रात्रीच्या अंधारात धागे काढायचो,,,,
रात्रीच्या अंधारातच सोडून जातोय,,,,
जेव्हा एके दिवशी "कु ऋ शिवाय एक दिवस" धागा आला तेव्हा एक दिवस असा धागा येईल आणि एक दिवस माझ्यावर मायबोलीशिवाय राहायची वेळ येईल असे मला एका दिवशीही वाटले नव्हते.
अन्न आहे तोंडात खोटे नाही बोलणार, जेव्हा जेव्हा माझ्या धाग्यांची विडंबने बनली आहेत तेव्हा तेव्हा सर्वात जास्त मीच ती आवडीने वाचली आहेत.
ही काही पहिली वेळ नव्हती अशी विडंबने पचवायची, पण पारंबीचा आत्मा यांनी लिहिलेले खरेच खूप छान होते. जणू ऋन्मेष म्हणून मी जे काही जगलो त्याचे सारे सारच चारच पॅराग्राफमध्ये मांडले होते. जणू सारांशात माझीच बायोग्राफी वाचत आहे असे मला वाटले. आयुष्यात जेव्हा आत्मचरीत्र लिहायची वेळ येईल तेव्हा मी पहिली विनंती पारंबीचा आत्मा यांनाच करेन. जर त्यांनी ती धुडकावली तर नाईलाजाने मीच लिहेन. पण लिहेन जरूर. कारण प्रत्येकाचे आत्मचरीत्र लिहिले गेले पाहिजे असे मला नेहमीच वाटत आलेय. प्रत्येक माणूस स्पेशल असतो. प्रत्येकात निसर्गाने काहीतरी वेगळेपण बनवले आहे. प्रत्येकाने ते जपले पाहिजे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाने ते कागदावर ऊतरवले पाहिजेत. अन्यथा ते एक दिवस तुमच्यासोबतच नष्ट होऊन जातील. म्हटले तर ते अनुभव वरवर साधारण वाटणारे असतील. पण तरीही लिहावे. कदाचित येणार्या पिढीसाठी तो अनमोल ठेवा ठरू शकतो.
ईथे स्वानुभावांवर धागे काढण्यामागे माझा हाच हेतू होता. कोणाला आवडायचे, कोणाला नाही, कोणी तिथे प्रतिसाद देत व्यक्त व्हायचे, तर कोणी फक्त प्रतिसादच वाचायचे. राग लोभ, स्तुती निंदा, ऊपकार अपकार, फायदा तोटा, यातले कश्याचेही गणित न मांडता माझा धाग्यांचा कारखाना अविरत चालू होता. पण आज त्याला खीळ बसली. आणि ती खीळ मलाच घालावीशी वाटली. त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होताच मी मायबोली सोडून जाईल असे जाहीर केले.... आणि ज्याने मायबोलीवर ईयत्ता दुसरी पास केली आहे त्यालाही हे ठाऊक असावे की त्या धाग्यावर २०० प्रतिसाद होणारच होते.
पण तरीही वाटले आता बस्स झाले !!
भले काळजात एकदम ठस्स झाले !!
कारण हा निर्णय मी कसा झेलणार, उद्या माझे काय होणार, ऊद्या मला पुन्हा मायबोलीची आठवण येईल का, ऊद्या मला पुन्हा ईथे काहीतरी लिहावेसे वाटेल का, किमान डोकावावेसे तरी वाटेल का, याच धाग्यावर काय प्रतिसाद येतील ते तरी उद्या बघावेसे वाटतील का, काय अवस्था होणार आहे उद्या माझी, याची मला आज जराही कल्पना नाही....
पण तरीही आता खरेच बस्स झाले.. धावता धावता कुठेतरी बसायची वेळ आता आली आहे. भले आपण माश्यासारखे पाण्यात पोहत असू, पण तेच पाणी माश्यासारखे पिता येत नाही. त्यासाठी कुठेतरी थांबावेच लागते. ते पाणी पिण्यासाठी थांबायची वेळ आता झाली आहे..
जर मायबोलीकरांनी कु ऋ शिवाय एक दिवस अनुभवला असेल तर आता मायबोली शिवाय एक दिवस अनुभवायची माझी वेळ आली आहे..
रजा घेतो मित्रांनो, काळ खराब आहे, जगलो वाचलोच,
तर परवा पुन्हा भेटूया .......!
