....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार! असे असंख्य विचार मनाला स्पर्शून जातात मग एखादं काव्य महाकाव्य किंवा एखादी कल्पना कादंबरीचे मूर्तिमंत स्वरूप घेण्याचं राहूनच जातं.
.......प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे. फक्त ते आपण स्वीकारायला हवं. प्रत्येक श्वासात एक 'वादळ' लपलेलं असतं. मातीच्या प्रत्येक कणात एक 'पहाड' दडलेला असतो तर प्रत्येक संमशेरीत एक भव्य 'सैन्य' आकार घेत असतं! ती प्रतिभा आपल्यामध्ये पण आहे फक्त आपल्या अंतर्मनाला ते कळायला हवं! कधी-कधी तुम्ही अनुभव घेतलेला असेल आपल्या मनात आलेला विचार आपण कागदावर उतरवतो नंतर ते प्रकाशित करायचं राहूनच जातं! काही दिवसानंतर ती कवितेची वही, ती कथा आपल्या दृष्टीस पडते आणि आपल्याला एक आश्चर्याचा धक्काच बसतो. खरच ही कलाकृती मी केलेली आहे. खरंच इतकी सुंदर कल्पना माझी असू शकते मग उगाच स्वतःला कौतुकाची थाप द्यावीशी वाटते की मी पण काहीतरी घडवू शकतो. मी हे नाही म्हणत की तुम्ही लगेचच 'वि. वा. शिरवाडकर', 'वि. स. खांडेकर', 'आचार्य अत्रे', 'पु.ल.' किंवा 'केशवसुत', 'गोविंदाग्रज' यांच्या पंक्तीत जाऊन बसणार पण नाही कळसी तर पायथ्याशी तर आपण नक्कीच जाऊ शकतो.
........तसं बघितलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेल असं क्वचितच घडतं. प्रत्येकाला जे हवं ते आयुष्यात मिळेलच याची काही शाश्वती नसते. पण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न तर आपण करूच शकतो.
ख्यातनाम शायर 'निदा फाजली' च्या शब्दात सांगायचं झालं तर,
"कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता!
कहीं जमीन तो कहीं आसमान नहीं मिलता!!"
तर कंबर कसून सज्ज व्हा, आपण जे स्वप्न उराशी बाळगले आहे ते सत्यात उतरवणार! कल्पना करा की आपण व्यासपीठावरून स्वत:च्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं वाचन करीत आहात. आपल्या काव्याला, लेखनाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टाळ्यांच्या कडकडाटाने सर्व हाल दुमदुमून गेला आहे.खरतर हे भविष्यात होणार म्हणजे मी साहित्यविश्वात एक आगळीवेगळी छाप सोडणार अशी कल्पना उद्या करण्याऐवजी ती आजच करा, हो मी आहे एक मोठा प्रसिद्ध कथा लेखक, कवी, कादंबरीकार!
तुम्हा सर्व प्रिय मायबोलीकरांचं यावर काय मत आहे ते नक्की कळवा ही नम्र विनंती!!!!
"अभी तो असली मंजिल पाना बाकी है,
अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है!
अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन;
सारा आसमां अभी बाकी है!!"
रियालिटी पिल ची गरज आहे >>
रियालिटी पिल ची गरज आहे >> सहमत. सगळ्यांनाच सगळं करता यायला लागलं तर मग त्या कृत्याचं काही वैशिष्ट्यच राहणार नाही. सगळेच जेवतात, त्यामुळे एखादा व्यक्ती जेवतो ह्यात काही कुणाला विशेष वाटायचं कारण नाही. लिहिणं, गाणं, चित्र काढणं हे खूप कमी लोकांना चांगलं जमतं म्हणून तर ते करणाऱ्यांचं कौतुक आहे.
रविची प्रत्येक किरण तुम्हाला हवीहवीशी वाटेल! >> इथे 'रवीचा' किरण आणि 'हवाहवासा' पाहिजे. मराठीत किरण पुल्लिंगी आहे. (आशेचा किरण वगैरे म्हणतात ते आशा नावाच्या बाईने तिच्या मुलाचं नाव किरण ठेवल्यामुळे नव्हे, किरण पुल्लिंगीच आहे.)
बरोबर हरचंद (की हरचंद्र?)
बरोबर हरचंद (की हरचंद्र?)
जेव्हा आपल्या मनात एक
जेव्हा आपल्या मनात एक प्रकारची अनामिक भिती घर करते तेव्हा आपल्याला दिशा कळेनाश्या होतात! सुर्य उगवतो की मावळतो याचा मनामध्ये संभ्रम निर्माण होतो.
मग ही उठाठेव कशाला!
च्रप्स माझं एवढच म्हणणं होत की प्र्यत्येक व्यक्तीपरत्वे वाईट आणि चांगले गुण असतात. आपण फक्त सद्गुणांकडे लक्ष देऊ! म्हणजे त्यामधला चांगला दुआ आपल्याला शोधता येईल! आणि प्रत्येक मायबोलीकर हा विशेष नसेलही पण त्याच्यातला साहीत्यक हा तर सद्गुणांनी भरलेला आहे न! कोण आपल्या लिखाणावर टीका करतं किंवा दुर्लक्षित करतं या विषयात खोल जाण्यापेक्षा आपल्यातील कवी,लेखक जागा करू! या साहित्यसागरातील मायबोलीकर हे मासे आहेत.या सागरातच त्यांचं जीवन आहे.आता यामध्ये कोणता मासा मोठा तर कोणता लहान आणि विशेष म्हणायच झालच तर साहीत्यरुपी माशाला कधी पोहण्याचा कंटाळा नाही येत कारण जेव्हा तो कंटाळा करायला लागला तेव्हा त्याचं जीवन संपेल कारण साहित्यसागरापासून तो वेगळा नाही होऊ शकत!
