मोदी वि. ईतर... भाजपा वि. ईतर... गांधी कुटुंब वि. ईतर.. अशा अनेक वाद विवादांतून, चर्चा, प्रसंगी वैयक्तीक टीकांतून एक बाब प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या गेल्या ७ दशकात, विशेषतः गेल्या दशकात आपली मते, भूमिका, विचारसारणी ही बर्यापैकी 'ठाम' असते. यात संस्कार, शिक्षण, मिडीया सर्वांचाच मोठा वाटा असतो. त्यामूळे व्यक्तीसापेक्षतेच्या कसोटीवर चूक व बरोबर, फायद्याचे का तोट्याचे याचे नेमकी ऊत्तर सापडणे मुश्कील असते. त्यातही भारता सारख्या महाकाय लोकशाही मधील प्रांत, भाषा, संस्क्रुती, ई. घटक बघता कुठल्याही (केंद्रातील) सरकारने राबवलेल्या योजना वा धोरणे ही सर्व गटांसाठी पुरक वा सर्वंकष विकासाला चालना देणारी असतात वा नाही यावर एकमत होणे तसे अवघडच.
सुदैवाने, सर्वसाधारण 'जागरूक' मतदार व नागरीक यांचे बर्याच गोष्टींवर एकमत असते. देशांतर्गत सुरक्षा असणे. सीमा सुरक्षा. सैन्य व ईतर मुख्य संस्थांचे बळकटीकरण. कुठलेही स्कॅम्स व घोटाळे न होता चालवलेला कारभार. देशाच्या सुरक्षा व विकासाला पुरक अशी आंतरराष्ट्रीय धोरणे राबवणे. दैनंदीन वापराच्या वस्तू, माल, वाहतूक यांच्या किमती वर नियंत्रण. स्वच्छता, आरोग्य, व पर्यावरण पुरक कार्यक्रम व ऊपाययोजना. करवसूली, जकात, ई. मध्ये पारदर्शकता. शहरे, राज्य यांच्या विकासाची कामे व योजना- दळण वळण, वाहतूक, ईंफ्रास्ट्रक्चर. आणि ईतरही बरेच काही. या सर्व अपेक्षा रास्त आहेत. पण आपल्या अपेक्षांच्या तराजूचे एक पारडे ७ दशकांच्या कारभाराचे आहे. तर दुसरे पारडे ५ वर्षाच्या कारभाराचे आहे. तेव्हा अचानक जादू होऊन संतुलन साधणे शक्य नाही.
कुठल्याही सरकार वा व्यक्तीवर वैयक्तिक टीका करणे, दोष दाखवणे, अपेक्षांच्या तराजूवर तोलणे हे सोप्पे काम आहे. पण सरकारच्या कामाची आकडेवारी तपासून नेमकी पुढे कशी वाटचाल अपेक्षित आहे आणि त्या साठी जागरूक मतदार म्हणून आपले कर्तव्य काय हे तपासून घेणे हे अधिक आवश्यक आहे. आपला देश अधिक विकसनशील व्हावा हीच आप्ली अपेक्षा आहे. मग सरकार कुणाचेही असो.
त्यातही सर्व गोष्टि, घडामोडी या तपासून पहाणे, वस्तुस्थिती पडताळून घेणे, संख्यात्मक माहिती हे सर्व तपासून बघायला सर्वसामान्य माणसाला वेळ नसतो. अशा वेळी मुख्यत्वे मिडीया (प्रिंट, केबल.. ई.) मधून ज्या बातम्या २४x7 समोर येत असतात त्यावरूनच साधारण मत व अनुमान निघत असते.
तेव्हा, एन डी ए सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या कारभाराची ही आकडेवारी. अर्थातच नरेंद्र मोदी हे या सरकारचे प्रमुख सेवक (पंतप्रधान) असल्याने त्यांच्या घोषणांच्या अनुशंगाने ही आकडेवारी दिली आहे. सरकारच्या अनेक वेब पोर्टल व गव्हरनंस माध्यमांवर ऊपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी एकत्रीत केली आहे. माहितीचे स्त्रोत विविध असल्याने सर्वच संदर्भ ईथे देणे टाळले आहे. पण आकडेवारमध्येच माहितीचे स्त्रोत चा उल्लेख आला आहे.
१. घोषणा/अपेक्षा/आश्वासनः
देशाच्या तळागाळातील घटकांना आपल्या अर्थव्यवस्थेत सामावून घ्यायचे असल्यास बचत्/बँक खाती असणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
३३.४ कोटी नविन बँक खाती, विशेषत: मागास विभाग व प्रदेश.
२६ कोटी रुपे कार्ड्स वितरीत केली गेली
प्रधान मंत्री जनधन योजने अंतर्गत ८,५०० कोटी रक्कम बँक बचत खात्यांमध्ये जमा
२. सामजिक सुरक्षा, पेंशन, विमा हे निम्न मध्यमवर्गीय स्तरावर आवश्यक प्रमाणात ऊपलब्ध नाही.
आकडेवारी:
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत १४ कोटी लोकांना सुरक्षा विमा मिळाला आहे
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फायदा जवळपास ५.५ कोटी कुटूंबांनी घेतला आहे
अटल पेंशन योजने अंतर्गत जवळपास १२.५ कोटी लोकांनी नोंदणी केली आहे
३. कमी व्याजदर कर्ज ऊपलब्ध केल्याने अनेक कुटूंबांना कर्ज घेणे सुकर झाले आहे, पर्यायाने त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला झाला आहे.
आकडेवारी:
प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत जवळपास १४.५ करोड लोकांनी स्वस्त/कमी व्याज दर कर्जाचा लाभ घेतला आहे.
४. देशाचा विकास व बांधणी ची सुरुवात खेड्यांच्या विकास व सुधारणांतून होणे आवश्यक आहे. आपल्याला आदर्श खेडी (मॉडेल व्हिलेज) ऊभारणे आवश्यक आहे.
