एन डी ए (मोदी) सरकार ची ५ वर्षे: २०१४-१९: आकडेवारी

Submitted by योग on 12 February, 2019 - 06:40

मोदी वि. ईतर... भाजपा वि. ईतर... गांधी कुटुंब वि. ईतर.. अशा अनेक वाद विवादांतून, चर्चा, प्रसंगी वैयक्तीक टीकांतून एक बाब प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या गेल्या ७ दशकात, विशेषतः गेल्या दशकात आपली मते, भूमिका, विचारसारणी ही बर्यापैकी 'ठाम' असते. यात संस्कार, शिक्षण, मिडीया सर्वांचाच मोठा वाटा असतो. त्यामूळे व्यक्तीसापेक्षतेच्या कसोटीवर चूक व बरोबर, फायद्याचे का तोट्याचे याचे नेमकी ऊत्तर सापडणे मुश्कील असते. त्यातही भारता सारख्या महाकाय लोकशाही मधील प्रांत, भाषा, संस्क्रुती, ई. घटक बघता कुठल्याही (केंद्रातील) सरकारने राबवलेल्या योजना वा धोरणे ही सर्व गटांसाठी पुरक वा सर्वंकष विकासाला चालना देणारी असतात वा नाही यावर एकमत होणे तसे अवघडच.

सुदैवाने, सर्वसाधारण 'जागरूक' मतदार व नागरीक यांचे बर्याच गोष्टींवर एकमत असते. देशांतर्गत सुरक्षा असणे. सीमा सुरक्षा. सैन्य व ईतर मुख्य संस्थांचे बळकटीकरण. कुठलेही स्कॅम्स व घोटाळे न होता चालवलेला कारभार. देशाच्या सुरक्षा व विकासाला पुरक अशी आंतरराष्ट्रीय धोरणे राबवणे. दैनंदीन वापराच्या वस्तू, माल, वाहतूक यांच्या किमती वर नियंत्रण. स्वच्छता, आरोग्य, व पर्यावरण पुरक कार्यक्रम व ऊपाययोजना. करवसूली, जकात, ई. मध्ये पारदर्शकता. शहरे, राज्य यांच्या विकासाची कामे व योजना- दळण वळण, वाहतूक, ईंफ्रास्ट्रक्चर. आणि ईतरही बरेच काही. या सर्व अपेक्षा रास्त आहेत. पण आपल्या अपेक्षांच्या तराजूचे एक पारडे ७ दशकांच्या कारभाराचे आहे. तर दुसरे पारडे ५ वर्षाच्या कारभाराचे आहे. तेव्हा अचानक जादू होऊन संतुलन साधणे शक्य नाही.

कुठल्याही सरकार वा व्यक्तीवर वैयक्तिक टीका करणे, दोष दाखवणे, अपेक्षांच्या तराजूवर तोलणे हे सोप्पे काम आहे. पण सरकारच्या कामाची आकडेवारी तपासून नेमकी पुढे कशी वाटचाल अपेक्षित आहे आणि त्या साठी जागरूक मतदार म्हणून आपले कर्तव्य काय हे तपासून घेणे हे अधिक आवश्यक आहे. आपला देश अधिक विकसनशील व्हावा हीच आप्ली अपेक्षा आहे. मग सरकार कुणाचेही असो.
त्यातही सर्व गोष्टि, घडामोडी या तपासून पहाणे, वस्तुस्थिती पडताळून घेणे, संख्यात्मक माहिती हे सर्व तपासून बघायला सर्वसामान्य माणसाला वेळ नसतो. अशा वेळी मुख्यत्वे मिडीया (प्रिंट, केबल.. ई.) मधून ज्या बातम्या २४x7 समोर येत असतात त्यावरूनच साधारण मत व अनुमान निघत असते.

तेव्हा, एन डी ए सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या कारभाराची ही आकडेवारी. अर्थातच नरेंद्र मोदी हे या सरकारचे प्रमुख सेवक (पंतप्रधान) असल्याने त्यांच्या घोषणांच्या अनुशंगाने ही आकडेवारी दिली आहे. सरकारच्या अनेक वेब पोर्टल व गव्हरनंस माध्यमांवर ऊपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी एकत्रीत केली आहे. माहितीचे स्त्रोत विविध असल्याने सर्वच संदर्भ ईथे देणे टाळले आहे. पण आकडेवारमध्येच माहितीचे स्त्रोत चा उल्लेख आला आहे.

१. घोषणा/अपेक्षा/आश्वासनः
देशाच्या तळागाळातील घटकांना आपल्या अर्थव्यवस्थेत सामावून घ्यायचे असल्यास बचत्/बँक खाती असणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
३३.४ कोटी नविन बँक खाती, विशेषत: मागास विभाग व प्रदेश.
२६ कोटी रुपे कार्ड्स वितरीत केली गेली
प्रधान मंत्री जनधन योजने अंतर्गत ८,५०० कोटी रक्कम बँक बचत खात्यांमध्ये जमा

२. सामजिक सुरक्षा, पेंशन, विमा हे निम्न मध्यमवर्गीय स्तरावर आवश्यक प्रमाणात ऊपलब्ध नाही.
आकडेवारी:
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत १४ कोटी लोकांना सुरक्षा विमा मिळाला आहे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फायदा जवळपास ५.५ कोटी कुटूंबांनी घेतला आहे
अटल पेंशन योजने अंतर्गत जवळपास १२.५ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे

३. कमी व्याजदर कर्ज ऊपलब्ध केल्याने अनेक कुटूंबांना कर्ज घेणे सुकर झाले आहे, पर्यायाने त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला आहे.
आकडेवारी:
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जवळपास १४.५ करोड लोकांनी स्वस्त/कमी व्याज दर कर्जाचा लाभ घेतला आहे.

