Submitted by चिन्नु on 22 April, 2019 - 22:07
अनाद आर्त साद ही, कशास आत्म ध्यास हा,
न मन पुरे न जन पुरे, कसा पुरेल श्वास हा?
नभात खेळ रंगतो, धरा तुझीच बावरी,
अचूक पेरशी कसा, चराचरात भास हा?
अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच भाळते,
अरूप रूप देखण्या, अथांग रे प्रयास हा
अदेहदेहि धारणे, तुझ्या क्रिडा युगंधरा!
तुझेच नाम जोडता, अतूट हो समास हा!
नकोच ही अलौकिके, नकोत बंध पाश ही,
अमोघ प्रीत 'मल्लिका', न बंध- बंध खास हा!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच
अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच भाळते,
अरूप रूप देखण्या, अथांग रे प्रयास हा
अप्रतिम! अगदी सुंदर!
सुंदर!
सुंदर!
अदेहदेहि, अनाद आर्त साद, अचूक पेरशी कसा> क्या बात! खूप सुंदर शब्दकळा
सुंदर
सुंदर
पद्मनाभ दादा, रसिकाताई,
पद्मनाभ दादा, रसिकाताई, विजयाताई खूप खूप धन्यवाद!
ह्या गझलेला तंत्रशुध्द करायला ज्यांनी ज्यांनी 'टेकु' लावले, त्या सर्वांचे मनापासून आभार
अप्रतिम...
अप्रतिम...
खूप सुंदर
खूप सुंदर
धन्यवाद दत्तात्रय दादा,
धन्यवाद दत्तात्रय दादा, सिद्धेशदादा!
फारच सुंदर
फारच सुंदर
धन्यवाद
धन्यवाद