आकडेवारी:
'परीवर्तन व सुधारणा उत्सूक जिल्हे' कार्यक्रमांतर्गत ११५ जिल्ह्यांची तपासणी व अधिकॄत नोंदणी झाली आहे.
५.८५ कोटी पेक्षा अधिक बिपील महिलांना एल्पिजी कनेक्शन दिले गेले आहे.
ग्रामपंचायती व खेडे परिसरात ९.२ कोटी शौचालये बांधली गेली आहेत (२०१४ पर्यंत ही संख्या फक्त ६.५ कोटी होती)
५. आपल्या खेड्यात वा गावात पक्का रस्ता असावा अशी प्रत्त्येकाची अपेक्षा असते
आकडेवारी:
२०१४ पर्यंत गावांना जोडणार्या पक्क्या रस्त्यांची टक्केवारी ५६% ईतकी होती. जी आता ९१% पर्यंत पोहोचली आहे.
६. आपल्याला एक असा भारत बनवायचा आहे जिथे गरीबांसाठी देखिल पक्की घरे, वीज, व पाणी ऊपलब्ध असेल.
आकडेवारी:
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जवळपास १.२५ करोड पक्की घरे, वीज व पाणी पुरवठ्यासकट बांधली गेली आहेत.
७. शेतकर्यांकडे जमिन आहे. त्यांना आवश्यक पाणी पुरवठा मिळाला तर मातीतून सोने (सुबत्ता) ऊगवण्याची किमया ते करू शकतात.
प्रधानमंत्री कृषीसिंचन योजना अंतर्गत जवळपास ५.७ लक्ष हेक्टर जमिनी या माय्क्रो इरीगेशन खाली आता सुपिक व पाणीदार करण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत १४.४ कोटी पर्यंत फसल विमा जारी करण्यात आला आहे.
८. आपल्या देशातील गोडाउन व अन्यधान्य केंद्रात अन्न पुरवून शेतकरी देशाची सेवा करत असतात. त्यासाठी मदत करणे व क्षमता वाढवणे हे आपले ध्येय आहे.
फक्त २०१७-१८ या एकाच वर्षात धान्य निर्मिती १०.५% ईतकी वाढली. २०१०-१४ मध्ये ही आकडेवारी फक्त २५० मेट्रीक टन एव्हडीच होती. जी आता २८० मेट्रीक टन ईतकी वाढली आहे.
खरीप पिकांसाठी शेतकर्याला मिळणार्या बाजार भावात ५०%, तर रबी पिकात २१% ईतकी ऐतीहासीक वाढ झाली आहे.
९. नोटबंदी, जीएस्टी या सारख्या धोरणातून आपण ( मुख्यतः देशांतर्गत) बराच काळा पैसा अधिकृत अर्थव्यवस्थेत आणला आहे.
६.८५ करोड लोकांनी २०१७-१८ मध्ये आयकर भरला आहे. जी आकडेवारी २०१४ पेक्षा ६५% अधिक आहे. २०१४ पर्यंत आयकर भरण्याची (income tax return filing) संख्या फक्त २२० करोड ईतकी होती. २०१७-१८ पर्यंत ही संख्या २०७० करोड पर्यंत पोहोचली आहे.
१०. छोटे, गृह व ईतर मध्यम आकाराचे व्यापार ऊद्योग [MSME Ecosystem. Most Micro, Small & Medium Enterprises (MSME)] हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना अधिक ऊधारी, कमी व्याज दर, आणि अधिक भांडवल ऊपलब्ध करून देण्यात हे सरकार सक्रीय आहे.
Support and Outreach Initiative Launched for MSME by November 2018
१ कोटी रू. पर्यंतचे कर्ज अशा ऊद्योग धंद्यांना ५९ मिनीटात म़ंजूर करून देणे हा अध्यादेश जारी केला गेला आहे.
Under CGT-MSE in 2014-18, guarantee applications with coverage of over Rs 8000 Crores were approved
२०१४-१८ दरम्यान सरकारने जवळपास २२,३०० अशा ऊद्योगांना वेगवेगळे ऊद्योजक मेळावे, प्रदर्शन ई. मध्ये सहभाग घेण्यास अनुदानीत मदत केली.
११. PM appealed to all investors and enterpreuners across the globe and in India to Make In India and Manufacture In India .
२०१४ मध्ये ऊद्योगधंद्यास पोषक्/पुरक यादीत Ease of Doing Business Ranking) भारताचा क्रमांक १४२ ईतका खाली होता. २०१८ च्या अखेरीस हा क्रमांक ७७ वर आला आहे. म्हणजेच क्रमवारीत ६५ अंकांनी सुधारणा झाली आहे.
२०१४ मध्ये भारतात फक्त २ मोबाईल मॅन्युफॅक्चरींग युनिट्स होती. २०१८ अखेरीस ही संख्या १२७ वर पोहोचली आहे.
१२. विकास दर व जागतिक विकास टक्केवारी यात भारताने सहा बलाढ्य अर्थसत्तांना मागे टाकले आहे.
२०१८ च्या अखेरीस भारताचा विकास दर (growth rate in GDP) हा ८.२% होता. व जगभरातील विकासाच्या टक्केवारीतील वाटा (India's share in World GDP) ३.१% ईतका होता. जो २०१३ च्या अखेरीस २.३% होता. जागतिक अर्थवाढितील भारताचा हिसा २००५-२०१३ या ८ वर्षाच्या कळात फक्त .६% ने वाढला. जो गेल्या पाच वर्षात .७% ने वाढला आहे.
१३. पोस्ट ऑफीस चे पेमेंट बँक मध्ये बदल करण्याचे काम आमचे सरकार करेल. ज्यामूळे पोस्ट ऑफीस च्या मार्गाने अनेक बँकांचे जाळे देशातील सर्व खेड्या पाड्यात व गावांमध्ये पसरेल.