(No subject)
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे हरचंदजी!
आणि हो चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद!
या साहित्यसागरातील मायबोलीकर
या साहित्यसागरातील मायबोलीकर हे मासे आहेत.या सागरातच त्यांचं जीवन आहे.>>
काय विचार मांडलात. तुम्हाला १०१ तोफांची सलामी.
सगळेच जेवतात, त्यामुळे एखादा
सगळेच जेवतात, त्यामुळे एखादा व्यक्ती जेवतो ह्यात काही कुणाला विशेष वाटायचं कारण नाही. लिहिणं, गाणं, चित्र काढणं हे खूप कमी लोकांना चांगलं जमतं म्हणून तर ते करणाऱ्यांचं कौतुक आहे.
>>>>>>
प्रत्येक जण लिहू शकतो, प्रत्येक जण चित्र काढू शकतो, प्रत्येक जण गाऊ शकतो, प्रत्येक जण नाचू शकतो.
काय चांगले आणि काय वाईट हे कोणी एखादी व्यक्ती ठरवू शकत नाही.
मला तर प्रत्येकाच्या लिखाणात एक मूल्य दिसते. प्रत्येकाच्या विचारात काही ना काही घेण्यासारखे वा त्याकडून शिकण्यासारखे असते.
या साहित्यसागरातील मायबोलीकर
या साहित्यसागरातील मायबोलीकर हे मासे आहेत.या सागरातच त्यांचं जीवन आहे.>>
काय विचार मांडलात. तुम्हाला १०१ तोफांची सलामी.
>>>>>
+७८६
मलाही हा विचार हि उपमा आवडली.
फक्त मगरींपासून सावधान असा एक बोर्ड या तळ्याशेजारी सॉरी सागराशेजारी लावायला हवा
मला तर प्रत्येकाच्या लिखाणात
मला तर प्रत्येकाच्या लिखाणात एक मूल्य दिसते. प्रत्येकाच्या विचारात काही ना काही घेण्यासारखे वा त्याकडून शिकण्यासारखे असते. >> बरोबर आहे. पण ते मूल्य सर्वांना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर सर्वांचे सर्वच लेख तेवढ्याच आनंदाने वाचले गेले असते. लोकांवर प्रत्येक लेखात मूल्य शोधण्याची जबरदस्ती आपण नाही करू शकत. शिवाय मूल्य आहे म्हणून लिखाण आवडेल असं नाही आणि लोकांना आवडतं म्हणजे मूल्य आहे असंही नाही ना!
हरचंद (की हरचंद्र?) >> हरचंद.
हरचंद (की हरचंद्र?) >> हरचंद. कि़ंवा हर्पा सुद्धा चालेल.
लोकांवर प्रत्येक लेखात मूल्य
लोकांवर प्रत्येक लेखात मूल्य शोधण्याची जबरदस्ती आपण नाही करू शकत. शिवाय मूल्य आहे म्हणून लिखाण आवडेल असं नाही आणि लोकांना आवडतं म्हणजे मूल्य आहे असंही नाही ना! Happy
>>>>>>
एक्झॅक्टली मी हेच म्हणत आहे. प्रत्येकाच्या लिखाणात मूल्य असते. एखाद्याला ते दिसतेय की नाही वा आवडतेय की नाही यावर ते अवलंबून नाही.
ड्युआयडी महाराजांनी खर्चना
ड्युआयडी महाराजांनी खर्चना तकरार यांच्यातली लपलेली लेखिका बाहेर काढावी ही नम्र विनंती. ड्युआयडी मोड मधे लाडे लाडे बोबडे विचार अलाऊड असल्याने तुम्हाला ते शक्य होईल.
आपल्या सर्वांचे आभार आणि हो
आपल्या सर्वांचे आभार आणि हो विशेष 'वीरू' आणि ऋण्मेशजींचे! स्तुती केल्याबद्दल!
खरतर चर्चा घडून यायला हवी हा माझा लिखाणामागचा उद्देश होता! मला माहीत आहे माझे विचार प्रत्येकाच्या दृष्टीने योग्य नाही असू शकत! पण त्या विचारांच समीक्षण तर नक्कीच होऊ शकतं!
"सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मेरी कोशिश है, यह सूरत बदलनी चाहिए!
आज यह दीवार परदे की तरह हिलने लगी
शर्त ये थी लेकिन बुनियाद हिलनी चाहिए!
मेरे सीने में ना सही
तुम्हारे सीने में सही;
हो कहीं भी आग
लेकिन "आग" जलनी चाहिए!!
खरतर चर्चा घडून यायला हवी हा
खरतर चर्चा घडून यायला हवी हा माझा लिखाणामागचा उद्देश होता! >>> सगळी ड्युआयडींची फौज उतरवा मैदानात.
Pages