आठवणीतली बडबडगीतं

Submitted by मृण्मयी on 28 March, 2009 - 12:57

निषादची लहानपणची 'नर्सरी र्‍हाइम्सची' काही पुस्तकं अचानक सापडली. ती उघडून सगळ्या कविता पुन्हा एकदा वाचताना मला माझ्या लहानपणीची 'बडबडगीतं' आठवायला लागली. लहान मुलांच्या कवितांकरता इतकं समर्पक नाव सुचणार्‍या महाभागाचं कौतुक!
जशी आठवतील तशी आपापल्या बालपणीची , आठवणीतली गाणी इथे लिहून काढलीत तर वाचायला (बहुतेक सगळ्यांना) आवडेल. (अभ्यासक्रमातल्या कविता जुन्या हितगुजवर कुठेतरी लिहील्या आहेत. पण बडबडगीतं सापडली नाही.)

माझी एक आवडती कविता...
ह्या कवितेतला चित्ता खूप हावरट वाटायचा. कुणाला ह्या कवितेचे कवी आठवत असतील तर सांगा.

एकदा एक चित्ता
हातात घेऊन अडकित्ता
चित्ता आला दुपारी
मागु लागला सुपारी
मी म्हंटले "कशाला?"
तेव्हा चित्ता म्हणाला,
"नुकतेच जेवण झाले फक्कड,
खाऊन टाकले बारा बोकड.
बारा बोकड सोळा शेळ्या,
बघता बघता फस्त केल्या.
नंतर थोडी गंमत म्हणून,
तीन कोंबड्या टाकल्या खाऊन.
जेवण जरा जडच झाले,
भलते अंगावरती आले.
म्हंटले खावी सुपारी,
म्हणून आलो दुपारी."

किशोर मासिकातली एक...
आलगट्टी गालगट्टी
शोन्याशी गट्टी फू

तुला मी घेणार घेणार नाही
चॉकलेट गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा
अंगावर सोडीन भू

पमगाडी, कूकगाडी
शेतावरची हम्मागाडी
आम्ही सगळे भूर जाऊ
एकटाच राहशील तू

पप्पु, बिट्टी, वेदा, राणी
आम्ही घेळू छापापाणी
तूच एकटा बाथरुममधे
रडके डोळे धू

(अशी दुष्ट प्रवृत्तीची बालगीतं आवडंत असल्याचं बघून आई-वडलांनी 'बाळीचे पाय पाळण्यातच ओळखले'.! Proud )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यातली बरीचशी बडबड गीते माझ्या लहानपणी आम्ही म्हणत असू. काही कविता म्हणूनही असायच्या. पण आमच्या लहानपणीचे मुलांचे आवडीचे चांदोबाचे गाणे इथे दिसले नाही. ते आहे:
चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूपरोटी खाऊन जा
तुपात पडली माशी
चांदोबा गेला उपाशी.

लहानपणी फार कविता वाचल्यात.....पण त्यान्चे कवि किन्वा पुर्ण आठवनित नाहि....

कोनास ठाउक असेल तर पुर्ण कराव्यात हि विनन्ति

घडाळ्यात वाजले अकरा.....बाबानि कापला बकरा..!!
बकरा कापन्यात एक तास गेला...मी नाहि अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले बारा _______________
________________________________?????

घडाळ्यात वाजले एक ..........आई ने केला केक..!
केक खान्यात एक तास गेला... मी नाही अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले दोन...........दादा चा आला फोन..!
फोने घेन्यात एक तास गेला.....मी नाही अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले तीन........ताई ची हरवलि पीन.......!
पीन शोधन्यात एक तास गेला.... मि नाही अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले चार......आई ने दिला मार....!!!
मार खान्यात एक तास गेला........ मी नाही अभ्यास केला.....!!

घडाळ्यात वाजले पाच.....ताई ने केला नाच.....!
नाच बघण्यात एक तास गेला.....मी नाही अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले सहा........आई ने केला चहा........!
चहा पिण्यात एक तास गेला......... मी नाही अभ्यास केला...!!

घडाळ्यात वाजले..................???????????????

आगे आप...............लिखो..........