२०१८ सप्टेंबर अखेरीस अशा ६५० पोस्टाच्या पेमेंट्स बँक शाखा व ३२५० सुविधा केंद्रे प्रामुख्याने खेड्यांमध्ये स्थापन झाल्या आहेत. ३००,००० + पोस्ट्मन आणि ग्रामिण पोस्ट सेवा या अंतर्गत जोडल्या गेल्या आहेत.
१४. आपल्या देशातील लक्षावधी तरूणांनी हस्तकला, कौशल्य, व कार्यकुशलतेचे प्रशीक्षण घेतले पाहिजे. यासाठी अशा संस्थांचे एकत्रीत जाळे ऊभारणे आवश्यक आहे.
दीन दयाल ऊपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत आजवर ६ लाख तरूणांनी प्रशीक्षण घेतले असून, शिवाय जवळपास ३.५ लाख तरूणांना रोजगार (नोकरी, धंदा) ऊपलब्ध झाला आहे.
via 587 number RSETI (Rural Self Employment Training Institues) च्या सहाय्याने जवळपास २४.५ लाख तरूणांना प्रशीक्षण तर जवळपास १६ लाख तरूणांना रोजगार मिळाला आहे.
CSC (EGovernance Services India Ltd) च्या माध्यमातून ३ लाख तरूण अशा केंद्रातून कार्यवाहक म्हणून काम करत आहेत.
१५. पं. दीनदयाल यांच्या शिक्षण, रोजगार, संधी या तरूणांसाठी अभिप्रेत असलेल्या स्वप्नपूर्ती साठी सरकारने देशाच्या ८०० लक्ष तरूणांसाठी काही ठोस पावले ऊचलली आहेत.
६ नविन IIT कार्यरत झाल्या आहेत. IIT Palakkad, IIT Tirupati, IIT Jammu, IIT Bhilai, IIT Goa, IIT Dharwad
२५०० अटल टेक्नोलॉजी लॅब्स मधून जवळपास ३०,००० विद्यार्थी reserach and innovation मध्ये कार्यरत झाले आहेत.
नॅशनल डिगीटल लायब्ररी ऑफ ईंडीया च्या माध्यमातून १.७ कोटी डिजीटल पुस्तके जवळपास ३० लक्ष युजर्स ना ऊपलब्ध केली गेली अहेत.
१६. जर सर्व खेडी व गावे ही डिजिटल ब्रॉड्बेंड व डिस्टंस लर्निंग माध्यामतून जोडली गेली तर गावातील सर्व मुलांना अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करता येईल.
१.२ लक्ष ग्राम्पंचायती ब्रॉड्बँड द्वारे जोडल्या गेल्या आहेत. 'Swayam' शिक्षीत भारत, ऊन्नत भारत या संस्थेद्वारे ३३ लाख युजर्स ना साधारणपणे
१००० ऑनलाईन कोर्सेस ऊपलब्ध केले गेले आहेत.
E-Pathsha या पोर्टल व मोबाईल अॅप च्या आधारे जवळपास ३३०० ध्वनिक्लिप्स, ६५० ई पुस्तके आणि ५०४ फ्लिप पुस्तके ऊपलब्ध केली गेली आहेत.
Nantional Repository of Open Educational Research वर जवळपास १३,६३५ माहिती फाईल्स ऊपलब्ध केल्या गेल्या आहेत.
१७. Technology च्या सहाय्याने बदल व सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. Geo Technology, Space Technology, अशा ईतर सर्व टेक्नोलॉजी चे ईंटीग्रेशन करून अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
मंगलयान- मंगळावर (ऑर्बीट मध्ये) यशस्वीपणे ऊपग्रह ऑपरेट करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश आहे.
https://www.bbc.co.uk/news/science-environment-29341850
ईस्रो ने एकाच लाँच मिशन मध्ये १०४ ऊपग्रह यशस्वीपणे लाँच करण्याचा नवा जागतिक विक्रम केला.
IRNSS ही भारताची स्वयंपूर्ण व स्वतः बनवलेली सॅटेलाईट नॅविगेशन सिस्टीम आहे.
GSAT 11 च्या सहाय्याने देशभरात ब्रॉडेबेंड कनेक्टीविटी अधिक क्षमतेने वाढवण्याचे काम सुरू आहे.
१८. ग्लोबल वार्मिंग च्या लढाईत व पर्यावरण संरक्षण यात भारताचे योगदान हे विद्युत ऊर्जा वापर कमी करण्याच्या माध्यमातून असेल.
मर्च ११, २०१८ मध्ये भारत सरकारने जवळपास १७५ कोटी रु. गुंतवणूक करून International Solar Alliance या जागतिक संशोधन, संस्था व कार्यकारिणीची स्थापना केली. या संस्थेच्या पहिल्या जागतिक संमेलनाचे ऊद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजी केले.
१९. स्वच्छ, निरोगी व सुराज्य (सुदृढ) भारत बनवण्यासाठी आम्ही एकत्रीतपणे काम करू.
'मिशन ईंद्रधनुष' योजने अंतर्गत आजवर ३.३ कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री डायलेसिस योजनेचा लाभ जवळपास २.५ लाख लोकांनी घेतला आहे.
सार्वजनिक व खाजगी रूग्णालयांबद्दल अद्ययावत माहिती असलेली National Health Repository आता ऊपलब्ध आहे.
२०. गरीब रूग्णांना प्रसंगी स्वस्त वा फुकट औषधे मिळावीत व चांगल्या मोठ्या रुग्णालयांमधे प्रवेश व वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून सरकारने प्रधानममंत्री जन आरोग्य योजना राबवण्याचे ठरवले.