४. देशाचा विकास व बांधणी ची सुरुवात खेड्यांच्या विकास व सुधारणांतून होणे आवश्यक आहे. आपल्याला आदर्श खेडी (मॉडेल व्हिलेज) ऊभारणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
'परीवर्तन व सुधारणा उत्सूक जिल्हे' कार्यक्रमांतर्गत ११५ जिल्ह्यांची तपासणी व अधिकॄत नोंदणी झाली आहे.
५.८५ कोटी पेक्षा अधिक बिपील महिलांना एल्पिजी कनेक्शन दिले गेले आहे.
ग्रामपंचायती व खेडे परिसरात ९.२ कोटी शौचालये बांधली गेली आहेत (२०१४ पर्यंत ही संख्या फक्त ६.५ कोटी होती)

५. आपल्या खेड्यात वा गावात पक्का रस्ता असावा अशी प्रत्त्येकाची अपेक्षा असते
आकडेवारी:
२०१४ पर्यंत गावांना जोडणार्या पक्क्या रस्त्यांची टक्केवारी ५६% ईतकी होती. जी आता ९१% पर्यंत पोहोचली आहे.

६. आपल्याला एक असा भारत बनवायचा आहे जिथे गरीबांसाठी देखिल पक्की घरे, वीज, व पाणी ऊपलब्ध असेल.
आकडेवारी:
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जवळपास १.२५ करोड पक्की घरे, वीज व पाणी पुरवठ्यासकट बांधली गेली आहेत.

७. शेतकर्यांकडे जमिन आहे. त्यांना आवश्यक पाणी पुरवठा मिळाला तर मातीतून सोने (सुबत्ता) ऊगवण्याची किमया ते करू शकतात.
प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना अंतर्गत जवळपास ५.७ लक्ष हेक्टर जमिनी या माय्क्रो इरीगेशन खाली आता सुपिक व पाणीदार करण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत १४.४ कोटी पर्यंत फसल विमा जारी करण्यात आला आहे.

८. आपल्या देशातील गोडाउन व अन्यधान्य केंद्रात अन्न पुरवून शेतकरी देशाची सेवा करत असतात. त्यासाठी मदत करणे व क्षमता वाढवणे हे आपले ध्येय आहे.
फक्त २०१७-१८ या एकाच वर्षात धान्य निर्मिती १०.५% ईतकी वाढली. २०१०-१४ मध्ये ही आकडेवारी फक्त २५० मेट्रीक टन एव्हडीच होती. जी आता २८० मेट्रीक टन ईतकी वाढली आहे.
खरीप पिकांसाठी शेतकर्‍याला मिळणार्‍या बाजार भावात ५०%, तर रबी पिकात २१% ईतकी ऐतीहासीक वाढ झाली आहे.

९. नोटबंदी, जीएस्टी या सारख्या धोरणातून आपण ( मुख्यतः देशांतर्गत) बराच काळा पैसा अधिकृत अर्थव्यवस्थेत आणला आहे.
६.८५ करोड लोकांनी २०१७-१८ मध्ये आयकर भरला आहे. जी आकडेवारी २०१४ पेक्षा ६५% अधिक आहे. २०१४ पर्यंत आयकर भरण्याची (income tax return filing) संख्या फक्त २२० करोड ईतकी होती. २०१७-१८ पर्यंत ही संख्या २०७० करोड पर्यंत पोहोचली आहे.

१०. छोटे, गृह व ईतर मध्यम आकाराचे व्यापार ऊद्योग [MSME Ecosystem. Most Micro, Small & Medium Enterprises (MSME)] हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना अधिक ऊधारी, कमी व्याज दर, आणि अधिक भांडवल ऊपलब्ध करून देण्यात हे सरकार सक्रीय आहे.
Support and Outreach Initiative Launched for MSME by November 2018
१ कोटी रू. पर्यंतचे कर्ज अशा ऊद्योग धंद्यांना ५९ मिनीटात म़ंजूर करून देणे हा अध्यादेश जारी केला गेला आहे.
Under CGT-MSE in 2014-18, guarantee applications with coverage of over Rs 8000 Crores were approved
२०१४-१८ दरम्यान सरकारने जवळपास २२,३०० अशा ऊद्योगांना वेगवेगळे ऊद्योजक मेळावे, प्रदर्शन ई. मध्ये सहभाग घेण्यास अनुदानीत मदत केली.

११. PM appealed to all investors and enterpreuners across the globe and in India to Make In India and Manufacture In India .
२०१४ मध्ये ऊद्योगधंद्यास पोषक्/पुरक यादीत Ease of Doing Business Ranking) भारताचा क्रमांक १४२ ईतका खाली होता. २०१८ च्या अखेरीस हा क्रमांक ७७ वर आला आहे. म्हणजेच क्रमवारीत ६५ अंकांनी सुधारणा झाली आहे.
२०१४ मध्ये भारतात फक्त २ मोबाईल मॅन्युफॅक्चरींग युनिट्स होती. २०१८ अखेरीस ही संख्या १२७ वर पोहोचली आहे.

१२. विकास दर व जागतिक विकास टक्केवारी यात भारताने सहा बलाढ्य अर्थसत्तांना मागे टाकले आहे.
२०१८ च्या अखेरीस भारताचा विकास दर (growth rate in GDP) हा ८.२% होता. व जगभरातील विकासाच्या टक्केवारीतील वाटा (India's share in World GDP) ३.१% ईतका होता. जो २०१३ च्या अखेरीस २.३% होता. जागतिक अर्थवाढितील भारताचा हिसा २००५-२०१३ या ८ वर्षाच्या कळात फक्त .६% ने वाढला. जो गेल्या पाच वर्षात .७% ने वाढला आहे.

