पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १७. लव्ह इन टोकियो (१९६६)

Submitted by स्वप्ना_राज on 4 October, 2018 - 13:37

साठ-सत्तरच्या दशकात (किंवा कदाचित त्याच्या आधीही असेल. ५० च्या दशकातले चित्रपट पाहायची माझी मानसिक तयारी अजून तरी झालेली नाही) बर्‍याच हिंदी चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांना परदेशदर्शन घडवलं. मग तो अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस असो, नाईट इन लंडन असो, द ग्रेट गॅम्बलर (कैरो, लिस्बन, व्हेनिस, रोम) असो की हरे रामा हरे कृष्णा (नेपाळ) असो. अर्थात हेही केवळ हिरो-हिरॉईनला गात बागडायला रमणीय बॅकड्रॉप हवा म्हणून नव्हे तर कथानक परदेशात घडतं म्हणून. ह्याच पठडीतला एक रोमँटिक सिनेमा म्हणजे '६६ साली आलेला लव्ह इन टोकियो. जॉय मुकर्जीच्या 'Love In’ ह्या trilogy अंतर्गत आलेला हा दुसरा चित्रपट अशी माहिती विकिवर मिळते. ह्या मालिकेतला पहिला 'लव्ह इन सिमला' (१९६०) आणि तिसरा 'लव्ह इन बॉम्बे' (१९७४). पैकी 'लव्ह इन सिमला' मध्ये त्याच्यासोबत साधना होती तर 'लव्ह इन बॉम्बे' मध्ये वहिदा.

220px-Love_In_Tokyo_poster.jpg

तर आधी चित्रपटाची बोटभर कथा. अशोकचं लग्न सरितासोबत ठरलेलं असतं. पण त्याला ती फारशी पसंत नसते. त्यात सरिताच्या १७ व्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचे वडिल 'आता लग्न करून टाकू' असा धोशा लावतात तेव्हा तर अशोकला आपल्या मित्राची, महेशची, मदत घेऊन चक्क पार्टीतून धूम ठोकावी लागते. घरी त्याच्या करारी, शिस्तप्रिय, बाणेदार वगैरे (थोडक्यात, नवऱ्याच्या मागे पोरांना वाढवणाऱ्या बायका जश्या असण्याची पध्दत हिंदी सिनेमात आहे तश्या असलेल्या) आईजवळ, म्हणजे गायत्रीदेवींजवळ, त्यांचे वकिल एक चिठ्ठी घेऊन येतात. गायत्रीदेवींचा मोठा मुलगा काही वर्षांपासून जपानमध्ये स्थायिक झालेला असतो. त्याने आईच्या इच्छेविरुध्द एका जपानी पोरीशी लग्न केल्यामुळे गायत्रीदेवींने त्याच्याशी सर्व संबंध तोडलेले असतात. त्याचा मृत्यू झाल्याचं कळूनही त्यांच्या निर्णयात काही बदल झालेला नसतो. वकिलांनी आणलेली चिठ्ठी त्यांच्या जपानी सुनेने मरण्यापूर्वी लिहिलेली असते (भारतीय सून काय लिहील एव्हढं आतडं पिळवटून टाकणारी ती चिठ्ठी कोणी जपानी लिहील असं मला तरी वाटत नाही. पण ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला की हे असं होतं असावं) . आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला अनाथालयात जावं लागू नये म्हणून नातू म्हणून नव्हे तर निदान एका निराधार महिलेचा मुलगा म्हणून तरी त्याला सांभाळा अशी विनंती तिने केलेली असते. वंशाच्या दिव्याबद्दल ऐकताच गायत्रीदेवी (अर्थातच!) हळव्या होतात. आणि नातवाला आणायला अशोकने त्वरित जपानला जावं असं फर्मान काढतात. सरिता लगेच त्याच्याबरोबर जायचा मनोदय व्यक्त करते. पण अशोक भारतीय संस्कृती, बायकांचं अदबशीर वागणं वगैरेवर एक छोटेखानी भाषण देऊन तिचा बेत हाणून पाडतो. आणि एकटाच जपानला जातो.

महेशचं शीला नामक मुलीवर प्रेम असतं पण तिचे वडिल ह्या लग्नाच्या विरोधात असल्याने तिला भारतातून थेट जपानमध्ये घेऊन जातात. विमानात अशोकची गाठ ह्या दोघांशी पडते तेव्हा शीलाचे वडिल 'टोकियोत काही मदत लागली तर मला कळव' असं म्हणतात ( ते Amway वाले नसतात बरं का!)