या अंतर्गत आरोग्य सुरक्षा विमा रू.५ लाख पर्यंत/ दर वर्षी/एक कुटूंब ऊपलब्ध केला गेला. यात १३०० आजार, व १३५० ऊपचार पॅकेजेस (सेकंडरी, टर्शियरी) अंतर्भूत आहेत. धोरणात्मक लक्ष्य-५० कोटी लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे.
२१. २०१९ मध्ये १५० व्या गांधीजयंती निमित्त स्वच्छ भारत (अभियान) समर्पीत करणे
२०१४ पासून आजवर ९.५ कोटी शौचालये बांधली गेली आहेत. जवळपास ५.३ लाख गावे आणि २५ राज्ये ही open defecation free म्हणून घोषित झाली आहेत. येथिल सांड्पाणी नियोजन व विल्हेवाट टक्केवारी ३९% (२०१४) वरून ९७% पर्यंत वाढली आहे.
२२. IT च्या माध्यमातून देशाचा प्रत्येक नागरीक जोडला जाऊ शकतो. म्हणूनच 'डिजीटल ईंडीया' च्या माध्यमातून अखंड भारत व ए़कात्मतेचा प्रसार होवू शकतो.
MyGov.in वर आता ७१ लाख लोकांनी अधिकृत रजिस्ट्रेशन केले आहे. जगातील सर्वात मोठा डिजीटल डेमोक्रसी प्लॅटफॉर्म असा हा विक्रम आहे. १.२ लाख ग्राम पंचायती आता फायबर ऑप्टीक मूळे जोडल्या गेल्या आहेत.
२३. मुलगी, महिला, स्त्री या खर्या अर्थाने स्वतंत्र असाव्यात आणि स्त्रीभ्रुण हत्त्या पूर्णपणे बंद ह्वावी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील.
'बेटी बचाओ बेटी पढाओ' अंतर्गत १०४ जिल्ह्यांमध्ये महिला/पुरूष ratio ऊंचावला आहे. 'मिशन ईंद्रधनुष' च्या अंतर्गत ८६ लाख गरोदर महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. मॅटर्निटी बेनिफीट कायद्यामध्ये २०१७ मध्ये सुधारणा करून आता गरोदर नोकरदार महिलांना २६ आठवड्याची पगारी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. जगात ही सर्वात मोठी paid maternity leave आहे.
२४. बलात्कारा सारख्या घटना घडतात तेव्हा देश म्हणून आपली मान झुकते. अशा वेळी (पुरूषांची) मानसिकता बदलण्याची गरज असताना आपण ऊलट मुलींवर/महिलांवर प्रतीबंध लादू पाहतो.
१२ वर्षा खालील मुलींवर बलात्कार करणार्यास म्रुत्यूदंड ची शिक्षा देण्याचा कायदा/ऑर्डीनंस मंजूर झालेला आहे.
२५. सुसूत्रीकरण व एकत्रीकरणाचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूणच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियाना अंतर्गत आम्हाला समाजातील सर्वच घटकांचे सहाय्य गरजेचे आहे.
'स्वच्च्छ विद्यालये' योजने अंतर्गत, एका वर्षात, विक्रमी १.९ लाख स्वच्छतागृहे शाळेत फक्त मुलींसाठी बांधण्यात आलेली आहेत. मुलींची शालेय शिक्षण प्रवेश संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.
या आकडेवारी व्यतिरीक्त, सरकारच्या पोर्टल वर प्रत्येक विभाग, खाते, योजनावार कामाचा चार वर्षाचा प्रगती अहवाल Performance KPI Dashbaords ऊपलब्ध आहेत. माझ्या माहितीत तरी हे पहिलेच सरकार असेल ज्यांनी अशी माहिती व पोर्टल अतीशय ऊत्तम प्रकारे संकलीत करून आपल्या समोर ठेवली आहे. मोठ मोठ्या कॉर्पोरेट्स मध्ये देखिल असे KPI Dashboards पहायला मिळत नाहीत.
Governance- Transeprency- Accountability.!
पोर्टल ची लिंकः 48months.mygov.in
प्रत्येक 'जागरूक' नागरीकाने आवश्य या पोर्टल ला भेट द्यावी व सरकारचे प्रगतीपुस्तक पहावे.
आता राहिला प्रश्ण आगामी निवड्णुकांचा. ज्या प्रकारे कॉ. व ईतर मिळून रोज नव नविन कुरापती व निव्वळ दिशाभूल करत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की देशाच्या भविष्यासाठी ना त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम आहे ना एक नेता. सगळेच नुसते कळप करून गोंधळ माजवायचा प्रयत्न करत आहेत. जाट, दलित, मुस्लिम, आणि ईतर घटक ज्यांना गेली ६ दशके काँ च्या सत्तेत वोट बँक म्हणून वापरले गेले व मुद्दामून मागास ठेवले गेले. त्यांना पुन्हा हे काँ कडबोळे नविन गाजरे दाखवत आहेत. शेतकरी, छोटे व्यापारी, बिल्डर, सत्तेचे दलाल, सर्वांना मोदी हाच कसा त्यांचा एकमेव शत्रू आहे एव्हडाच प्रचार करण्यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. खुद्द एन डी ए मध्ये असलेले त्यांचे सहकारी पक्ष देखिल आता निव्वळ कुठल्याही पक्षा बरोबर सत्तेची समिकरणे जुळवण्या साठी आटापिटा करत आहेत.
