वसंत पालवीत आहे

Submitted by तो मी नव्हेच on 27 July, 2020 - 08:23

ग्रीश्म जाळे जरी अन शिशिर गोठवीत आहे;
तुझी याद येता वसंत पालवीत आहे

तुझे स्वप्न उराशी मी कवटाळूनी बसतो;
तुला मिठीत घेण्या ते खुणवीत आहे

किती श्वास झाले मी न मोजदाद केली;
तुझा गंध हरेक श्वास फुलवीत आहे

न माळतो कुणीही रक्त-जास्वंद मोगऱ्याशी;
परि हात माझा तुझ्यात गुम्फवीत आहे

हाच खेळ चाले केवळ माझिया मनाचा;
तुझे अस्तित्व सदैव भासवीत आहे

तू नाहीस मृगजळ जरी जाणतो मी;
हीं तुझी ओढ़ अनंत चालवीत आहे

तुझी वाट बघता मी दररोज येथे;
काल्पनीक चातकाला जगवीत आहे

तू येशील का मजपाशी घ्यायला तो;
तुझा रेशमी रुमाल बोलवीत आहे

--रोहन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users