Submitted by प्रतिक सोमवंशी on 27 August, 2019 - 04:32
रस्त्याने जाताना एक काटा रुततो
मग तेच भळभळणार रक्त
छे, रक्त कसल माझ्या कविता त्या
काही मतले चपलीला चिकटतात
काही चारोळ्या पायात राहून जातात
काही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतात
काही काट्याला बिलगून आभारही मानतात
काही ओळी ते रक्त गोठवायचा प्रयत्नही करतात
त्या साचलेल्या, अडगळीतल्या, निर्जीव,
नसांच्या बेड्यात जखडून ठेवलेल्या कवितांना
एकदाच स्वतंत्र मिळतच
आणि राहून जाते ती त्यांच्या आठवांची जखम
©प्रतीक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आठवांच्या जखमा
सुंदर लिहिलंय. प्रतिकदा..
आठवांच्या जखमा
असातातच जीवघेण्या
कितीही काळ लोटला
तरीही न भरणार्या
काहिही न बोलताच
टचकन डोळ्यांत
पाणी आणणार्या
आठवांच्या जखमा
असतातच जीवघेण्या
मनामनात साचलेल्या
पावसाच्या सरींनी
चिंब भिजलेल्या
खोडकर क्षणांनी
काळावर अलगद
ठसे उमटवलेल्या
Indeed
Indeed
अप्रतिम
अप्रतिम
प्रतिक
आणि
मन्या पण मस्तच
खुप आवडली