Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24
Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.
१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.
२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!
तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ पियू, अरे हो खरेच की
@ पियू, अरे हो खरेच की
यातून कळते की कुठल्याही आयडीने का लिहेना, ऋन्मेष खरेच लिहितो
<< यातून कळते की कुठल्याही
<< यातून कळते की कुठल्याही आयडीने का लिहेना, ऋन्मेष खरेच लिहितो Happy >>
------- हे (इतरांसाठी ) कल्चरल शॉकचे उदाहरण आहे.
तिकडे डकवायला हवे.
लग्न!!!
लग्न!!!
दुरियन खाल्लंय.. फार विचित्र
दुरियन खाल्लंय.. फार विचित्र गोड होते. वासदेखील..
ऑफिस समोर अशोक वृक्ष होता
ऑफिस समोर अशोक वृक्ष होता.बाजूला मोठमोठी झाडे होती वड,पिंपळ ह्याची.त्या झाडांवर वटवाघूळ खूप होती.
आणि ती वटवाघळे अशोक वृक्षाची फळं खूप खात असत.
हिरवा रंग असलेली जांभळा पेक्षा थोडी मोठी असलेली ती फळं.
माझ्या डोक्यात विचार आला ही वटवाघूळ खूप ही फळ खात आहेत .
ह्याची चव आपण घेवून बघावी.
म्हणून ते फळ टेस्ट केले.
तिखट आणि कडू अशी विचित्र चव होती.
अती भयंकर
नंतर डोक्यात विचार आला विषारी तर नसतील ना?
पण काही झाले नाही.म्हणजे विषारी नव्हती.
दुरियान घेवुन मेट्रो / बसने
दुरियान घेवुन मेट्रो / बसने प्रवास करायला सिंगापुरात बंदी आहे
फणसों से है मुझे प्यार
फणसों से है मुझे प्यार दुरीयन दफा करो.
कोकणकन्या आणि तुतारी दोन्ही
कोकणकन्या आणि तुतारी दोन्ही ट्रेनछ्या तिकीट न मिळाल्याने कल्याण ते सावंतवाडी प्रवास पटना-वास्को ट्रेन स्लिपर क्लासमध्ये केला, पुन्हा ही चूक करणार नाही.
गुलमर्ग ला चेंगरा चेंगरी
गुलमर्ग ला चेंगरा चेंगरी होण्याइतकी गर्दी? इतके टूरिस्टी झाले आहे का ते ठिकाण?
अर्थात माउन्ट एवरेस्ट ला ट्राफिक जॅम हे वाचल्यामुळे आता आश्चर्य वाटायला नको .
माउंड एव्हरेस्ट वर तर आता
माउंड एव्हरेस्ट वर तर आता स्टारबक्स उघडायचेच काय ते बाकी आहे !
हो. गेल्या महिन्यात तिथे
गुलमर्ग ला चेंगरा चेंगरी होण्याइतकी गर्दी? इतके टूरिस्टी झाले आहे का ते ठिकाण
>> हो. एप्रिल एन्डला तिथे किमान 10 हजार पब्लिक होतं एकाच वेळी एकाच ठिकाणी. आणि अचानक वातावरण बदललं आणि बेक्कार हिमवर्षाव सुरू झाला. लोकं पळत सुटले. गोंडोला उर्फ रोपवे ची कपॅसिटी जास्तीत जास्त 1000 लोकं शांतपणे तिथून नेण्याची आहे तिथे 10,000 लोक म्हणजे चेंगराचेंगरी, रडारड, लहान मुलांचे श्वास गुदमरणे, वस्तू हरवणे, चोरीला जाणे, तिथल्या स्थानिक लोकांनी चक्क पैसे घेऊन लोकांना रांगेत मध्येच घुसवणे आणि दुसरीकडे कॉमन पब्लिकने चक्क 5 तास गर्दीत कुडकुडत उभे राहणे, कोण पुढे आणि कोण मागे यावरून भांडणे, धक्काबुक्की वगैरे सर्व प्रकार स्वतः अनुभवले.
