आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधा रुसली सुन्दरी
जाउन बैसली मन्दीरी
समजावितो हरी ग राधे राधेच्या मन्दीरी

बान्गड्या ठेविल्या तबकात
घाल की राधे हातात
तुला माझ्या गळ्याची शपथ

डुल ठेविले तबकात
घाल की राधे कानात
तुला माझ्या गळ्याची शपथ

सगळ्या दागिन्याचे नाव टाकायचे.

उघडा मंदीर हे रामाचे बघण्या रुप सीतेचे उघडा मंदीर हे
फराळासी आणियला सुकामेवा सेवन करी तु देवा उघडा मंदीर हे

पाहून राम सीता हनुमंता धन्य कौसल्या माता उघडा मंदीर हे
सिहासन केले जडीतांचे कोंदण आत ही-याचे उघडा मंदीर हे
घालूनी हार गळा रामाच्या लावु टिळा बुक्काचा उघडा मंदीर हे

हे पुर्ण येत नाहीये कोणाला माहीती आहे का?

ते गोल गोल राणी गाणं टाका ना कुणीतरी.

मलाही फारस येत नाही एक्च ओळ आठवते आहे...
गोल गोल राणी
चहुकडे पाणी

------------------------------

आज मला सुट्टी
मिच करणार चहा
आई इथे नुसती
तू उभी रहा.

तूच ठेव आधण.
घाल चहा साखर
झक्कपैकी आले घाल
अग अग उकळला
दूध पटकन घाल

आता कसे छान
दे कपात गाळुन
देते बाबांना नेऊन

बाबांना मात्र सांग
पिलूने केला चहा..

---------------------------------------------

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
धरब बेबे माझाच कान
--------------------------------

अजुन एक फार आवडायचे -

कोणास ठावुक कसा
पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले छान छान
ससा म्हणाला करा पास..................

अजुन खूप आठवत नाहीये

ते गोल गोल राणी गाणं टाका ना कुणीतरी.

मलाही फारस येत नाही एक्च ओळ आठवते आहे...
गोल गोल राणी
चहुकडे पाणी

------------------------------

आज मला सुट्टी
मिच करणार चहा
आई इथे नुसती
तू उभी रहा.

तूच ठेव आधण.
घाल चहा साखर
झक्कपैकी आले घाल
अग अग उकळला
दूध पटकन घाल

आता कसे छान
दे कपात गाळुन
देते बाबांना नेऊन

बाबांना मात्र सांग
पिलूने केला चहा..

---------------------------------------------

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू
तेलंगीच एकच पान
धरब बेबे माझाच कान
--------------------------------

अजुन एक फार आवडायचे -

कोणास ठावुक कसा
पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
भरभर वाचले धडे
गुरुजी म्हणाले छान छान
ससा म्हणाला करा पास..................

अजुन खूप आठवत नाहीये

कुणाला हे गाणं माहित आहे का? बालवाडीत असताना मुलं म्हणायची - सगळ्या भाज्यांची नावे त्यात यायची.
मला अधले मधले शब्द आठवतायेत...

....
भोपळ्या शेट्या, गोलच मोठा
....
कोथींबीरीला हवी हिरवी साडी
....

ए बी सि डी सातारा
त्यातुन निघाला म्हातारा
म्हातार्याने खाल्ली काकडी
बंड्याची शेंडी वाकडी,वाकडी...(वाकडी असे चार पाच वेळा म्हणायचे, )

(आणी बंड्याच्या जागी कुठलेही नाव )

चक चक चकली
काट्यानी माखली
तुकडा मोडताच
खमंग लागली

कडकड कडबोळे
कुडकुडीत झाले
एकच खाताना
दात दुखू लागले

गोरी पान कर्ंजी
नावे सारखी दिसते
पोटातले खातानी
आणखी हवी वाटते

एवढा मोठ लाडू
हातात सुध्दा मावत नाही
थोडा थोडा खाताना
केव्हा संपला कळतच नाही

तिखटजाळ चिवडा
आम्हाला नको बुआ
दाणे आणि खोबर वेचून
लाडूच्या बदली बाबांना द्या

झाला एकदाचा फराळ
सगळ्यांना द्या चहा
दुध पिउन आम्ही
किल्ला करायला निघालो पहा

एक होती चिऊ
तिला झाला भाऊ
चिऊ म्हणाली
अय्या बाळाच नाव काय ठेऊ
कुणीतरी म्हणे चिऊ चिऊ चिऊ
बाळाच नाव काय ठेव काव काव काव
चिऊ म्हणते शी काऊ असतो काळाअ
माझ्या तर आईचा गोरा गोरा बाळा
नाव ठेविन चिमणचिंटुला