सर्व भारतीय आईबापांना आपल्या मर्जीने मुलाचं-मुलीचं लग्न लावून द्यायची सवय असते (जी आजतागायत कायम आहे!) त्यानुसार आशाचे काका तिचं लग्न प्राणशी लावून देणार असतात. ह्याला आशाच्या स्वर्गवासी पिताश्रींची संमती असते. आणि हे लग्न झाल्यावरच त्यांचा वकिल आशाच्या वडिलांनी मरायच्या आधी तिच्यासाठी ठेवलेलं एक पत्र तिला देणार असतो. (तेव्हाच्या काळात कुटुंबाचे वकिल आणि लग्नाचे मुहूर्त काढून देणारे गुरुजी हे गरज पडायच्या आधीच हाताशी असायचे!). अर्थात काका आणि प्राण दोघांचा आशाच्या गडगंज संपत्तीवर डोळा असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. पण आशाला प्राण अजिबात पसंत नसतो. त्यामुळे ती साखरपुड्याच्या दिवशीच टोकियोतल्या आपल्या घरातून पळून जाते. तिला शोधायला काका ५००० डॉलर्सचं इनाम जाहीर करतात (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!).

दरम्यान अशोक टोकियोला पोचून आपल्या पुतण्याला, चिकूला, भेटतो खरा पण चिकू त्याच्याबरोबर भारतात यायला साफ नकार देतो. आशाच्या काकांनी तिला शोधून आणणाऱ्यांना इनाम जाहीर केल्याची बातमी तो टीव्हीवर पाहतो आणि घरातून पळून जातो. अर्थात कोणीतरी म्हटल्याप्रमाणे It’s a small world. पुन्हा निदान तेव्हाच्या काळात तरी जपानमध्ये फार गर्दी दिसत नव्हती (इथे आमच्या रानडे रोडला तेव्हाही कोणी गणपतीच्या किंवा दसरा-दिवाळीच्या दिवसांत हरवला तर एकदम ख्रिसमसलाच सापडत असेल ह्याची मला खात्री आहे!). तेव्हा चिकू नेमका आशाला जाऊन धडकतो. मग आशाला शोधायला निघालेला प्राण आणि चिकूला शोधायला निघालेला अशोक ह्या दोघांना गुंगारा देत देत आशा आणि चिकू टी-हाउस, शीलाच्या बापाचं दुकान असा त्रिखंडात संचार करत, वेषांतर करत पळत राहतात. पण शेवटी प्राणच्या हातावर तुरी देऊन अशोक, आशा आणि चिकू ह्या तीन ओंडक्यांची सागरात भेट होते. आशाने कोणी ओळखू नये म्हणून सरदारजीचा वेश धारण केलेला असतो. आणि अशोक पुरता माठ असल्याने 'ही बाई आहे' हे काही त्याच्या ध्यानात येत नाही. ह्या सगळ्या पळापळीत चिकूने हात फ्रॅक्चर करून घेतलेला असतो. त्याला सरदारजीचा उर्फ आशाचा लळा असल्याने अशोक तिलाही चिकूला सांभाळायला टोकियोतल्या आपल्या भावाच्या घरी घेऊन येतो. अर्थात त्यांचं भारतात येणं लांबणीवर पडतं. दरम्यान शीलाच्या जाण्याने अस्वस्थ झालेला महेश 'अशोकची टोकियोमध्ये एका जपानी मुलीसोबत जवळीक वाढलेय' अशी लोणकढी गायत्रीदेवींना मारून आपली जपानला जायची सोय करून घेतो. मग अशोक-महेश भेट, आशा बाई आहे हे अशोकला कळणं, दोघांचं एकमेकावर प्रेम बसणं, प्राणने आशाला किडनॅप करणं, शीला-महेशने तिला सोडवणं वगैरे गोष्टी यथासांग पार पडतात.

