मायबोली सोडून जाताना ........

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 June, 2021 - 17:43

रात्रीच्या अंधारात धागे काढायचो,,,,
रात्रीच्या अंधारातच सोडून जातोय,,,,

जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते.

अन्न आहे तोंडात खोटे नाही बोलणार, जेव्हा जेव्हा माझ्या धाग्यांची विडंबने बनली आहेत तेव्हा तेव्हा सर्वात जास्त मीच ती आवडीने वाचली आहेत.
ही काही पहिली वेळ नव्हती अशी विडंबने पचवायची, पण पारंबीचा आत्मा यांनी लिहिलेले खरेच खूप छान होते. जणू ऋन्मेष म्हणून मी जे काही जगलो त्याचे सारे सारच चारच पॅराग्राफमध्ये मांडले होते. जणू सारांशात माझीच बायोग्राफी वाचत आहे असे मला वाटले. आयुष्यात जेव्हा आत्मचरीत्र लिहायची वेळ येईल तेव्हा मी पहिली विनंती पारंबीचा आत्मा यांनाच करेन. जर त्यांनी ती धुडकावली तर नाईलाजाने मीच लिहेन. पण लिहेन जरूर. कारण प्रत्येकाचे आत्मचरीत्र लिहिले गेले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आलेय. प्रत्येक माणूस स्पेशल असतो. प्रत्येकात निसर्गाने काहीतरी वेगळेपण बनवले आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाने ते कागदावर ऊतरवले पाहिजेत. अन्यथा ते एक दिवस तुमच्यासोबतच नष्ट होऊन जातील. म्हटले तर ते अनुभव वरवर साधारण वाटणारे असतील. पण तरीही लिहावे. कदाचित येणार्‍या पिढीसाठी तो अनमोल ठेवा ठरू शकतो.

ईथे स्वानुभावांवर धागे काढण्यामागे माझा हाच हेतू होता. कोणाला आवडायचे, कोणाला नाही, कोणी तिथे प्रतिसाद देत व्यक्त व्हायचे, तर कोणी फक्त प्रतिसादच वाचायचे. राग लोभ, स्तुती निंदा, ऊपकार अपकार, फायदा तोटा, यातले कश्याचेही गणित न मांडता माझा धाग्यांचा कारखाना अविरत चालू होता. पण आज त्याला खीळ बसली. आणि ती खीळ मलाच घालावीशी वाटली. त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले.... आणि ज्याने मायबोलीवर ईयत्ता दुसरी पास केली आहे त्यालाही हे ठाऊक असावे की त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होणारच होते.

पण तरीही वाटले आता बस्स झाले !!

भले काळजात एकदम ठस्स झाले !!

कारण हा निर्णय मी कसा झेलणार, उद्या माझे काय होणार, ऊद्या मला पुन्हा मायबोलीची आठवण येईल का, ऊद्या मला पुन्हा ईथे काहीतरी लिहावेसे वाटेल का, किमान डोकावावेसे तरी वाटेल का, याच धाग्यावर काय प्रतिसाद येतील ते तरी उद्या बघावेसे वाटतील का, काय अवस्था होणार आहे उद्या माझी, याची मला आज जराही कल्पना नाही....

पण तरीही आता खरेच बस्स झाले.. धावता धावता कुठेतरी बसायची वेळ आता आली आहे. भले आपण माश्यासारखे पाण्यात पोहत असू, पण तेच पाणी माश्यासारखे पिता येत नाही. त्यासाठी कुठेतरी थांबावेच लागते. ते पाणी पिण्यासाठी थांबायची वेळ आता झाली आहे..
जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे..

रजा घेतो मित्रांनो, काळ खराब आहे, जगलो वाचलोच,
तर परवा पुन्हा भेटूया .......!

अरे हो, जाता जाता, सर्वांचे मीम्स खरेच खूप छान होते. जाता जाता खरेच खूप हसवलेत सर्वांनी. मायबोली संयोजक मंडळाने यंदा मीम्स स्पर्धा घ्यायला हरकत नाही. जाता जाताही मायबोलीचा विचार सुटत नाहीये Happy

शुभ रात्री, शब्बाखैर, खुदा हाफिज ... लव्ह यू ऑल Happy
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ Srd
सोसायटीत कुणी मायबोलीकर आहेत आणि त्यांनी " सोसायटीत बायकांशी कसे भांडावे" धागा वाचला काय?
>>>>

हाहा,
नाही नाही.
आणि वाचला तरी या कारणासाठी मायबोली नाही सोडणार. त्यातला किस्सा खरा असला तरी बायकांशी कसे भांडावे हा प्रश्न गंमतीने विचारला होता. बाईमाणसांशी डिल करताना आपसूकच वागण्यात एक नरमाई येते. मी ॲक्चुअली बायकांशी नाही भांडू शकत. अपवाद बायकोचा. तिच्याशी केमिस्ट्री अशी जुळलीय की कसेही वागायला जमते Happy

ईतर प्रतिसादांना उद्या सावकाश ऊत्तरे देतो. कारण ते प्रतिसाद फार रोचक आहेत. उत्तरेही तशीच लिहायला हवीत. आणि दुर्दैवाने आता थोडी वॅक्सिन साईड ईफेक्ट कणकणी जाणवू लागलीय. त्यामुळे झोपतो आता. शुभरात्री Happy

पाआं नी ऋन्मेषची विकेट काढली, ऋन्मेषने लगेचच पाआंची विकेट काढली. फिट्टंफाट झाली >>>> राभु Lol
ग्रेट ! अशा बुद्धीमत्तेला सलाम !!