अरे हो, जाता जाता, सर्वांचे मीम्स खरेच खूप छान होते. जाता जाता खरेच खूप हसवलेत सर्वांनी. मायबोली संयोजक मंडळाने यंदा मीम्स स्पर्धा घ्यायला हरकत नाही. जाता जाताही मायबोलीचा विचार सुटत नाहीये
शुभ रात्री, शब्बाखैर, खुदा हाफिज ... लव्ह यू ऑल
- ऋन्मेऽऽष
ओके वेब सिरीज मी बघत नाही. तो
ओके वेब सिरीज मी बघत नाही. तो वेळ मी माझ्या फॅमिलीला देतो
इथे बागडतोस तो पण वेळ दे की
इथे बागडतोस तो पण वेळ दे की फॅमिलीला
त्यांनी प्लीज म्हटलेय Lol >>>
त्यांनी प्लीज म्हटलेय Lol >>>
मराठी प्लीज >> मराठी मिडीयमचा आहे मी >> मराठी कृपया
छे हो, हा वेळ ऑफिसचा आहे.
छे हो, हा वेळ ऑफिसचा आहे. वर्क फ्रॉम होम करता करता मायबोलीला देतोय
आणि फॅमिलीला त्यांचाही पर्सनल वेळ नको का द्यायला? पोरं मोठी होतात तसे त्यांनाही पर्सनल वेळ जास्त द्यावा लागतो.
हा छान विषय आहे, मागच्या एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे यावर धागा काढायचा आहेच.
मराठी प्लीज >> मराठी मिडीयमचा
मराठी प्लीज >> मराठी मिडीयमचा आहे मी >> मराठी कृपया
>>>>
अच्छा अच्छा
म्हणजे माझ्या पोस्टमधील प्लीज हा शब्द मराठी नाही म्हणून ते म्हटलेले का
आहो, मी मराठीचा अभिमान बाळगायला ते मराठीत सांगा नव्हते म्हटलेले. तसा काही मराठीचा हट्ट नाहीये माझा. तर मला ईंग्लिश जमत नाही म्हणून तसे म्हटलेले
ईंग्लिश हा शब्दसुद्धा इंग्लिश
ईंग्लिश हा शब्दसुद्धा इंग्लिश आहे त्याला मराठीत काय म्हणतात? इंग्रजी?
ईंग्लिशला मराठीत ईंग्रजी
ईंग्लिशला मराठीत ईंग्रजी म्हणायचे हे कोणी ठरवले असेल? ईंग्रजांनी कि आपणच त्यांच्या भाषेला मराठी शब्द दिला. तो ही उगाचच. कारण एखादे विशेषनाम आहे तसेच वापरायला काही हरकत नव्हती. जसे फ्रेंच भाषेला आपण फ्रेंच भाषाच बोलतो.
अरे ऋ, जसे फ्रेंच भाषेला आपण
अरे ऋ, जसे फ्रेंच भाषेला आपण फ्रेंच भाषाच म्हणतो
मला हे म्हणतो बोलतो प्रकरण
मला हे म्हणतो बोलतो प्रकरण आणि त्यामागचे व्याकरण नियम आजवर समजले नाहीत. जे जे मला समजतात ती ती मी सुधारणा करतो. पण हे काही कळतच नाही
"रहा ऐसी हो जो चलने पे मजबूर
"रहा ऐसी हो जो चलने पे मजबूर करें,
उम्मीद ऐसी हो जो जीने को मजबूर करें!
महक कभी कम ना हो दोस्ती की,
दोस्ती ऐसी हो जो जीने को मजबूर करें!!"
ऋन्मेशजी आपल्या सहज आणि सुंदर भाषाशैलीने आपण मायबोलीकरांच्या मनात घर करुन गेलात! ही पोकळी आम्हाला जाणवेल.कधी-कधी आपलेपण,जिव्हाळा नकळतच निर्माण होतो ऋणानुबंधनातून!
आपल्याला नविन प्रवासासाठी शुभेच्छा!
what? just saw him yesterday
what? just saw him yesterday or am i missing something?
ह्या ऋन्म्याला खरच काय उद्योग
ह्या ऋन्म्याला खरच काय उद्योग नाय. काहीतरी फुसकुली सोडतो आणी त्या धाग्यातुन हळूच दुसरा धागा विणतो. तो तेव्हाच जाईल जेव्हा प्रशासक त्याला घरी सोडुन येतील.