१३. पोस्ट ऑफीस चे पेमेंट बँक मध्ये बदल करण्याचे काम आमचे सरकार करेल. ज्यामूळे पोस्ट ऑफीस च्या मार्गाने अनेक बँकांचे जाळे देशातील सर्व खेड्या पाड्यात व गावांमध्ये पसरेल.
२०१८ सप्टेंबर अखेरीस अशा ६५० पोस्टाच्या पेमेंट्स बँक शाखा व ३२५० सुविधा केंद्रे प्रामुख्याने खेड्यांमध्ये स्थापन झाल्या आहेत. ३००,००० + पोस्ट्मन आणि ग्रामिण पोस्ट सेवा या अंतर्गत जोडल्या गेल्या आहेत.

१४. आपल्या देशातील लक्षावधी तरूणांनी हस्तकला, कौशल्य, व कार्यकुशलतेचे प्रशीक्षण घेतले पाहिजे. यासाठी अशा संस्थांचे एकत्रीत जाळे ऊभारणे आवश्यक आहे.
दीन दयाल ऊपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत आजवर ६ लाख तरूणांनी प्रशीक्षण घेतले असून, शिवाय जवळपास ३.५ लाख तरूणांना रोजगार (नोकरी, धंदा) ऊपलब्ध झाला आहे.
via 587 number RSETI (Rural Self Employment Training Institues) च्या सहाय्याने जवळपास २४.५ लाख तरूणांना प्रशीक्षण तर जवळपास १६ लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे.
CSC (EGovernance Services India Ltd) च्या माध्यमातून ३ लाख तरूण अशा केंद्रातून कार्यवाहक म्हणून काम करत आहेत.

१५. पं. दीनदयाल यांच्या शिक्षण, रोजगार, संधी या तरूणांसाठी अभिप्रेत असलेल्या स्वप्नपूर्ती साठी सरकारने देशाच्या ८०० लक्ष तरूणांसाठी काही ठोस पावले ऊचलली आहेत.
६ नविन IIT कार्यरत झाल्या आहेत. IIT Palakkad, IIT Tirupati, IIT Jammu, IIT Bhilai, IIT Goa, IIT Dharwad
२५०० अटल टेक्नोलॉजी लॅब्स मधून जवळपास ३०,००० विद्यार्थी reserach and innovation मध्ये कार्यरत झाले आहेत.
नॅशनल डिगीटल लायब्ररी ऑफ ईंडीया च्या माध्यमातून १.७ कोटी डिजीटल पुस्तके जवळपास ३० लक्ष युजर्स ना ऊपलब्ध केली गेली अहेत.

१६. जर सर्व खेडी व गावे ही डिजिटल ब्रॉड्बेंड व डिस्टंस लर्निंग माध्यामतून जोडली गेली तर गावातील सर्व मुलांना अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करता येईल.
१.२ लक्ष ग्राम्पंचायती ब्रॉड्बँड द्वारे जोडल्या गेल्या आहेत. 'Swayam' शिक्षीत भारत, ऊन्नत भारत या संस्थेद्वारे ३३ लाख युजर्स ना साधारणपणे
१००० ऑनलाईन कोर्सेस ऊपलब्ध केले गेले आहेत.
E-Pathsha या पोर्टल व मोबाईल अॅप च्या आधारे जवळपास ३३०० ध्वनिक्लिप्स, ६५० ई पुस्तके आणि ५०४ फ्लिप पुस्तके ऊपलब्ध केली गेली आहेत.
Nantional Repository of Open Educational Research वर जवळपास १३,६३५ माहिती फाईल्स ऊपलब्ध केल्या गेल्या आहेत.

१७. Technology च्या सहाय्याने बदल व सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. Geo Technology, Space Technology, अशा ईतर सर्व टेक्नोलॉजी चे ईंटीग्रेशन करून अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
मंगलयान- मंगळावर (ऑर्बीट मध्ये) यशस्वीपणे ऊपग्रह ऑपरेट करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश आहे.
https://www.bbc.co.uk/news/science-environment-29341850
ईस्रो ने एकाच लाँच मिशन मध्ये १०४ ऊपग्रह यशस्वीपणे लाँच करण्याचा नवा जागतिक विक्रम केला.
IRNSS ही भारताची स्वयंपूर्ण व स्वतः बनवलेली सॅटेलाईट नॅविगेशन सिस्टीम आहे.
GSAT 11 च्या सहाय्याने देशभरात ब्रॉडेबेंड कनेक्टीविटी अधिक क्षमतेने वाढवण्याचे काम सुरू आहे.

१८. ग्लोबल वार्मिंग च्या लढाईत व पर्यावरण संरक्षण यात भारताचे योगदान हे विद्युत ऊर्जा वापर कमी करण्याच्या माध्यमातून असेल.
मर्च ११, २०१८ मध्ये भारत सरकारने जवळपास १७५ कोटी रु. गुंतवणूक करून International Solar Alliance या जागतिक संशोधन, संस्था व कार्यकारिणीची स्थापना केली. या संस्थेच्या पहिल्या जागतिक संमेलनाचे ऊद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजी केले.

१९. स्वच्छ, निरोगी व सुराज्य (सुदृढ) भारत बनवण्यासाठी आम्ही एकत्रीतपणे काम करू.
'मिशन ईंद्रधनुष' योजने अंतर्गत आजवर ३.३ कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री डायलेसिस योजनेचा लाभ जवळपास २.५ लाख लोकांनी घेतला आहे.
सार्वजनिक व खाजगी रूग्णालयांबद्दल अद्ययावत माहिती असलेली National Health Repository आता ऊपलब्ध आहे.

