छतशेती - सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तन्त्राने.

Submitted by साधना on 29 December, 2018 - 04:02
terrace farming

श्री. सुभाष पाळेकर गुरुजींचे एक नैसर्गिक शेतीविषयक शिबीर नुकतेच पनवेल येथे पार पडले. शिबिरात बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला. पण माझ्या ह्या लेखाचा तो विषय नाही.

पाळेकर गुरुजींबद्दल मी प्रथम ऐकले निसर्गाच्या गप्पा ह्या मायबोली धाग्याच्या व्हाट्सअप्प गृपवर. जागुने गेल्या वर्षी श्री. तुषार देसाईना ग्रुपमध्ये घेतले. त्यांनी गुरुजींच्या शून्य बजेट नैसर्गिक शेतीबद्दल अधून मधून बोलायला सुरवात केली. शेतीविषयक म्हटल्यावर मी कान टवकारले पण फक्त देशी गायीचेच शेण हवे वगैरे ऐकून मला वाटले हे नवे काहीतरी फॅड असणार. शेण हे शेण आहे. मग ती देशी गाय असो वा विदेशी. बैल असो वा म्हैस. काय फरक पडतो विशिष्ट शेणाने? हे काहीतरीच सांगतात असा विचार करून मी त्या विषयाकडे दुर्लक्ष केले. नंतर देसाईंच्या फार्मला भेट दिली तिथे त्यांची पत्नी विद्याही देशी गायच हवी म्हणायला लागली. नाहीतर म्हणे रिझल्ट्स मिळत नाहीत. मी तिला उलटसुलट विचारून बघितले पण देशी गाय हवीच यावर ती ठाम होती. ते ऐकून संधी मिळाली तर म्हशीचे शेण वापरून बघायचे हे मी मनातल्या मनात ठरवून टाकले.

माझा शेतीतला रस पाहून मी गुरुजींच्या शिबिराला हजेरी लावावी यासाठी तुषार आग्रह करायचे. मलाही उत्सुकता होती. तशा दोन संधी आल्याही. पण दोन्ही वेळेस वैयक्तिक दुर्घटनांमुळे मला जाता आले नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबरात पुण्याला गुरुजींचे दोन दिवसांचे एक शिबीर आयोजित केले गेले होते. त्या शिबिराला मला घेऊन जाण्यात तुषार यशस्वी झाले. शिबिरात देशी गायच का हा विषय गुरुजींनी समजावल्यावर देशी गायीचे महत्व लक्षात यायला लागले. गुरुजींची सगळी पुस्तके विकत घेतली. देशी गायीवरचे पुस्तक वाचले, त्यात दिलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ नेटवर शोधले व लक्षात आले की गुरुजी जे बोलतात त्याला गुरुजींनी स्वतः केलेल्या प्रयोगांचे अथवा प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ आहेत. उगीच स्वतःला सोयीचे ते हवेत ठोकून दिले असे गुरुजी करत नाहीत. माझा विश्वास बसू लागला.

त्या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले व सुभाष पाळेकर तंत्र वापरणारे खूप शेतकरी भेटले. त्या सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर व गुरुजींची पुस्तके वाचल्यावर शेतकऱ्यांनी स्वतःला जगवायचे असेल, आत्महत्यांपासून स्वतःला रोखायचे असेल तर सुभाष पाळेकर शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. पुर्णपणे रासायनिक खतांवर पोसलेला शेतीमाल खाऊन कर्करोग, मधुमेह, निकामी मूत्रपिंडे वगैरे रोगांना बळी पडणे अपल्याला थांबवायचे तर झिरो बजेट शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. इतर सर्व शेतीपद्धती जसे ऑरगॅनिक, गांडूळखत वगैरे ह्या रासायनिक इतक्याच घातक व निसर्गाची हानी करणाऱ्या आहेत हे डोक्यात फिट झाले. झिरो बजेट, ज्याचे आता सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नामकरण करण्यात आले आहे, जी विषमुक्त अन्न पुरवू शकते तीच एकमेव अशी पद्धत आहे जी शेती, शेतकरी व खाणारे सामान्य यांना तारू शकते हे डोक्यात फिट झाले.

तर आता हा धागा मी का काढला त्याकडे वळते. पनवेलच्या शिबिरात गुरुजींनी छतशेती या विषयाला तीन तास दिले.

नीती आयोगाने सगळ्या राज्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीपद्धती अंगिकारावी असे निर्देश दिले असले तरी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश व झारखंड ह्या राज्यानीच ती पद्धती स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अजून लक्ष दिलेले नाही. महाराष्ट्रात सुभाष पाळेकर पद्धतीचे शेतकरी आता वाढत असले तरी इतर राज्यांच्या तुलनेत ते कमी आहेत. त्यामुळे आज मुंबईत विषमुक्त भाजीपाला खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शहरात ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी स्वतःपुरता भाजीपाला पिकवला तर निदान तेव्हढेतरी विषमुक्त अन्न त्यांना खायला मिळेल हा विचार करून शहरातील शिबिरात छतशेतीचा प्रचार गुरुजी करतात. शहरात छतावर जागा असते, लागेल तेवढे ऊन असते, मुबलक पाणी असते. मग हे सगळे वाया का घालवायचे? का नाही आपण आपले अन्न स्वतःच पिकवू शकत? हाही एक विचार यामागे आहे. याशिवाय लोकांना विषमुक्त शेतमाल ही कल्पना समजायला व भविष्यात विषमुक्त अन्न विकणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हायला याचा उपयोग होईल हे वेगळे.

तर मला शिबिरात जी माहिती मिळाली ती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवावी व ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःचे विषमुक्त अन्न स्वतःच पिकवायचा आनंद घ्यावा हा या धाग्याचा हेतू आहे.

ज्यांच्याकडे जागा आहे व दिवसाचे 6-7 तास थेट ऊन मिळते त्यांनी जागेचे नियोजन, भाजीचे नियोजन व जीवामृताचे नियोजन कसे करावे हे खाली दिले आहे.

छतावरील शेती तीन गटात विभागली आहे. तुमच्या जागा उपलब्धतेनुसार व तुमच्या गरजेनुसार या तीन गटातील कुठलाही एक गट अथवा एकापेक्षा जास्त गट किंवा सर्व गट निवडून तुम्ही छतशेती करू शकता.

छतशेती सुरू करण्याआधी बाजारातून एक उत्तम प्रतीची, शेततळ्यात वापरली जाणारी प्लास्टिक शीट विकत घ्या व पूर्ण छतावर किंवा ज्या भागात शेती करणार तिथे पसरा. यामुळे पाणीगळतीचा त्रास होणार नाही. तसेच छत किती मजबूत आहे याचा अंदाज घ्या. छतशेतीमुळे छतावर जास्त भार येत नाही कारण माती जास्त वापरली जात नाही, वाळलेली पाने जास्त वापरली जातात. तरीही ओल्या मातीचे वजन सुकलेल्या मातीच्या दुप्पट होते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे छताची सक्षमता ठरवा.

छतशेतीसाठी सजीव जिवाणूमाती: चुनखडी व चिकणमाती सोडून इतर कुठल्याही प्रकारची लाल अथवा काळी माती घ्या. बारीक मुरूम असला तरी चालेल. मातीच्या १० ते २५ टक्के घनजीवामृत त्यावर टाका. त्यावर नैसर्गिकरित्या सुकलेला पालापाचोळा टाका. आता त्यावर जीवामृताचे जाडसर मिश्रण टाका, फावड्याने सर्व नीट एकत्र करा आणि त्याचा सावलीत ढीग करून ठेवा. ४८ तासांमध्ये सजीव माती तयार होते. ही माती आपल्याला वापरायची आहे.

गट पहिला: सर्व प्रकारच्या पालेभाज्या व कंद.

पालेभाजीत सर्व पालेभाज्या जसे मेथी, पालक, चुका, चाकवत, अंबाडी, कोथिंबीर, माठ, तांदुळजा वगैरे.

कंदभाजीत कांदे, लसूण, गाजर, मुळा, बिट, सलगम, नवलकोल वगैरे. यात बटाटे लावता येणार नाही, त्यांना जास्त जागा लागते.

प्लास्टिक शीटवर सहा फूट लांब व तीन फूट रुंद आयत आखून घ्या व त्याच्या चारही बाजूला एक एक वीट आडवी ठेवा. म्हणजे तुम्हाला ६' X ३' X विटेची उंची असा आयताकार खड्डा मिळेल. विटेची उंची साधारण साडेसहा ते नऊ सेंटीमीटर असते. विटा एकाला एक लागून ठेवा पण पाणी ओघळून जाईल इतकी लहान 3-4 मिमी फट ठेवा.

IMG_20171210_103150734_HDR~01_0.jpg

छतावर असे एकावर एक विटा रचून खड्डे बनवताना दोन खड्ड्यांच्या मध्ये पाणी/जिवामृत द्यायला, भाजी तोडायला तुम्हाला फिरता यावे यासाठी 2 फूट अंतर ठेवा.

IMG_20171210_103233362~01.jpg

खड्डे तयार झाले की वरून दोन बोटे जागा सोडून खड्ड्यात सजीव माती भरा. त्यावर जीवामृत शिंपडा.

सहा फूट लांबीला समांतर अशा साडेचार इंच अंतरावर रेघा पाडा व त्यात बीजामृत संस्कार केलेल्या पालेभाजीच्या बिया पेरा. बियांवर माती झाका व मातीवर वाळलेले गवत/पाने इत्यादींचे आच्छादन टाका. बिया रुजून वर अंकुर दिसायला लागला की ताबडतोब आच्छादन काढून घ्या. आच्छादन टाकल्याने बिया रुजायला आवश्यक ते वातावरण तिथे तयार होते. बिया रुजून आल्यावर आच्छादन काढले नाही तर आच्छादनात रोपे गुरफटायचा धोका आहे.

