निषादची लहानपणची 'नर्सरी र्हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)
माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.
एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."
किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू
तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू
पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू
पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू
(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! )
अमि, याच बाफवर दुसर्या
अमि,
याच बाफवर दुसर्या पानावर आहे.
एक डोके मुलाला दोन शिन्गे
एक डोके मुलाला
दोन शिन्गे गायीला
तिन तोन्डे दत्ताला
चार पाय बैलाला
पाच बोटे हाताला
सहा पाय मुन्गीला
सात घरे समईला
आठ काड्या छत्रीला
नऊ ..............
दहा तोन्डे रावणाला
धन्स मंजुडी
धन्स मंजुडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंपाने आणली कांदा भाकर गंगूने
चंपाने आणली कांदा भाकर
गंगूने आणली दही साखर
चटणी लोणचे कुंदाचे
भात पिठले शंकरचे
केळी आंबे सुभाषचे
श्रीखंड पुरी ..... ची
झाडाखाली पंगत बसली
अंगत पंगत छानच जमली.
हत्ति दादा हत्ति दादा केवधे
हत्ति दादा हत्ति दादा केवधे मोथे नाक ,,, आइ ने ओधुन केले,,, लम्बच लाम्बच लम्ब
.... हे महिति आहे का कुनाला?????
मला लहानपणी पाचवी सहावीत
मला लहानपणी पाचवी सहावीत असतांना , पुढील कविता फार फार आवडत असे. त्यामध्ये एक मुलगी शाळा शिकण्यासाठी शहरात गेलेली असते. तिच्या शाळेला सुट्या लागल्याने , ती परत घरी , आपल्या खेड्यात यावयास निघाली असते. त्यावेळी तीच्या मनात कोणकोणते विचार येतात , हे या कवितेत दिले आहे.
" सुशिलेच्या शाळेस सुटी झाली , मनी मुलगी ती फार फार धाली
म्हणे आता भेटेल मला आई , बाप , भाऊ , प्रिय ताई आणि माई !
माय माझी भेटेल मला जेंव्हा , आंसवांनी न्हाणील मला तेंव्हा ,
मुका बाबा घेतील कपोलाचा , हसून भाउ , घेईल गाल गुच्चा !
संपुर्ण कविता टाकण्यासाठी , डायरी शोधावी लागेल. पण , आहे, संपुर्ण कविता आहे. लवकरच टंकीन येथेच.
अशीच दुसरी एक कविता आहे. कोकणातून , आईपासून दूर एका शहरात , एक मुलगा शिक्षणासाठी आलेला असतो. तो फार आजारी असतो. मरणाशी त्याची झुंज सुरु असते.एक दयाळू डॉक्टर त्याचेवर ईलाज करीत असतात. पण त्यांच्याही उपचारास मर्यादा असतात. त्याला आईची खूप आठवण येत असते. तो म्हणतो....
" पोर खाटेवर मॄत्युच्याच दारा , कुणा गरिबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात , सेविकेचा आधार एक हात !
कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न , कुठे डोळे लावुन बसे खिन्न ,
ताप त्याने भरताच तडफडावे , जसे पांखराने ते फडफडावे ! "
अतिशय करुण स्थितीचे वर्णन आहे. आत्ता या क्षणाला सर्व कविता आठवत नाही. पण
संपुर्ण कविता टाकण्यासाठी , डायरी शोधावी लागेल. पण , आहे, संपुर्ण कविता आहे. लवकरच टंकीन येथेच.
मला लहानपणी पाचवी सहावीत
मला लहानपणी पाचवी सहावीत असतांना , पुढील कविता फार फार आवडत असे. त्यामध्ये एक मुलगी शाळा शिकण्यासाठी शहरात गेलेली असते. तिच्या शाळेला सुट्या लागल्याने , ती परत घरी , आपल्या खेड्यात यावयास निघाली असते. त्यावेळी तीच्या मनात कोणकोणते विचार येतात , हे या कवितेत दिले आहे.
" सुशिलेच्या शाळेस सुटी झाली , मनी मुलगी ती फार फार धाली
म्हणे आता भेटेल मला आई , बाप , भाऊ , प्रिय ताई आणि माई !