२०. गरीब रूग्णांना प्रसंगी स्वस्त वा फुकट औषधे मिळावीत व चांगल्या मोठ्या रुग्णालयांमधे प्रवेश व वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने प्रधानममंत्री जन आरोग्य योजना राबवण्याचे ठरवले.
या अंतर्गत आरोग्य सुरक्षा विमा रू.५ लाख पर्यंत/ दर वर्षी/एक कुटूंब ऊपलब्ध केला गेला. यात १३०० आजार, व १३५० ऊपचार पॅकेजेस (सेकंडरी, टर्शियरी) अंतर्भूत आहेत. धोरणात्मक लक्ष्य-५० कोटी लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे.

२१. २०१९ मध्ये १५० व्या गांधीजयंती निमित्त स्वच्छ भारत (अभियान) समर्पीत करणे
२०१४ पासून आजवर ९.५ कोटी शौचालये बांधली गेली आहेत. जवळपास ५.३ लाख गावे आणि २५ राज्ये ही open defecation free म्हणून घोषित झाली आहेत. येथिल सांड्पाणी नियोजन व विल्हेवाट टक्केवारी ३९% (२०१४) वरून ९७% पर्यंत वाढली आहे.

२२. IT च्या माध्यमातून देशाचा प्रत्येक नागरीक जोडला जाऊ शकतो. म्हणूनच 'डिजीटल ईंडीया' च्या माध्यमातून अखंड भारत व ए़कात्मतेचा प्रसार होवू शकतो.
MyGov.in वर आता ७१ लाख लोकांनी अधिकृत रजिस्ट्रेशन केले आहे. जगातील सर्वात मोठा डिजीटल डेमोक्रसी प्लॅटफॉर्म असा हा विक्रम आहे. १.२ लाख ग्राम पंचायती आता फायबर ऑप्टीक मूळे जोडल्या गेल्या आहेत.

२३. मुलगी, महिला, स्त्री या खर्या अर्थाने स्वतंत्र असाव्यात आणि स्त्रीभ्रुण हत्त्या पूर्णपणे बंद ह्वावी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
'बेटी बचाओ बेटी पढाओ' अंतर्गत १०४ जिल्ह्यांमध्ये महिला/पुरूष ratio ऊंचावला आहे. 'मिशन ईंद्रधनुष' च्या अंतर्गत ८६ लाख गरोदर महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मॅटर्निटी बेनिफीट कायद्यामध्ये २०१७ मध्ये सुधारणा करून आता गरोदर नोकरदार महिलांना २६ आठवड्याची पगारी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. जगात ही सर्वात मोठी paid maternity leave आहे.

२४. बलात्कारा सारख्या घटना घडतात तेव्हा देश म्हणून आपली मान झुकते. अशा वेळी (पुरूषांची) मानसिकता बदलण्याची गरज असताना आपण ऊलट मुलींवर/महिलांवर प्रतीबंध लादू पाहतो.
१२ वर्षा खालील मुलींवर बलात्कार करणार्‍यास म्रुत्यूदंड ची शिक्षा देण्याचा कायदा/ऑर्डीनंस मंजूर झालेला आहे.

२५. सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूणच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियाना अंतर्गत आम्हाला समाजातील सर्वच घटकांचे सहाय्य गरजेचे आहे.
'स्वच्च्छ विद्यालये' योजने अंतर्गत, एका वर्षात, विक्रमी १.९ लाख स्वच्छतागृहे शाळेत फक्त मुलींसाठी बांधण्यात आलेली आहेत. मुलींची शालेय शिक्षण प्रवेश संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.

या आकडेवारी व्यतिरीक्त, सरकारच्या पोर्टल वर प्रत्येक विभाग, खाते, योजनावार कामाचा चार वर्षाचा प्रगती अहवाल Performance KPI Dashbaords ऊपलब्ध आहेत. माझ्या माहितीत तरी हे पहिलेच सरकार असेल ज्यांनी अशी माहिती व पोर्टल अतीशय ऊत्तम प्रकारे संकलीत करून आपल्या समोर ठेवली आहे. मोठ मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये देखिल असे KPI Dashboards पहायला मिळत नाहीत.
Governance- Transeprency- Accountability.!
पोर्टल ची लिंकः 48months.mygov.in
प्रत्येक 'जागरूक' नागरीकाने आवश्य या पोर्टल ला भेट द्यावी व सरकारचे प्रगतीपुस्तक पहावे.

आता राहिला प्रश्ण आगामी निवड्णुकांचा. ज्या प्रकारे कॉ. व ईतर मिळून रोज नव नविन कुरापती व निव्वळ दिशाभूल करत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की देशाच्या भविष्यासाठी ना त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम आहे ना एक नेता. सगळेच नुसते कळप करून गोंधळ माजवायचा प्रयत्न करत आहेत. जाट, दलित, मुस्लिम, आणि ईतर घटक ज्यांना गेली ६ दशके काँ च्या सत्तेत वोट बँक म्हणून वापरले गेले व मुद्दामून मागास ठेवले गेले. त्यांना पुन्हा हे काँ कडबोळे नविन गाजरे दाखवत आहेत. शेतकरी, छोटे व्यापारी, बिल्डर, सत्तेचे दलाल, सर्वांना मोदी हाच कसा त्यांचा एकमेव शत्रू आहे एव्हडाच प्रचार करण्यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. खुद्द एन डी ए मध्ये असलेले त्यांचे सहकारी पक्ष देखिल आता निव्वळ कुठल्याही पक्षा बरोबर सत्तेची समिकरणे जुळवण्या साठी आटापिटा करत आहेत.