आता एव्हढं सगळं चांगलं चाललंय म्हणजे माशीला सर्दी होणारच. म्हणजे माशी शिंकणारच हो. सरिताचे वडील गायत्रीदेवींचे कान भरून त्यांना आणि सरिताला घेऊन टोकियोत येतात. (तेव्हाच्या काळात मुंबईहून शिवनेरी किंवा नीता व्हॉल्वो पकडून पुण्याला जावं अश्या सहजतेने मंडळी घाऊक गर्दी करून भारतातून जपानला जाताना पाहून मला तर भरून आलं). आईसाहेब आशाला त्वरित नापसंत करतात. मग चित्रपटाचा शेवट जवळ आला नसतानाही हिंदी सिनेमातली सुप्रसिध्द मॅरेथॉन सुरु होते, त्या पळापळीत प्राण अशोकला गाडीने उडवतो आणि अशोकची दृष्टी जाते. तेव्हा आईसाहेबांना सरिता आणि आशा दोघीतल्या फरकाची जाणीव होते. यथावकाश अशोकला दृष्टी परत मिळते (टीव्ही चॅनेलवर चित्रपटाच्या प्रायोजकांनी त्यांच्या पाइल्सच्या औषधाची जाहिरात २०-२५ मिनिटं दाखवल्याने चित्रपट कापला. त्यामुळे हा चिमीत्कार कसा झाला हे माहित नाही!) . सरिता आणि तिचे वडिल दोघांना हाकलून लावण्यात येतं. गायत्रीदेवी नातवाला स्वीकारतात. अशोक आणि आशा शुभविवाह ठरतो. पण.......

पण, किंतु, परंतु......बंधू.....आणि भगिनींनो.....ह्या 'पण'च्या पुढे काय आहे हे कळण्यासाठी चित्रपट पहा असं म्हणायला माझी जीव धजावत नाही. कारण चित्रपटाची गाणी पाहून-ऐकून हा रोमँटिक चित्रपट आहे अशी समजूत होते खरी. पण प्रत्यक्षात तो रोमान्स तोंडी लावण्याइतकाही नाही. महेश-शीला-शीलाचे वडिल ह्यांचा आचरटपणा मात्र चित्रपट भरून वर दशांगुळे उरला आहे. फक्त तो सहन करायची तयारी असल्यासच चित्रपट पाहावा.

चित्रपटाच्या नायकाची भूमिका जॉय मुकर्जीने केली आहे म्हणजे तो अशोक. मला स्वत:ला जॉय मुकर्जी आवडतो. बंगाली नायकांच्या मानाने सणसणीत उंची, देहयष्टी आणि बर्यापैकी देखणा (आणि तरीही बायकी न दिसणारा!) चेहेरा हे तिन्ही त्याच्याकडे आहेत. रोमँटिक हिरो म्हणजे शेवटच्या काही रिळांत पोलिस यायच्या आधी व्हिलनला ३-४ चापट्या, थोडे बुक्के, काही गुद्दे मारणे, त्याचा गळा धरणे, थोडीफार लाथाळी करणे ह्यापलीकडे फायटिंग स्किल्स लागत नाहीत. बाकी राहिली गाणी अन हसणं-रागावणं-आश्चर्य-संभ्रम वगैरे प्रेमात पडलेली मंडळी करतात त्या लीला. त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' ह्या न्यायाने त्याने भूमिका बर्‍यापैकी वठवली आहे. आशाच्या भूमिकेत आशा पारेख आहे. तिचं थोडं लाडिक बोलणं (ह्या बाबतीत शर्मिला चार पावलं पुढे आहे म्हणा!) सोडलं तर तीही हिंदी नायकप्रधान (म्हणजे जवळपास सर्वच!) चित्रपटात नायिकेकडून असणाऱ्या ज्या काही अपेक्षा असतात त्या बर्‍यापैकी पूर्ण करते. फक्त गायत्रीदेवी उगाचच तिच्या कानाखाली जाळ काढतात तेव्हा ती मुळूमुळू रडते ते मात्र मला अजिबात आवडलं नाही. तिने ठणकावून सांगायला हवं होतं की "हे बघा आईसाहेब, माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे पण म्हणून मी वाटेल ते अजिबात सहन करणार नाही. तेव्हा परत हात उचलायचा नाही. काय समजलेत?”. असो. प्राणच्या भूमिकेत प्राण सिकंद नेहमीप्रमाणेच शोभला आहे. मदन पुरीने आशाच्या काकांची भूमिका केली आहे तर ललिता पवारने गायत्रीदेवी साकारल्या आहेत. महेश म्हणजे महमूद हे एव्हाना लक्षात आलं असेल. त्यामुळे शीलाची भूमिका शुभा खोटेने केली आहे हेही ओघाने आलंच.

बाकी भूमिकांत धुमाळ (शीलाचे वडील), मुराद (गायत्रीदेवींचे वकिल), मोहन चोटी (शीलाच्या वडिलांचा सहाय्यक), असित सेन (शीलाचं लग्न तिच्या वडिलांनी ह्याच्याशी ठरवलेलं असतं) आणि तरुण बोस (अशोकचे डोळे जातात तेव्हा त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर) ही मंडळी दिसतात.