एक होती ऊ
तिला झाली टू
ती गेली बाजारात
तिला मिळाला पैसा
ती आली आईकडे
आई आई ह्या पैशाचं काय करू
आई म्हणाली जा आण भाजी
चिरू कशी...चराचरा
शिजवू कशी... रटारटा
खाऊ कशी ...मटामटा
नीजू कशी
डाव्या कुशी
** कशी
ढुमदिशी.

ये ग ये ग.गाई गोठ्यात
बाळाला दुदु दे वाटीत॥
बाळाची वाटी मांजर चाटी
मांजर गेलं रागानं
त्याला नेलं वाघोबानं
वाघमामा डुरकतो
अस्वल पोळ्या करितो
मुलाबाळांना चारितो
चला मुलांनो खेळायला
बाळाची बोरे सांड्ली
मुलाबाळांनी वेचिली

१) नखुल्या बाई नखुल्या ,
चंदनाच्या टिकुल्या.
एक टिकली उडाली
गंगेत जाऊन बुडाली
गंगेला आला लोंढा
भिजला माझा गोंडा
गोंड्याच्या पदरी काडी
भिजली माझी साडी
साडीच्या पदरी रूपया
भाउ माझा शिपाया
शिपायाने केली बायलू
नाकी मोती लायलू
बायलू गेली ताकाला
विंचू डसला नाकाला
विंचवाची केली भाजी
वाढायला बसली आजी
आजीचा हात कापतो
बाळ माझा झोपतो.

२)आमाम आमाम आमले
मामाच्या घराला खामले.
खामल्यात होता किडा
मामा मागतो विडा
विड्याला नाही चुना
मामाच्या घरात सुना
सुनेच्या अंगात नाही चोळी
मामा मागे पोळी
पोळीला नाही तूप
बघा बाळाचे रूप!

३)एक लिंबू झेलू की दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू की तीन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू की चार लिंबू झेलू
चार लिंबू झेलू की पाच लिंबू झेलू

पाचा लिंबांचा पाणवठा , माळ घाली हणमंता
येता जाता कमळं तोडी, राजाच्या मागे लागली राणी
इथे इथे पाणी, इथे खोल पाणी
राणीच्या बाळाला भूकू लागली
सोन्याच्या झारीतून दूदू पाजलं.

साखर लिम्बू, साखर पोहे,
साखरभात..
या सगळ्यावर साखरझोप
करते मात..

१)डोल गे डोल डोलाची
कढी केली सोलाची
कढी गेली सांडून
बाबू आला भांडून
२)इथे इथे नाच रे मोरा, नाच रे मोरा
बाबू घाली चारा,तू जाऊ नको घरा
येईल मामा ,तुला देईल चारा
चारा खा पाणी पी,भूर्रा जा

१. पापड खाल्ला कुर्रुम कुर्रुम
लोणचं खाल्लं चटक मटक
भात खाल्ला गुटु गुटु
कढी प्यायली भुरुक भुरुक
चटणी खाल्ली एक बोट
भरलं बाळाचं पोट पोट
ढेकर आली ढुरुक ढुरुक
बाळ हसलं खुदुक खुदुक...

२. सरसर उंच वाढलं झाड , वाढलं झाड
बघता बघता गेलं ढगा आड , ढगा आड
ढगांचं झालं पाणीच पाणी
झाडाला सुचली गोड गाणी
झाडांची झाली फळं फुलं
वेचायला आली मुली मुलं.......

३. फुले झाली मुले
मुले झाली फुले
मुले बसली बागेत
फुले गेली शाळेत
भुंग्याना मुलांचा वासच येइना
मुलांचा धडा पाठच होईना
मुले लागली रडु
फुले लागली रडु
एक परी आली
जादु करुन गेली
मग फुले झाली फुले
मुले झाली मुले

चिव चिव चिमणी , गाते गाणी
बांधले घरटे , झाले उलटे
पडले पिल्लु , पहाते लिलु
लिलुने हात लावला,
पिल्लाने हात चावला
लिलु लागली रडायला
आई समजुत घालायला
लाडु दिला खायला
लिलु लागली हसायला....

