धुरळा

Submitted by salgaonkar.anup on 16 January, 2020 - 06:39

उडतो तुझ्या आठवणींचा धुरळा
माझ्या या चेहऱ्यावरी
पापण्या या आपसूक मिटता
हात हे डोळ्यांवरी
क्षणभर जातो सावरताना
स्वप्न असे की भास परी
परिचयाचा माझाच रस्ता
आठवणींचा पूर उरी
मी मुकेपणाने चालत जातो
पाचोळा हा तुडवत राहतो
कणाकणाने क्षण उडताना
चेहरा धुळीने माखत जातो
खूप वाटते पुसून टाकावे
तर रुमालाजवळ हात जातो
चेहरा पाटी होते कोरी
भाव त्यावर आकारत जातो
दुःखाचा अश्रू टिपून त्यावर
आनंदाने हासत राहतो
गर्दीत होते मग आठवांची
एक एक क्षण ओघळत जातो
सुख दुःखाच्या या जाळ्यामध्ये
चेहऱ्याचा रंगच बदलून जातो
© अनुप साळगांवकर - दादर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर आहे. बाबांना तुमच्या नावासकट व्हॉट्सॅपवरती पाठवली तर काही हरकत नाही ना?. आईची आठवण येउन , कदाचित त्यांनाही .... Sad