या सर्व नकारात्मक प्रचाराचा व दिशाभूल करण्याचा काहितरी परिणाम होणार हे अपेक्षितच आहे. दुर्दैवाने आपल्या देशातील बहुसंख्यांना देखिल सरकारच्या कामाची, संपूर्ण माहिती नसते. ज्या काही थोड्या फार जणांना माहिती असते किंवा जाणून घ्यायचे प्रयत्न केले असतात त्यातील काही 'आदर्शवादी' असतात. काही स्वार्थी. तर तरूण वर्गातील जे आता मतदार असतील त्यांनी आधीच्या सरकराचा सवाळा गोंधळ व भोंगळ कारभार बघितलेला नसतो. ज्यांना बरीच माहिती असते ते वाद विवाद व ऑनलाईन चर्चा, वॅप यात मग्न असतात. देशभक्त कमी पण मोदी भक्त का गांधी परिवार भक्त असे वाद विवाद सर्वत्र दिसतात.
भाजपा व एन डी ए यांचे सर्वच निर्णय वा वागणूक दर वेळी योग्यच आहे असेही नाही. तेही चुकले असतील. पण ज्या प्रकारे गेल्या ५ वर्षात सुधारणा, सुविधा, प्रगती चा आलेख ऊंचावलेला आहे ते पाहता चुका सुधारून चांगले काम करून दाखवण्याची ईच्छाशक्ती, क्षमता, व नेतृत्व या सरकार मध्ये नक्की आहे हे स्पष्ट आहे. मोदी 'पडले' तर त्यांचे वैयक्तीक नुकसान शून्य आहे भारातातील एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत हे लिहायला मिळते हे ही नसे थोडके. भाजपा पक्षाचे नुकसान थोडे फार नक्कीच होणार. पण फार मोठे नुकसान देशाचे होईल हे नक्की. गेल्या सरकारच्या रखडलेल्या व दीरंगई झालेल्या कीत्त्येक कामांना या सरकारने मार्गी लावले. नुसते नितीन गडकरींच्या कामाची यादी द्यायची (Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development) तरी एक वेगळा बाफ ऊघडावा लागेल ईतकी कामे पूर्ण केली आहेत. अगदी तसेच परराष्ट्रीय, सैन्य, रेलवे, ई. ईतर मोठ्या विभागांचे चित्र आहे. डिजीटल भारत व मोबाईल प्रणाली माध्यमातून दैनंदीन व अनेक निम सरकारी कामांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाच्या हातात आलेल्या अधिकार व स्वयत्ताता निश्चीतच सुखावह आहे.
नविन कुठलेही कडबोळे आले तर पदे, पोर्ट्फोलिओ, आणि त्यातून पैसा कमावायचे धंदे यासाठीच अंतर्गत कलह माजेल. नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर, सुशमा स्वराज, सुरेश प्रभू, निरमला सितारामन यांसारख्या अनेक लोकांनी अक्षरशः दिवस रात्र मेहेनत करून मा. मोदी यांच्या नेत्रूत्वाखाली केलेल काम, ऊभारलेला विकास व सुरक्षेचा भक्कम पाया आणि योजना या सर्वांना नव्या कडबोळ्या सरकार मध्ये खीळ बसण्याची किंवा कामांची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता जास्ती आहे. पारदर्शकता, जबाब्दारी, ऊत्तरदायीत्व हे सर्व गांधी परिवाराच्या पायाशी वाहणार्या संधीसाधू लोकांकडून नेमकी काय अपेक्षा असणार आहे हे वेगळे लिहायला नको. आणि पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या.
'सबका साथ सबका विकास' मधला विकास तर निश्चीत दिसतो आहे. पण या सरकारला मिळालेला सबका साथ असाच पुढेही मिळेल का याचे ऊत्तर नजीकच्या काळातच मिळेल. एक जबाबदार नागरीक, मतदार, व व्यक्ती म्हणून आपली कर्तव्ये व सहभाग काय हे आपल्याला माहितच आहे.
सर्वांना व आपल्या देशाला अनेक शुभेच्छा!
ता.क: मोदी सरकारचे अतीशय चपखल विश्लेषण:
https://m.youtube.com/watch?fbclid=IwAR0k32bsY4Xdbt2EcKldp4e3mw2FRZaA1Xy...
त्यांचा राष्ट्रवाद हा असा
त्यांचा राष्ट्रवाद हा असा मर्यादीत आहे. >> मोदी आणि राष्ट्रवादाची सांगड कशी काय घातली बुवा??
मोदी म्हणजेच भारत. मोदी विरोध
मोदी म्हणजेच भारत. मोदी विरोध म्हणजे देशद्रोह. सिम्पल.
पोल देणे हे निव्वळ
पोल देणे हे निव्वळ रिकामटेकड्या लोकांचे उद्योग असतात , खरा कामगार आणि कष्टकरी वर्ग मत देतो आणि तेही योग्य त्यालाच ...
कळेलच , दम काढा वाईस ....
नवी दिल्ली, ता. १८ : (अधिकृत
नवी दिल्ली, ता. १८ : (अधिकृत बातमीदाराकडून) निवडणूक आयोग आणि राष्ट्रपती भवन यांनी डेक्कन हेरॉल्डच्या सर्व्हेला मान्यता दिल्याचे समजते. स्वतः निवडणूक आयोगाने जो सर्व्हे घेतला होता त्यात भाजपला ५३ जागा मिळाल्या आहेत. तर सहकारी मित्रपक्षांच्या ४७ जागा असे एकुण शंभरचे संख्याबळ भाजपच्या हाताशी आहे असे निवडणूक अंदाजांवरून दिसते.
उर्वरीत सर्व जागा भाजपच्या विरोधकांना मिळत आहेत असे सर्व्हे सांगतो. यआ सर्व्हेत खूपच कमी जागा मिळत असल्याने अमित शहा यांच्या विनंतीवरून थोड्या अधिक जागा असलेल्या डेक्कन हेरॉल्डच्या सर्व्हे वर सहमती झाल्याचे समजते.