आता वाचला हा धागा... (पण सगळा नाही .. Sad वेळ नाही ना..)

एक गीत माज्या डोक्यातून कधीच जात नाही..."चल मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची "

आता ह्या धाग्यात याबद्दल काही लिहिलंय का माहित नाही....पण हे गीत ऐकू जरी आले तरी .. रडावं वाटत मला ...एकदम शाळाच आठवते....

का रडू वाटत ते मात्र कळल नाही .!!!!

कोणा कडे बागुलबुवा हि कविता आहे का ? मला फ़क्त पहीलच आठवते आहे.

रात्र पसरते जेव्हा भोवती
समोरच्या त्या आंब्या वरती
येउन बसतो बागुलबुवा
कुणा न कळ्तो त्याचा कावा

असेल तर प्लीज इकडे द्या ..

चिऊ च पिल्लु शाळेत गेल.
पाटी पेन्सिल विसरुन आल
कावळे गुरुजी रागावले
काव काव करत ओरडले

चिऊ च पिल्लु खुप भ्याल
रडत रडत घरि पळाल
चिऊ म्हणे झाल काय?
देते बाळाला दुधाची साय

दुधाच्या नावान आल खुशित
ह्ळुच शिरल आईच्या कुशीत.

मी लहान असताना असल काय काय म्हणायचो

तेव्हा कुठे तरी "Urvasi Urvasi Take it Easy Urvasi" आईकलं, बहुतेक रंगोलीवर असणार .
आणि आम्ही ते असं म्हणायचो:
उ बशी उ बशी, नाकात गेली मधमाशी
आई म्हणते काढू कशी, बाबा म्हणतात राहू दे तशी.

अजून बरंच होतं काय काय, डॉक्टर म्हणतात, nurse म्हणते वगैरे .

तसंच सचिन वर सुद्धा काहीतरी होतं

आजी ने आणला mixer , mixer
सचिन ने मारला sixer, sixer .

आजीच्या कानात बोळा
सचिन चा number सोळा

अगदी नॉस्टॅल्जिक करणारा बीबी!! मस्त संकलन होतंय बडबडगीतांचं!!........... Happy
'किलबिल बडबडगीते' असं एक पुस्तक होतं. विकास प्रकाशनाचं की कुणाचं होतं ते आता आठवत नाही. पण त्यात खूप छान छान बडबडगीतं आहेत. आणि त्यातली चित्रं पण फार सुंदर आहेत.
पाउस आला, वारा आला, पान लागले नाचू..........
थेंब टपोरे, गोरे गोरे, भरभर गारा वेचू............
आणि
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती.....
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वरि भिरभिरती,.................
ही बालगीतं कुणाला पूर्ण माहित असतील तर इथे द्या नं....

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फूलपाखरे वर भिरभिरती
स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई

त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाती नाचती, कोणी रडके नाही

नाही पुस्तक, नाही शाळा
हवे तेवढे खुशाल खेळा
उडो, बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही

तिथल्या वेली गाणी गाती
पर्‍या हसर्‍या येती जाती
झाडावरती चेंडू लटकती
शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही

साभार : http://geetmanjusha.com

मस्त धागा , आज च बघितला.

बेडूक मामा , डराव डराव ,
चकली खातो कराव कराव.
बेडूक मामाचे मोठे मोठे डोळे
काळे काळे काजळाचे गोळे.
बेडूक मामाला वाजली थंडी
आईला म्हणतो दे ना बंडी,
आई म्हणते थांब थांब
कोट शिवते लांब लांब.
आईने शिवला शानदार कोट
बेडूक मामाचे उघडे पोट.
बेडूक मामाची गंमत झाली
डूबकन पाण्यात उडी मारली.

फू फू फुगा
रंगीत घालून झगा
गाल फुगवुनी म्हणे माझ्याकडे बघा..

हे आठवतंय का कोणाला ??

विहीणबाई विहिणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा !

पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !

कुठुन मेलं बाहुलीचं लग्‍न काढलं आम्ही ?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !

सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्‍यांशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहून घ्यावा ताठा !

Pages