रोपांना नियमित मग अथवा कपाने थोडे थोडे पाणी द्या, विटांखालून बाहेर येणार नाही इतपत.

पाण्याचा पाईप हाती घेऊन पाणी देऊ नका.

महिन्यातून दोन तीनदा दोन ओळींच्या मध्ये कप किंवा मगाने जीवामृत हलक्याने ओता.

दर अमावास्या/ पौर्णिमेला कीडनिवारणार्थ ब्रम्हास्त्राची फवारणी करा. 300 मिली ब्रम्हास्त्र + 10 लिटर पाणी.

दर अष्टमीला जिवामृताची फवारणी करा. 10 लिटर पाणी + 750 मिली जीवामृत + 250 मिली आंबट ताक.

तुम्हाला अमावस्या/पौर्णिमा/अष्टमी कळत नसेल तर कॅलेंडरवर तारखा मार्क करून ठेवा व त्याप्रमाणे फवारणी द्या. शक्यतो तारखा चुकवू नका.

जीवामृत बनवताना किती खड्डे बनवले त्याप्रमाणे द्रावण कमीजास्त करा.

जीवामृताची फवारणी नियमित केली तर ब्रम्हास्त्राची फवारणी करायची वेळ येत नाही. पानांची नियमित तपासणी करा. पानाच्या मागच्या बाजूला उन्हात चमकणारी अंडी अथवा बारीक किडी आढळल्या तरच ब्रम्हास्त्र फवारावे. पानावर छोटासा लाल/पिवळा/काळा डाग दिसला तर बुरशीनाशक फवारा.

भाज्या कधीही मुळापासून उपटू नयेत, पाने खुडून घ्यावीत. त्यामुळे सतत नवे फुटवे येऊन दीर्घकाळ भाजी मिळत राहते.

गट क्रमांक 2 : सर्व प्रकारच्या फळभाज्या.

यात मिरची, टोमॅटो, फुल/पत्ताकोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी, वाल, चवळी, मूग, वाटाणा वगैरे फळभाज्या येतात. यात बटाटे लावता येतील.

प्लास्टिक शीटवर ६' X ३' आकाराचे, दोन विटा एकमेकांवर रचून खड्डे बनवा. दोन खड्ड्यात 2 फूट अंतर ठेवा, तुम्हाला मधून फिरता यावे यासाठी. विटा रचताना अशा रचा की खालच्या दोन विटांच्या जॉईंटवर वरची वीट येईल. जास्तीचे पाणी जाण्यासाठी खालच्या दोन विटात थोडेसे अंतर ठेवा.

IMG_20171210_103157865_HDR~01.jpg

वरून दोन बोटे सोडून सजीव माती भरा.

सहा फुटाच्या बाजूला विटेपासून सहा इंच अंतर सोडून आडवी रेघ मारा, विरुद्ध दुसऱ्या बाजूलाही तशीच रेघ मारा. त्यावर मध्ये थोडे थोडे अंतर सोडून फळभाजी लावा.

मध्ये 2 फूट जागा मोकळी राहील. त्याच्या मध्यभागी आडवी रेघ मारून त्यावर कडधान्ये लावा.

फळभाज्या - मिरची, टोमॅटो, कोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी वगैरे.

कडधान्ये - मटार, चवळी, उडीद वगैरे द्विदल प्रकार.

ऋतू बघून त्या ऋतूत येणारी कडधान्ये व भाज्या पेरा.

कडधान्ये उगवून आल्यानंतर दोन्ही कोपऱ्यात दोन व मध्ये एक असे झेंडू लावा.

कडधान्ये जमिनित नायट्रोजन फिक्स करतात, तो फळभाज्यांना मिळतो. कडधान्य रोपांची पाने सतत गळून पडतात, त्यामुळे आच्छादन मिळते. यावर मित्रकिडी येतात ज्या फळभाज्यांवरील शत्रूकिडींचा बंदोबस्त करतात.

झेंडूच्या मुळांमध्ये फळभाज्यांच्या मुळांच्या गाठीत निवास करणाऱ्या सूत्रकृमीचे (नीमॅटोड) नियंत्रण करणारे औषधी तत्व असते. झेंडूवर भरपूर मित्रकिडी व मधमाशा आकर्षित होतात. मित्रकिडी फळभाज्यांवरच्या शत्रूकिडींचा नाश करतात. मधमाशा फळभाज्यांचे परागीभवन करण्यास मदत करतात.

मिरची, वांगी वगैरे फळभाजीचे उत्पादन निघाल्यावर जोडफांद्या छाटून जीवामृत शिंपडावे व खाली आच्छादन करावे. परत नव्या फांद्या फुटतात व उत्पन्न मिळते. फुल/पत्ता कोबी कापून घ्यायचा, रोप उपटायचे नाही. नवे फुल येते. उत्तम दर्जासाठी जीवामृत फवारणी नियमित करत राहावी.

गट 2 चे पाणी व जीवामृत व्यवस्थापन गट 1 प्रमाणे करावे.

गट क्रमांक 3 : फळझाडे व इतर.

यात ऊस, तूर, पपई, केळी, मोहरी, डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता, दालचिनी, पेरू, शेवगा, हादगा इत्यादींचा समावेश होतो.

यासाठी ६' X ३' चा खड्डा तिहेरी विटा रचून बनवावा.

तूर, ऊस, पपई, केळी लावायची असतील तर ६' X ३' चा खड्डा पुरेसा आहे.

डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता लावायचा असेल तर ६' X ६' चा खड्डा तयार करा.

आपण मध्यम उंचीची झाडे लावणार आहोत हे लक्षात घ्या.

सर्वप्रथम जे फळझाड लावणार त्याचे कलम रोपवाटिकेतून आणून, त्यावरील प्लास्टिक पिशवी फाडून ती तयार खड्ड्याच्या मधोमध ठेवा व नंतर वरून सहा बोटे राहतील इतकी जागा सोडून खड्ड्यात माती भरा. त्यावर पालापाचोळा आच्छादा व जीवामृत शिंपडा.

एका खड्ड्यात एकच फळझाड आपण लावणार आहोत हे लक्षात घ्या.

खरीप हंगाम असेल तर तूर व रब्बी असेल तर मोहरी विटेपासून सहा इंच अंतरावर चार कोपऱ्यात लावा.

चारही बाजूंना विटांपासून 1 फूट अंतर सोडून एक चौकोन आखून त्यावर फळभाज्या लावा. ६' X ६' चा खड्डा असेल तर आत अजून एक चौकोन फळभाज्यांचा घेता येईल. याच्या आतली मुख्य फळझाडाभोवतीची सगळी जागा आच्छादनाने भरा.

सहा इंच जागा सोडली तिथे कडधान्ये व झेंडू लावा.

बाकी कुठे रिकामी जागा दिसली तर तिथे पालेभाज्या लावा.

पाणी व जीवामृताचे व्यवस्थापन आधी लिहिल्याप्रमाणे करा. जितके शक्य तितके जीवामृत देत राहिले व मित्रकिडींचा बंदोबस्त करणारी झाडे असली तर फारसा काही त्रास न होता उत्पन्न मिळते.

पालेभाज्या 1 फूट बाय 9 इंच उंच कुंडीतही वाढवता येतात. तिसऱ्या गटातील फळझाडे 500 लिटरच्या प्लास्टिक पिंपात वाढवता येतात. पिंपाचा तळ व झाकण कापून टाकावे. पिंप मधून कापावे म्हणजे आपल्याला दोन बसकी पिंपे मिळतात, त्यात फळझाडे लावता येतात.

गच्चीवर 200 लिटर पाण्याची पिंपे ठेऊन ती पावसाळ्यात भरायची. भरली की त्यावर गच्च झाकणे लावून वर भरपूर गवत पसरायचे. आपण कमीत कमी पाणी वापरणार असल्याने पिंपात भरून ठेवलेले पाणी पुरते.

तर वर लिहिल्या प्रमाणे तीन गटात विभागून छतशेती करता येईल.

यात मेहनत भरपूर आहे. जीवामृत वापरायच्या तारखा चुकवून चालत नाही. जीवामृत आज वापरायचे तर तीन चार दिवस आधी ते बनवायला घ्यावे लागते. त्यामुळे नीट वेळापत्रक बनवून ते काटेकोरपणे पाळावे लागते. हयगय, कंटाळा केला की अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण अनुभव असा आहे की सुरवातीला ही मेहनत केली की नंतर आपोआप तिथे एक इकोसिस्टीम तयार होते व ती स्वतःचे नियोजन स्वतःच करायला लागते.

गांडूळखत वर्मीकंपोस्ट

गांडूळे जमिनीखाली राहणारे कृमी आहेत. जमिनीत ते खाली वर फिरत राहतात, जमिनीच्या आत त्यांच्या फिरण्याने पोकळ्या तयार होतात. यामुळे जमीन सैल होते, मुळांना वाढायला वाव मिळतो. गांडूळे सहसा प्रकाशात येत नाहीत, जमिनीखाली राहतात, तिथेच मिळणारे कुजलेले वनस्पतींचे भाग खातात व विष्ठा टाकतात. या विष्ठेतून झाडांच्या वाढीला आवश्यक मूलद्रव्ये खालच्या थरातून वर येतात व मुळांना मिळतात. गांडूळांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात ते यासाठी.

गांडुळात तीन प्रकार आहेत. पहिला जमिनीच्या पृष्ठभागावर राहून तिथले कुजलेले वनस्पतीभाग खाणारा, दुसरा जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी खाली राहून, जमिनीला समांतर बोगदे करणारा, माती खाणारा व तिसरा खोल जमिनीत राहून उभे बोगदे करून वर येऊन पाने खाणारा.