या सगळ्यात भयाण प्रकार म्हणजे जिथे गर्दी होती तिथे लाईट्स सुद्धा नव्हते. पत्रे गळत होते. मुसळधार बर्फाच्या पावसामुळे हळूहळू मिट्ट काळोख होऊ लागला होता. आणि जवळपास 70% पब्लिक गर्दीची सवय नसणारे नव्हते. (मुंबईकर जसे कितीही गर्दीत पॅनिक होत नाहीत त्याच्या अगदी उलट पब्लिक होते). पावसाच्या माऱ्याने एक जरी पत्रा पडला असता किंवा एकाचाही धीर सुटून कोणी कोसळले असते तर दुसऱ्या दिवशी पेपरात नाव नक्की होते. तिथल्या तमाम मराठी लोकांनी सतत 5+ तास गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय वगैरे घोषणा देऊन लोकांचे धैर्य टिकवून ठेवले.
माउंट एव्हरेस्ट वर ट्रॅफिक जॅम हे अगदी अविश्वसनीय आहे. पण आता जगात कुठेही गर्दी होऊ शकेल यावर विश्वास बसलाय.
लोणावळा ला दर वेळी आवडीने
लोणावळा ला दर वेळी आवडीने जाते.पण हळूहळू कमी दिसायला लागणारी माकडं, हॉटेल्स चे प्रचंड रेट,एसटी स्टँड चौकात होणारा ट्रॅफिक जॅम, टिपिकल मंकी पॉईंट ला दरीच्या कुंपणा आधी टाकलेला प्लास्टिक कचरा, चिप ची पाकिटं, मका कणसाच्या चिपाडाचा मोठा ढीग हे पाहून दर वेळी 'आता पुढच्या वेळी कितीही जवळ पडलं, 1 तासात जाता आलं, वाटेत निसर्गरम्य डोंगर दिसले तरी लोणावळा अजिबात नको' असं ठरवलं जातं.
बे एरीया तुन येलोस्टोन ला
बे एरीया ते येलोस्टोन गाडी ने गेलो, १६ तासाचा प्रवास, मधे फक्त जेवणाचा ब्रेक घेतलेला. मजा आली पण सगळ्यांचीच वाट लागलेली. पुन्हा कधीही करणार नाही. एक मोठा ब्रेक मस्ट आहे.
तिथे 10,000 लोक म्हणजे
तिथे 10,000 लोक म्हणजे चेंगराचेंगरी, रडारड, लहान मुलांचे श्वास गुदमरणे, वस्तू हरवणे, चोरीला जाणे, >>> बाप रे! साउंड्स लाइक ए नाइटमेअर!!
गुलमर्गचं वर्णन वाचून अंगावर
गुलमर्गचं वर्णन वाचून अंगावर काटा आला.
मी अमेरीकेत असतानाचा प्रसंग
मी अमेरीकेत असतानाचा प्रसंग आहे. खुप दुरियन बद्दल एकले एका चायनीज कलिगकडून.
मी फणस खाण्यात पक्की, फणस इतका आवडतो की अर्धा तरी संपवू शकते एकटीने मिडियम साईजचा. तो ही बरका(रसाळ) फणस जो सहसा बरेच लोक खात नाही. आणि हाच कॉन्फीडन्स नडला.
मला वाटले, दुरियन दिसतो तर तसाच. गेले आणायला. अगदी तुनळी वर रीसर्च करून की सगळ्यात चांगली वराईटी घ्यायची.
मुस्टँग किंग का कायतरी. चक्क ७० डॉलरला घेतला(हो, इतकी महागच असते हि वराईटी अमेरीकेत).
नवरा म्हणत होता, अगं, सुटे गरे घेवु जे त्या दुकानात आहेत ते.
उत्साहाने फोडला तर कसलं काय, इतका विचित्र वास. लसूण, कांदा मधला वास. गिळताना वाटत नाही पण नाकाजवळ घेवत नाही(मला तरी). नवरा लांब पळाला.
