अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चितळ्यांचा पातळ पोहे चिवडा भंकस लागतो. Overall चितळ्यांचे तिखट-मिठाचे प्रकार अजिबात चविष्ट नसतात. पातळ पोहे चिवडा आठवलेज पुणे ह्यांचा चांगला असतो. flavours of my city वर दोन वेळेस मिळाला होता. त्यांच्या चकल्या, शंकरपाळे पण छान होते.

गाडीला स्वतःची pantry car असेल तर best food service मिळते.अधे-मध्ये स्टेशनवर जेवण-खाण चढवणार असतील तर मग वाईट परिस्थिती. गाडीच्या प्रवासासाठी घरुन जेवणाखाणाची तयारी करणं ह्यासारखा दुसरा आनंद नसेल Happy

केस सरळ करून घेतले होते. तसे माझे एकदम कंगना सारखे येरगुळे येरगुळे नाहीत पण तरीही अजून सरळ असावेत असे नेहमी वाटायचे. भारीतल्या ठिकाणी जाऊन, त्यांनी सांगितले भारीतले शाम्पू कंडिशनर घेऊन ते नीट ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भयाण झाले नंतर. दिसायला आवडत होतं पण केसांची रया गेली होती. मग म्हणे दर महिन्याला टचअप करायला लागतं. हिंमत नाही झाली. मग मुळांजवळ वेवी नी टोकं ताठ असं काहीतरी विचित्र दिसत होतं. कधी एकदा सगळे परत पहिल्यासारखे होताहेत असं झालं होतं.
परत कधीच हा प्रकार करणार नाही असं ठरवलं.

नंतर सिस्टीन (Cysteine) ट्रीटमेंट म्हणून एक मिळाली. लोकांचे ते केलेले केस पाहिले. नैसर्गिकरित्या सरळ असल्यासारखे दिसतात केस, शेपटाच्या केसासारखे नाही वाटत. टोकं इस्त्री नी स्टार्च केलेली न दिसता थोडी वेवी आणि भरघोस दिसतात. चपाट केस न दिसता मस्त सुदृढ दिसतात. ते केल्यावर दिल गार्डन गार्डन अगदी! आता एक वर्ष झालं पण केस अजूनही तसेच मला हवे तितके सरळ नी धष्टपुष्ट आहेत. गळती लागते कधी पण ती काही न करता पण ज्या वारंवारतेने लागते तितपतच!

ज्यांचे केस पटापट वाढतात त्यांनी स्ट्रेटनिंग केले तर रुट्स वेडी वाकडी दिसतात.
माझ्या डोक्यावर आधीच सरळ असलेले निवडक तुरळक ४ केस आहेत, नाहीतर मला केस सरळ सुळसुळीत जपानी बाहुली वाला लुक आवडतो जाम Happy

चितळ्यांचं गोडाचं तरी कुठं काय धड असतंय? ओरिजिनल बंगाली-राजस्थानी(मारवाडी)-गुजराती-मथुरा-आग्रा भोज मिठाया ज्यानं खाल्यात असा कोणीही शहाणासुरता माणूस चितळ्यांच्या "मिठाईकडे" ढुंकूनही पाहणार नाही. सन्माननीय अपवाद फक्त मोतीचुर लाडू, तो ओरिजिनलच्या जवळपास थोडंबहुत फिरकतो, पूर्ण नाहीच.

ज्यानं खाल्यात असा कोणीही शहाणासुरता माणूस चितळ्यांच्या "मिठाईकडे" ढुंकूनही पाहणार नाही.>>>> अपवाद चितळेंची आंबाबर्फी! त्याला तोड नाही.