भारतात आढळणारे बहुसंख्य गांडूळ दुसऱ्या प्रकारात मोडतात. ते जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी राहतात व तिथेच आडवे तिडवे बोगदे करतात. माती खाऊन त्यातली मूलद्रव्ये मुळांना उपलब्ध करतात.

गांडूळखतात वापरतात तो ऐसेनीया फीटीडा हा पहिल्या प्रकारात मोडणारा गांडूळ आहे. तो जमिनीच्या पृष्ठभागाजवळ राहतो व तिथला कुजलेला वनस्पतिभाग खातो. यामुळे पृष्ठभागावर असलेला ह्युमस नाहीसा होतो. ह्युमसचे आवरण जमिनीवर असणे खूप गरजेचे आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये विघटित करणारे लाखो सूक्ष्मजीव व बुरशी ह्या ह्युमसखाली वावरत असतात. रासायनिक शेतीने हा ह्युमस संपवला आहे. तो ह्युमस परत निर्माण करण्याचे प्रयत्न नैसर्गिक शेतीद्वारे सुरू असताना फिटिडा गांडूळ शेतात वापरले तर ते तयार होणारा ह्युमस खात राहणार, ह्युमस निर्माण होणार नाही. शिवाय गांडूळांना खाण्यासाठी शेतात सतत कुजलेला पालापाचोळा टाकावा लागणार. ही शेती मग फायद्याची होणार कशी? पाळेकर गुरुजींचा गांडूळशेतीला विरोध आहे तो या कारणांसाठी.

माझे मत: जिथे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल व ऑरगॅनिक वेस्ट गोळा होते, जसे शहरातील कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंडस, तिथे हे गांडूळ वापरून खत बनवता येईल. हे खत बाल्कनी व टेरेस गार्डनिंग करणाऱ्या ग्रुप्सना वापरता येईल. मी कुंडीत गांडूळे वापरून झाडे लावलेली आहेत. आपण कुंडीत किंवा खड्ड्यात घरातील ऑरगॅनिक वेस्ट वापरून गांडूळखत बनवतो तेव्हा फिटीडा गांडूळांना लागणारे खाद्य आपण पुरवतो व त्या खाद्यापासून खत मिळवतो. आपल्यासाठी हे फायद्याचे ठरते. शेतात ही पद्धती वापरली तर कित्येक एकर शेतात पसरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक वेस्ट लागेल.

बीजसंस्कार : कुठल्याही पिकाच्या बिया पेरताना बियाणातून रोगांचे बिजाणूही पेरले जातात, रोप जन्मतःच रोगग्रस्त होते. यावर उपाय म्हणून बियांना बाविस्टिन लावून मग बी पेरा असे कृषी विद्यापीठ सांगते. पण बाविस्टीनमुळे अपायकारक बीजाणू व बुरशीसोबत उपकारक बुरशी सुध्दा नाश पावते. म्हणून देशी गाईपासून बिजामृत वापरून बीजसंस्कार करावा. आपण कुंडीत लावायला म्हणून जे बीज बाजारातून विकत घेतो त्यालाही विषारी औषध चोळलेले असते. पाकिटावर तसा उल्लेख असतो.

बिजामृत : पाणी 20 लिटर, शेण 1 किलो, गोमूत्र किंवा मानवी मूत्र 1 लिटर, दूध 100 मिली, माती मूठभर, कळीचा चुना 50 ग्राम. हे सगळे एकत्र करून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी बियांवर शिंपडून हलक्या हाताने किंवा काठीने फिरवून घ्यावे. सावलीत बिया वाळवून नंतर पेरायच्या. रोपे तयार करून घेतली असतील तर त्याची मुळे बिजामृतात बुडवून काढायची व मग लावायची.

ऑरगॅनिक शेती दूरगामी विचार करता फायद्याची का नाही हे खालील वेब साईटवर दिलेय. ब्रम्हास्त्र, जीवामृत वगैरे कसे बनवायचे हे देखील या साईटवर दिलेय. इच्छुकांनी वाचावे.

http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/home.aspx

हा धागा काढायचा उद्देश 'शहरी शेती करू इच्छिणाऱ्या लोकांना अजून एक मॉडेल' हा आहे. शहरी शेती करणारे वर्मीकंपोस्ट, घरातील ओरर्गनिक वेस्ट कंपोस्ट इत्यादी पद्धती वापरत आहेत. मराठी विज्ञान संघ दाभोलकर प्रणित शहरी शेतीचा प्रसार करतात. त्यावरही मी एक धागा काढलेला आहे.

https://www.maayboli.com/node/52986

तुम्हाला जसे जमेल तसे करा. तुम्ही स्वतः पेरलेल्या बियातून भाजी उगवून ती खाताना किती गोड लागते याचा अनुभव स्वतः घ्या. कदाचित हा अनुभव घेत असताना शेतीत किती कष्ट आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. ते कष्ट कळले तर आपल्या हातून कळत नकळत अन्नाची जी हानी होतेय तिला आळा बसेल.

हा धागा काढण्याचा उद्देश हा आहे. कोणाचा प्रचार करण्यासाठी हा धागा काढलेला नाही. वर दिलेल्या पद्धतीने छतशेती करताना मला जे बरेवाईट अनुभव येतील ते यापुढे लिहीन.

पुण्याला बरेच जण छतशेती करतात. त्यापैकी तीन चार जणांच्या शेतीला मी भेट दिलीय. बहुतेक लोक गेले पंधरा ते वीस वर्षे शेती करत आहेत. ते सगळेच गुरुजींच्या पद्धतीने करताहेत असे नाही. ट्रायल एरर मेथडने किंवा ज्ञात पद्धतींनी त्यांनी सुरवात केली. आजूबाजूचा सुकलेला पालापाचोळा, घरातील भाजीपाल्याचा कचरा वगैरे वापरून त्यांनी छतशेती केलेली आहे. तुम्ही पुण्यात असाल व भेट द्यायची इच्छा असेल तर मी पत्ते व फोन नंबर देईन.

खालील फोटो वेगवेगळ्या ठिकाणच्या छतशेतीचे आहेत. वर लिहिल्याप्रमाणे ह्या सगळ्या छतशेती पाळेकर पद्धतीने होतात असे नाही. केवळ छतशेती किती यशस्वी रित्या करता येते व यात काय प्रकारची पिके घेता येतात याची कल्पना यावी म्हणून मी फोटो दिलेत.

फोटो नं. 1:

IMG_20171210_103208261_HDR~01.jpg

फोटो नं. 2

दुधी सुकवून त्यात लावलेले रोप

IMG_20171210_115641625.jpg

फोटो नं 3:

गच्चीत लावलेले अंजीर, चिकू, पेरू. चिकू ड्रमात लावलाय.

IMG_20171210_121453771_HDR~01.jpg

इतका मोठा होता:

IMG_20171210_121458198_HDR~01_0.jpg

चिकूचा मोसम नव्हता, त्यामुळे फार थोडे चिकू होते.

IMG_20171210_121509157_HDR~01.jpg

झाड मोडून पडेल इतके पेरू लागले होते

IMG_20171210_115852299_HDR~01.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गांडूळ खतशेती व कंपोस्टिंग याला का विरोध ते आज सविस्तर लिहिते.

त्यांचा बनणाऱ्या खताला विरोध नाही, करण नैसर्गिक शेतीत ह्या दोन्ही प्रकारची खते नैसर्गिकरित्या बनतात, त्यांचा विरोध आहे कसे बनते याला. आज लिहिते.

आपल्या या धाग्यावर छतावरची बाग, भाजीपाला वगैरे यावरचे प्रयत्न हेच अधिक यावे. पाळेकर प्रकरण बरेच चर्चा करून झालं आहे.
बाल्कनी आणि छत यामध्ये मुख्य फरक सूर्यप्रकाश कमीअधिक मिळणे किंवा अजिबात न मिळणे, अपुरी जागा, मोठी झाडे न लावता येणे आहे. बाकी तेच आहे.

पाळेकर प्रकरण बरेच चर्चा करून झालं आहे.
हे वाक्य असे हवे खरे तर -
पाळेकर प्रकरण बरेचदा अनुभवशून्य लोकांकडून पोकळ चर्चा करून झालं आहे
-------
इथे साधना ताई स्वानुभव मांडत समजावून सांगणार आहेत.
हां फरक आहे

साधना अतीशय उत्तम माहिती दिलीस, ती पण फोटोसहीत. वर कोणीतरी विचारले आहे की देशी गायच का? तर मी एके ठिकाणी असे वाचले होते की देशी गायी ( आपल्या पाळलेल्या ) या विवीध ठिकाणी चरतात, त्यातुन सतत फिरत असल्याने त्यांच्याही अन्नाचे पचन होते. व आपल्या कडे राना-वनात-जंगलात ( जिथे हिंस्त्र श्वापदे नाहीत अशी छोटी गायराने ) जेव्हा चरायला जातात, तेव्हा माणसाला माहीत नसणारी किंवा माहीत असणारी अशी अनेक आयुर्वेदीक वनस्पती, वेलींची पाने त्या ( गायी-बकर्‍या वगैरे) खात असतात, ज्यात कुठलाच अपाय नसतो, पण त्या वनस्पती त्या शेणखतात सुक्ष्म रुपाने उरतात.

पण ज्या गायी ( विदेशी ) एकाच जागी एकाच जागी उभ्या राहुन, चलन वलन न करता खात रहातात, त्यांच्या शेणखाताचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून हे लोक देशी गायींवर भर देत असावेत. हे मी सर्व वाचलेय, आता कुठे तेच आठवेना.