माय माझी भेटेल मला जेंव्हा , आंसवांनी न्हाणील मला तेंव्हा ,
मुका बाबा घेतील कपोलाचा , हसून भाउ , घेईल गाल गुच्चा !
संपुर्ण कविता टाकण्यासाठी , डायरी शोधावी लागेल. पण , आहे, संपुर्ण कविता आहे. लवकरच टंकीन येथेच.
अशीच दुसरी एक कविता आहे. कोकणातून , आईपासून दूर एका शहरात , एक मुलगा शिक्षणासाठी आलेला असतो. तो फार आजारी असतो. मरणाशी त्याची झुंज सुरु असते.एक दयाळू डॉक्टर त्याचेवर ईलाज करीत असतात. पण त्यांच्याही उपचारास मर्यादा असतात. त्याला आईची खूप आठवण येत असते. तो म्हणतो....
" पोर खाटेवर मॄत्युच्याच दारा , कुणा गरिबाचा तळमळे बिचारा
दूर आई राहिली कोकणात , सेविकेचा आधार एक हात !
कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न , कुठे डोळे लावुन बसे खिन्न ,
ताप त्याने भरताच तडफडावे , जसे पांखराने ते फडफडावे ! "
अतिशय करुण स्थितीचे वर्णन आहे. आत्ता या क्षणाला सर्व कविता आठवत नाही. पण
संपुर्ण कविता टाकण्यासाठी , डायरी शोधावी लागेल. पण , आहे, संपुर्ण कविता आहे. लवकरच टंकीन येथेच.
खालील पोस्ट 'पुण्यातले
खालील पोस्ट 'पुण्यातले पुणेकर' या बाफावरून इकडे हलवली आहे.
मेधा | 30 August, 2016 - 18:12
९,
चिका चिका बूम बूम https://www.amazon.com/Chicka-Boom-Board-Book/dp/1442450703/ref=sr_1_1?s...
ब्राउन बेअर ब्राउन बेअर https://www.amazon.com/Brown-Bear-What-You-See/dp/0805047905/ref=sr_1_1?...
गूड नाईट मून https://www.amazon.com/Goodnight-Moon-Margaret-Wise-Brown/dp/0694003611/...
रूढार्थाने कविता नसल्या तरी चालीत म्हणता / वाचता येणारी पुस्तकं आहेत. घरी इतक्यांदा वाचली गेलीत की आता मुलं मिडल स्कूल मधे असली तरी मला अजूनही तोंडपाठ आहेत. कधी ही गाडीत मुलं फार किरकिर करत असली की आम्ही गूड नाईट मून मोठ्याने म्हणत असू. दोन तीन ओळीत शांत होत असत .
मुंबईत क्रॉसवर्ड मधे सहज मिळतील.
आणखी एक " दख्खनच्या राणी , तू
आणखी एक
" दख्खनच्या राणी , तू नेतेस का मला ? पेशवाई पुणे , पाहायचे मला "
दुसरे
" माझ्या मामाची रंगीत गाडी हो , तिला खिलारी बैलांची जोडी हो ,
कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो "
तिसरे
" बाहुलीचं लगीन झोकात लागलं , नवरोबानं भांडण काढलं "
चवथे
" चुलीवरची खीर एकदा ,पुरीला म्हटली "
पाचवे
" कोकिळेच्या तान्हुल्याचं जाऊळ , काळ भोरसं ,
घरट्यामध्ये आज आहे , बाळाचं गं बारसं "
खुप छान...
खुप छान...
छान धागा! कुणाला खालील गाणे
छान धागा!
कुणाला खालील गाणे माहिती आहे का, लहानपणी खूप वेळा ऐकलेले आहे, मुली अभिनय करून म्हणायच्या. पहिल्या काही ओळी आठवतात. शब्द असे आहेत.
सोन्याची घागर बाई मोत्यांची चुंबळ
घागर घेऊनी निघाले पाण्याला
घागर बुडाली बाई चुंबळ तरंगे
मगर माशांनो द्या माझी घागर
आई माझी पार्वतीदेवी, पिता माझा शंकर.