चित्रपट गाण्यांच्या बाबतीत मात्र अजिबात निराश करत नाही. हसरत जयपुरीचे शब्द, शंकर-जयकिशनचं संगीत आणि लता मंगेशकर-मोहम्मद रफी-मन्नाडे ह्यांचे आवाज. सायोनारा, ओ मेरे हे शाहे-खुबा, ले गयी दिल गुडीया जापानकी, आ जा रे आ जरा, कोई मतवाला आया मेरे द्वारे आणि मुझे तुम मिल गये हमदम (पाइल्सवाल्यांनी हे गाणंही कापायला लावलं. त्याबद्दल त्यांना आधी रौरव आणि मग कुंभीपाक!) पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच.

टीचभर कथेचा दोन-अडीच तासांचा चित्रपट करताना त्याचं जे होतं तेच ह्या चित्रपटाचं झालं आहे. विनोदाच्या नावाखाली आचरटपणा, थिल्लरपणा आणि पाचकळपणा ह्यांचा अतिरेक झाला असल्याचं आधी म्हटलंच आहे. गेईश्याच्या नाचाच्या वेळी महमूदने जे काही हावभाव केलेत ते जपानी संस्कृतीची टर उडवणारे, अनादर करणारे वाटतात. अशोकचे डोळे जातात तेव्हा गायत्रीदेवी आणि आशा 'माझे डोळे घ्या' चा जो काही धोशा लावतात तो पाहून हसावं का रडावं तेच कळत नाही. त्यात तो डॉक्टर भारतीय असतो म्हणून हा वेडेपणा खपवून घेतो. एखादा जपानी असता तर त्याने 'एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू काढून ह्या दोघींच्या डोक्यात त्याचा अर्धा-अर्धा भाग बसवावा काय' असा विचार केला असता. :रागः आणि हो, मिशन इम्पॉसिबल मध्ये मास्क वापरण्याआधी ह्या लोकांनी त्याचा शोध लावला होता. Uhoh आहात कुठे?

थोडक्यात काय तर हा चित्रपट तेव्हा जपानमध्ये दाखवला असता तर '६६ मध्ये ते नक्की आपल्यावर चाल करून आले असते. Sad

ता.क. चित्रपटात आशा पारेखने तिचा पोनीटेल बांधायला वापरलेल्या क्लिपवरून तश्या हेअरक्लिप्सना पुढे 'लव्ह इन टोकियो' असं म्हणायला लागले हे विकीवरून कळलं.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक तो सारखे खून आणि रहस्य वाला पिक्चर धुंद असेल.
मला इतकंच आठवतंय की तो अपॉईन्ट्मेन्ट घेऊन कोणालाही भेटायला गेला की त्या माणसाचा खून झालेला असतो.

तो बुचडावाला बाबा मेहमूद आहे त्या पोस्टरमधला...
तुझी ही मालिका म्हणजे एकदम स्मरणरंजन आहे लहानपणी (इतर पर्याय नसताना) रविवारी लागणार्‍या हिंदी सिनेमांचं Happy
अजून काही सुचवते

कानून (राजेंद्र कुमार, अशोक कुमार)
विक्टोरिया नंबर २०३
तलाश
ज्वेल थीफ
महल
तीसरी मंजिल
मेरा साया
खामोश (नसीर, अमोल पालेकर, इ)

एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू काढून ह्या दोघींच्या डोक्यात त्याचा अर्धा-अर्धा भाग बसवावा काय >>> Rofl पंचेस भारी आहेत. लेख पण मस्तच. पिक्चर फार पूर्वी पाहिलाय त्यामुळे नीट आठवत नाहीये. परत पहावा म्हणते!

वा! एकदम नॉस्टॅल्जिक झाले वाचून.
लव इन टोकियो फक्त आणि फक्त गाण्यांमुळे आवडला होता.

वरदाने लिहिलेले `कानून' आणि `खामोश' हे दोन्ही जबरी सिनेमे आहेत. मी कितीही वेळा बघू शकते.
आमची १०वीची फायनल परिक्षा सुरू होती तेव्हा एका थिएटरला `कानून' लागलेला होता. (तो खूप जुना सिनेमा आहे. तेव्हा पुन्हा रिलीज केला होता.) शेवटचा पेपर झाल्यावर आम्ही मैत्रिणींनी पाहिला होता. (आजकालची पिढी `ब्लॅक-अँड-व्हाईट सिनेमे?? नक्को !!' म्हणते; पण आम्हाला तेव्हा तसं काही वाटायचं नाही. कदाचित बरीच वर्षं काळा-पांढरा दूरदर्शन पाहिल्याने सवय झाली होती.)