एक विनंती
कृपया धाग्यातील बदल ईथे कमेंट मध्ये फक्त त्याबद्दल टाइटल देत नमूद केला की मला धागा बदलून असे दिसले की तेवढे बदल वाचणे सोप्पे होईल. अनेक महत्वाचे मुद्दे पुढेही कदाचित धाग्याच्या मूळ कन्टेन्टला जोडण्यात येतील तेव्हा एकूण लांबी वाढल्याने हां धागा मोबाईल वर वाचताना ही पद्धत वाचकांच्या सोयीची राहील असे वाटते.
शक्य असेल तर ह्याचा नक्की विचार करावा. धन्यवाद.

तुम्हाला जसे जमेल तसे करा. तुम्ही स्वतः पेरलेल्या बियातून भाजी उगवून ती खाताना किती गोड लागते याचा अनुभव स्वतः घ्या. कदाचित हा अनुभव घेत असताना शेतीत किती कष्ट आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. ते कष्ट कळले तर आपल्या हातून कळत नकळत अन्नाची जी हानी होतेय तिला आळा बसेल.

हा धागा काढण्याचा उद्देश हा आहे. कोणाचा प्रचार करण्यासाठी हा धागा काढलेला नाही.
>>>>>
हे खूप आवडले.

वर दिलेल्या पद्धतीने छतशेती करताना मला जे बरेवाईट अनुभव येतील ते यापुढे लिहीन. >>>>
वाट बघत आहे.

ते वापरून केलेली शेती विषमुक्त का नसते हे सविस्तर सांगितले तर मुद्दा समजायला सोपे होईल>>>

या संदर्भात मी वर लिहिलेय त्याव्यतिरिक्त गुरुजींनी अजून एक मुद्दा मांडलाय. फिटीडा गांडूळ हेवी मेटल्स खातात. यासाठीच industrial वेस्ट मॅनेजमेंट मध्ये त्यांना वापरतात.

गुरुजींचा मुद्दा हा आहे की हे गांडूळ हेवी मेटल्स खोल जमिनीतून खातात व वर पृष्ठभागावर ती विष्ठेतून आणून टाकतात यामुळे जमिनीत नको असलेली घातक रसायने येतात.

हे कारण मला फारसे पटले नाही. फितीडा गांडूळे खोल जातच नाहीत, त्यामुळे वरचा 30 सेमीचा थर सोडला तर खाली हेवी मेटल्स असली तरी ती या गांडुळांपर्यंत पोचणार नाही.

आपण घरात वर्मीकंपोस्ट करतो त्यात फक्त घरातले ऑरगॅनिक वेस्ट म्हणजे भाजीपाला वापरतो. त्यामुळे घरातील वर्मीकंपोस्ट मला धोकादायक वाटत नाही. मूळ भाजीपाल्यात हेवी मेटल्स असतील तर ते मात्र धोकादायक ठरेल.

दुआयडु, तुमच्या प्रतिसादाबद्दल अनेकानेक धन्यवाद. तुम्ही लक्ष ठेवून वाचता आहात बघून खूप बरे वाटले. मूळ धागा काही दिवसानंतर संपादनासाठी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे माझें छतशेतीचे अनुभव मी वेगळा धागा काढून टाकेन. इथे लिंक देइन.

रश्मी, देशी गाई मध्ये नक्कीच काहीतरी आहे जे बाकीच्या गाईमध्ये नाही. गोहत्याबंदी कायदासंदर्भात खटला सुप्रीम कोर्टापुढे आला असता राजीव दिक्षितांनी देशी गायीचे फायदे नमूद केले व त्यामुळे सुप्रीम कोर्टाने गोहत्या बंदी च्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे मला तरी वाटते की नीट नियोजन करून वापरली तर देशी गाय खूप फायद्याची आहे. अर्थात हा माझा विषय नाही त्यामुळे मी यात फारच खोलात गेले नाही.

हरपेन, मनापासून आभार.

इतर प्रतिसादकांचेही मनापासून आभार. हा विषय लोकांना इंटरेस्टिंग वाटतो याचा आनंद आहे.

आजपासून गुरुजींचे 2 दिवसांचे शिबिर नव्या मुंबईत, आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ पश्चिमेला भरत आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.

झिरो बजेट- "अशाश्वत" तंत्रज्ञान

झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाबद्दल न पटणाऱ्या,अशास्रीय अनेक बाबी वर्षभर काहीही न बोलता, लिहता बारकाईने अभ्यास करत होतो. यात सामान्य शेतकऱ्यांची कशी दिशाभूल होत आहे आणि शहरी माणूस शेती आणि शेतकऱ्यांबद्दल कसे गैरसमज मनात गृहीत धरत आहेत हे दिसत होतं पण शांत होतो. आता शांत राहणे पटत नाही, मन अस्वस्थ होतं.

कोणतेही तंत्रज्ञान सदा सर्वकाळ १००% उपुक्तच नसते. प्रत्येक बाबीत काही चांगल्या/वाईट गोष्टी असतात आणि काळानुरूप त्यात सुधारणा, बदल,नवीन प्रयोग आणि त्याच्या निष्कर्षातून येणारे नवीन सिद्धांत हे सतत बदलत राहायला हवेत तरच ते अधिकाधिक उपयुक्त ठरते. हे विज्ञानाच्या नियमात आपण सर्वांनी शिकलेलं आहे आणि या बद्दल दुमत असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे एखाद्या तंत्रज्ञानाच्या भक्तांचा ज्यांना फक्त आम्हीच श्रेष्ठ म्हणण्याची सवय असते त्यांचं काय? झिरो बजेट सारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणारे, त्याचे समर्थक ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपुढे अशा पद्धतीने मांडतात की हेच फक्त जगनमान्य आणि सर्वश्रेष्ठ शेती तंत्रज्ञान आहे आणि बाकीचे सगळे फेल आहे. सुभाष पाळेकर (गुरुजी!) आणि त्यांचे काही प्रचारक हेच करत आहेत आणि शेतकऱ्याला कायम बुचकळ्यात टाकत आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यात एकात्मिक शेतीच्या तोट्यांचा बागुलबुवा केला आणि आपले तंत्रच कसे तारणहार आहे हे मांडले आणि मांडत आहेत.

आपल्या शेतकरी मित्रांनी, संशोधन केंद्रांनी, विद्यापीठांनी अनेक प्रयोग केले आहेत आणि त्यांच्या यशावर आधारित माहिती ते देत असतात. या पाळेकरांच्या गळाला लागलेलं मासे म्हणजे संडे फार्मर, आयटी क्षेत्रात काम केलेले किंवा करत असलेले,डॉक्टर, सरकारी नोकरीतून रिटायर्ड झालेले लोकं असं म्हणायला मोठा वाव आहे आणि ते असे लोक आहेत ज्यांना शेती म्हणजे जादूचा खेळच वाटतो. शेतीतील खर्च शून्य करण्याच्या नादात बरेच शेतकरी शून्य होत आहेत हे कधी समजायचे गुरुजींना? शेती एक व्यवसाय आहे आणि व्यवसायात आज १ रुपया लावला तर उद्या २ रुपये होतील हा साधा सिम्पल फॉर्म्युला आहे. त्यामुळे आता तरी गुरुजींनी शेतकऱ्यांच्या माथी हे तंत्रज्ञान थोपवण्यापेक्षा वास्तव स्वीकारावे असे वाटते. तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाचा प्रचार जरूर करा पण दुसऱ्या पद्धती वाईट आणि माझीच चांगली हा प्रचार थांबवा. जगाला पुरावे नसलेले तर्क न सांगता गणित मांडून दाखवा कसं तुमच तंत्र शून्य खर्चाचं आहे? दाखवा कि बियाणे, अन्नद्रव्य, तणनियंत्रण, कीड नियंत्रण, रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा खर्च, अवजारे, यंत्रे यांचे भाडे, पाण्याचा खर्च, लाईट बिल कसा शून्यावर आणला? फक्त बोलून दाखवण्या पेक्षा प्रत्यक्षात हिशोब आणि गणित दाखवा. दाखवा ZBNF/SPNF शेती कशी एकात्मिक शेती पेक्षा अधिक नफा देते? दाखवा कितीजन हे साध्य करण्यात यशस्वी झाले आहेत?

तुम्ही म्हणता घरचे वापरा सगळे. त्या घरच्या निविष्ठा शून्य किमतीच्या असतात असं कोण म्हणेल आणि तुम्ही कसे काय म्हणू शकता? माझ्या शेतातील शेणखत मी स्वतः वापरले तरी त्याची किंमत आहे. व्यवसाय करणारा कोणताही शहाणा माणूस हे कसं मान्य करेल कि घरचं म्हणजे किंमत शून्य. माझे कष्ट म्हणजे किंमत शून्य, असं शक्य आहे? मग अंबानी-टाटा घरच्या कंपनीत काम करण्याचे कोट्यवधी रुपये मानधन का घेतात? ते का नाही सांगत माझी कंपनी कमीत कमी गुंतवणूक करून इतके कोटी कमावते? कारण प्रत्येक वस्तू आणि सेवा याची किंमत असते, तिला शून्य पकडताच येत नाही. ते फक्त तुम्हीच करू शकता असे वाटते.

मागे काही दिवसा पूर्वी "झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्रचे" नाव बदलून आता "सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्र" असे केल्याचे समजले. त्याला कारणेही न पटण्यासारखी दिली.ज्या तंत्रज्ञाच्या जोरावर पद्मश्री पदरात पाडून घेतलात, नीती आयोगापर्यंत मजल मारलीत तेच नाव बदलायला लागणं यातच आपल्या तंत्रज्ञानाचा फोलपणा दिसून येत नाहि का? कि आता प्रसिद्धी आणि स्वतःच्या नावासाठी हा अट्टाहास चालला असावा असे देखील म्हणायला वाव आहे.

