Submitted by पाषाणभेद on 2 August, 2019 - 15:51
पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच
सुंदरच
छान
छान
माझा मोबाईल ओला झाला इतक्या
माझा मोबाईल ओला झाला इतक्या पावसाने.