ऋन्मेशजी आपल्या सहज आणि सुंदर
ऋन्मेशजी आपल्या सहज आणि सुंदर भाषाशैलीने आपण मायबोलीकरांच्या मनात घर करुन गेलात! ही पोकळी आम्हाला जाणवेल.>> इतके इमोशनल होऊ नका हो. ऋन्मैषजी इथेच आहेत. ते काही सोडून जाणार नाही तुम्हाला.
आशुचॅम्प यांच्या
आशुचॅम्प यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
प्रणवंत यांचे खांद्यावरून
प्रणवंत यांचे खांद्यावरून गोळ्या मारण्याचे काम इमाने इतबारे चालू असल्याचे पाहून समाधान वाटले.
(No subject)
(No subject)
कहर
कहर
(No subject)
जिद्दु, एक दिवसासाठी सोडून
जिद्दु, एक दिवसासाठी सोडून दिली होती माबो , पारंबीचा आत्मा यांचा तो धागा बघा. तिथे खूप मजा केलीये/घेतलीये.
सगळंच खोटं होतं ते , माबोसोडायचं आव्हान तर सापळाच होता. कारण मग सर्वजणं सगळं सोडून प्रतिसाद देतील आणि स्वतःला चर्चेत रहाता येईल. हे माहिती असूनही आम्ही टिपी म्हणून खेळलो. माईंडगेम्स ..!
अस्मिता, मला कळले होते ते पण
अस्मिता, मला कळले होते ते पण वरची कमेंट वाचल्यावर रात्रीतून काही राडे झाले का अशी शंका आली
(No subject)
माबोवर आपलं बारा गावचं निदान बारा सोमिवरच पाणी पिऊन मगंच यावे नाही तर आपली 'अलका कुबल' होते. इथे 'उषा नाडकर्णी' च टिकू शकते.
सगळीकडे निर्मिती सावंत होऊन
सगळीकडे निर्मिती सावंत होऊन राहिल्यावर फार लोड नाही येत.
चालतयं की.
चालतयं की.
लोकहो,
लोकहो,
ईथे २०० केलेत तर अजून एक दिवस सोडून जाईल
आणि हो, यावेळी नवा धागाही काढणार नाही. अगदी तात्या विंचूसारखा गपचूप पसार होईन.
एकेक दिवसाने काय होतंय राव,
एकेक दिवसाने काय होतंय राव, व्हायचं तर किमान एक वर्षभर सोडून जा
उगा सोडून जातो अशी टुरटुर तर बंद होईल
मला आधी वाटलं तो अगं अगं म्हशी धागा यावरच आलाय पण नाही
एक दिवस सोडून जाईल
>>>>>
जाईल नव्हे जाईन
एखादा कपडे काढून नाचू लागला
एखादा कपडे काढून नाचू लागला कि लोक त्याच्या नादाला लागत नाहीत. मग त्याला आपल्याला कुणीच आव्हान देणारं राहीलं नाही असं वाटू लागतं... पण एका क्षणी गावातल्या टोळभैरवांना तो दिसतो आणि मग ते काय टीपी करावा म्हणून त्याला खडे मारायला लागतात, टॉर्चर करू लागतात. दोन्हीही गावाने ओवाळून टाकलेले असतात.
मी जिवंत असताना दुस-या प्रकारात होतो. त्यामुळे कुणी कपडे काढून नाचताना दिसला की सवयी उफाळून वर येतात.
एक दिवस सोडून जाईल
एक दिवस सोडून जाईल
>>>>>
जाईल नव्हे जाईन
>>>>>>>>>>>>>>>>>> इथे जाईल बरोबर असू शकेल. ह्या वाक्यात ते त्यांच्याकडे त्रयस्थ वृत्तीने बघत असावेत. कारण त्यांच्या पुढच्याच वाक्यात प्रथमपुरुषी क्रियापद आलं आहे ('होईन').
मायबोली सोडून जाताना इतरत्र
मायबोली सोडून जाताना इतरत्र दंग व्हावे
इतरत्र दंग होताना माबोस का छळावे?
वॉव मानव,
वॉव मानव,
हे कोणते वृत्त आहे?
ओळखीचे तर वाटते आहे.
Pages