या सर्व नकारात्मक प्रचाराचा व दिशाभूल करण्याचा काहितरी परिणाम होणार हे अपेक्षितच आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुसंख्यांना देखिल सरकारच्या कामाची, संपूर्ण माहिती नसते. ज्या काही थोड्या फार जणांना माहिती असते किंवा जाणून घ्यायचे प्रयत्न केले असतात त्यातील काही 'आदर्शवादी' असतात. काही स्वार्थी. तर तरूण वर्गातील जे आता मतदार असतील त्यांनी आधीच्या सरकराचा सवाळा गोंधळ व भोंगळ कारभार बघितलेला नसतो. ज्यांना बरीच माहिती असते ते वाद विवाद व ऑनलाईन चर्चा, वॅप यात मग्न असतात. देशभक्त कमी पण मोदी भक्त का गांधी परिवार भक्त असे वाद विवाद सर्वत्र दिसतात.

भाजपा व एन डी ए यांचे सर्वच निर्णय वा वागणूक दर वेळी योग्यच आहे असेही नाही. तेही चुकले असतील. पण ज्या प्रकारे गेल्या ५ वर्षात सुधारणा, सुविधा, प्रगती चा आलेख ऊंचावलेला आहे ते पाहता चुका सुधारून चांगले काम करून दाखवण्याची ईच्छाशक्ती, क्षमता, व नेतृत्व या सरकार मध्ये नक्की आहे हे स्पष्ट आहे. मोदी 'पडले' तर त्यांचे वैयक्तीक नुकसान शून्य आहे भारातातील एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत हे लिहायला मिळते हे ही नसे थोडके. भाजपा पक्षाचे नुकसान थोडे फार नक्कीच होणार. पण फार मोठे नुकसान देशाचे होईल हे नक्की. गेल्या सरकारच्या रखडलेल्या व दीरंगई झालेल्या कीत्त्येक कामांना या सरकारने मार्गी लावले. नुसते नितीन गडकरींच्या कामाची यादी द्यायची (Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development) तरी एक वेगळा बाफ ऊघडावा लागेल ईतकी कामे पूर्ण केली आहेत. अगदी तसेच परराष्ट्रीय, सैन्य, रेलवे, ई. ईतर मोठ्या विभागांचे चित्र आहे. डिजीटल भारत व मोबाईल प्रणाली माध्यमातून दैनंदीन व अनेक निम सरकारी कामांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाच्या हातात आलेल्या अधिकार व स्वयत्ताता निश्चीतच सुखावह आहे.

नविन कुठलेही कडबोळे आले तर पदे, पोर्ट्फोलिओ, आणि त्यातून पैसा कमावायचे धंदे यासाठीच अंतर्गत कलह माजेल. नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, सुशमा स्वराज, सुरेश प्रभू, निरमला सितारामन यांसारख्या अनेक लोकांनी अक्षरशः दिवस रात्र मेहेनत करून मा. मोदी यांच्या नेत्रूत्वाखाली केलेल काम, ऊभारलेला विकास व सुरक्षेचा भक्कम पाया आणि योजना या सर्वांना नव्या कडबोळ्या सरकार मध्ये खीळ बसण्याची किंवा कामांची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता जास्ती आहे. पारदर्शकता, जबाब्दारी, ऊत्तरदायीत्व हे सर्व गांधी परिवाराच्या पायाशी वाहणार्‍या संधीसाधू लोकांकडून नेमकी काय अपेक्षा असणार आहे हे वेगळे लिहायला नको. आणि पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या.

'सबका साथ सबका विकास' मधला विकास तर निश्चीत दिसतो आहे. पण या सरकारला मिळालेला सबका साथ असाच पुढेही मिळेल का याचे ऊत्तर नजीकच्या काळातच मिळेल. एक जबाबदार नागरीक, मतदार, व व्यक्ती म्हणून आपली कर्तव्ये व सहभाग काय हे आपल्याला माहितच आहे.

सर्वांना व आपल्या देशाला अनेक शुभेच्छा!
ता.क: मोदी सरकारचे अतीशय चपखल विश्लेषण:
https://m.youtube.com/watch?fbclid=IwAR0k32bsY4Xdbt2EcKldp4e3mw2FRZaA1Xy...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता ती पळवाट होती का सरकारमान्य व्यवस्था हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा भाग आहे!
तुम्ही रेषेच्या कुठल्या बाजुला उभे आहात त्यावरुन ठरते ते!>>>>>
कमीत कमी असाही दृष्टिकोन असू शकतो, आणि अशीही बाजू असू शकते, हे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!

एकदा खुसपटच काढायची सवय लागली की मग जिथे तिथे घोटाळाच दिसतो!>>>
खुसप्टे नाहीत हो, भगदाडे आहेत, आणि दिसतायेत

आता सरकारी अनुदाने थेट खात्यात जमा होतायत हा मोठ्ठा फायदा (आणि त्या अनुषंगाने middleman ला लागलेले बूच) दिसत नाही पण कुणीतरी त्या यंत्रणेचा स्वताच्या स्वार्थासाठी केलेला दुरुपयोग दिसतो.... चालायचेच!
≥>>>>>>
दुरुपयोग केला हे मान्य आहे तर.
अनुदाने थेट जमा होतायेत, पण ती अनुदाने कमी करत करत जीवनावश्यक कमोडिटीच्या किंमती गगनाला भिडवलेलं दिसत असेलच!
आणि ज्या आधारच्या बळावर हे सगळं होतंय, ती आयडिया पपू मोदी यांचीच ना?
मागच्या सरकारला तर आधारचा अ माहिती नव्हता!!!

सनव, आमच्या काँग्रेसने तुमच्या भाजपने गोवा आणि ईशान्येच्या राज्यात घालून दिलेला आदर्श स्वीकारला. चुकलं का त्यांचं?