@ आशूचॅम्प
मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना भरपूर वेळ देता येईल आता अशी आशा करतो
>>>

आपण दरवेळी हे बोलतातच. बहुधा आपला असा समज झाला आहे की जो जितका वेळ मायबोलीवर असतो तो आपल्या कुटुंबाला द्यायचा वेळ खाऊनच असतो Happy
मला वाटते यावर एक स्वतंत्र धागा काढलेलाच बरे. मुद्दाम असे नाही, पण मला स्वत:लाच बरेच दिवसापासून फॅमिली टाईम आणि त्यासंबंधाने टाईम मॅनेजमेंटबद्दल एक धागा काढायचा होताच. आपल्याला त्यात आपसूक उत्तरे मिळून जातील Happy

@ पारंबीचा आत्मा,
Submitted by पारंबीचा आत्मा on 5 June, 2021 - 09:18
.

>>>>>

अहो सर या विश्लेषण कम स्पष्टीकरणाची बिलकुल गरज नाही. नका फार विचार करू. मी माझ्या लेखात लिहिलेच आहे की मीच तसे म्हटले २०० झाले की जातो आणि गेलो. ना मी तुम्हाला तुमच्या लेखाबद्दल ब्लेम करत आहे, ना माझ्या एक दिवस जाण्याबद्दल जबाबदार ठरवत आहे, ना दुसरा कोणी असे करणार. मीच आपला धागा तसा वळवला हे सुर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे.

एक छान ऊदाहरण देतो,
ते ईंजिनीअरींगला वायवाला नाही का एक्स्टर्नल कडक येतो. एकेकाची फाडू लागतो. त्याच्या ज्ञानासमोर आणि अनुभवासमोर आपली डाळ शिजणार नाही हे आपण समजून चुकतो.
त्यात आपण ठरलो बॅकबेंचर विद्यार्थी, ज्याला फायनल परीक्षेच्या आधीच अभ्यास करायची सवय. अश्यावेळी मग काय करावे? तर ती वायवा उर्फ तोंडी परीक्षा त्या एक्स्टर्नलला त्याला हवी तशी ड्राईव्ह करू न देता आपण आपल्या सोयीने आपल्याला जे जमते, जे येते, तिथे ती वळवावी. यातच विद्यार्थ्याची हुशारी असते. मी त्या धाग्यावर तेच केले Happy

किंबहुना आपण जे केलेत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद कारण माझ्यासह सर्वांनाच मजा आली. यामागे आपला प्रामाणिक हेतू काय होता हे जगात फक्त एकाच व्यक्तीला ठाऊक असणार आणि ती म्हणजे खुद्द आपण. मग तो हेतू काय असावा यावर विचार करण्यात वेळ घालवणे वा तो अंदाजून आपल्याबद्दल मत बनवणे हा माझ्या स्वभावाचा पिंड नाही. मी माझ्यापरीने माझ्यासाठी जे चांगले त्यात शोधता येईल ते शोधले आणि आनंद मिळवला.

मला खरे तर असे दुसऱ्यांवर निखळ विनोद करणारयांचे अमाप कौतुक वाटते. कारण जर तोल ढळला तर आपल्यावर एखाद्याचे ट्रोलिंग केल्याचा आरोप होऊ शकतो. त्यामुळे मला स्वत:ला हे जमत नाही. म्हणून मी स्वत:वरच विनोद करण्यात धन्यता मानतो. (हा देखील एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो, यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे बरेच आहे)

असो, माझा नेहमीचा फेव्हरेट डायलॉग. आयुष्य खूप सिंपल असते, आपण जास्त विचार करून कॉम्प्लिकेटेड करतो. एवढे छान विनोद केलेत त्याला आता फार विचार करून सिरीअस वळणावर नेऊ नका Happy

मला अनेक विषयांवर कुणीतरी परस्पर धागा काढावा असे वाटते. आपण पुढाकार घेऊ नये असे वाटते. कारण नाही सांगता येत. अशा वेळी ऋन्मेषसारखे स्वयंसेवक म्हणा किंवा धागासैनिक मदतीस येतात. कधी कधी त्यांना थेट न सांगता धागा काढण्यासाठी उकसवून पण हे काम करता येते, किंवा थेट सांगूनही करता येते. मी एकदाच थेट सांगितले तर पठ्ठ्याने माझे नाव टाकले. मग काय उपयोग दुस-याला सांगायचा ? Lol

मला असे वाटत होते की आपण थेट सांगितले काय, डोक्यात किडा सोडून दिला काय किंवा उकसवले काय , आपले काम समजून असे लोक धागे काढत असावेत. ऋन्मेषने माझे नाव घेऊन धक्काच दिला या समजाला. Sad
त्यामुळे आता बरेचसे विषय सुचवावेसे वाटत नाहीत.

