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे..
रजा घेतो मित्रांनो, काळ खराब आहे, जगलो वाचलोच,
तर परवा पुन्हा भेटूया .......!
अरे हो, जाता जाता, सर्वांचे मीम्स खरेच खूप छान होते. जाता जाता खरेच खूप हसवलेत सर्वांनी. मायबोली संयोजक मंडळाने यंदा मीम्स स्पर्धा घ्यायला हरकत नाही. जाता जाताही मायबोलीचा विचार सुटत नाहीये
शुभ रात्री, शब्बाखैर, खुदा हाफिज ... लव्ह यू ऑल
- ऋन्मेऽऽष
हृदयी वसंत फुलताना
हृदयी वसंत फुलताना
'मी मी पणाची' मात्र आता ओ
'मी मी पणाची' मात्र आता ओ आलेली आहे. बास करा प्लीज ही कळकळीची विनंती!!! असो.
@मानव
@मानव
लोल मानव...
लोल मानव...
ओ एम जी !
ओ एम जी !
धागा विरंगुळ्यात गेला ...
मानव
मानव
मानवदादा
मानवदादा
अगं , सामो हे सगळे लाईटली घे . नुसता ड्रामा आहे.
मी मी पणाचा माझा आवडता व्हिडिओ ...
https://youtu.be/MC85TFltMKA
मानव
मानव
@ अस्मिता,
@ अस्मिता,
हा विडिओही बघा .. तिथेच तुम्ही दिलेल्या लिंकवरच सापडला, तुलनेत जास्त मजेशीर वाटला
https://www.youtube.com/watch?v=LZE9VEeRl6w
हा पाहिलायं ऋ , दुसराही आहे
हा पाहिलायं ऋ , दुसराही आहे अक्की आणि बेअर ग्रिल्स तो पण धमाल आहे.
https://youtu.be/CbpgpCMD6AM
वरचा चुकीचा होता, बदलला आहे.
धागा विरंगुळामधे हलवलायं आता काहीही दिले तरी फार अवांतर होणार नाही.
https://youtu.be/MC85TFltMKA
https://youtu.be/MC85TFltMKA
मी मायबोली सोडून जात आहे आणि मीच प्रतिसाद लिहीत आहे आणि मीच वाचत आहे आणि त्या प्रतिसादला मीच उत्तर देत आहे
On serious note, Solipsism विषयी कुणाला माहिती आहे का? ती एक भन्नाट थियरी आहे.
हा धागा विरंगुळा बनला का??मी
हा धागा विरंगुळा बनला का??मी पण येते मग..मज्जा मज्जा सुरूए वाटतं
आजकाल अजबगजब सल्ले मागणारे
आजकाल अजबगजब सल्ले मागणारे चकटफू कोतबो धागे दिसत नाहीत जास्त. कुठे चाललीये मायबोली माझी?
मृणाली, तुम्ही मजा करू शकता
मृणाली, तुम्ही मजा करू शकता येथे, पण तुम्हाला (आई मीन ईथल्या कोणालाही) आयुष्यात कधीही मायबोली सोडून जावी वाटले (किमान एक दिवसासाठी) तर तुम्ही हा धागा वापरू शकता.
पण काही तासांपुरता सोडायची असेल तर प्लीज आपला आपला वेगळा धागा काढावा
इतका रिकामा वेळ कसा काय मिळू
इतका रिकामा वेळ कसा काय मिळू शकतो एखाद्याला?
लेख पाडा, त्यावर निम्म्याहून अधिक प्रतिक्रिया स्वतःच्याच
(No subject)
तुम्ही मजा करू शकता येथे, पण
तुम्ही मजा करू शकता येथे, पण तुम्हाला (आई मीन ईथल्या कोणालाही)
मागे तुम्हीच सांगितले की तुमचं इंग्रजीचं ज्ञान अगदीच सामान्य आहे. हे पाहता वरच्या वाक्याचा अर्थ - कोणाची तरी आई मीन राशीची आहे असा घ्यायला हरकत नसावी.