`खामोश'मधलं अमोल पालेकरचं पात्र त्याच्या `गोलमाल' वगैरे इमेजहून पूर्णपणे वेगळं आहे. त्यातले त्याचे क्लोज-अप्स तेव्हा हॉण्टिंग वाटायचे. त्याने कामही जबरी केलंय.

लहानपणी `छत्तीस घंटे' पण आवडला होता. (माला सिन्हाची ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे, तरी)

माझी थ्रिलर्सची यादी :

छत्तीस घंटे (राजकुमार, माला सिन्हा, सुनील दत्त)
धुआ (मिथुन, रंजिता. कास्टवर जाऊ नका; सिनेमा भारी थ्रिलर होता.)
धुंद (संजय खान, झीनत अमान)
इत्तेफाक (राजेश खन्ना, नंदा)
द ट्रेन (राजेश खन्ना, नंदा)
फरार (अमिताभ, शर्मिला टागोर, संजीव कुमार)
बे-रहम (शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार, माला सिन्हा) हा रिलीज झाल्यावर २-३ वेळा पाहिला होता. यातला `२६ जुलै की रात तुम कहां थे?' हा शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग तेव्हा आम्ही सारखा म्हणायचो. Lol

या सर्वांवर वाचायला आवडेल.

आणखीही आठवतील तसे लिहीन.

mi_anu, विकीवरून संजय खानच्या पिक्चर्सची लिस्ट काढून चेक करावं लागेल.

साधना, हो ग मस्त दिसायचा संजय खान...'रुत है मिलनकी साथी मेरे आ रे' ह्या गाण्यात तर कातिल दिसलाय अगदी.

वरदा, लिस्टबद्द्ल खूप धन्यवाद. पैकी कानून आणि तिसरी मंझिल १-२ वर्षांपूर्वी पाहिलेत. पण त्यावर लिहिता येण्याइतपत सध्या आठवत नाहिये. महल एकदा पाहिला. पुन्हा पहायची अजिबात हिंमत नाही. एक तर त्यात अशोककुमार एखाद्या ठोकळ्यासारखा वावरलाय आणि पिक्चरचा शेवट अजिबात आवडला नाही. Sad मेरा साया ही पाहिलाय पण अनेक वर्षांपूर्वी आणि सुनिल दत्तसाठी पुन्हा पहायला तयार आहे एका पायावर Happy ज्वेल थीफ लिस्टमध्ये आधीच होता. बाकीचे अ‍ॅड केले.

ललिता-प्रीति, द ट्रेनवर लिहिलंय मी ह्या मालिकेत. धुंद आणि इत्तफाक लिस्टमध्ये होते. बाकीचे अ‍ॅड केले. धन्यवाद Happy आणखी आठवले तर नक्की सांगा.

ह्या चित्रपटांबद्दल चर्चा होताना बघून खरंच खूप मस्त वाटतंय Happy

स्वप्ना_राज,
तुमची "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त" सिरीज सेंट्रल थीम चित्रपटच आहे तर ही पूर्ण सिरीज ललित विभागापेक्षा 'चित्रपट' विभागात असणे योग्य होणार नाही का?
ईच्छा असल्यास अ‍ॅडमिनना सांगून धागे योग्य विभागात हलवू शकता.

स्वप्ना, जमल तर लगे हाथ मेरा सायाचा मूळ मराठी चित्रपट म्हणजे पाठलाग पण बघून घे. मला चित्रपट म्हणून पाठलाग जास्त आवडला होता.
मी वरती लिहिल्यापैकी तलाश अति बोअर आहे, पूर्ण पाहू शकले नाही. महल बराय. बाकी सगळे आवडतात. परत पाहण्याजोगे आहेत.

ललिता, कानून मी पण शाळेत असताना थिएटरमध्येच बघितला आहे गं. मंडईत ते कुठलं जुनं थिएटर होतं? तिथे लागला होता बहुतेक..

स्वप्ना, जमल तर लगे हाथ मेरा सायाचा मूळ मराठी चित्रपट म्हणजे पाठलाग पण बघून घे. मला चित्रपट म्हणून पाठलाग जास्त आवडला होता.>>
यप्प. पाठलाग जास्त छान आहे. आणि सुनील दत्त पेक्षा काशिनाथ घाणेकरांनी जास्त छान अ‍ॅक्टींग केली आहे अस वाटल.
बहुतेक तो सारखे खून आणि रहस्य वाला पिक्चर धुंद असेल.
मला इतकंच आठवतंय की तो अपॉईन्ट्मेन्ट घेऊन कोणालाही भेटायला गेला की त्या माणसाचा खून झालेला असतो.>>
हो धुंद च. मस्त आहे . सगळ्यांची अ‍ॅक्टींग जबरी आहे.

