मायबोली सोडून जाताना ........

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 June, 2021 - 17:43

रात्रीच्या अंधारात धागे काढायचो,,,,
रात्रीच्या अंधारातच सोडून जातोय,,,,

जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते.

अन्न आहे तोंडात खोटे नाही बोलणार, जेव्हा जेव्हा माझ्या धाग्यांची विडंबने बनली आहेत तेव्हा तेव्हा सर्वात जास्त मीच ती आवडीने वाचली आहेत.
ही काही पहिली वेळ नव्हती अशी विडंबने पचवायची, पण पारंबीचा आत्मा यांनी लिहिलेले खरेच खूप छान होते. जणू ऋन्मेष म्हणून मी जे काही जगलो त्याचे सारे सारच चारच पॅराग्राफमध्ये मांडले होते. जणू सारांशात माझीच बायोग्राफी वाचत आहे असे मला वाटले. आयुष्यात जेव्हा आत्मचरीत्र लिहायची वेळ येईल तेव्हा मी पहिली विनंती पारंबीचा आत्मा यांनाच करेन. जर त्यांनी ती धुडकावली तर नाईलाजाने मीच लिहेन. पण लिहेन जरूर. कारण प्रत्येकाचे आत्मचरीत्र लिहिले गेले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आलेय. प्रत्येक माणूस स्पेशल असतो. प्रत्येकात निसर्गाने काहीतरी वेगळेपण बनवले आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाने ते कागदावर ऊतरवले पाहिजेत. अन्यथा ते एक दिवस तुमच्यासोबतच नष्ट होऊन जातील. म्हटले तर ते अनुभव वरवर साधारण वाटणारे असतील. पण तरीही लिहावे. कदाचित येणार्‍या पिढीसाठी तो अनमोल ठेवा ठरू शकतो.

ईथे स्वानुभावांवर धागे काढण्यामागे माझा हाच हेतू होता. कोणाला आवडायचे, कोणाला नाही, कोणी तिथे प्रतिसाद देत व्यक्त व्हायचे, तर कोणी फक्त प्रतिसादच वाचायचे. राग लोभ, स्तुती निंदा, ऊपकार अपकार, फायदा तोटा, यातले कश्याचेही गणित न मांडता माझा धाग्यांचा कारखाना अविरत चालू होता. पण आज त्याला खीळ बसली. आणि ती खीळ मलाच घालावीशी वाटली. त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले.... आणि ज्याने मायबोलीवर ईयत्ता दुसरी पास केली आहे त्यालाही हे ठाऊक असावे की त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होणारच होते.

पण तरीही वाटले आता बस्स झाले !!

भले काळजात एकदम ठस्स झाले !!

कारण हा निर्णय मी कसा झेलणार, उद्या माझे काय होणार, ऊद्या मला पुन्हा मायबोलीची आठवण येईल का, ऊद्या मला पुन्हा ईथे काहीतरी लिहावेसे वाटेल का, किमान डोकावावेसे तरी वाटेल का, याच धाग्यावर काय प्रतिसाद येतील ते तरी उद्या बघावेसे वाटतील का, काय अवस्था होणार आहे उद्या माझी, याची मला आज जराही कल्पना नाही....

पण तरीही आता खरेच बस्स झाले.. धावता धावता कुठेतरी बसायची वेळ आता आली आहे. भले आपण माश्यासारखे पाण्यात पोहत असू, पण तेच पाणी माश्यासारखे पिता येत नाही. त्यासाठी कुठेतरी थांबावेच लागते. ते पाणी पिण्यासाठी थांबायची वेळ आता झाली आहे..
जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे..

रजा घेतो मित्रांनो, काळ खराब आहे, जगलो वाचलोच,
तर परवा पुन्हा भेटूया .......!

अरे हो, जाता जाता, सर्वांचे मीम्स खरेच खूप छान होते. जाता जाता खरेच खूप हसवलेत सर्वांनी. मायबोली संयोजक मंडळाने यंदा मीम्स स्पर्धा घ्यायला हरकत नाही. जाता जाताही मायबोलीचा विचार सुटत नाहीये Happy

शुभ रात्री, शब्बाखैर, खुदा हाफिज ... लव्ह यू ऑल Happy
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले..>>> शब्दाला जागलात तुम्ही. त्याबद्दल धन्यवाद. उद्या या परत. मी तर रोज मायबोली सोडून जाते. आठवण आली कि येते परत.
शुभरात्री!

जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते. >>> उद्या ऑफीसला जाणार असल्याने मायबोलीवर यायला जमणार नाही त्यामुळे परवा धागा काढीन या ऋन्मेषने एका धाग्यावर कमेण्टमधे दिलेल्या माहितीवर तो धागा होता. २०० प्रतिसाद मिळाले तर मायबोली सोडून जा असा कोणताही विषय त्या धाग्यात नाही. तसे वळण प्रतिसादात दिले आहे.

या धाग्यात जर लेखकाने स्वतः म्हटले आहे की बास झाले असे वाटले तर जाऊ नको किंवा परत या असे म्हणण्याचा संबंधच नाही. कारण सोशल मीडीयावर जर आपण जरूरीपेक्षा जास्त वेळ घालवत असू आणि कुठेतरी चुकीची टोचणी लागली असेल तर निमित्त मिळून त्यातून सुटका होत असेल तर चांगलेच आहे. हा वेळ आपल्या मुलींना देता आला तर मला आनंदच होईल. मुलांचे बालपण एकदाच येते. जितका जास्त वेळ त्यासाठी देता येईल तितका कमीच आहे. आपल्या रियल आयुष्यातल्या आव्हानांना आपल्यालाच तोंड द्यावे लागत असल्याने तिथे डमी उभा करता येत नाही. हा बॅलन्स सांभाळणे गरजेचे असते. तसे होत नसल्यास बास झाले ही जाणीव होणे गरजेचे आहे. तशी ती तुम्हाला झाली असेल तर अभिनंदन.

तुमचे कोणतेही चरित्र त्या धाग्यात मी मांडलेले नाही. तसे वाटून घेणे किंवा आपले हसे झाले आहे असे वाटण्याचे खरेच काही कारण नाही. पण तसा समज होऊन विनाकारण २०० प्रतिसाद झाले तर मी मायबोली सोडून जाईन असे वळण दिले गेले असेल तर मग तो वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे असे वाटते. तसे असेल तर या प्रतिसादातल्या आधीच्या परीच्छेदांना अर्थ नाही.

मायबोली सोडुन जाणे न जाणे हा तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण तुम्हाला खरोखर वाटत असेल की आता पुरे तर तुम्हाला मनापासुन शुभेच्छा आणि तसे नसेल तर पुढच्या धाग्यासाठी शुभेच्छा.

स्तुत्य निर्णय
शब्दाला जागल्याबद्दल अभिनंदन
मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना भरपूर वेळ देता येईल आता अशी आशा करतो
उत्तम आरोग्ययासाठी शुभेच्छा

मानवजात नष्ट झाली तरी पृथ्वीला काही फरक पडत नाही तसेच एखादा आयडी गेला तर मायबोली ओस पडत नाही
इतकेच टाहो फोडणारे आयडी येतील त्यांना सांगणे आहे

जग ओस पडत नाही, पण कमतरता जाणवतेच. दिनेश, साती अशा आय डींची उणीव मला अजूनही जाणवते. तसे तर अनेक नवीन आय डी जन्म घेत असतात. हे नवीन आणि काही बहुप्रसवी आय डी धागे प्रसवीत असतात. पण प्रतिसादांचे भडिमार होत असताना निर्विषपणे आणि शांतपणे त्यांना तोंड देणारे विरळा.
ह्या आय डीचे भारंभार धागे निघाले असले तरी दररोज सामना कराव्या लागणाऱ्या छोट्या छोट्या समस्याच त्यांत मांडलेल्या असतात. असल्या फालतू प्रश्नांवर काय धागे काढायचे म्हणून कुत्सित टीका भरपूर झाली, तरीही अनेकांना त्यांत आपलेच प्रश्न सापडले म्हणून प्रतिसाद वाढत गेले. शिवाय चांगली चर्चा आणि चांगले अवांतरही भरपूर झाले, पण धागा भरकटवू नका असे कधीच सांगितले नाही गेले. उलट' ह्या मुद्द्यावर नवीन धागा काढू ' असे म्हणून पुन्हा अनेक धागे निघाले. कुठल्याही धाग्यावर कुणाचाही अपमान धागाकर्त्याकडून झाला नाही.
मला स्वत:ला हे विशेष वाटते.
ह्या आय डीने खरेच मायबोली सोडली असेल तर त्याला शुभेच्छा. मायबोलीपेक्षा अधिक मोठे क्षितिज आणि व्यासपीठ त्याला मिळो. इथले लेखन व्यवस्थित संपादित करून त्याचे पुस्तक निघो. अधिकाधिक चांगले लिखाण होवो. तेव्हढी क्षमता ह्या आय डीकडे आहे.