जसे की.
- आपण सोशल मीडीयाच्या आहारी गेलो आहोत का ? त्याचे दुष्परिणाम इत्यादी ..
पण आता हा विषय मी सुचवणार नाही. या विषयावर जर धागा काढलाच तर तो मी सुचवलेला नाही इतकेच मी जाहीर करते. धन्यवाद.

@ रानभुली कुठला धागा, लिंक द्या. विपुही करू शकता.

नाव तुम्ही सुचवलात धागा याचे श्रेय द्यायला टाकले असेल.
जर तुम्ही धागा काढायला सुचवून जर तसे सांगितले असते की नाव नको टाकू तर नसते टाकले. याआधीही असे धागे काढलेत बरेच जणांसाठी. त्यांची नावेही त्यांच्या विनंतीवरून गुलदस्त्यात आहेत.

खरे तर एखाद्याला स्वत:ला धागा काढायला पुढाकार घ्यायला नको वाटते याची अनेक कारणे असू शकतात. पण प्रतिसाद कसे येतील अशी भिती असेल तर हे मात्र चांगले लक्षण वा चांगले चित्र नाही. मायबोलीचे वातावरण असे व्हावे की कोणाला तशी भिती वा संकोच वाटता कामा नये.

रानभुली कुठला धागा, लिंक द्या. विपुही करू शकता. >>> तुमच्या प्रोफाईलच्या लिखाणाची लिंक द्या. विपूही करू शकता. त्यातून शोधता येईल म्हणजे.

अच्छा सापडला
ते तळटीप तुम्हाला विषयाचे श्रेय द्यायला होती हो.
आणि धागाही वादग्रस्त नव्हता. अन्यथा स्वत:ची मान घातली असती चरख्यात Happy

https://www.maayboli.com/node/78133

हुश्श ! फायनली संपला एक दिवस Happy
तो सुद्धा शनिवारचा सुट्टीचा दिवस..
दिवसभर काय करणार म्हणून वॅक्सिन करून घेतले. जेणेकरून दिवसभर छान आरामही झाला.
>>>
मी हे वॅक्सिंग करुन घेतले असे वाचले Wink
आणि फोटो पण दिलाय म्हणून जास्तच उस्तुकतेने स्क्रोल केले आणि मग लोल.....

आज वरची कारकीर्द पाहता वॅक्सिंग करत पण असतील.
>>>>
वेक्सिंग म्हणजे ते अंगावरचे केस काढणे ना?
त्यात गैर काय आहे? ईथले कित्येक जण करत असतील ना..

https://www.maayboli.com/node/79210
ऋन्मेष मासिक काढताय का ? माझे फोटो छापा त्यात.
नवीन Submitted by पारंबीचा आत्मा on 8 June, 2021 - 01:53
>>>>

छे हो, मी कश्याला मासिक काढतोय. ती माझी पात्रता नाही. दोनचारदा मासिकात कथा छापून आलेल्या तेव्हाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याईतका आनंद झालेला. मासिक काढणे वगैरे मला झेपणारे नाही. ते तर प्रभूदेसाईंच्या कथा ईतक्या भारी कल्पक वाटतात त्यामुळे त्यांनी मासिकांत, दिवाळी अंकात लिहावे वा स्वतःचे पुस्तक काढावे असे वाटते ईतकेच Happy

तिथे त्या धाग्यावर हे अवांतर नको म्हणून ईथे कॉपी पेस्ट केले. डोंट माईंड Happy

किमान माणूस होऊ नका
- हे गूगल ट्रान्सलेटर ( अनुवादक) नी दिलेलं उत्तर.

>> याआधीही असे धागे काढलेत बरेच जणांसाठी.

यावर एक धागा काढा. ज्यांना स्वतःला धागा काढायचा नाही (कोणत्याही कारणास्तव) पण तुम्हाला/इतरांना धागे काढायला विषय सुचवायचे आहेत अशांसाठी हा धागा उपयोगी होईल.

वेड घेऊन पेडगावला जायचा प्रकार आहे हा. यात उत्तर देताना कसलीच गंमत नसते. अशा प्रश्नांना पास माझा.

अतुल,
आपले एक "अखिल मायबोली धागाकर्ता मंडळ" ऑलरेडी आहे
नवीन सभासद लाभ घेऊ शकतात

https://www.maayboli.com/node/56708

वेड घेऊन पेडगावला जायचा प्रकार आहे हा.
>>>>>
मला अ‍ॅक्चुअली ईंग्लिश फार जमत नाही.
मराठी मिडीयमचा आहे मी
त्यामुळे Core competency ला चॅलेंज करा. Don't be a minimum guy. वगैरे नाही समजले. त्यात काय वेड घेतले. बरेच लोकांना नाही कळत ईतके ईंग्लिश. पण काही लोकांना संकोच वाटतो ते कबूल करायला.

Pages