स्वप्ना, बरेचदा प्रतिसाद द्यायच राहून जात पण लेख अगदी हमखास वाचला जातो. त्यामुळ लिहायच थांबू नकोस.

धुंध मध्ये डॅनी, झीनत, नवीन निश्चल व संजय आहे. त्यात एकच खून आहे जो सुरवातीलाच होतो, डॅनीचा. पण चित्रपटभर डॅनी फ्लॅशबॅकमधून येऊन घाबरवत राहतो.

नाय नाय
बुढ्ढा मिल गया लक्षात आहे माझ्या.हा वेगळा.

साधना म्हणते ते बरोबर.....धुंदमध्ये एकच खून आहे....चित्रपटाच्या सुरुवातीला. मी संजय खानच्या पिक्चर्सची लिस्ट चेक केली पण बर्‍याच चित्रपटांची स्टोरी दिलेली नाहिये. तरी पुढे दिलेले ३ मिळाले. ७३ नंतरचे पिक्चर्स चेक करायचा कंटाळा आला. हिरॉईन लक्षात आहे का?

उपासना
अनोखी पहचान
इंतकाम

वरदा, 'ह्या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभोवती' हे गाणं पाठलाग मधलंच आहे ना? जुने मराठी चित्रपटसुध्दा पहायचे आहेत. पण आधी लग्न कोंढाण्याचे Happy

सीमा धन्यवाद Happy

हायझेनबर्ग...लेख चित्रपट विभागात टाकले तर किती लोक मुद्दामहून जाऊन वाचतील माहित नाही. त्यामुळे तूर्तास ललितमध्येच राहू देत.

हायझेनबर्ग...लेख चित्रपट विभागात टाकले तर किती लोक मुद्दामहून जाऊन वाचतील माहित नाही. त्यामुळे तूर्तास ललितमध्येच राहू देत. >> माझ्यासारख्या लोकांना ज्यांना चित्रपट विभाग ईग्नोर करायचा आहे/ केलेला आहे त्यांच्यावर हे चित्रपट विषयक धागे ललित विभागात ऊघडणे त्यांची 'मुद्दाम गैरसोय करण्यासारखे' नाही का? मायबोली अ‍ॅडमिनने विभाग subscribe/unsubscribe करण्याची सोय करून देण्यात काय हशील आहे मग?
ज्यांना चित्रपट विषयक धाग्यांची आवड आहे ते सदस्य असतीलच ना ह्या विभागाचे जसे ललित विभागाचे असतील.

हायझेनबर्ग, तुम्हाला हा लेख न वाचण्याची सोय आहे. असो. मी अ‍ॅडमिनना विचारते, जर कंपल्सरी असेल तर चित्रपट विभागात हलवेन.

हायझेनबर्ग, तुम्हाला हा लेख न वाचण्याची सोय आहे. >> तुमच्याकडून हे ऐकणे अगदीच अनपेक्षित होते.
मी काही माझ्या मनचे नियम सांगत नाही तर मायबोली अ‍ॅडमिनने घालून दिलेले प्रघात पाळून सगळ्या वाचकांप्रती सौजन्य दाखवण्याची आठवण करून देत आहे.
आडमुठेपणा करून मिळवलेले प्रतिसाद वाचून तुम्हाला आनंद होत असेल तर असोच .. तुमची मर्जी.

आडमुठेपणा करून मिळवलेले प्रतिसाद वाचून तुम्हाला आनंद होत असेल तर असोच .. तुमची मर्जी.>>>

हाबे, तुम्ही काहीच्या काही लिहिताय. धाग्याच्या नावातच पिक्चर शब्द असल्याने तुम्ही चुकून उघडला असे होणार नाही. मायबोलीवर नियम आहेत पण ते तसेच पाळावेत , न पाळणारे आडमुठे आहेत असे अडमीनने कुठेही म्हटले नाही. तुम्ही धागा उघडू नका, वाचू नका. ज्यांना वाचायचे ते वाचतील.

माझ्याकडून ऐकणे अगदीच अनपेक्षित होते म्हणजे काय? जे खरं आहे आणि लॉजिकल आहे तेच सांगितलं. आणि सगळ्या वाचकांप्रती सौजन्य दाखवायला सांगताय म्हणजे तुम्ही इथल्या सगळ्या वाचकांचे अधिकृत प्रवक्क्ते आहात का? मी मायबोलीवर नेहेमी येत नाही त्यामुळे असलात तर मला माहित नाही.

