Submitted by सिद्धेश्वर विला... on 7 September, 2018 - 03:02
आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला
विषाद नव्हता मनी तो कसला
ना होती मनीषा अन विजिगीषा
पण ,,, पाषाण शोधण्यातच हया गेली
अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन
अक्षय संचयात बहू किल्मिषे दाटली
पृथ्थककरणात अन निरूपणात
कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली
भ्रमिष्ट अस्थिपंजर
शोध कूर्म गतीने पाषाणाचा
अनिर्वचनीय बंधनात अविरत
सोबतीने शोध अस्तित्वाचा
अनावृत, वैचित्र्य, अनाहूत गाठे
यथास्थित स्थितिस्थापक
क्षणभंगुर वाटे
शिरकाण , बलिदान ती ज्येष्ठ नाती
पाषाण शोधण्यातच दिली मूठमाती
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे वाचून
हे वाचून
चित्तचक्षूचमत्कारिक शब्दफुले उर्ध्वपतनाने गाळून त्यांचा रेखीव बांधेसूद सुगंध, चमचमणार्या अत्तराच्या कूपीत ,सोडल्यानंतर मखमली भूकेला उधाण यावे तसे झाले.
कळतंय ना मला काय म्हणायचेय
एग्जॅक्टली
==) सुन्दर प्रतिसाद...
==) सुन्दर प्रतिसाद...
पाषाण पुण्यात आहे
पाषाण पुण्यात आहे
इश्श , आम्ही नाही जा . पण
इश्श , आम्ही नाही जा . पण माझी " हि " मुंबईला आहे ==)
अहो! मग पाषाण दिल्लीत का
अहो! मग पाषाण दिल्लीत का शोधताय?
एकदा कवितेचा विषय मराठीत समजावला तर माझ्या सारख्या मंद बुध्दी वाचकांवर आपली कृपा होईल.
सहज विचारलं हं! _/\_
स्वतःला मंदबुद्धी समजून घेणे
स्वतःला मंदबुद्धी समजून घेणे नेहेमी हितकर असते साहेब , त्याने होते काय कि आपल्या स्वतःच्या ज्ञानात निरंतर भर पडत राहते . कवितेचा अर्थ आपल्याला पाहिजे होता ना तो थोडक्यात समजावून सांगतो पातळ तर घ्या नाहीतर गंगेला सोडून द्या
माणूस सदैव हातचं सोडून पळत्याच्या पाठी असतो ,, अगदी मरेपर्यंत ,, खरी नाती त्याला शेवटपर्यंत कळतच नाहीत. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत तेच शोधत राहतो आणि अखेर त्या शोधात जे त्याचे जवळचे असतात त्यांना कायमचा गमावून बसतो ...