गोव्यात मुख्यमंत्र्यांसह नऊ पैकी सहा मंत्री हरले. तरीही ४० पैकी १३ जागा जिंकलेल्या भाजपने सरकार बनवलं. काँग्रेसच्या १७ जागा होत्या.
दोन खासदार पाठवणा र्‍या इलुश्या राज्यातली सत्ता वाचवण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना राज्यात पाठवलं (आठवा - हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला) आणि आता ते मुख्य मंत्री पराकोटीचे आजारी असतानाही त्यांना विश्रांती घेऊ दिली जात नाही.
आठवलंपणावरून आठवलं.२०१४ मध्ये हा प्रश्न विचारलेला. मोदींच्या टीममध्ये कोण असेल? की ते एकटेच बॅटित्य, बोलिंग, फील्डिंग करतील. तसंच होतंय. अर्थ, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार ही महत्त्वाची खाती तेच पाहताहेत. वर निम्मा वेळ पक्षाच्या प्रचारात घालवताहेत.
देशाला पाच वर्षांपैकी किती काळ पूर्ण वेळ अर्थमंत्री आणि पू र्ण वेळ संरक्षणमंत्री मिळाला?
आता तर या सरकारातले ब्लॉग मंत्री गंभीर आजाराने बाहेर आहेत. ट्विटर मंत्री बाईंनी निवडणूक लढवणार नाही असं सांगितलंय.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. बाकी अनंत कुमार हेगडेंसारखे अत्यंंत विचारी मंत्री आहेत. राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यांचा ते चांगला समाचार घेतात. पण भाजपचे सगळे मंत्री राहुलवर लक्ष ठेवून असतात. त्या च्या मान सरोवर यात्रेचे फोटो अ‍ॅनालाइज करतात. त्याची वंशावळ आणि धर्मावळ मांडतात. त्यात आता प्रियांकाची भर पडली. कामं काय एकटे मोदीजी आणि त्यांच्या मदतीला दोभालजी सांभाळणार का?
मोदीजींना आराम मिळायला हवा की नको?

>>खुसप्टे नाहीत हो, भगदाडे आहेत, आणि दिसतायेत

खुसपटे का भगदाडे?.... त्याला पण ते वरचेच लागू आहे.... रेषेच्या कुठल्या बाजूला वगैरे!
चालयचेच! Proud

इतकी आकडेवारी दिलीच आहे, तर आणखी एक आकडेवारी हवी.
मोदींनी आणलेल्या सुशासनामुळे आणि देशाच्या होत असलेल्या भव्य प्रगतीमुळे किती परदेशस्थ भारतीय परत आले? (मोदींचा प्रचार करण्यापुरते न व्हे, कायमचे.) मोदींनी आणलेल्या अच्छे दिनांची फळे दुरून पाहण्यात काय अर्थ आहे. इथे येऊन ती चाखून खाऊन पचवून दाखवाल, तो जाने, तो माने.

भरत अहो कर्नाटकात काँग्रेसने स्वतः सरकार बनवले असते तर तुम्ही म्हणू शकला असतात की गोव्याकडे बघा. पण कुमारस्वामी जे सीएम आहेत त्यांना २२५ पैकी फक्त ३७ सीट आणि भाजपला १०४ आहेत!
कॉग्रेसला ८० सीट. पण सीएम कोण तर जनतेने नाकारलेला.

त्यामुळे मग मोदी हवेत, त्यांनी ५ वर्ष हाच जॉब केलाय, त्यांना आता अनुभव पण आहेच. नवीन अननुभवी लोक नकोत!

बॉ ऽऽऽऽऽऽं रं.

<त्यांनी ५ वर्ष हाच जॉब केलाय, त्यांना आता अनुभव पण आहेच.>

जनतेला सुद्धा मोदींचा अ नु भ व आहेच.

<नवीन अननुभवी लोक नकोत> हे लॉजिक मस्त आहे. माझी बोलती बंद झाली.

अपेक्षित धुरळा ऊडलाच आहे. तरिही पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहतो. Happy
एन डी ए सरकार ने जी आश्वासने दिली, घोषणा केल्या, किंवा पं.मोदी यांनी स्वतः स्वातंत्र्य दिन निमित्त केलेल्या भाषणात जे दावे केले त्या अनुशंगाने त्यापैकी कशाची पूर्तता किती पातळीवर झाली याची आकडेवारी दिली आहे. खरे तर काही आकडे पाहता अजून भरपूर काही करायचे शिल्लक आहे हे स्पष्ट होते. glass half full. पण अशी आकडेवारी सरकारने ऊपलब्ध केली आहे हे महत्वाचे आहे.

मात्र, सीमेवर किती जवान मेले ही आकडेवारी मागणार्‍यांच्या मानसिकतेची कीव येते. कारण कुठल्याच देशातील कुठल्याच सरकार ला (काही अपवाद वगळता) सीमेवर त्यांचे जवान जीवानीशी जावेत असे वाटत नाही. मग या वर्षी आम्ही फक्त १० जवान मरू देऊ असे आश्वासन देऊन त्यावर मात्र प्रत्यक्षात १०० मेले अशी आकडेवारी दिल्यावर नक्की कुणाला कसले समाधान मिळणार आहे देव जाणे.
असो.

मागच्या इलेक्शनला त्या ह्यांनी आकडेवारी वाला लेख लिहिला होता.
आता हे आलेत.

आनंद आहे.

@ मान्यवर धागाकर्ते, तुम्हाला व तुमच्या सारख्या बहुसंख्यांना मोदी व त्याच्या पित्त्यांनी जे केलंय करताहेत हे बरोबर वाटत असेल तर आनंद आहे.

देशाचं जे काय व्हायचं ते होइल.

तुम्हाला कधीतरी उपरती होवो असे म्हणुन थांबतो.