परवा अमोल दिघे नामक तरुणाचा झिरो बजेट बाबतीत स्वअनुभव वाचण्यात आला. स्वतः अनुभव घेतलेला शेतकरी जेव्हा इतके परखड पणे लिहतो तेव्हा त्याला खोडायला हवं किंवा तो बोलतोय ते कसे चूक आहे हे सिद्ध करायला हवं. दिघे यांच्याशी माझं फोनवरही बोलणं झालं आणि त्यांनी मांडलेले मुद्दे पटण्याजोगे आहेत. तुमच्याच मुशीत शिकलेले दिघे सारखे तरुण जेव्हा असे तुमचे तंत्र वापरून शेती करणे तोट्यात येते म्हणतात आणि ते वापरणे बंद करतात तेव्हा आपण यावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. पुस्तक, CD, DVD विकून शेती होत नसते हे आता तरी समजून घ्या. आपल्या विरोधात एखाद्या व्यक्तीने जरी पाऊल उचलले तरी आपण लगेच त्याच्यावर हातभार लांबडा मेसेज सोशल मीडियावर लिहता आणि आपली भक्त मंडळी तोच प्रमाण मानून त्यावर चिकित्सा न करता प्रचार करतात. लातूरचे श्रीपाद कुलकर्णी यांच्या बाबतीतील आपल्या मेसेज मध्ये सरळ सरळ आपला "मी"पणा दिसून आला.

आजच पंढरपूरचे भरत रानरुई या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याने स्वतःची 2 ऑडिओ क्लिप प्रसारित केल्या आहेत त्या ऐकल्या. एकेकाळी संपादक असताना आपण सेंद्रिय शेतीचा प्रचार करत होतात आणि कालांतराने आज सेंद्रिय शेतीच विषयुक्त शेती वाटू लागली याचा अर्थ पैशाच्या लोभापायी स्वतःच्या तत्वाला आपण तिलांजली दिली असाच होईल. रानरुई यांनी तर आपल्याला 20 वर्षांपूर्वी पुस्तक लिहिण्यास 10 हजारांची मदत केली होती अस ते म्हणतात. आपण सगळ्या लोकांकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्यात मोडतोड करून स्वतःच्या नावावर खपवण्याचा अघोरी धंदाच केला असे म्हणावे लागेल. आपल्याकडून आदरणीय सावे गुरुजींच्या बाबतीत देखील हेच झालं.

तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे चळवळीतील सर्व जुने जाणते कार्यकर्ते तुमच्या चळवळी पासून का दुरावले आहेत? स्पष्ट कोणी बोलत नसेल तरी प्रत्येकाच्या मनात खदखद आहेच. याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. झिरो बजेट म्हणजे शहरी लोकांना मार्केटिंग करण्याचा अड्डा बनला आहे परंतु यात पारदर्शकता किती हा संशोधनाचा विषय आहे. मार्केटिंग करणारे अनुयायी आज लखपती झालेत पण झिरो बजेट करणारा शेतकरी काही लखपती झाला नाही तो शून्यातच आहे.

आम्ही काय म्हणतो चला एक अभ्यास करू जवळपास ४० लाख अनुयायी (शिबीरार्थीं) असलेल्या या गुरुजींच्या परिवारात महाराष्ट्राची प्रमुख पिके घेणारे १०-२० आदर्श शेतकरी तुम्ही दाखवा, त्यांचे शेतीतील प्रत्यक्ष खर्च आणि उत्पन्न आणि एकात्मिक शेती करणारे शेतकरी यांचे खर्च आणि उत्पन्न यांची तुलना करू. आणि बातमी, जाहिरात, भक्तांकरवी प्रचार न करता थेट हिशोब मांडून दाखवू जगाला कि कोणते तंत्र अधिक फायद्याचे आहे. आम्ही एकात्मिक शेती करण्याऱ्या उत्तम शेतकऱ्यांची नावे तयार ठेवत आहोत तुम्ही सुभाष पाळेकर तंत्राचे (ZBNF) १००% अवलंब करून नफा कमावणारे शेतकरी सुचवा. आह्माला विश्वास आहे झिरो बजेट यात हरणार.

वाईट याचं वाटतं कि असे गणित न तपासता, असे अहवाल तुलना न करता फक्त प्रसिद्धीतल्या बातम्या आणि हा म्हणाला,तो म्हणाला म्हणजे खरं असेल यावर अनेकजण विश्वास ठेवत आहेत. प्रत्यक्षपणे कुणी चेकच करत नाही, इथपर्यंत कि शासकीय धोरणात याचा स्वीकार करताना याची चिकित्सा होऊ नये हे दुर्दैवी वाटते. यातून प्रश्न सुटणार आहेत कि बिकट होणार आहेत हे कृपया प्रत्यक्षात तपासा. विद्यापीठांना, संशोधकांना विनंती आहे आपण याबद्दल उघडपणे कधी बोलणार आहात? का बेडकासारखे सध्या आहात त्यालाच आपण विश्व मानणार आहात?

गुरुजी तुमचे तंत्र वापरणारा शेतकरी २ वर्षात आहे तेवढं संपवून परत जुन्या मार्गावर येतो याची कितीतरी उदाहरणे आपणास पहावयास मिळतील. विषमुक्त अन्न पिकवायला नैसर्गिक,सेंद्रिय, झिरोबजेट तंत्रज्ञानच लागते हे डोक्यातून काढून टका. जगाच्या पाठीवर विषमुक्त अन्न कसे पिकवल जातं याचा थोडा अभ्यास करायची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या पुढची संकटे दिवसेंदिवस अधिक आक्राळ विक्राळ होत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी आणि शेतीक्षेत्र टिकवणं आव्हानात्मक असणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. फक्त मी-माझं करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम केलं तर भविष्यातील चित्र वेगळं असेल. पाळेकर गुरुजी वयक्तिक हेवेदावे टाळा, मीपणा सोडा. तंत्रज्ञानाचा प्रसार जरूर करा पण कोणाच्या माथी मारण्याचा उद्योग करू नका कारण आता शेतकरी लुटण्याच्या स्थितीत अजिबात राहिला नाही.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
आष्टा(सांगली) दि.27/3/2019
8275391731

टीप- नाव कट न करता आहे तसा लेख फॉरवर्ड करा. लेखात मोबाईल नंबर असणे अति आवश्यक आहे त्यामुळे इतर शेतकरी संपर्क साधू शकतात.

पाळेकर बुवा ज्यांच्या मुळे प्रसिद्ध पावले ते श्री आर.एच.पाटील regional joint director agriculture हे चार जिल्ह्यांचे वरिष्ठ कृषि अधिकारी होते. अति हेकट माणूस. या मानसाने संपूर्ण यंत्रणेला कामाला लावून यांची शिबिरे भरवली.
पाळेकर सुरुवातीला कृषि विद्यापीठांना नावे ठेवणे व स्वत:ला शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून project करणे हीच कामे करत होते. स्वत:ची पुस्तके विकणं हाही छुपा अजेंडा होता.
चार चार दिवस फक्त झुलवत ठेवायचे पदरात काहीच पाडत नव्हते.
यांच्या पद्धतीने एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न पुरवठा होऊ शकणार नाही. शेतीतील मुख्य समस्या कीड व रोग नियंत्रण. पाळेकर तंत्र थोड्या क्षेत्रावर अवलंबणे ठिक. पण शेतमालाला फार कमी भाव असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक शेती करावी लागते.
पेट्रोल व सोनं जसं महाग होते त्या प्रमाणात अन्नधान्याच्या किमती वाढल्या पाहिजेत. धान्याची किंमत शंभर रुपये प्रति किलो झाली , भाजीपाल्याची दिडशे रुपये किंमत झाली तर कुठे सेंद्रिय शेती परवडेल.

<<< टीप- नाव कट न करता आहे तसा लेख फॉरवर्ड करा. लेखात मोबाईल नंबर असणे अति आवश्यक आहे त्यामुळे इतर शेतकरी संपर्क साधू शकतात. >>>

माझा कुत्रा या भांडणात नाही. (I have no dog in a fight.)
हा लेख फॉरवर्ड करत असाल तर ZBNF च्या साईटवर ही यादी आहे, ती पण फॉरवर्ड करा म्हणजे कुणालाही अजून माहिती हवी असेल तर दोन्ही बाजू ऐकून मग स्वतः निर्णय घेता येईल.

शेतीत intensive farming प्रकार आहे . यादीतील बरेच शेतकरी कर्नाटकातील आहेत. तिकडे जिरायती शेती जास्त आहे. सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष, डाळिंब यासारखी पिके zbnf पध्दतीने पिकवणे अवघड आहे.

१) नार्थ इस्टची उन न येणारी जागा - काहीही येत नाही. कितीही खते घातली तरी अगदी दोन तास उन्हाची सर भरून येत नाही. एक फिल्म पाहिल्याचे आठवतय. उत्तर गोलार्धातले गाव. सूर्य फार तिरका येतो. गावाबाहेरच्या टेकडीवर एक मोठा रिफ्लेक्टर बसवून प्रकाश गावाकडे वाढवला.
२) गोमुत्र मिळण्याची मारामार. ट्रॅक्टर मुतत नाही.

" कोणतेही तत्त्वज्ञान सदासर्वकाळ १००% उपयुक्त नसते."
अगदी सहमत. तंत्रज्ञानच का , इतर सर्व शिक्षणही प्रत्येक पिढीमागे बदलते, बदलायला हवे. मात्र बदल हे फॅड बनू नये. फॅड हे फॅशन सारखे अनुकरण असते. पीअर प्रेशर किंवा वन अपमनशिप दाखवण्याची भावनिक निकड या मागे असू शकते. हा एक प्रकारचा प्रवाहपतितपणा असतो. या उलट अनेकांगी संशोधन, वापरसुलभता, नफातोटा, दीर्घकालीन परिणाम , स्थळकाळ यांचा विचार करून मिळालेल्या निष्कर्षातून झालेला बदल हा लाटेसारखा नसतो. उपयोगित्व संपेपर्यंत तो टिकतो.
पाळेकरांचे संशोधन हे मूलभूत नसून ते अल्पजीवी आहे असे माझे मत झाले आहे.

