नवे कितीही नाते जुळले तरी जुने तुटत नाही
संपले जरी साथ आपले मात्र प्रीत सुटत नाही
असतात सार्या दिशा साक्षी साक्ष देण्या प्रिया
ते सोबतीस आहे म्हणून तुझी उणीव आटत नाही
दूर दूर आपण, मध्ये इतके खोल पण रिते अंतर
मीलनाचे स्वप्न नयनी, सत्यात काही घटत नाही
मिळाली सौख्याची पर्वणी पण तुजवाचून अपुरे
मी श्वास रोखून धरले असता दुरावे मिटत नाही
तू लहर जणू प्रेमाची मी तप्त आतुर किनारा
विरहाची ही प्रतीक्षा इथेच काही संपत नाही
काव्य शांत व्हावे तर बोलतील ही हे मौन
शब्द रुजलेल्या पानात वादळ उठत नाही
होकार ठोके देतात, नकार कळवत असतांना
द्वंद्व मनी भरले जरी द्विधा काळीज दाटत नाही
परिकथेची सुरूवात आगळीवेगळी होती
अंत अनुत्तरीत झाले तरी आता हरकत नाही
सजवले होते कदाचित चिता अव्यक्त भावनांचे
ठिणगीभर शंकांनी ज्वलाग्नि मात्र पेटीत नाही
मिळेल आसमंत जेव्हा जमीन उरेल का हाती?
हवी असलेली प्रत्येक गोष्ट इथे प्रत्येकाला भेटत नाही