वास्तविकतेच्या भयाण जंगलात,
एखाद्या झाडाच्या आडोश्याला...
पाऊस झेलत पडलेल्या दगडातुन
कुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं...
शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलत
या हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलात
तिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतय
ती मूर्ती असली तरी जननी आहे
तिच्या ओल्या अंगावरून कित्येक वेलींना मार्ग मिळतो
तिच्या स्तनांवरून टपकणारा पावसाचा प्रत्येक थेंब
तिच्या बाटलेल्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतो
तिला नाही माहीत कुठला विटाळ, कुठला रोग
कुठला दोष, अन कुठले हेवेदावे
तरी हा जालीम पाऊस रोज येऊन भिजवून जातो
रोज तिच्या त्वचेच्या कित्येक छोट्या छोट्या ठिकऱ्या उडवून जातो
तिच्या शरीरावर आता उठावांपेक्षा चिराच जास्त दिसत आहेत,
काय म्हणावं या पावसाला, “बलात्कारी”
हाच पाऊस मला पण भिजवतोय
एक एक थेंब मनात विद्रोह करून जातोय
“मला तर त्याच्या गांडुपणा वर किळस यायला लागलीय आता” .
©प्रतिक सोमवंशी
पावसाचा गांडुपणा
Submitted by प्रतिक सोमवंशी on 3 July, 2019 - 08:08
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख लिहिलंय!
सुरेख लिहिलंय!
चांगली आहे हो कविता. एकदम
चांगली आहे हो कविता. एकदम चित्रदर्शी. शीर्षका मुळे एकदम दचकायला झाले. पर्यावरणाच्या निकषांनुसार जितका पडेल तितका पाउस कमीच आहे. पण स्त्रीवादी दृष्टिकोणातून वाचली तर उत्तम आहे . असे मत परि वर्तन होईलका पुरुषांची/!
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ,
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती , ज्यांची होयची त्यांची होईलच की ...
भारी लिहिलंय,
भारी लिहिलंय,