मज खेळणी नको ती जादु नको नवी,
मज खेळणी नको ती
जादु नको नवी, जादु नको नवी
आई मला हवी हो आई मला हवी
रगडून अंग माझे घालील रोज न्हाऊ
शाळेत खावयाला देईल गोड खाऊ
रात्री कुशीत घेई मज रोज झोपवी
आई मला हवी हो आई मला हवी
खोड्या करुन येता मज रागवील खोटे
गालावरुन माझ्या फिरवील गोड बोटे
सांगे शुभंकरोती देवास आळवी
आई मल हवी हो आई मला हवी.
https://www.youtube.com/watch?v=qnwUejLwGvE
माझ्या गुरु म्हणजे ज्येष्ठ
माझ्या गुरु म्हणजे ज्येष्ठ संगीतकार श्री प्रभाकर पंडित यांच्या पत्नी अनुराधा पंडित यांनी मला हे गाणे दुरुस्त दिले .त्यांच्याकडे बडबडगीते,भजने यांचा खजिनाच आहे .त्या स्वतः बडबड गीते लिहितात आणि मुलांना शिकवतात.
सदर गाणे आधी धनुश्री ने पोस्ट केलेआहे. हे गाणे काकूंनी संग्रहातील फोटो काढून पाठवले.तसेच ते श्री शंकर वैद्य यांचे आहे हेही सांगितले. त्या माझ्या गुरु आहेत याचा फार अभिमान वाटतो k क कसा क कसा,कमरेवर हात विठोबा जसा.
छ कसा छ कसा, गुबऱ्या गालात हसतो जसा.
ळ कसा ळ कसा,पाटावर भटजी बसलाय जसा.
ऐ कसा ऐ कसा, बोलिंग टाकतोय बाळु जसा.
ई कडी ई कधी,डोक्यावर पदर घेतेय जशी.
ठ कसा ठ कसा,झाडाला पपनस लोंबतोय जसा.
ल कसा ल कसा ,फतकल मारून बसलाय जसा.
ह कसा ह कसा,कंबर झुलवित नाचतोय जसा.
ढ कसा ढ कसा,तुम्हीच सांगा न गुपचूप हसा.
-शंकर वैद्य
धन्यवाद सतेजा , मी किती वर्षे
धन्यवाद सतेजा , मी किती वर्षे शोधतेय ते गाणं, शंकर वैद्यांचं आहे ह्या माहिती साठी सुद्धा धन्यवाद.
>सदर गाणे आधी धनुश्री ने पोस्ट केलेआहे. >>>>>ते धनुडी आहे
एक कडवं मिसिंग आहे का? मला आठवतय
उ कशी उ कशी
चटणी वाटत बसलीये जशी
तुलाही धन्यवाद धनुडी,कारण
तुलाही धन्यवाद धनुडी,कारण तुझ्या पोस्ट मुळेच मी पण पोस्ट केले.मला मिळालेल्या गीतात 'उ कसा उ' नाही आहे.
उ कशी उ नाही आहे.आणि हे गाणे
उ कशी उ नाही आहे.आणि हे गाणे पंडित काकुंमुळे मिळाले.त्यांच्याकडे त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली याची प्रत आहे.
मस्त आहे हे गाणं. चपखल वर्णन
मस्त आहे हे गाणं. चपखल वर्णन आहे अक्षरांचं!
फुगेवाल्याचं गाणं
फुगेवाल्याचं गाणं
फुगेवाल्या फुगेवाल्या फुगलेत फुगे
जांभळे पिवळे आडवे उभे
बांधून का रे ठेवलेस गाल?
काय रे बाबा तुझी कमाल!
सोड ना त्यांना उडू दे वर,
फुगेवाल्या पैसे घे लवकर.
अजून एक माझ्या लहानपणी ची कविता
फुग्या फुग्या का फुगलासं?
का रे बाबा रुसलासं?
आई रागे भरली तुला,
कंटाळून तव पी पी ला
असाच जर तू फुगशीलं ,
फटकन फुटून जाशीलं,
बसून माझ्या पिशवीतं
चल रे जाउ बंदरातं!