(No subject)
@ aashu29
@ aashu29
इतका रिकामा वेळ कसा काय मिळू शकतो एखाद्याला?
>>>>>
टाईम मॅनेजमेंट आणि स्मार्ट ऑफिस वर्क
..
वरच्या वाक्याचा अर्थ - कोणाची तरी आई मीन राशीची आहे
>>>>
ईंग्लिश आणि मराठी, हिंदी या भाषेत काही शब्द कॉमन असतात पण अर्थ वेगळा.. ते मजेशीर घोळ घालतात. काढूया एक धागा
मानव
मानव
मी हा धागा न वापरताही धागा यायच्या आधीपासून च एक दोन दिवस मायबोली सोडून देते .परत येते. पण कोणाला कळायचंच नाही ते. आता धाग्याचा सदुपयोग करेन.
काढूया एक धागा Happy">> अं हं , दोन हवेत
1. टाईम मॅनेजमेंट फॉर माबो आणि स्मार्ट ऑफिस वर्क ( धागा मजकुर सगळ्यांना समजेल अशा मराठीत)
2. कॉमन शब्द डिफ्रंट अर्थ
वर्णिता, पहिला धागा काढायचाच
वर्णिता, पहिला धागा काढायचाच आहे. हे आधीच १-२ प्रतिसादात लिहिले आहे.
या विकेंडला दोन्ही काढतो
नक्की धागा काढा पण सिम्पल
नक्की धागा काढा पण सिम्पल भाषेत लिहा.
अति शुद्ध मराठी वाचवत नाही.. दाताखाली दगड आल्यासारखे वाटतात जड मराठी शब्द...
अर्रर्र!!
अर्रर्र!!
गेलं का? पटकनी दिंडी
गेलं का? पटकनी दिंडी दरवाजा बंद करुन घ्या रे.
(No subject)
असा शाहरुखचा फोटो नाही कां?
असा शाहरुखचा फोटो नाही कां?
शेवटी अमिताभ तो अमिताभच
अमिताभ तो अमिताभच +७८६
अमिताभ तो अमिताभच +७८६
शाहरूख तो शाहरूखच +७८६
दोघे सुपर्रस्टार आहेत. मी दोघांना मानतो. लोकांना उगाच वाटते की मी शाहरूखचा फॅन आहे तर अमिताभ वा आमीर यांना पाण्यात बघायलाच हवे
बाकी हा फोटो वरची अमांची
बाकी हा फोटो वरची अमांची पोस्ट वाचून गंमतीने टाकला होता.
तुम्ही ऋन्मेष बाहेर गेलाय म्हणत दिंडी दरवाजा लाऊन घ्यायचा विचार करू लागलात, पण ऋन्मेष स्वतःच तो दरवाजा बंद करून टाळे मारून आत तुमची वाट बघत बसलाय
मोराल ऑफ द पिक्चर - अशी पटकन सुटका नाही
हा हिरो बॅ बॅ बकरीछाप वाटत
हा हिरो बॅ बॅ बकरीछाप वाटत नाही. अँग्री यंग मॅन वाटतो.
पण आताच्या पानावर पंचवीसपैकी
पण आताच्या पानावर पंचवीसपैकी नऊ धागे सोडण्याच्या तयारीतल्या लेखकाचे आहेत.
काशीला निघाले पण पुढच्या चौकातूनच परततात तांब्या घ्यायला. मग झोप काढून दुसरे दिवशीचं प्रस्थान ठेवतात. पण पुन्हा चौकातून माघारी. दात ब्रश करायला ब्रश राहतो. मग नंतर शांपू, कंगवा, पेनड्राइव . . . . .
परत आलाच आहेत तर लेकीची सायकल दुरुस्त करून आणा, .....
ही तर माय आपली माया बोली.
Pages