कसला मस्त बाफ आहे हा.. बरं झाल बै मी कधीपासून माझ्या भाच्यासाठी शोधत होती गाणी Happy
मृण्मयी छान काम केलस Happy

गायी पाण्यावर काय म्हणोनी आल्या || का गं गंगा जमुना ही या मिळाल्या ||
उभय पित्तरांच्या चित्त चोरटीला || कोण बोलले माझ्या गोरटीला ||
उष्ण वारे वाहती नासिकात || गुलाबाला सुकविती काश्मिरात ||
तुला लंकेच्या पर्वतीसमान || पाहोनी होइ स्वाभिमान>>> ही कविता माझी जाम आवडीची.

ते गोल गोल राणी गाणं टाका ना कुणीतरी.

आपडी थापडी

गुळाची पापडी

धम्मक लाडू

तेल काढू !

तेलंगीचे एकच पान

दोन हाती धरले कान !

चाउ माउ चाउ माउ !

पितळीतले पाणी पिऊ

हंडा पाणी गडप !

गुळाची पापडी हडप !

एकदम मस्त बाफ आहे हा... कितीतरी नवी-जुनी गाणी आठवली, बरीच नव्याने कळाली.

मी लहानपणी ही गाणी अगदी साभिनय करायचे आणि हमखास टाळ्या मिळवायचे Lol

१ ) राणीचे गाणे

कांदे चिरायला बसली राणी, तिच्या डोळ्याला आले पाणी.
पाण्याचे झाले मोठे तळे, त्यात उगवली दोन कमळे.
दोन कमळ्यांत एकच परी, दोरीवरच्या उड्या मारी.
एक उडी घाईत चुकली, बिचारी परी पाण्यात पडली.
पाणी गेले सगळे आटून, परीच्या पंखांनी परी गेली उडून.
परीला पाहून राणी हसली, कांद्याची चटणी खमंग झाली.

२) परीचे गाणे

एक होती परी, खूप खूप गोरी, अन छोटीशी सुंदर छान छान भारी.
एकदा काय झाले? एकदा काय झाले?
आकाशाच्या गंगेला पूर मोठा आला, अन परीचा बंगला वाहूनच गेला
रड-रड रडली, रड-रड रडली, अन धावतच चांदोबाच्या घरी ती गेली.
चांदोबा म्हणाला दात-ओठ खाऊन, नदीतच घर तुला देतो मी बांधून.
तेव्हापासून परी नदीतच गेली, अन लाटांच्या घराची मालकिण झाली.
अशी होती परी, खूप खूप गोरी, अन छोटीशी सुंदर छान छान भारी.

@ मंजिरी...

ही घ्या "शाळेचा रस्ता' ही कविता पूर्ण रुपात ~

शाळेस रोज जातांना | मज विघ्नें येती नाना !
किति पक्षी गाती गाणी
झाडावरि म्हणती बसुनी,
'ये मुला, खेळुं या मिळुनी !'
परि उशीर टाळायला | मी निघें तडक शाळेला | १
टोळ कसे गवतावरती
आनंदे टुण टुण उडती !
खेळ्या बोलावीती
परि उशीर टाळायला | मी निघें तडक शाळेला | २
गारुडी वाजवुनि पुंगी
बोलावी झणिं मजलागीं !
बहु जमती जन त्या जागीं,
परि उशीर टाळायला | मी निघें तडक शाळेला | ३
बाजूस खेळणींवाल
वाखाणुनि अपुल्या माला
वेधितसे नकळत बाळां
परि उशीर टाळायला | मी निघें तडक शाळेला | ४
वाटेंतिल झाडें वेली,
हालविती पानें अपुलीं;
बोलाविति मजला जवळी !
परि उशीर टाळायला | मी निघें तडक शाळेला | ५

~ कविंचे नाव आहे 'ना.गं.लिमये' पण यांच्याविषयी माझ्याकडे काही जादाची माहिती नाही.

चांदोबा लपला झाडीत
आमच्या मामाच्या वाडीत
मामाने दिली साखरसाय
चांदोबाला फुटले पाय
चांदोबा गेला राईत
मामाला नव्हते माहीत

हे मी माझ्या निवडक दहात टाकतेय्..आण़खी कुणा लहान मुलं वाल्यांना (किंवा मोठ्यांनाही) पुन्हा बब्बडगीतं वाचुन बालपण जागवायचं असेल तर वाचुया पुन्हा...:)

अजून एक शंकराचे गाणे होते.त्यात शंकराचे वर्णन होते.शब्द मात्र आजिबात आठवत नाहीत.
>>>> ' डोक्यावर चांदोबा आणि गंगा, जटाधारी देवाचे नाव सांगा ' असं एक गाणं आठवतंय पण पुढच्या ओळी माहित नाहीत.