तेव्हढी क्षमता ह्या आय डीकडे आहे
+100
नक्कीच. आणखी मोठे व्यासपीठ मिळो (मायबोली सोडून जा असे अजिबात म्हणत नाही) यासाठी शुभेच्छा.

अगदीच मिळो
मी तर म्हणतो यांना युनो मध्ये जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी निमंत्रित केले जावे
म्हणजे आपले प्रश्न सोडून जगात अन्यही काही असू शकेल हेही त्या निमित्ताने कळेल
आणि युनो ला यांच्या प्रतिभेचा, व्यासंगाच उपयोग होईल

जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे. >>> हे मिस केले होते. पण प्रतिसादातले काही लेखात दिसेना म्हणून बारकाईने वाचल्यावर ते दिसले. Lol

२०० प्रतिसाद मिळाले तर मायबोली सोडून जा असा कोणताही विषय त्या धाग्यात नाही. तसे वळण प्रतिसादात दिले आहे.>>>>+111111
आता अजून एक ऋणदिवस काढला की झाले. देवा शक्ती दे.. _/\_
पुन्हा भेटू परवा. Happy

पाआं नी ऋन्मेषची विकेट काढली, ऋन्मेषने लगेचच पाआंची विकेट काढली. फिट्टंफाट झाली Lol
इमोशनल प्रतिसाद देता देता वाचले , नाहीतर माझीही विकेट निघाली असती Lol
या निमित्ताने सोमीच्या किती आहारी जावे, किती वेळ द्यावा याचं पुन्हा एकदा अवलोकन करायची संधी मिळाली तर बरंच.

इमोशनल प्रतिसाद देता देता वाचले , नाहीतर माझीही विकेट निघाली असती>>> राभु Lol
उपरोधिक इमोशनल प्रतिसाद द्यायचा. आपोआपच कस्टमाइज होतो. Wink Biggrin

या निमित्ताने सोमीच्या किती आहारी जावे, किती वेळ द्यावा याचं पुन्हा एकदा अवलोकन करायची संधी मिळाली तर बरंच.
Submitted by रानभुली on 5 June, 2021 - 19:09>>>
नवीन धाग्याचा विषय.. Happy

हे मिस केले होते. पण प्रतिसादातले काही लेखात दिसेना म्हणून बारकाईने वाचल्यावर ते दिसले. >> अरे थँक्यू म्हण की मला Wink मी बारकाईने वाचून पहिल्या प्रतिसादात एकच दिवस चालला आहे स्पष्ट लिहीले की! Lol माणूस शाकाहारी कि मांसाहारीचे उत्तर इथे मिळाले - सोमिहारी....

सोशल मीडियाच्या जास्त आहारी जाऊ नका. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण मी बोकलतने डिझाईन केलेला रोबोट आहे. तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद वाचतो, प्रतिसाद देतो आणि संध्याकाळी बोकलतसोबत मायबोलीवर काय झालं याची पाच मिनिटे चर्चा करतो. खरा बोकलत गेले चार पाच महिने मायबोलीवर आला नाही.

कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण मी बोकलतने डिझाईन केलेला रोबोट आहे.
@पारंबीचा आत्मा: ह्यांची पण सुपारी घ्या.

जाऊ बाई
नका बाई जाऊ

मी तो धागा वाचला नव्हता , आता कळले तिकडे काय कुऋक्षेत्र झाले ते, तो धागा कुठेय ?

हुश्श ! फायनली संपला एक दिवस Happy
तो सुद्धा शनिवारचा सुट्टीचा दिवस..
दिवसभर काय करणार म्हणून वॅक्सिन करून घेतले. जेणेकरून दिवसभर छान आरामही झाला.

या वॅक्सिन अनुभवावर स्वतंत्र धाग्यात लिहायला आवडेल. वॅक्सिन बिलकुल नाही घ्यायची ते सर्वांनी घेतली पाहिजे असे माझे जे मतपरीवर्तन झाले ते मांडायची ईच्छा आहे. थोडे साईड ईफेक्ट ओसरले की बघूया कसे जमते.

हा पुरावा म्हणून आजचा फोटो, काही लोकं तो लगेच मागणार याची कल्पना असल्याने आधीच देतो Happy

1622921764235.jpg

सर्वप्रथम सर्व शुभेच्छांचे मनापासून आभार Happy

आता काही माझ्याशी संबंधित प्रतिसादांना ऊत्तरे देतो Happy

@ सीमंतिनी, खूप छान जाहीरात आहे ती. अगदी आठवणारही नाही त्या वयात नेलेत. नेहमीच्या शिरस्त्यानुसार कालही तुमचा पहिला प्रतिसाद वाचला आणि मगच झोपायला गेलो Happy

Pages