२०१४ च्या मोदींच्या निवडणूक प्रचारांच्या भा षणात त्यांनी सीमेवर मरणार्‍या जवानांचं भांडवल केलं होतं. त्याची तुम्हांल घृणा आली असेल अशी आशा आहे.
Modi says, "More jawans were killed by terrorists that they were killed in wars. Pakistan has been beheading our soldiers. But Delhi govt is serving chicken biriyani to the Pakistani PM."

"A government that cannot safeguard its own army, then such a government is not needed," says Modi.

Modi asks if jawans to should allowed to die, the crowd shouts back in chorus, "No."
एप्रिल २०१४ च्या प्रचाराच्या बातमीतून.
तुमची घृणा घेऊन तिथे जा बरं. की प्रचार सभेत केलेली वक्तव्य जुमला म्हणून सोडून द्यायची ?

ची आकडेवारी दिली आहे.
<<
तो तुमचा यूसलेस मोदी अन त्याचे गुंड साथीदार आकडेवारीच मुळात खोटी देतात हा प्रॉब्लेम आहे.
तुमच्यासारखे साक्षर लोक ती आकडेवारी डिफेडच कशी करू शकता, हा त्याहून मोठा प्रॉब्लेम आहे.

उदा. तुमचे मंत्री व्हिडिओचा स्पीड वाढवून ट्रेन फास्ट आहे सांगतात.

१ महिन्यापूर्वी एका शाळासोबतीणीच्या मुलीच्या लग्नात माझी एक लहानपणची मैत्रिण भेटली. "अरे, तुझ्याकडूनच बदलून मिळतील अशी खात्री वाटली म्हणून आणलेत." म्हणून मला जुन्या १००० अन ५०० च्या काही नोटा दाखवू लागली. सगळे मिळून २०-२२ हजार असतील. पण हीच हिरॉइन शाळेच्या ग्रूपवर जी काय मोदीभजनं टाकत असते, ते पाहून कीव आली.

इतके भयंकर दुतोंडी, दांभिक, खोटारडे अन विकृत लोक पहायची वेळ या आयुष्यात पुन्हा न येवो, इतकीच इच्छा आहे.

इथे मायबोलीवार प्लॅस्टिकचा वापर अन कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट्सवर एलोक्वंट पोस्टी टाकणारे तुम्ही भाजपेयी तुमच्या मोदीने प्रिस्टीन फॉरेस्ट्समधे अडाणीला खाणकामाला परवानगी दिली की थंड पडता.

अंबानी त्सुनामीला रोखणार्‍या खाजणांना बुजवून नवी बीकेसीपेक्षा भव्य स्कीम चालू करणार म्हटलं की आनंदी होता.

फ्लेमिंगो सँक्चुरी मधून बुलेट ट्रेन

अभयारण्यात मेट्रो.

तुमच्या खिशात हात घालून गुपचूप काढून घेतलेले स्वच्छ भारत अन काऊ सेस..

सरकार, हा मी माझ्या सुखासाठी नोकरीवर ठेवलेला आयटम आहे, ही बेसिक कन्सेप्ट अंबानी अडाणीने नव्हे, तर आपण सर्व भारतीय मतदात्यांनी लक्षात ठेवायची गोष्ट का विसरतो आपण?

< पण अशी आकडेवारी सरकारने ऊपलब्ध केली आहे हे महत्वाचे आहे. >

जी आकडेवारी सरकार लपवते आहे, तीत फेरफार करते आहे, ती अधिक महत्त्वाची आहे.
तिला तुम्ही धुरळा म्हणून सोडून द्याल. इंडिया शायनिंगची आ ठवण ठेवा. विरोधकांकडे आहेच कोण हा प्रश्न तेव्हाही होता.

मग या वर्षी आम्ही फक्त १० जवान मरू देऊ असे आश्वासन देऊन त्यावर मात्र प्रत्यक्षात १०० मेले अशी आकडेवारी दिल्यावर नक्की कुणाला कसले समाधान मिळणार आहे देव जाणे.
असो.
<<
अहो

जे खरेच मेले त्यांची खरी आकडेवारी दिली तर तुमच्या भंकस देशप्रेमाचे बेगड ताबडतोब फाटतेय की!

लाजही नाही वाटत असली स्टेटमेंट्स करायला? अंतरात्मा मेली की काय तुमची? अरेरे

त्या निर्लज्ज डोभालच्या पोराच्या कंपनीत पाकिस्तानी पार्टनर आहे!

अन हा डोभाल भारताचा सिकुरिटी अ‍ॅडव्हाजर!

यू गाईज मेक मी सिक.

तो मोहनदास पै, पक्का भाजपेयी भारताचा सर्वात मोठा बीफ एक्स्पोर्टर!

यू गाईज मेक मी सिक.

लय मोठ्ठी आकडेवार यादी आहे.

एक पैशाची तपासणी / विचारणी झाली का अमित शहाची किंवा त्याच्या पोराची?

कुठे गेले पुरावे?

अमोल पालेकरने तुमच्या फडतूस सरकारविरुद्ध एक शब्द काढला तर कुणी टिनपॉट सरकारी नोकर त्याला स्टेजवर गप बसवते??

फार माज आलाय तुम्हा भाजप्यांना!

देशाचं जे काय व्हायचं ते होइल.
तुम्हाला कधीतरी उपरती होवो असे म्हणुन थांबतो.
Submitted by आ.रा.रा. on 12 February, 2019 - 20:55
<<

मतांच्या लाचारीसाठी, देशात धार्मिक लांगूलचालन, जातीयवाद, करोडोचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षात जेवढे वाटोळे केले त्यावेळी तुम्हाला वरिल ज्ञान सूचले नाही ते. शिवाय तुम्ही मोदी सरकार पुन्हा निवडुन येईल की नाही याची मुळीच काळजी करु नका. श्री मोदींना पुन्हा निवडणुन द्यायला या देशातील ३८ टक्के सुज्ञ व हुशार जनता समर्थ आहे. तुम्ही त्या पप्पूबरोबर पोगो पाहात बसा. Proud

सरकारविरुद्ध बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, पण इथला एक आय डी ज्या पद्धतीने भाषा वापरतोय, त्यामुळे इथे आता नीट चर्चा होणं अशक्य दिसतंय!
त्यामुळे रामराम!

