पीतांबर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 March, 2019 - 12:51

अंधार दाटून आला की
सावल्या खायला उठतात
त्यांचे ते घाणेरडे स्पर्श,
नखांनी माझ्या कातडीला कुडतडन
घड्याळाच्या प्रत्येक सेकंदाला
(टिक, टिक, टिक, टिक)
माझ्या देहाची रोजची होणारी विटंबना
ते अंधारात माझ्याकडे सरसावणारे हात
माझ्या गळ्याचा घेतलेला घोट
माझ्या वेणीला धरून मला फरफटत नेताना
अजून अंधारात, काळोखाच्या टोकापर्यंत
माझ्या ड्रेसचा रक्ताने माखलेला शोल्डर
बस ,बस नाही सहन होत आता
(टिक, टिक, टिक, टिक)
हे घड्याळ, ही रात्रीची वेळ, या वाईट आठवणी
मला झोपायचय, मेंदूच्या नसा फुटण्याआधी
हे कान्हा,
“त्या द्रौपदीसारख मला वाचवायला एखाद पितांबर का नाही धाडलस रे?”

Group content visibility: 
Public - accessible to all site users