एकदा प्रथमच कल्याण ते शेगाव स्लीपर कोच बसने रात्रीचा प्रवास केला होता. आमची स्लीपर सीट नेमकी मागच्या दोन चाकांच्या वर आली होती. रात्रभर आम्ही थाड् थाड् उडत होतो. डिफरेंन्शियलच्या घरघर आवाजाने डोकं उठलं होतं. एस्सेल वर्ल्डची आठवण येत होती. अशात झोप कुठली लागायची? परत येतेवेळी जाणीवपूर्वक मधली सीट घेतली. Lol

जेम्स भाऊ, आता पॅनकेक, तिरमीसु, चिजकेक आणि पेस्ट्रीचं कौतुक करतो की तुम्हाला चितळे गोड वाटू लागतील. Wink

आणि मग अमेरिकेतील देसी मिठाईच्या दुकानात पाऊल टाकू नये, नुसतं मिट्ट गोड आणि जुना पुरणा माल असतो म्हणतो की चीजकेक खायचं सोडून देशी ठिकाणी का जाता म्हणाल! Proud

अमितव जी, नाही हो तुम्ही मला पारच शेंडी गंधधारी /दाढी टोपीधारी/ कन्फेड्रेट कंझर्व्हेटिव्ह करून टाकलेत की हो! , असं काही नाही, तिरामीसु ते ऑरेंज मार्मलेड व्हाया नटेला, वगैरे वर माझा काहीच रोष नाही, ह्यातले बरेच प्रकार तर अत्यंत आवडते आहेत, पण चितळे काही केल्या आवडत नाहीत, हे मात्र सोळा आणे सच सांगतोय, देवकीताईंशी सहमत मात्र, मोतीचुर-आंबा वडी बरी असते थोडी चितळेंचीही

जसे दालखिचडी आजारातच बरी वाटते तशी..
Submitted by भन्नाट भास्कर on 18 July, 2018 - 10:06>>>

भास्करदादा, तुझ्या या वाक्याचा तीव्र निषेध! मी अगदी दररोज दालखिचडी खाऊ शकतो!

ब्राम्हण मैत्रिणींकडे थोड पुणेरी स्टाईल जास्त वाटल कोल्हापुरपेक्षा. (सरसकट विधान नव्हे तर पर्सनल अनुभव )>>>>>> ब्राह्मण लोकांमध्ये भाज्या आणी आमट्या गुळचट बनवत (पदार्थात गुळ किंवा साखर घालुन ) असल्यामुळे असते तसे.

सीमा, बरे झाले ही कोल्हापूरची यादी दिली, Happy कारण अंबाबाईच्या दर्शनाला अजूनही जाणे राहीले असल्याने हे पदार्थ नक्कीच खाता येतील, विकत मिळत असतील तर उत्तमच.

ब्रिटानीयाचीच मारी अत्युत्तम! बाकी खरच भंकस. कुरकुरीतपणा, थोडासा गोडसरपणा ही त्या मारीची वैशिष्ट्ये. पार्ले, ओटस ही मारी नावाची बिस्कीटे फार बेचव.

गाडीला स्वतःची pantry car असेल तर best food service मिळते.>>>>> पँट्री कार मध्ये जाता आले तर जाऊन बघा. परत जेवणार नाही. Proud

मला चितळेंची आंबा बर्फी, मोतीचूर् लाडु, चिरोटे जाम आवडतात. थोडक्यात काय तर चितळे आवडतात. Proud Light 1

पँट्री कार मध्ये जाता आले तर जाऊन बघा. परत जेवणार नाही.

गेले तेही दिवस, आजकाल राजधानी/शताब्दी क्लास ट्रेन्स मध्ये खुद्द आयआरसीटीसीचे कॅटरिंग असते, त्यांचे स्टॅण्डर्ड्स काय आहेत हे नीट समजून घ्यायचे असेल तर युट्युब वर नॅशनल ज्योग्राफीक चॅनल वर चालणाऱ्या 'मेगा किचन' सिरीज मधला आयआरसीटीसी किचनचा एपिसोड नक्की पहावात. बाकी सुपरफास्ट पेंट्री एलिजीबल ट्रेन्स मध्ये आयआरसीटीसी स्टॅण्डर्ड्सनुसार फिक्स केलेले सब कॉन्ट्रॅक्टर जेवण पुरवतात, पेसेंजर्सची क्वालिटी/हायजीन संबंधी हलक्यातली हलकी तक्रारही कडकरित्या हाताळली जाते, मध्यंतरी स्वच्छतेचे नॉर्मस् न पाळल्यामुळे एका सब कॉन्ट्रॅक्टरला जवळपास दीड लाख रुपये दंड आणि कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशनची शिक्षाही सुनावली गेली होती, हे सगळं ट्वीटर आऊटरेज वरून नाही तर रुटीन चेकप अंतर्गत झाले होते, म्हणजेच रेल्वे कॅटरिंग बाबत बऱ्यापैकी प्रोऍक्टिव्ह झाली आहे.