आठमुठेपणा करून मिळवेलेले प्रतिसाद? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की केवळ मी ललित मध्ये हे लेख टाकलेत म्हणून ज्यांना ह्यात काडीचा इंटरेस्ट नाही असेही लोक हे लेख वाचून प्रतिसाद देताहेत? मला वाटतं मायबोलीचे वाचक खूप सुजाण आहेत. त्यांना ज्यात इंटरेस्ट नाही त्या लेखाच्या लिंकवर ते एक तर क्लिक करणार नाहीत आणि केलंच समजा तर प्रतिसाद देण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालवणार नाहीत.

आधी म्हटल्याप्रमाणे अ‍ॅडमिनकडून सूचना येईल त्याप्रमाणे मी करेन. ही माझी ह्या विषयावरची शेवटची पोस्ट. नाहीतर म्हणाल की उगाच लेखावरच्या पोस्टी वाढवायला हे करताय.

स्वप्ना, लिहीत राहा!! लेख कोणत्या विभागात वगैरे ला फार महत्व नाही.लेखाचे नाव सेल्फ एक्स्प्लेनिंग आहे.
या सिरीज मधले काही पिक्चर माहीत नसतात ते लेख नुसतेच वाचले जातात, प्रतिसाद न देता.पण ही सिरीज खूप रोचक आहे.
अजून आठवलेले पिक्चर:
डिंपल चा बीस साल बाद
तो एक बोटीवर धर्मेंद्र, राजेंद्रनाथ स्त्री वेशात आणि लहान बाळ वाला पिक्चर होता तो
ऋषी कपूर चा खोज
ऋषी कपूर चा बडे दिलवाले

लेखाचे नाव सेल्फ एक्स्प्लेनिंग आहे.>>>>> +१
लेखाच्या शीर्षकातच पिच्चर लिहिलेलं असल्यावर ज्याला इंट्रेस्ट नाही त्याने तो लेख न उघडणं सहाजिक आहे.
शीर्षक न वाचता लेख ललितात आहे का विरंगूळा मधे आहे हे बघुन लोक लेख उघडतात आणि वाचतात? माझ्यासाठी हे नवीन आहे. Uhoh

स्वप्ना, बरेचदा प्रतिसाद द्यायच राहून जात पण लेख अगदी हमखास वाचला जातो. त्यामुळ लिहायच थांबू नकोस.. + १
प्रत्येक वेळी प्रतिसाद दिला जात नाही.. पण मी तुमचे लेख वाचून बरेच चित्रपट पाहिले..कारण जुने सगळेच चित्रपट माहित नसतात..

माझ्याकडून ऐकणे अगदीच अनपेक्षित होते म्हणजे काय? >> दहा एक वर्षात व्यक्तीच्या लिखाणावरून त्याच्या समजूतदारपणाचा अंदाज येतो. तुमच्या 'पन्ना' सिरीजवरून माझा तसा चांगला समज झाला होता. 'पन्ने' आवडल्याने तुमच्या चाहत्यांच्या यादीत नाव सुद्धा नोंदवले होते (In case you didn't notice) पण त्यानंतर शशक आणि चित्रपटांबद्दलचा रतीब न आवडल्याने ते काढून टाकले. असो...
तुम्ही 'न वाचण्याची सोय आहे' असे म्हंटल्याने 'पन्ने' हे फक्त भरण्यासाठीच असतात हे 'अचानक' समजले म्हणून ते अनपेक्षित होते असे लिहिले.

जे खरं आहे आणि लॉजिकल आहे तेच सांगितलं. >> बालवाडीत शिकलेल्या 'लाल ठोकळे लाल डब्यात' तसे 'चित्रपट विषयक धागे चित्रपट विभागात' असे साधे सरळ सोपे लॉजिक आहे. तुमचे हे धागे ललित विभागात ऊघडण्यामागे काय लॉजिक आहे?
तुम्ही म्हणलात तसे जास्त लोक वाचतील वगैरे? लोकांनी वाचले हे प्रतिसाद आल्याशिवाय कसे समजेल तुम्हाला? मग तुम्ही प्रतिसाद मिळ्वण्यासाठी मुद्दाम ललित विभागात धागे ऊघडता हे तुम्हीच सांगितलेले 'लॉजिक' मी लिहिले तर ते तुम्हाला नापसंत का असावे?

आणि सगळ्या वाचकांप्रती सौजन्य दाखवायला सांगताय म्हणजे तुम्ही इथल्या सगळ्या वाचकांचे अधिकृत प्रवक्क्ते आहात का? >> मी माझ्याबद्दल बोलत होतो...भलेही ९९.९९% मायबोली तुमच्या धाग्यांचीं वाचक आहे असे समजले तरी ऊरलेल्या मी एकट्या ज्याला तुमच्या धाग्यात रस नाही त्याबद्दलही सौजन्य दाखवा असे सांगत होतो.