डोक्यावर चांदोबा आणि गंगा
जटाधारी देवाचे नाव सांगा
शंख डमरू त्रिशूळ लांब
वल्कल नेसतो भोळा सांब

अशा ओळी आहेत त्या बहुतेक.... (चुकीची ऐकू आलेली गाणी बाफावरून साभार)

पूर्ण नाही आठवत

केळीच्या बागा मामाच्या , पिवळ्या घडानी वाकायच्या
मामा आमचा प्रेमाचा, घडावर घड ढाडायचा
..........
...............
ताई मोठ्या हाताची जपून शिकरण ढवळायची
...............
...............
आजी मोठ्या मायेची, पूरे पूरे तरी वाढायची
मामाला ढेकर पोचवायची

अजून एक मोराचं गाणं आहे.

मोरा रे मोरा
काय तूझा तोरा..

रंगीत पिसारा
डोक्यावार तूरा..

बघ वर बघ
काळे काळे ढग..

एक पाय दुमडून
पिसारा फुलवून..

नाच तर खरा
मोरा रे मोरा..

घड्याळा घड्याळा थांब थांब
किती वाजले सांग सांग
दोन तुझे काटे, लहान आणि मोठे
दिसतात कसे. दोन हात जसे
भर भर धावतात
भर भर पळतात
एक ते बारा, एक ते बारा
ह्याच्या पुढे जात नाही
पुढचे आकडे माहित नाही
भिंतीवर, टेबलावर
कुणाकुणाच्या हातावर
ऐटी मध्ये बसायचं
किती वाजले सांगायचं
एक कान पिरगाळला
टिकटिक टिकटिक सुरु करा
दुसरा कान पिरगाळला
पहाटेला उठाव मला
सारा जग झोपलं
तुला नाही विसावा
सारखा काम काम काम
कशाला धावतोस सांग सांग

फिरायला गेलं माकड
वाटेत भेटला बोकड

दोघे गेले हॉटेलात
दाबून खाल्ला मसालेभात

माकडाने मारली उडी
पळवली सुपारीची पुडी

दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात

संयोजक, Lol
'एकदा एक चित्ता' पाडगावकरांची आहे हे आठवत नव्हतं.

>>कुणाला ती जुनी कविता माहीत असेल कृपया इथे लिहा.
आभाळ वाजले धडाडधुम
वारा सुटला सु सु सुम....

ही घ्या....

आभाळ वाजलं धडाडधूम
वारा सुटला सू सू सुम
वीज चमकली चक चक चक
जिकडेतिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिलं सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडुक बेडुक
तो ओरडला ड्रांव ड्रुक ड्रांव ड्रुक

मृण्मयी तुला कुठल्या शब्दात धन्यवाद देऊ हेच कळत नाही. माझ्या लहानपणीची ही कविता. आणी अतीशय आवडती. हा धागा चालू करुन तू अनेकांना भावविवश केलसं हे नक्की. ( मी "तुम्ही" म्हणण्या ऐवजी "तू" म्हणतेय त्याबद्दल रागवु नये, कारण मायबोलीवर तुझे योगदान खूप असल्याने तुझे आणी दिनेशजींचे नाव कधीच विसरु शकत नाही, आम्हाला त्यातच आपलेपणा वाटतो. )

दोन सोबती असती पहा
त्यांचा ठरला विचार हा
आपण जाऊ रानात
बोरे खाऊ झोकात
..........................
तिकडून आले अस्वल
एक चढला झाडावरी
दुसरा निजला जमिनीवरी
अस्वल आले
हुंगून गेले
झाडावरचा खाली आला
मित्रा संगे बोलू लागला
काय बोलले अस्वल रे
अशाची सांगत नकोच रे

मधली ओळ वा कडवे कुणाला माहित आहे का?
मी ७३, ७४ हे गाण शिकलो होतो .

Pages