Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 June, 2019 - 10:25
वाटेवरी उतारी त्या
हात हातात कुणाचे
भलतेच काय बरे
वेड्या असे वागायचे
रितभात जगताची
काय तुला ठाव नाही
चढ उताराची धाव
मध्ये कुठे गाव नाही
कुणी कुणा सावरावे
कळण्यास वाव नाही
कुणी कुठे घसरावे
थांबण्याचे नाव नाही
जाणणारे अंध डोळे
अर्थ तोच मोजणारे
उमटून प्रश्न मनी
भुवयात अडणारे
सांग बरे तूच आता
यात असे काय खरे
उताराचा स्वभाव वा
बहाणा ही वाट धरे
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख लिहिलंय..
सुरेख लिहिलंय..
पाऊल वाकडे टाकून वाटेला दोष
पाऊल वाकडे टाकून वाटेला दोष कसा द्यावा. बहाणा असो वा स्वभाव उताराचा. चालणारा स्खलनशील नसला तर घसरण होणार नाही. छान कविता.
JayantiP. >>>>>>>खरे आहे
JayantiP. >>>>>>>खरे आहे .धन्यवाद
मन्या >>.धन्यवाद