पेट्रोल व सोनं जसं महाग होते त्या प्रमाणात अन्नधान्याच्या किमती वाढल्या पाहिजेत. धान्याची किंमत शंभर रुपये प्रति किलो झाली , भाजीपाल्याची दिडशे रुपये किंमत झाली तर कुठे सेंद्रिय शेती परवडेल.
>>>
हे खरे बोललात

मी पाळेकर पद्धतीने शेती केलेली नाही, फार सखोल अभ्यास केलेला नाही. जे थोडेफार ऐकले-वाचले आहे त्यावरून माझा आत्ता तरी निष्कर्श असा आहे की ही शेती कमी क्षेत्रात, भाजीपाला (माळवं) कमी प्रमाणात वगैरे घेणार्‍यांसाठी उपयुक्त आहे. वर हेलांनी दिलेल्या लेखाशी सहमत. माझ्या पाहण्यातले झिरो बजेट शेतकरी नोकरी करून, एफडी ठेवून सध्या शेती करत आहो या कॅटेगरीतले आहेत.

शेती एक व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणून करावा. साधं जीव आणि रसायन शास्त्र आहे. संकरित चा बागुलबुवा वेडेपणा आहे. चव हवी म्हणून वेगळ्या जातीचे गावरान पीक. पौष्टीक वगैरे सगळंच असतं.
रासायनिक खते आणि कीटकनाशके याना पूर्णपणे बंद करणे शक्य नाही पण नियोजनाने गरज कमी केली जाऊ शकते. बाकी सरकार भोंदू लोकांवर पैसे खर्च करत असेल तर चुकीचे आहे. कृषी विद्यापीठाच्या लोकांवर लक्ष ठेवून ते काय करत आहे ते पाहणे जास्त फायद्याचे ठरेल.

आवर्जून धागा वाचून प्रतिसाद देणाऱ्या सगळ्या प्रतिसादकांचे आभार.

वरच्या फॉरवर्डमध्ये उल्लेखलेल्या व्यसक्तीबद्दल चर्चा मी ज्या spnf ग्रुपवर आहे तिथे चर्चिला गेला, ज्याने ती चर्चा सुरू केली तो स्वतः अयशस्वी spnf शेतकरी आहे म्हणून सांगत होता. त्याचे प्रश्न व शंका मला जेनुईन वाटल्या, त्या प्रश्नांची कुणीही कार्यकर्ते उत्तरे देत नाहियेत म्हणून मी अस्वस्थ झाले व शेवटी एका कार्यकर्त्याला फोन करून विचारले. तेव्हा कळले की जो स्वतःला शेतकरी म्हणवत प्रश्न मांडत होता तो पूर्णवेळ शेतकरी नसून संडे फार्मर होता. त्याला स्वतः गुरुजींनी मार्गदर्शन केले होते व तो नीट लक्ष देऊन शेती करत नाही म्हणून झापले होते. धरसोड वृत्तीने शेती करणे spnf मध्ये अपेक्षित नाही.

कुठलीही शेती सोपी नाही. रासायनिक शेतीमूळे जमिन पंगू झालेली आहे, त्या जमिनीत बाह्य टॉनिक म्हणजे खते टाकली नाहीत तर खाण्यालायक काहीही उगवून येणार नाही.

अशा जमिनीत तुम्ही एकदा जीवामृत टाकले आणि आता भरपूर पीक येईल ही अपेक्षा ठेवली तर निराशाच होणार.

Spnf शेतीचे चार स्तंभ आहेत : बीजामृत, जीवामृत, आच्छादन व वाफसा. यातले एक जरी नसले किंवा कमी पडले तरी अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. आणि हे चारही तुमच्या शेतीत अस्तित्वात असावे यासाठी गरज आहे शेती spnf प्रणालीकडे नेण्याच्या प्रयत्नात सातत्य राखण्याची.

वर्षानुवर्षे पडीक असलेली किंवा रासायनिक शेतीखाली असलेली जमीन नैसर्गिक शेतीसाठी एका वर्षात तयार होईल ही अपेक्षा चूक आहे. गुरुजी म्हणतात आधी जमीन पैलवान करा, त्यातून आपोआप पैलवान पिके येतील. गुरुजींनी दिलेले वेळापत्रक व लिहिलेल्या सूचना जशाच्या तशा पाळल्या तर जमीन सहा महिन्यातसुद्धा पैलवान करणे शक्य आहे पण गुरुजींचे वेळापत्रक पाळणे कित्येकांना शक्य होत नाही. प्रत्यक्ष शेतावर मनुष्यबळ, पाणी, देशी गाय वगैरे आवश्यक घटकांची अनुपलब्धता वगैरे कुठलेही संकट उद्भवू शकते. मनुष्याचा आळस हेही एक मोठे संकट आहे. प्रत्यक्ष शेतावर 24 तास हजर असलेला शेतकरी एकवेळ वेळापत्रकानुसार काम करेल पण शहरात नोकरी सांभाळून वेळ मिळेल तशी शेती करणार्यांना हे वेळापत्रक कितपत पाळता येणार? आणि असे अर्धवट प्रयत्न करून स्वतःचे अपयश spnf व गुरुजींच्या माथी मारून काय साध्य होणार? गुरुजींचे काहीही नुकसान नाही, ते तुमच्या शेतीतील spnf रॉयल्टी मागत नाहीयेत. फायदा झाला तर तुमचाच आहे.

गुरुजींचे तंत्र गेली काही वर्षे वापरून यशस्वी शेती करणारे शेतकरी spnf कडे वळू इच्छिणाऱ्या नव्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेतीकडे वळायचा सल्ला देतात. एकदम पूर्ण शेत spnf प्रणालीखाली आणण्याऐवजी थोडी थोडी जमीन spnf खाली आणा. ज्यांचे पोट शेतीवर अवलंबून आहे त्यांनी नवे तंत्र छोट्या तुकड्यावर आत्मसात करून त्यात यश आले की मग त्याचा मोठ्या तुकड्यावर वापर करा हाच सल्ला ते देतात.

जे एफडी ठेऊन शेती करताहेत ते कसलीही रिस्क घेऊ शकतात. त्यांनी खुशाल पूर्ण शेती spnf खाली आणावी, अर्थात शहरात राहून नव्हे तर जिथे शेत आहे तिथे राहून.

वर मी विकेंड फार्मर बद्दल लिहिले आहे. एका कार्यकर्त्याने वरील फॉरवर्डच्या संदर्भात एक किस्सा मला सांगितला. गुरुजींच्या शिबिराला आलेल्या एका जोडप्याच्या तो संपर्कात होता. त्या जोडप्याची मुंबईनजीक पडीक शेतजमीन होती व खिशात पैसा मुबलक होता. शिबिर झाल्यावर त्यांनी उत्साहाने spnf प्रणालीने शेत कसायचे ठरवले. देशी गायीची सोय झाली, शेतावर कायमस्वरूपी गडी जोडपे ठेवले, जिवामृताला आवश्यक बेसन, गुळ वगैरेचा स्टॉक केला. आणि सुरवात केली. सहा सात महिन्यांनी त्यांनी कार्यकर्त्याला फोन केला. म्हणाले सगळे वेळापत्रक नीट पाळतोय पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. कार्यकर्त्याने विचारल्यावर म्हणाले आम्ही नियमित महिन्यात एका वीकेंडला शेतात जातो, गड्याला आधी कळवतो, तो सगळी तयारी व व्यवस्था बघतो. आता एकदा न कळवता मध्येच जा व बघा असे कार्यकर्त्याने सांगितले. 15 दिवसांनी परत फोन. एका सकाळी अकस्मात शेतावर गेले तर जिवामृतासाठी दिलेल्या बेसनाची भजी तळताना गडी सापडला. गुळ पण असेच वापरात आणले जात होते, ना शेण गोळा करून ठेवले होते, ना गोमूत्र. जिवामृताच्या नावाखाली गडी मालक यायच्या दिवशी शेणाचे पाणी तयार ठेवायचा. कसे मिळणार अपेक्षित परिणाम?

तात्पर्य हेच की तुम्हाला spnf च काय, कुठल्याही प्रकारच्या शेतीतून फायदा करून घायचा असेल तर तुम्ही 24 तास शेतकरी असायला हवे. पिकांच्या वाढीच्या अवस्था माहीत असायला हव्या, रोगांची लक्षणे ओळखता यायला हवी.

Spnf मध्ये तर हे अजून जास्त महत्वाचे ठरते. पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थांच्या वेळी वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागतात. आणि ज्यांच्या फवारण्या करायच्या ते सप्तधान्यांकुरअर्क, आंबट ताक वगैरे आधी तयार करून ठेवावे लागते. रोग पडतोय अशी शंका आली की निमास्त्र, दशपर्णी अर्क वगैरे फवारायचे असते तेही आधी करून ठेवावे लागते.

कीटकनाशके बाजारातुन हवी तेव्हा आणून फवारता येतात. Spnf मध्ये सगळे आपले आपण बनवायचे व वापरायचे. म्हणून गुरुजी सांगतात की शेतात सतत पिकावर लक्ष ठेवा. किडी, कीटक ओळखायला शिका, कारण सगळेच कीटक पिकांचे शत्रू नसतात. किडींचे हल्ले ओळखायला शिका, रोगांची सुरवात ओळखायला शिका. तुमची वेगवेगळी अस्त्रे तयार असायला हवीत किडी, कीटक, रोगांचा नाश करायला. आणि हे वेळीच केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाणार.