त्याशिवाय आजकाल आयारसीटीसी फूड पार्सल सेवाही उपलब्ध आहे, ह्या सेवेच्या अंतर्गत तुम्ही तुमचा पीएनआर नंबर दिला की तुमची ट्रेन ब्रेकफास्ट/लंच/डिनरच्या वेळेला कुठल्या स्टेशनला टच होणार आहे त्यानुसार त्या त्या गावातील रेप्युटेड रेस्त्रांची लिस्ट झळकते, त्यातून तुम्ही हवे ते पदार्थ (पंजाबी भाज्या, सँडविचेस, ज्यूस वगैरे) आपल्या कार्ट मध्ये ऍड करून पेमेंट केलं की ते नीट पॅक केलेलं पार्सल आपल्या सीट वर डिलिव्हर होतं. ह्या स्थानिक रेस्त्रांला सुद्धा आयआरसीटीसी नॉर्म पाळूनच ह्या सप्लाय चेन मध्ये एन्ट्री मिळते. इतके असूनही जर आयआरसीटीसी वर 'सरकारी शिक्का' असल्यामुळे ते नकोच असेल तर ट्रॅव्हल खाना डॉट कॉम वगैरे प्रायव्हेट फूड ऍग्रगेटर्स पण उपलब्ध आहेत, काही सिलेक्टेड रुट्स वर तर हल्ली डोमिनोजचा पिझ्झा वगैरे पण डिलिव्हर होतो. फक्त हे पार्सल्स कॅश ऑन डिलिव्हरी मिळत नाहीत प्री पेमेंट करावी लागते.

रश्मे डेक्कन क्विन ची पँट्री अप्रतिम आहे.>>>>> Sad दक्षु, रेल्वेचा प्रचंड प्रवास फक्त लग्ना आधीच झाला गं. पण डेक्कन क्वीन, प्रगती असा मुंबई- पुणे प्रवास रेल्वेने झालेला नाहीये, पण अनूभव घ्यायचा आहे. Happy

पँट्री वाल्या रेल्वे ने प्रवास करुन १० वर्ष झाली. तेव्हा राजधानीत खाल्लेले सर्व आवडले होते.
सध्या गाडीत खाणे हे पुणे मुंबई प्रवासात कटलेट किंवा आमलेट किंवा सँडविच पुरतेच मर्यादीत आहे.ते आवडते.पण कटलेट मध्ये बरेच तेल असते.

>>>> पँट्री कार मध्ये जाता आले तर जाऊन बघा. परत जेवणार नाही.

>> गेले तेही दिवस

माझा सुद्धा याबाबतचा अनुभव दहाएक वर्षांपूर्वीचा आहे. पण mandard तर मागच्याच महिन्यात प्रवास केलाय म्हणतात:

>> Last month I travelled from Pathankot to Delhi by 2nd AC. Horrible experience dirty toilets, bad food.
>> Submitted by mandard on 18 July, 2018 - 10:58

डुरंटो रेल्वे चा आपले वजन वाढवण्यासाठी खास प्रयत्न चालला असावा असा संशय येतो, सतत काही न काही चरायला देत असतात
आणि सगळीकडे असतो का माहिती नाही पण चहा म्हणजे एक मोठा व्याप होता, दूध पावडरचे पाकीट, चहा चे डीप आणि साखर पण तशीच आणि थर्मास मध्ये उकळते पाणी
गाडी हालत डुलत असताना ते पुढ्यात घेऊन करत बसणे म्हणजे वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे

आज प्रथमच ट्राय केली पण परत कधींच नाही; लीपस्टिक लावलेल्या
बायकांकडे तुम्ही बघतां तेंव्हां त्यांचा काय संताप होत असेल , तें कळलं मला आज !!!
romantic.jpg

Pages