गडकरींच्या या ट्विटला काय
गडकरींच्या या ट्विटला काय म्हणावं? वेडेच आहेत; सरकार असा धाडसी (काहिंच्या मते आत्मघातकि) निर्णय कसा काय घेउ शकतं? धिस इज सो ब्रुटल अँड अॅन असॉल्ट ऑन ह्युमॅनिटी...
Tell me something new....
Tell me something new.... Yaawn!
हे मनमोहनसिंग आणि काँग्रेसचं
हे मनमोहनसिंग आणि काँग्रेसचं सरकार नाही, ते लोक चुप्प बसायचे. आम्ही तसे नाही.
ही टेप अजून झिजली नाही का? हा व्हिडियो २१ मे २०१४ म्हणजे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पण शपथविधी पूर्वीचा आहे.
https://www.youtube.com/watch?v=LQj2cR-rsl8
आणि ही सुद्धा जुनीच टेप आहे की.
आमच्या वाट्याचं पाणी थांबवू म्हटल्यावर इतकं नाचायचं असतं? असेल असेल.
हे खरंय का?पुलवामा हल्ल्याची
हे खरंय का?
पुलवामा हल्ल्याची बातमी आल्यावर सुद्धा मोदीजी "विजय शंखनाद रॅलीत'' प्रचाराचं भाषण करीत होते?
त्यांच्या प्रचारात एकाही दिवसाचा खंड पडलेला नाही. आणि भाजप म्हणतंय की पुलवामा शहीदांना श्रद्धांजली म्हणून आम्ही कार्यक्रम रद्द करतोय.
अमित शहांची प्रचार सभाही ही बातमी आल्यावर चालूच होती. त्यातही खंड पडलेला नाही.
ते राफेल घोटाळ्यावर बोलत
ते राफेल घोटाळ्यावर बोलत नाहीत. ते बेरोजगारीवर बोलत नाहीत. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. शेवटी दक्षिण कोरीयाने त्यांना शांततेचा पुरस्कार दिला.
(No subject)
ते पाणी बंदची न्यूज देणारे
ते पाणी बंदची न्यूज देणारे कुठं गेले?
तोंडचं पाणी पळालं असेल
तोंडचं पाणी पळालं असेल
ट्रोलस् पेटलेत इथे ! हाहा:
ट्रोलस् पेटलेत इथे !
ते राफेल घोटाळ्यावर बोलत
ते राफेल घोटाळ्यावर बोलत नाहीत. ते बेरोजगारीवर बोलत नाहीत. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. शेवटी दक्षिण कोरीयाने त्यांना शांततेचा पुरस्कार दिला.
>>>
संरक्षणमंत्र्यांनी संसदेत राफेलबद्धल माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने करार सरकारी नियमांचे पालन करून पारदर्शकपणे झाला असा निकाल दिला. CAG ने किमतीबाबत खुलासा केला.
मग तुम्हाला राफेल "व्यवहारात" "घोटाळा" नक्की कुठल्या गोष्टीत दिसतोय? आता सरकारने काय तुम्हाला कराराची सगळी कागदपत्रे... मग राफेलचे डिझाईन... मग त्याचे बिल ऑफ मटेरियल , प्रत्येक स्पेअर पार्टची किंमत आणि करारात सामील विविध कंपन्यांचे बँक अकाउंट नंबर इत्यादी माहिती द्यायची कि काय?
कॅगचा अहवाल लोकलेखा समितीने
कॅगचा अहवाल लोकलेखा समितीने पाहिलाय हा स र्वोच्च न्यायालयाचा गैरसमज दूर झाला का?
मोदींची कॉर्बेट पार्कमधली फिल्म कधी पाहायला मिळेल?
पाणी व्यवस्थापन आणि टोमॅटो
पाणी व्यवस्थापन आणि टोमॅटो बंदी हे मास्टरस्ट्रोक नसून फुसके जूस्सा पादा आहेत.
मुळात पाणी व्यवस्थापन हे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. बंव्हंशी हिमालयातून स्रोत असणाऱ्या नद्यांना आणि पाण्याच्या प्रवाहाला वळतं करण्यासाठी किमान १५/२० वर्षांचा कार्यक्रम राबवावा लागेल. शिवाय पाणी व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय विषय आहे. भारत पाणी व्यवस्थापन करू शकेल पण त्यासाठी कणखर इच्छा शक्ती पाहिजे. आणि त्या इच्छाशक्तीचाच दुष्काळ पडलेला असताना फक्त भक्त मंडळींच्या बाजारबुणग्या गावगप्पांना मास्टरस्ट्रोक समजणं मूर्खपणाचंच ठरेल.
पाकिस्तानात टोमॅटो २०० काय किंवा २००० रुपये किलो झाले काय, त्याने भारताला प्रत्यक्ष फायदा काही होणार नाही. इतर बऱ्याच जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्या पाकिस्तानात भारतापेक्षा निम्म्या किमतीत विकल्या जातात. पेट्रोल आणि डिझेल, ही सर्व जीवनावश्यक गोष्टींच्या वाहतुकीवर आणि त्याच अनुषंगाने त्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर थेट परिणाम करणारी इंधने भारताच्या तुलनेत पाकिस्तानात खूप स्वस्त आहेत. शिवाय आता भारतातून टोमॅटोबन्दी झाली नसून, २/३ वर्षांपूर्वी पाकिस्ताननेच भारतातून आयात होणाऱ्या टोमॅटोवर बंदी घातली होती.
https://www.thenews.com.pk/…/234050-Import-of-Indian-tomato…
शेठची फिल्म मेकिंग, शेठच्या ट्रोल आर्मीच्या आतवर घुसलीय. जनसामान्य वर्गात शेठच्या तथाकथिक देशभक्तीचं पितळ या फिल्म मेकिंग ने पार उघडं नागडं पडलंय. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे पाणीव्यवस्थापन आणि टोमॅटो बंदीचे फुसके बार उडवले जातायत.