हे वाटते तितके सोपे नाही. आणि विकेंड शेतकऱ्याला हे शक्य नाही. कारण तो शेती गडी-नोकरांवर अवलंबून राहून करत असतो. गडी-नोकर कितपत रस घेऊन हे करणार?

म्हणून गुरुजी म्हणतात की विकेंड शेतकरी spnf चे मारेकरी आहेत.

Spnf पद्धतीने जी शेती केली जाते त्या शेतांवर जवळ जवळ दर महिन्याला शिवारफेऱ्या आयोजित केल्या जातात. शेती करू इच्छिणाऱ्या नव्या शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो.

एप्रिल 27-28 ला सोलापूर भागात एक शिवारफेरी आयोजित केली आहे. शनिवारी 2 शेतांना भेटी द्यायच्या आहेत, रविवार पूर्ण दिवस एक शेत पहायचे आहे. बहुतेक शिवारफेऱ्यांना गुरुजी स्वतःही हजर राहून मार्गदर्शन करतात. यामुळे ज्याचे शेत आहे त्याला तो जे करतोय ते गुरुजींच्या नजरेखालून घालून घ्यायची संधी मिळते व इच्छुकांना spnf शेती कशी होते, कशी दिसते याचे जिवंत प्रात्यक्षिक घडते.

खालील माहिती माझ्यापर्यंत हिंदीत पोचली. मी ती परत मराठीत लिहायचा कंटाळा केला. Happy

खाली प्रत्येक शेतकऱ्याचा फोन नंबर आहे. वर ज्यांना वेगवेगळ्या शंका पडलेल्या आहेत त्यांनी या फोन नंबरवर फोन करून शंका निरसन करून घ्यावे. हे शेतकरी किती वर्षे spnf करताहेत, किती एकर जमिनीवर करताहेत, सुरवात कशी केली वगैरे सर्व प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.

मी या शिवारफेरीला जातेय, ज्यांना यायचंय त्यांचे स्वागत आहे.

पद्मश्री डाॅ.सुभाष पालेकर गुरुजीके सान्निध्यमे उनके साथ दो दिनकी सर्वोत्तम प्राकृतिक खेती दर्शन यात्रा.........

सुभाष पालेकर प्राकृतिक कृषीसे आठ फीटपर लिया गन्ना फसल साथमे उसमे टरबुज खरबुज खीरा टमाटर गेंदा पालक मेथी धनिया प्याज जैसी दस प्रकारकी सहफसले,और साथमे दुसरी फसल गन्ना कटनेकेबाद उसका बीना नया गन्ना लगाये आगे सौ सालतक वही पॅन्डी ratoon बहुवार्षिक गन्नेमे रुपांतरण और उसमेभी आच्छादन mulching को छेद करके उन छेदोंमे सब्जीयोंकी और टरबुज खरबुज ककडी टमाटर हरी सब्जियोंकी अनेक मोसमी सहफसले आप सामने देखेंगे...

प्राकृतिक गन्नेसे प्राकृतिक गूड बनानेका परिवारके तीन सदस्यके हाथो चलनेवाला सिर्फ एक लाख पचास हजार रुपये लागतपर खडा छोटासा पारीवारिक कारखाना देखोगे और कैसे खडा करना है यहभी समझोगे....गूड बनानेकी विधी आपके सामने दिखायी जायेगी... जीवामृत बनानेकेलिये और घरमे खानेकेलिये आवश्यक प्राकृतिक गूड घरमे कैसे निर्माण करे ईसकी वीधीभी सामने दिखायी और बताई जायेगी....

साथमे प्राकृतिक तेल्या रोगमुक्त अनारकी रोगमुक्त प्रति अनार पेड 100 से 200 सुंदर निर्यातक्षम फलोसे लदी हुई बहोतही सुंदर फसल और उसमे सहफसले जैसे फल्लीयोंसे लदा सहजन drumstick, पपीता, बैंगन मिर्च लोबीया साक्षात खडी देखेंगे...

ता.27 और 28 एप्रील 2019 चवथा शनिचर और रविवार दोनो दिन छुट्टी

सुबह 9.00 से शाम 7.00 तक...

महाराष्ट्रके सोलापूर जिल्हेके माढा तालुकामे टेंभुर्णी शहरके ईर्दगिर्द......

खुद श्री.पालेकर गुरुजी आपको मराठीसे सिधा हिंदी और अंग्रेजीमे भाषांतर करके बतायेंगे । भाषाकी समस्या नही आयेगी।

प्रवेश निःशूल्क, दोनो दिनका सुबहका नाश्ता दोपहर और रातका भोजन और निवासकी साधारण व्यवस्था माॅडेल किसान और बेंबळे ग्रामवासी आपको निःशूल्क उपलब्ध कर रहे है, आपको पैसे देना नही है! सिर्फ दो दिन वाहनमे घुमनेका दो दिनका शूल्क किराया प्रति व्यक्ती 300 रु. देना पडेगा । अगर कोई अपना खुदका या किरायाका वाहन लेकर आता है तब उनको वाहन शुल्क देना नही पडेगा ।

संपर्क करे...श्री.समाधान सलगर पाटील 9730111501, श्री.विलास भोंसले पाटील 9763002071, श्री.धनंजय पाटील 9975085932

आपको ता.27 एप्रील 2019 को सुबह 8.00 बजेतक रोटरी हाॅल, सरकारी विश्रामगृहकेपास, टेंभूर्णी शहर ,ता.माढा जिं सोलापूर महाराष्ट्र पहुंचना है ।यह टेंभुर्णी शहर पुणे..सोलापूर ..हैदराबाद हायवेपर खडा है ।

टेंभुर्णी शहर ईस हाय वे पर पुणेसे 160 किमी, सोलापुरसे 85 किमी., पंढरपूरसे 45 किमी अंतरपर है । रेल्वेसे आनेकेलिये मुंबई..पुणे...से आगे सोलापुर हैदराबाद बंगलोर रेल्वे मार्गपर कुर्डुवाडी जंक्शनपर उतरना पडता है, कुर्डुवाडीसे टेंभूर्णी सिर्फ 25 किमी पर है, आनेकेलिये निरंतर बसेस और रिक्शा चलती है ।

अगर किसीको टेंभूर्णीमे खुदके खर्चेपर लाॅजमे रहना है तब रह सकते है ! सत्कार लाॅज मो.नं.9881261555, जगदंबा लाॅज 7774057368, साई लाॅज 9975056655 ईन नंबरपर संपर्क करे । ईन तीनो लाॅजमे एसी रुम दो बेड प्रतिदिन 600 से 800 रु.किराया और अतिरिक्त बेडका प्रति बेड प्रति दिन 150 रु. होगा । जीनको लाॅज सुविधा चाहिये उन्होने अपना शूल्क पहले भेजना है या खुद रुम आॅनलाईन बुक करना है ।

राजस्थान गुजरातसे आनेवाले पहले मुंबई यां पुणे पहुंचना है और बादमे बस ट्रेनसे टेंभुर्णी या कुर्डुवाडी आना है । उत्तर भारत और मध्य भारतसे आनेवाले खंडवा मनमाड शिर्डी अहमदनगर होकर आ सकते है । दक्षिणी भारतसे आनेवाले बंगलोर ..धारवाड..बीजापूर... सोलापूर करते हुये आ सकते है यां हैदराबाद सोलापूर होते हुये आ सकते है

आगे पढनेकेलिये Read more पर दबाके स्पर्ष करे..

ता.27 एप्रील 2019 सुबह 9 बजे..
श्री.विनोद केलकर ग्राम डाक नीमगांव टेंभूर्णी, ता.माढा, जि.सोलापूर 9421040561, 9527820581

आठ फूटपर लगाया प्राकृतिक गन्ना कटनेकेबाद उसका पॅन्डी रटून लिया उसमे हर आठ फूटके पट्टेमे डाले हुये सुखे पत्तोंके आच्छादनमे छेद डालकर उन छेदोमे लियी सब्जीयाॅ टरबूज खरबूज टमाटर जैसी विविध सहफसले.. यह सब देखेंगे और एक बार गन्ना लेनेकेबाद दोबारा गन्ना लगानाही नही है, सौ सालतक वही गन्नेकी पॅन्डी लॅन्डी सॅन्डी फसल कैसे ले यह देखेंगे, सिखेंगे....20 देशी गौ पालन गोशाला गोमूत्र संकलनभी देखेंगे ।

उसी दिन दोपहर 2 बजे....
श्री.सोमनाथ मनोहर डोके ग्राम डाक कन्हेरगाव ता.माढा जि.सोलापूर 9049932848, 7507706923
प्राकृतिक गन्ना और उससे गूड बनानेका छोटासा परिवारके तीन सदस्योंके हाथो चलनेवाला सिर्फ एक लाख पचास हजार रुपयेके लागतपर खडा किया श्री.डोकेजीका छोटासा पारिवारिक खुदका कारखाना देखेंगे और उसे कैसे खडा करना है यहभी बताया जायेगा । ईस कारखानेमे प्राकृतिक गन्नेसे प्राकृतिक पौष्टीक औषधी गूड बनानेकी विधी आप खुद अपने आंखोसे लगातार चार घंटेतक देखोगे और समझेंगे और लीखकर लेंगे । श्री.सोमनाथ डोकेजी यह प्राकृतिक गूड प्रति किलो 100 रुपये दामोसे बेचते है, बहोत बडी मांग है । एक टन गन्नेसे 140 किलो गूड मिलता है और वह गूड बेंचकर एक टन गन्नेके 12000 से 14000 रुपये मिलते है । प्राकृतिक गन्नेकी रसवंती खडी करके गन्नेका रस बेंचकर एक एकड गन्नेसे बारा लाख रुपये आमदनी कैसे मिल सकती है यह गणितभी आपको श्री.पालेकर गुरुजी बतायेंगे,ताकि बुढे मांबापको गाॅवमे अकेले छोडकर युवा बच्चे गांव छोडकर शहर न भागे , खुदका गूडका या रसवंतीका छोटासा उद्योग खडा करके सन्मानसे जिये !