आता खपवणार कसा? तर तुनळीवर ग्लुटन फ्री केक रेसीपी पाहिली. ती केली. तर तो ही काही चांगला नाही लागला चवीला. नवर्याला सांगितले, असा हेल्दी, तसा हेल्दी पण काहीच खायला तयार नाही. लब्बाड , सांगायला लागला त्याचे पोट दुखतेय.
सगळे पैसे फुकट, केक करून तो ही फुकट बटर वगैरे. $१०० तरी खर्च केक वगैरे धरून. त्या केक मध्ये बटर, साखर, बदाम पीठ, अंडी सगळं फुकट.
कानाला खडा.... कधीच आणणार नाही. दुरियन चीप्स पण बेक्कार लागतात. तो टिपीकल वास काही करून जात नाही.
साखरेत घोळा, का तुपात, पाद** वास असतोच.
माझ्या मैत्रीणेकडून पण हेच एकले, दुरीयनबद्दल. तिने तर उलट्या केलेल्या. बर्याच लोकांचा अनुभव असाच दिसतोय.
झंपी हाहाहा, मस्त लिहिलंय.
झंपी हाहाहा, मस्त लिहिलंय.
दुरियन काय असत ? >>>>>>
दुरियन काय असत ? >>>>>>
फणसा च्या जातीतील एक फळ. थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया मध्ये सापडते आणि फार पॉप्युलर आहे.
त्या फळाला भयानक वास येतो आणि चव हि अक्वायर्ड टेस्ट म्हणावी अशीच असते.
अक , धन्यवाद
अक , धन्यवाद
इतकी पराकोटीची वाईट चव / वास
इतकी पराकोटीची वाईट चव / वास असलेल्या दुरीयनला एवढी साता समुद्रापार लोकप्रियता आणि मार्केट वॅल्यु नक्की कशामुळे आहे मग ? काही विशेष औषधीय गुण आहेत की सर्व अफवांचे पीक म्हणून प्रसिद्धी ?
कामाच्या गोष्टी सांगितल्या
कामाच्या गोष्टी सांगितल्या बद्दल धन्यवाद.
-------------
Android apps अपडेट करणे हे आता वाईट्ट होत चालले आहे. जी काही apps विश्वसनीय ,चांगली होती त्यामध्ये अपडेटच्या नावाखाली जाहिरातींचे फुल्लसाईज विडिओ घुसडत आहेत. तो विडिओ ८/१६ सेकंद झाल्यावरच बंद होतो आणि दुसरा चालू होतो. उदाहरण M indicator mumbai local trains app. ते app च डिलिट करावे लागले. आता mumbai local नावाचे दुसरे घेतले. (( https://play.google.com/store/apps/details?id=com.miin.mumbaitraintimetable by MIIN ))
फळ हेल्दी आहे, बी वायटॅमिन
फळ हेल्दी आहे, बी वायटॅमिन वगैरे वगैरे रोजचेच. आता त्या त्या देशातील एक फळांच्या प्रजाती. चव हि डिवलपच होवून येते.
तुनळीवर सर्च करा, दुरीयन केकला त्यांच्या तिथे लग्नात तुफान मागणी व किंमत असते. ते पण विशिष्ट प्रकाराचे(मुसँग किंग भारी महाग).
माझ्या ओळखीत तर, फणसाच्या आणि आंब्याच्या वासाने उलट्या करणारे आहेत. एक मराठी नागपुरी मैत्रीण, मला फणसाचे गरे खाताना बघून पळून गेली लांब. त्यानंतर मी, ऑफीसला सुद्ध कधीच फणसाचे गरे घेवून गेले नाही.
माझी मुलगी, केळ्याच्या वासाने लांब पळते. लहानपणी, मी कधीच केळे खाल्ले नाही. नंतर बर्याच उशीरा हॉस्टेलमध्ये गेले आणि खायला काहीच नसले तर केळ गिळायची कसेतरी. तिथे सवय लागली.
मागे एकदा आम्ही 'मुशाफिरी'
मागे एकदा आम्ही 'मुशाफिरी' अंकात जकार्तातल्या एकांचा लेख घेतला होता. ते अनेक वर्षं तिथे राहत होते.