जमतील कितीतरी बालगडी
नेतील तुजला मग कोणी
मिळेल पैसा मम पोटा
फेरी वाला मी छोटा
खूप छान धागा, एक बालगीत
खूप छान धागा, एक बालगीत शोधताना गुगलवर सापडला,
निवांत वाचेन
ये तांबू तू ये घरी झाली आता
ये तांबू तू ये घरी झाली आता सांज
हंबरते हे वासरु त्याला आधी पाज
हे गाणं कोणाला माहीत असेल तर कृपया सांगा । आमचे आजोबा म्हणायचे आम्ही लहान असताना।
आता ही एवढी एकच ओळ लक्षात आहे
हिरवा हिरवा पोपट तो, सांग
हिरवा हिरवा पोपट तो, सांग तुला का आवडतो
चोच तयाची लाल कशी, पिकलेली मिरचीच जशी
बारीक डोळे वाटोळे, कान तयाचे लपलेले
गळ्यात पट्टा बघ काळा, पंख हलवून करी चाळा
फडफड करितो पंखाची, वेळ जाहली खाण्याची
डाळ पेरू अन डाळिंब, काय देऊ तुला तरी सांग
पिऊन पाणी गोड बोलुनी, भजन करील बघ हा जेव्हा
वाजिव टाळ्या तू तेव्हा
उंदीरमामा बिळातूनि, हळूच बघती
उंदीरमामा बिळातूनि, हळूच बघती वाकोनी
शिंक्यावरती डबा दिसे, सभोवताली कोणी नसे
भूक लागली त्या भारी, उडी मारली डब्यावरी
धडामधुडूमधूम डबा पडे, घाबरगुंडी फार उडे
गोल गोल फिरून दमला भोवरा
गोल गोल फिरून दमला भोवरा
मनात म्हणाला थांबू का जरा
पण एका पायाने उभं कसं राहायचं
सारखं डोकं खालीच जायचं
अह्हा मस्त!!
अह्हा मस्त!!
ते 'फुटाणा - वाटाणा
ते 'फुटाणा - वाटाणा
शेंगदाणा, उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला तीळाचा दाणा '
आणि मग तीळगूळ कसा बनला त्याचे वर्णन येते.
बडबडगीत कोणाला येतं का? मी फार वाट पाहीली ते मला अभ्यासक्रमाला येण्याची पण मी त्या इयत्तेत गेले आणि पुस्तकच बदलले.
सामो ते बडबडगीत लहानपणी
सामो ते बडबडगीत लहानपणी कोणीतरी मला असं शिकवलेलं..
वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण
अर्रे मस्त जुइ धन्यवाद
अर्रे मस्त जुइ
धन्यवाद
सामो , हि घे, मी पण बरीच
सामो , हि घे, मी पण बरीच वर्षे शोधत होते .मग कायप्पावर मिळाली
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा
उडत चालले टणाटणा !
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण !
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर !
" तिळा , तिळा , कसली रे गडबड ? "
" थांबायला वेळ नाही .
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड !"
" ऐक तर जरा , पहा तर खरा ,
कणभर तिळाचा मणभर नखरा ! "
"बघा तरी थाट ! सोडा माझी वाट !"
" बघू या गंमत , करू या जंमत !
चला रे जाऊ याच्याबरोबर ."
तीळ चालला भराभर . वाटेत लागले ताईचे घर .
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात !
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
" घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत .
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा , फुटाणा , शेंगदाणा गेले घाबरून!
पण तीळ पाहा कसा ?
हाय नाही , हुय नाही , हासे फसफसा !
पाकाने खुलतोय , काट्याने फुलतोय !
अरे , पण हे काय ? तीळ कुठे गेला ?
काटेरी , पांढरा हलवा कुठून आला ?
" वाटाण्या , फुटाण्या , शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत ? कणभर तिळाची मणभर करामत !
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला !
हा धागा खरंच खुप सुंदर आहे.
हा धागा खरंच खुप सुंदर आहे. बऱ्यापकी बडबडगीतं माहित होती. खूप नॉस्टॅल्जिक झालं.
मी बालवर्गात असतानाचं एक बडबडगीत अजून पाठ आहे.
खादाड खाऊ आप्पा..
मारीत होते गप्पा..
पोटात कावळे खूप खूप..
करू लागले भूक भूक..
ताटात जिलब्या शंभर..
खाण्यात पहिले नंबर..
वडे होते परातभर..
त्यांनी खाल्ले भराभर..
दिल्या ढेकरा ढराढर..
हे हे हे छाने
हे हे हे छाने
Pages