श्री.सोमनाथजीका नया गन्ना छे फूट अंतरालपर लिया हुआ जीसमे आप प्याज चना गेहु अलसी मूंगफल्ली गवार भिंडी सहफसलेभी खडी देखेंगे ।

ता.28 एप्रील 2019 सुबह 9 से शाम 5 बजेतक....,
श्री.समाधान पाटील सलगर , ग्राम डाक बेंबले ता.माढा जि.सोलापूर
9730111501

सुभाष पालेकर प्राकृतिक कृषी तकनिकसे लियी खडी प्राकृतिक अनारकी फसल एक एकड 12 बाय 8 फूट अंतरालपर लियी पांच सालकी फसल, तेल्या रोगमुक्त bacterial blight disease free फसल,प्रति पेड 100 से 200 रोगमुक्त सुंदर निर्यातक्षम फलोंसे लदी अनारकी फसल जिसमे आप सहफसलोंके रुपमे पपीता ( फूल लगे है)+ सहजन फल्लीयोंसे लदा + बैंगन + मिर्च + चंदन + लोबीया आपके सामने खडी देखेंगे..... और उसको खडी करनेकेलिये क्यां किया यह श्री.समाधान पाटीलजी आपको विस्तारसे बतायेंगे ।

साथमे उनकी गन्नेकी नई फसल 8 x 2 , 8 x 4, 6 x 2 फूट अंतरालपर लियी हुई जिसमे विविध सहफसले जैसे देशी ज्वार + मका + देशी खपली खीर बनानेका गेहूॅ + चना+ बैंगन + मिर्च + गवार + भिंडी + टींडा + टमाटर + ककडी + राजमाश + लहसून +चवळी + प्याज +मेथी + पालक +धनिया +शेपु आप खडी देखेंगे ।

श्री.समाधान पाटीलजीका खडा प्राकृतिक गन्ना कटनेकेबाद उसमे पांच फीटके एक पट्टेको छोडकर एक पट्टेमे ( गन्नेके दो कतारोंके बीचके खाली जगहको पट्टा कहते है ) गन्नेके पडे सुखे पत्तोंका आच्छादन माने बीछावन mulching करके उस आच्छादनमे छेद करके एक कतारमे उन छेदोंमे बीज डालकर या पौधे लगाकर निकली बढ रही और आच्ठादनपर फैली टरबुज Watermelon खरबुज चना की सहफसले और खाली पट्टोंमे लिये हुई प्याज मेथी पालक धनिया मका लोबीया ये विविध सहफसले आप सामने खडी देखेंगे ।

एक बार गन्ना लगानेकेबाद दोबारा गन्ना लगानाही नही है ,खडे गन्नेकी फसलकोही आप लगातार सौ सालतक पंन्डीके रटुनके रूपमे कैसे ले सकते हे और उनमे हरसाल हर मोसममे विविध मोसमी सहफसले कैसे ले सकते है यह विधी श्री.सुभाष पालेकर गुरुजी आपको आपकी भाषामे बतायेंगे ।

साथमे हमारे प्राकृतिक गन्नेसे जीवामृत निर्मितीकेलिये और घरमे खानेकेलिये आवश्यक प्राकृतिक पोषक औषधी गूड अपने घरमेही घरबैठे अपने घरके चुल्हेपर कैसे निर्माण करे ईसकी बहोतही सरल विधी आपको बताई जायेगी और आप उसे लिखेंगे ।

श्री.समाधान पाटीलजीकी गोशालामे महाराष्ट्रकी विख्यात देशी गायकी नसल खिल्लार दस गाय आप देखेंगे।

श्री.सुभाष पालेकर गुरुजी आपको जीवामृत घनजीवामृत बीजामृत कैसे निर्माण करे और उनका उपयोग कैसे करे यह जानकारी देंगे, साथमे विविध प्राकृतिक दवाएॅ घरमे कैसे निर्माण करे और उनका छिडकाॅव कैसे और कब करे यह जानकारी भी देंगे । यह सब जानकारी आपको लिखना है। ईसलिये आतेवक्त साथमे पॅड बही पेन और ओढनेकेलिये ब्लॅन्केट या शाॅल लानाही है, भुलना नही।

संपर्क करे.,श्री.समाधान सलगर पाटील 9730111501, श्री.विलास भोंसले पाटील 9763002071, , श्री.धनंजय पाटील 9975085932, श्री. मोहन भोंसले पाटील 9511951819, श्री.विश्वासराव लोंढे 9834512989, श्री. उमेश मिस्कीन 9860805350, श्री.शरद शिंदे 9028598955, श्री.विनोद केलकर 9421040561, श्री.सोमनाथ डोके 9049932848, श्री.अमोल पालेकर 9881646930, श्री,अमित पालेकर 9673162240

ग्राम बेंबलाके समस्त श्री.विठ्ठलभक्त वारकरी संप्रदायी ग्रामस्थ आपके यात्रा दिंडीका सहर्ष स्वागत करनेकेलिये आपकी प्रतिक्षामे है ।

बाकीचं वाचतो नन्तर, हे महाशय डॉक्टर कशाचे आहेत, कोणती डॉक्टरेट केली ह्यांनी? Zbnf चे spnf होण्याचे कारण काय?>>>>>

वरच्या प्रतिसादात गुरुजींच्या दोन्ही मुलांचे फोन नंबर दिले आहेत. त्यावर फोन करून व्यक्तिगत माहिती विचारता येईल.

SPNF का: यावेळच्या शिबिरात गुरुजींनी याचे उत्तर दिले होते. माझे फारसे लक्ष नव्हते तरी जेवढे कानावर पडले ते असे की हल्ली गुरुजींचे तंत्रज्ञान तर लोक वापरतात पण त्याला zbnf म्हणणे त्यांच्या जीवावर येते, म्हणून ते स्वतःला वाटेल ती नावे देऊन तंत्रज्ञान वापरतात व पैसे कमवायला बघतात. त्यांचे उत्पादन चांगले नसेल तर उगीच सरसकट लोकांचे या प्रकारच्या शेतीबद्दल वाईट मत बनते.
SPNF हा ब्रँड जर तयार झाला तर त्याचा वापर करून SPNF उत्पादक शेतकरी त्या नावाखाली एकत्र येऊन स्वतःचे उत्पादन बाजारात योग्य भावाने विकू शकतील. काय प्रकारचे उत्पादन अपेक्षित आहे याचे स्टॅंडरडायझेशन होईल.

ZBNF चे SPNF करण्यामागे कारण हे की तांत्रिकदृष्ट्या ZBNF जरी शक्य असले तरी हे तंत्रज्ञान अजून लोकांनी इतकेही अंगिकारले नाही की ते पूर्ण झेरो बजेट व्हावे.

झेरो बजेट ची व्याख्या ही - मुख्य पिकात आंतरपिके घ्यायची. त्या आंतरपिकांच्या विक्रीतून त्यांचा खर्च जाऊन जो नफा उरेल त्या नफ्यातून मुख्य पिकाचा खर्च वळता करायचा. पूर्ण खर्च वळता झाला तर मुख्य पीक झेरो बजेटमध्ये तुम्हाला मिळते. आंतरपिकांचे नियोजन नीट केले तर पुरेसा नफा कमावता येतो.

पण आपल्याकडे शेतमालाला काय भाव मिळावा हे शेतकार्याच्या हातात नाही. उलट पीक चांगले आले तर भाव पूर्ण पडतो. या वर्षी कांद्याचे काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे. शेतकऱ्यांचा माल कितीही चांगला असला तरी अपेक्षित किंमत मिळत नाही. त्यामुळे अपेक्षित नफा मिळत नाही.

लोक सोशल मीडियावर शेतकाऱ्यांबद्दल कितीही अश्रू ढाळते झाले तरी बाजारात गेल्यावर 10 रु ला मेथी जुडी मिळत असेल तर 15 ला दोन दे, नाहीतर राहूदे हीच भूमिका घेतो.

(ऑरगॅनिक हे नाव वापरून दुप्पट किंमतीत उत्पादने विकली जातात, तो ऑरगॅनिक स्टॅम्पही खरा नसतो हे मी ऐकिवात आहे ही वेगळी माहिती. या पार्श्वभूमीवर SPNF हा एक समर्थ ब्रँड व्हावा व उत्पादकांना एक खात्रीची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत)

अहो, त्यांच्या मुलांचे फोन नंबर वरती आहेत. फोन करा व थेट गुरुजींशी बोला.

श्री.अमोल पालेकर 9881646930, श्री,अमित पालेकर 9673162240

फोन वर बोलून पत्ता घ्या. अमरावतीला राहतात. तिथेच शेतीही असेल आसपास. जाऊन बघून या. इथे आम्हालाही सांगा.

मला अमरावतीला जाणे सध्या शक्य नाही. मी सोलापूरला जातेय. तिथे या. गुरुजी तिथेही भेटतील. तिथे घ्या शंका समाधान करून.

माझ्या कडे मोठी गॅलरी आहे, पण direct sunlight येत नाही कारण North East facing आहे. काही लागवड करू शकते का?>>>>

भाजीपाला वगैरे येण्याची शक्यता खूप कमी आहे.

तुम्ही शोभेची झाडे अर्थात इनडोअर प्लांटस लावू शकता. खूप अशीही रोपे आहेत जी सावलीत चांगली वाढतात.

Screenshot_20190330-202954.png

Pages