Submitted by सिद्धेश्वर विला... on 26 November, 2019 - 02:27
ना देवेंद्र देव इथे
ना उद्धव आहे साव
आजही बळीराजा भीक मागतो
पण , त्याला काडीचा नाही भाव
संगीत खुर्ची चालू झाली
पवार वाजवतायत बिगुल
हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे
पण आपलीच बत्ती गुल
किती बघावं , काय बघावं
कळत नाही काहीच
जो तो आम्हाला नाग वाटतो
आपला वाली कुणी नाहीच
का लावला डाग नखाला ?
डोक्याची झालीय भेळ
कोण बसणार खुर्चीवरती
यातच चाललाय वेळ
लाज बाळगा जरा मनाची
पुरे हि शोभायात्रा
लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत
कि वेड्यांची भरलीय जत्रा
कुणीही बसावे , काही करावे
आता मेलेय माझे मन
डाग पुन्हा कधी लावणार नाही
हा करतोय आज मी पण
((( सिद्धेश्वर विलास पाटणकर )))
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अतीव सुंदर..! फार दिवसांनी
अतीव सुंदर..! फार दिवसांनी आलात..
मस्त!
मस्त!
धन्यवाद दोघांनाही
धन्यवाद दोघांनाही
@ DJ साहेब
हो फार दिवसांनी आलो .. या रंजक राजकारणाने आणलं असं म्हणूया ..
आवडली..
आवडली..