त्या लेखात त्यांनी दुरियनचं खूप कौतुक केलं होतं. टेस्ट डेवलप व्हावी लागते, हे त्यांनीही म्हटलं होतं.
पुलंनी 'पूर्वरंग'मध्ये लिहिलं
पुलंनी 'पूर्वरंग'मध्ये लिहिलं आहे दुरियानबद्दल. त्यांनी बहुतेक त्याच्या तीव्र वासाबद्दलच लिहिलं आहे. खाऊन बघितला नसावा.
फणसाचा वास खूप जणांना नाही आवडत.
सुक्या माशांचा वास ,
सुक्या माशांचा वास ,
मग ते बोंबील असोत , सुकट असो,किंवा सोडे असोत खूप लोकांना aawdat नाही.
आपल्याला वास पण आवडतो आणि चव पण.
सोडे तर माझे आवडते आहेत.
ऑफिस मध्ये tipin मध्ये सुक्या मासळी चे प्रकार घेवून गेले तर कॅन्टीन खाली होईल
म्हणूनच फणसाला गुजराती
म्हणूनच फणसाला गुजराती गिऱ्हाईक नाही.
दहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात
दहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात लवासा फिरायला मित्रांबरोबर बाईक ट्रीप केली होती.
सात मित्र चार गाड्या, येताना मी एकटा.
येताना, उतारावर बुंगाट पळवली होती गाडी. आजही आठवण काढली तर शहारा येतो अंगावर.
विशितील सळसळीत रक्त, हेल्मेट नाही, उतार, पाऊस, अंधार, आणि वेग.
कसं काय thrill केलं अजूनही नाही कळत.
Imagica ची Nitro ride ह्या thrill पुढे किस झाड की पत्ती.
पुन्हा नाहीच करणार असं काही
आजकाल घरात फायर प्लेसेस कुठं
आजकाल घरात फायर प्लेसेस कुठं असतात.
म्हणुन आम्ही जिरा पावडर घेऊन किचन चीमनीतून भ्रमण करण्याचा प्रयत्न केला मावशीच्या घरी जायला.
तिकडे मावशीला आधी कल्पना दिली होती . पण तिथे पाऊस पडत होता म्हणुन तिने भजी तळायला घेतली होती. चीमनीतून सरळ कढईवरच आदलळलो. कढई पडली तेल सांडले, भजी वाया गेली, चटके बसले, कपडे खराब झाले, मावशीची बोलणी खावी लागली.
आता परत ट्राय नाही करणार.
मी मलेशियन भेटीत दुरियन विकत
मी मलेशियन भेटीत दुरियन विकत घेउन खाल्लेला आहे. दिसायला साधारण आपल्या मध्यम आकाराच्या नारळाएवढा होता. मी विक्रेत्यालाच फळ कापुन दे म्हणुन सान्गितले. कापल्यावर आत किडनीच्या आकाराचे तिन चार गरे निघाले. गर कमी आणि मोठी बी. फळातुन निघालेले इतकुसे गरे पाहता बिक्रेत्याने फसवुन अर्धे गरे स्वतःच खाल्ले असे वाटले होते पण त्यातुन तितकाच माल निघतो हे नन्तर कळले. :).
दुरियानबद्दल भलभलते वाचुन तो फणसा सारखा असणार असा गै स झाला होता. बाहेर फणसासारखे काटे पण आतुन रुपडे वेगळे असा प्रकार होता. चवीला तर यथातथाच… आपल्या फणसाच्या चाराचीही सर नाही. पण तिथल्या लोकांना आवडत असेलही. आपल्याला काय…
मला भयन्कर वगैरे वास आला नाही. कदाचित कापुन ठेवलेले फळ नन्तर वास मारत असावे. फणसाचाही वास ब-याच जणांना सहन होत नाही.
अमेरिकेतून भारतात एअर इंडिया
अमेरिकेतून भारतात एअर इंडिया ने प्रवास!
आयुष्यात पुन्हा कधीही करणार नाही. देवाकडे ज्या असंख्य मागण्या आहेत ही पण एक आहे की एअर इंडिया ने प्रवास करायची वेळ देवाने कधी आणू नये.
Pages