काल निखिला म्हात्रे शेठच्या पक्षाच्या प्रवक्त्याला विचारात होती की...
पुलवामाचा हल्ला झाला तेंव्हा शेठ शूटिंग करत होते का? आणि जर ते शूटिंग करत होते तर त्यांना या हल्ल्याची माहिती दिली होती का?
या प्रश्नांवर शेठच्या पक्षाचे प्रवक्ते हल्ला झाल्यानंतर ७/८ दिवसांनीही माहिती उपलब्ध नाही म्हणून सांगत असतील तर, काय लायकीचे प्रवक्ते माहिती आणि उत्तरे देण्यासाठी पक्षातर्फे निवडले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर इतके अत्युच्चं वैचारिक पातळीचे प्रवक्ते असतील तर देशभक्तीच्या पार्श्वनादी पुड्या सोडणारे भक्त काय लायकीचे असतील हे हि लक्षात घेतलं पाहिजे.
शेवटी महत्वाचं...
हा #देश #आपला आहे.
सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न विचाराने आपला अधिकार आहे.
सरकार देशभक्त आहे असं समजून चालूया.
फक्त प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.
१.) पुलवामाचा हल्ला झाला त्या वेळी शेठ काय करत होते?
२.) शेठना हल्ल्याची तात्काळ माहिती देण्यात आली होती काय?
३.) जर माहिती देण्यात आली नव्हती तर संबंधित यंत्रणा काय करत होत्या?
४.) जर माहिती देण्यात आली होती तर शेठनी ती गांभीर्याने घेतली होती का?
५.) जर माहिती गांभीर्याने घेतली होती तर, फिल्म मेकिंग महत्वाचं होतं कि नव्हतं हे त्यावेळी कोणी ठरवलं?
प्रश्न विचारा...
... हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आणि सर्वात महत्वाचं...
... शेठच्या ट्रोल आर्मीच्या खोट्या माहितीला बळी पडू नका.
देश महत्वाचा आहे. फिल्म मेकिंग नाही हे ध्यानात ठेवा.
वंदे मातरम!
©मिलिंद खोत.
फेब्रुवारी २२' २०१९
रावी मधे गडकरी, सिंधू मधे
रावी मधे गडकरी, सिंधू मधे अमित शाह आणि सतलज मधे फडणवीस आडवे पडून पाणी रोखणार
#कायप्पा
सुब्रमण्यम स्वामी का बयान बम,
सुब्रमण्यम स्वामी का बयान बम, जेटली चेकपोस्ट नहीं हटवाते तो बच जाती 40 जवानों की जान भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी ने टीवी 9 भारतवर्ष से एक्सक्लूसिव बातचीत में कहा है कि अरुण जेटली ने दिसंबर 2014 में रक्षामंत्री रहते हुए जम्मू श्रीनगर राजमार्ग से चेकपोस्ट हटवाई थी, इसी वजह से आतंकी सीआरपीएफ काफिले पर हमला करने में कामयाब रहे'...!! http://www.tv9bharatvarsh.com/india/bjp-leader-subramanian-swamy-exclusi...
पाणी अडवणार!
पाणी अडवणार!
<<
वॉव.
आमच्याच्याने (मागचं) युती सरकार असताना कृष्णेचं पाणी अडवून जमलं नाही. पण ते एक असो.
दुसरं, उदा. पानशेत का फुटलं?
असे पाणी अडवून गम्मत करायला काही ट्याक्नालाजी वगयरे काय लाग्ते का नाय? पाणी अडवून घेतलं, तर वरतून भोक पाडून काढावं लागतं किंवा नको तिथे फुटतं.
पण भक्तजन येती, वाळवंटी नाचती, अन मूर्ख लोक त्या नाचावर दौलतजादा करिती.
ते ही जौद्या.
>>ट्रोलस् पेटलेत इथे ! Lol<<
पेटले कोण, जाळ कुठे लागला.
जौद्या.
यांना बर्नोऑल चा ट्रक दिला तरी कमीच पडणारे.
शेवटी काये ना,
चला लोकहो, आपणही काश्मिरी मुसलमानांचा पग्रोम करूया. (फाळणी, शिख दंगलि, गांधी"वधाच्या" दंगली, गुजरात दंगे, अन तत्सम.) अॅट द सेम टाईम यु क्नो, काश्मिर इज इन्डिविजिबल पार्ट ऑफ इंड्या यु क्नो? -का रे भो? फक्त जमीन हवी तुला? तिथल्या माणसांचं काय? मारून टाकायचे का ज्यू मारले तसे? पण नाही. हे भोक्*डीचे आर्मीवर दगड मारतात? :राग : मग यांना बंदूक मारून मारूनच टाकायला हवे.. अन ते ३७०. किती लिहू पुढे?
अरे यार... कसं काय जमतं? डोकं वापरायचंच नाही. अभ्यास करायचाच नाही.
आपण नथूच्या नावाने "फाळणीच्यावेळी हिंदू मरताना मी रडलो" म्हणून पोस्टी टाकत (तुमच्या घराजवळ राहणारा) मुसलमान (ज्याच्या बापजाद्यांनी हिंदूस्थानात राहणे पसंत केले, व जो तुझ्यासोबत तुझ्याच शाळेत केजीपासून होता, जसे कित्येक हिंदू पाकिस्तानातही राहिलेत, त्यांना) मारा असा संदेश फैलावू या. बट माईंड हां. आपण असलं काहीच अॅच्क्चुअली करायचं नस्तंय. एकही देशस्थ किंवा चित्पावन दंग्यात रस्त्यावर तल्वार हातात घेऊन, किंवा छातीचा कोट करून मारता मरताना मला तरी दिसला नाहिये.
हे नुसतेच अ-निरोध बनून इकडं तिकडं काड्या टाकत राहतात.