मतांच्या लाचारीसाठी, देशात धार्मिक लांगूलचालन, जातीयवाद, करोडोचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन
<<
ए हाड रे.
खोटे बोलू नकोस.
बिल झालेय तुझे.

नोटबंदी अन राफेल, या दोघातले घोटाळे दिसत नसतील तर मोदीबिंदूचं ऑपरेशन करून घे कुठेतरी.

तृतियश्रेणी माणुस कुणिकडला Lol

ज्या पद्धतीने भाषा वापरतोय,
<<
मोदी, शहा अन त्याचे पित्ते, ज्या प्रकारे इतरांविषयी बोलतात, त्या भाषेकडे दुर्लक्ष करून, फक्त सभ्य लोकांनी सभ्य रहावे हे सांगत रहायचे, ही स्टाईल विसरलात तर बरे. गांधी दुसरा गाल पुढे करायला सांगतो, हे संघोट्यांनी पसरवलेले जुने छद्म आहे. मी दुसर्‍याही कानाखाली काढणारा गांधीवादी आहे.

या सरकारविरुद्ध बोलायचे मुद्दे असतील तर मला फाट्यावर मारायला तुम्हाला मनाई केलेली नाही. पण उगंच होलियर दॅन दाऊ चा आव आणू नका. खूप पाहिलेत असे. Lol

रच्याकने.

>>
तुम्ही त्या पप्पूबरोबर पोगो पाहात बसा
<
हे लय सभ्य वाटतंय ना आपणास?

फडतूस!

फडतूस!
>>>>>
तुम्हाला मनोरुग्ण म्हणून मला मनोरुग्णांचा अपमान करायचा नाहीये. कारण ही शुद्ध विकृती आहे.
तुमच्या तोंडाची गटार गंगा अशीच चालू राहो, पण त्या घाणीजवळ उभं राहण्याची माझी इच्छा नाही!
असो उपचार घ्या!
मी मोदींच्या काही धोरणाविरोधी जरी असलो, तरीही प्रत्येक विरोधी मत ऐकल्याबरोबर पिसाळलेल्या कुत्र्यप्रमाणे काही लोक का सुटतात, देव जाणे!

सनव यांना प्रश्न - कर्नाटक - अन्य पक्षातले आमदार विकत घेऊन सरकार स्थापन करणं हे सुद्धा तुम्हाला मान्य्य असेलच.
https://theprint.in/politics/well-make-12-people-ministers-give-rs-10-cr...

Even at the high court and Supreme Court level, Amit Shah has held discussions in case there is any problem from the Speaker… Everything is ready.

जय हो!

आकडेवारी - मोदी काही ना काही निमित्त काढून देशभर फिरतात . पंतप्रधान म्हणून ऑफिशियल दौरा. त्याच्या जोडीला तिथे पक्षाची प्रचार सभाही घेतात. तर अशा दौर्‍याचा खर्च पक्ष ही उचलतो का? याचे उत्तर मिळालेले नाही.
इतकी छान आकडेवारी ठेवणारं सरकार ही आकडेवारी का ठेवत नाही?

अहो 'भाऊ' ३८% भक्तांनी गॅस सबसीडी सोडली असती तर ५ लाख काय आम्हा सर्व गरीब देशवासीयांना गॅस फुकटात मिळाला असता , परंतू फुकटयांना नावे ठेवताना भक्तांना गॅस सबसीडी घेताना लाज वाटत नाही . परदेशातील काळा एक रुपयाही पंतप्रधान आणू शकणार नाही , आणि नवीन रोजगारही निर्माण करू शकणार नाही , कारण देशाचा पंतप्रधान हा राष्ट्रीय पातळीवस्चा नेता कधीही नव्हता , राज्य पातळी वरच त्याने जुमले करावे आणि तेही त्याच्या राज्यातच.

@अज्ञातवासी, या परिस्थितीवर त्या प्रथमश्रेणीची फडतूस मनोवृत्ती असलेल्या लोकांना फाट्यावर मारून अशा लोकांशी हुज्जत ना घालता तुम्हाला काय सांगायचंय ते सांगणं हा एक जालिम उपाय आहे. या प्रकारच्या लोकांना असं वाटत कि फालतू विनोद करून किंवा काहीतरी कुजकट लिहून मी एकटा किंवा माझा कंपूच फक्त इथे लिखाण करू शकेल आणि बाकीचे पळ काढतील. तर अशा सुमार बुद्धीच्या लोकांची मते दुर्लक्षित करून तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगत रहा.

कुठल्या बाबतीत 'घोर' निराशा झाली ज्यामूळे दैनंदीन आयुष्य व विकासाचे मार्ग अडले>> मगिल ७० वर्शात यापैकी काय झाले होते यावर प्रकाश पाडाल का?? २०१४ नंतर भरपेट जेवायला, अंगावर ल्यायला आणि शिक्षण-नोकरी झालं का?? घोड्यावरुन प्रवास केलात की उंटावरुन??

मुलायम म्हणतात मोदी परत पंतप्रधान बनावेत. आता बोला..!
https://timesofindia.indiatimes.com/india/hope-modi-becomes-pm-again-say...

ताकः तिकडे राहुल बाबा अजूनही राफेल ची कागदी विमाने ऊडवण्यात मग्न आहेत, आणि ईकडे सपा ची समझौता फिल्डींग सुरू झालेली दिसते. Proud

Pages