तुम्हाला बहुधा अजूनही नेमका प्रॉब्लेम कळाला नाही असे दिसते.. डीटेल मधे सांगायचा प्रयत्न करून पाहतो.

अ‍ॅडमिनचा हा धागा वाचून बघाच https://www.maayboli.com/node/63811

त्यातलाच हा खालचा पॅराग्राफ.
तुम्ही जर मायबोलीत प्रवेश केला असेल तर (Logged in असाल तर) , तुम्हाला By Default "माझ्यासाठी नवीन" ही यादी दिसेल. मायबोलीवर ज्या ग्रुपचे तुम्ही सभासद आहात फक्त त्याच ग्रूपमधले नवीन लेखन तुम्हाला दिसत राहील. तुम्ही जसे जसे एक एका पानाला भेटी द्याल तशी ही यादी कमी होत जाईल. इथला बदल म्हणजे , ज्या ग्रूपचे तुम्ही सभासद नाहीत, त्या ग्रूपमधले नवीन सार्वजनिक धागे या यादीत दिसत, ते आता दिसणार नाहीत. मायबोलीवर पटकन "नवीन काय" पहायचे आहे , पण जास्त वेळ नाही, अशा वेळी हि सुविधा उपयोगी पडेल.

अ‍ॅडमिनच्या बोल्ड केलेल्या ओळीत लेखक धागा योग्य विभागात काढण्याचे सौजन्य दाखवतील हे गृहीत धरलेले आहे. (जसे तुम्ही डोळे ऊघडे ठेऊन गाडी चालवाल हे ग्रूहीत धरून रोडवरचे ट्राफिक साईन्स लावलेले असतात)
मी 'चित्रपट' विभाग मला त्यातले धागे आवडत नसल्याने unsubscribe केलेला आहे. पण काही लेखकांनी पाककृती पासून शी-शू पर्यंतचे विषयांचे धागे वेगवेगळे विभाग असतांनाही ललितात घुसडण्याचा हट्ट धरल्याने मी त्या विषयांच्या विभाग/ग्रूपचा मेंबर नसूनही मला ते धागे 'माझ्यासाठी नवीन' मधे सतत (प्रत्येक प्रतिसादागणिक') दिसत राहतात. मला आवड/ रस नसलेले विभाग unsubscribe करूनही जर मला दर्जाहीन आणि नकोसे धागे टाळता येणार नसतील आणि तेही केवळ लेखकांच्या अ‍ॅडमिनने पाडून दिलेले प्रघात न पाळण्याच्या अनाकलनीय अट्टहासामुळे तर मी त्यबद्दल बोलणे रास्त नाही का?

अ‍ॅडमिनने ह्या सर्व सुविधा ऊपलब्ध करून देण्याला काय अर्थ आहे जर आपण जबाबदारीने आणि सौजन्याने त्यांच्याप्रती आदर दाखवत नसू.

आधी म्हटल्याप्रमाणे अ‍ॅडमिनकडून सूचना येईल त्याप्रमाणे मी करेन. >> तुम्ही चित्रपट विभागात धागे ऊघडावेत आणि ते ललित विभागात ऊघडायचे असल्यास अ‍ॅडमिनकडे परवानगी मागावी... हे योग्य असेल. बाकी तुमची मर्जी.
तुम्हाला पोलिसाने हटकेपर्यंत नोएंट्री मधून गाडी चालवायची असेल तर तुमची ईच्छा.. पण अपघाताची जबाबदारीही तुमचीच आहे हे ओघाने आलेच.

नाहीतर म्हणाल की उगाच लेखावरच्या पोस्टी वाढवायला हे करताय. >> हे मी नाही तुम्ही स्वतःच म्हणाला आहात.

सुजाण वाचक म्हणजे कोंण? तुमच्या लिखाणावर आक्षेप न घेणारे का? ह्या न्यायाने तुमच्या १७ व्या धाग्यापर्यंत मी कदाचित तुमच्या 'सुजाण वाचक' यादीत असेल आणि आता नाही असे दिसते.

असो... मुद्दा कळण्यास अतिशय सोपा आहे..
अजूनही न कळाल्यास... पायस, रसप वगैरे सातत्याने चित्रपटांवर लिहिणारे लेखक चित्रपट विभागातच धागे का काढतात आणि आपण का नाही... असे स्वतःलाच विचारून पहा.

Pages