अन यांच्यातले. दंगेखोर "उजवे" किंवा माथेफिरू. (कारण दंग्यात हेच पेटतात विनाकारण)
ते ही जौद्या. अति उजवे, ते उदा. मिल्ट्रितले महाऽऽऽऽऽन मेजर गोगोय.
आसामी आहेत ना ते? दोषी ठरले होते अल्पवयीन वेश्येला हॉटेलात बोलावून म्हणे? आसामातल्या बायांनी नागडं होऊन काहीतरी आंदोलन केलं होतं म्हणे. कालच बातमी वाचली या बेस्टेस्ट मोदपा सरकारने परत आसाम रायफल्सला त्याच पॉवर्स दिल्या म्हणून.
पण ते ही असो.
राष्ट्रभक्तीने ओथंबून वॉर झोनमधे विकृती करणे असो, किंवा सिव्हिलियन दंग्यात ये&^वपणा. राईटविंग विकृती नेहेमीच अल्टिमेट आहे.
का हो? तुम्हाला राईट अन राँग मधला फरक समजतच नाही का?
why the hell can we not understand difference between Patriotism and "Nationalism"?
कल्याणच्या सुभेदाराची सून, *"काहीच" न करता* उलट साडीचोळी देऊन परत पाठवली हा शिवाजीचा मूर्खपणा होता, असे लिहिणारे मान्यवर वि.दा. सावरकर ज्यांचे पुज्य आहेत, त्यांच्या आकलनाची कीव करायच्या पलिकडे गेलोय मी. एल ओ एल.
३.) जर माहिती देण्यात आली
३.) जर माहिती देण्यात आली नव्हती तर संबंधित यंत्रणा काय करत होत्या?
<<
मोदीचा फोन "नॉट रिचेबल लागला हो" असला मूर्ख प्रचार करताहेत हे भाजपेयी.
मोदी काय कावपिंप्रीच्या शिवारात वावर खेडनारा तुझा साला आहे का? का वावरमा जाइसन रेंज ना बाहर व्हई जास?
अरे येडा, तो देस ना पंतप्रधान शे.
टावर ले रेंज नसन, तं सॅटेलाईट फोन र्हास तठे! डिस्कवरी च्यानलवर मेकप करीसन नाचानं काम शे का त्यानं? का देश नी काळजी कराले पायजे?
येडी फैय्या, येड्यान मायक नाचू नको, का इकडं टेररिस्ट नंगा नाच करायले, आन हिकडं मोदीले 'रेंज नही'.
आणि इन द एन्ड,
आणि इन द एन्ड,
भाजपा, व शिवसेनेची "युती" "झाली'. ५०-५० सीट डिस्ट्रीब्यूशन बर्का.
काँग्र्याच्युलेशन्स. (त्यातही काँग्र्या आहेच )
जस्ट अ रिमाइंडर फॉर शी शू स्वयंसेवक्स.
"थेल अकेला तल्ता हेय"
घसरला का जातीवर?
घसरला का जातीवर?
मोदी, भाजपा आणि संघावर टीका करणाऱ्यान्ची खरी जळजळ तीच असतीय
तुमची फुलबाजी तडतडायला लागली की लै म्हणजे लै मज्जा येती
ह्यानिमित्ताने माझा अनेक
ह्यानिमित्ताने माझा अनेक वर्षापासून असलेला एक प्रश्न विचारून घेतो : जो ज्या जातीचा असतो त्याच जातीला समजा शिव्या घालत असेल तर त्याला जातीयवादी म्हणतात का?
(No subject)
मर्दाचे लक्शन...
मर्दाचे लक्शन...
पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे, भारताने सर्व पातळीवर पाकची कोंडी करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारत पाकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची ही चाल चांगलीच अंगलट आली आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार नाही असं म्हटलं आहे.
याचसोबत विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढून घेतला आहे. जोपर्यंत भारत सरकार स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबद्दल आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. व्हिसा नाकारल्यानंतर पाकिस्तानी नेमबाजी संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तक्रार केली होती. यावर कारवाई करताना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या खेळाडूच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलं आहे.
घसरला का जातीवर?
(महान लोकांची पोस्ट =)
>>
घसरला का जातीवर?
<<
पूर्वीच टाईप केलेले उत्तर :
>>
पेटले कोण, जाळ कुठे लागला.
<<
अशी पेकाटात द्यायला हवीये ना या राईट विंगर्सच्या.. कायमचं तुणतुणं मोडलं पाहिजे... पण अगेन, फ्रॉम लेफ्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, इट्स माय "मजबूरी का नाम महात्मा गांधी", की i HAVE TO LET YOU LIVE, AND *NOT* CONDUCT MASS MURDERS LIKE THE NAZI DID!
येस. महात्मा गांधी ही मजबूरी देतोच देतो.
श्या!
आजचा गांजा लै कडक दिसतोय LOL
आजचा गांजा लै कडक दिसतोय
LOL
नाही ब्वा. गांजा नाही फुंकत
नाही ब्वा. गांजा नाही फुंकत आम्ही. ते काम तुमच्या पुज्य दैवताचे आहे. ते कायम तारेत असतात. फुल इंटेलिजन्स आहे आपल्याकडे.
बरं, जाळ तुमच्या "हिकडं"
बरं, जाळ तुमच्या {अंडरलाईन, बोल्ड, इटॅलिक्स, साईझ = दहा हजार}"हिकडं"{/अंडरलाईन, बोल्ड, इटॅलिक्स, साईझ = दहा हजार} कस्काय लागला? आमच्या परम-मित्राचे डू आयडी आहात की मंजो?
हे परत पूर्वीच टाईप केलेले
हे परत पूर्वीच टाईप केलेले उत्तर :
>>
जौद्या.
यांना बर्नोऑल चा ट्रक दिला तरी कमीच पडणारे.
<<
खि खि खि:क्क
Pages