Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24
Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.
१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.
२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!
तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
भाऊ _______/\_______
भाऊ _______/\_______
(No subject)
बॅचलर असताना पल्सरवर
बॅचलर असताना पल्सरवर लोणावळ्याला निघालेला आमचा ग्रुप. मित्र गाडी चालवत होता अन मी मागे बसलेलो. तेव्हा मित्राच्या सांगण्यानुसार चालू गाडीवर मी पुढे झालो अन तो मागे येऊन बसला. थोड्या वेळाने पुन्हा मी मागे (चालू गाडीवरच) गेलो अन तो पुढे आला.
पुन्हा कधी नाही केला अस प्रकार
भाऊ,
भाऊ,
स्लीपर कोच मध्ये त्रास झाला तर उशी उलट्या बाजूला ठेवून (डोक्याच्या बाजूने ओढले जाण्याची सोय) झोपायचं डोक्यात आलं नाही का?
>> उशी उलट्या बाजूला ठेवून
>> उशी उलट्या बाजूला ठेवून (डोक्याच्या बाजूने ओढले जाण्याची सोय) झोपायचं डोक्यात आलं नाही का?
ते सुचणे स्वाभाविक आहे ना? ते केले गेले नाही म्हणजे तो पर्याय उबलब्ध नसणार हे डोक्यात यायला हवे खरे तर
उशी फिक्स असते. निदान त्या ट्रॅवल मध्ये तरी होती. लेदरची. बेडचा भाग म्हणूनच खिळ्यांनी फिक्स केलेली. तिच्यावर पाय ठेवून डोके उशी नसलेल्या अवस्थेत असा एक असफल प्रयत्न करून पाहिला होता तरीही.
लहानपणी मला ट्रकच्या पुढच्या
लहानपणी मला ट्रकच्या पुढच्या ड्रायव्हर च्या बाजूला बसून प्रवास करायची इच्छा होती.
नंतर एकदा तसा योग आला. मुलांची व्यायाम प्रात्यक्षिके होती त्यामुळे ती टीम मागच्या बाजूला बसलेली. मला नाइलाजाने पुढे बसायला लागले. पण त्यानंतर अर्धा तास प्रवास करताना तो ड्रायव्हर मधुनच जे कटाक्ष टाकून भयंकर गाणी म्हणत होता, त्या वेळी कशी बशी गप्प बसले व नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला पण नंतर कधी अशा हौशी नको रे बाबा
अरे बापरे, मुलांना ट्रकमध्ये
अरे बापरे, मुलांना ट्रकमध्ये मागे बसवून घेऊन गेलात?
नाही च्रप्स.. मी नाही बसवले
नाही च्रप्स.. मी नाही बसवले :त्यांची मल्ल खांब प्रात्यक्षिके चालत्या ट्रकमध्ये होती.. मला हौस बघण्याची म्हणून मी सुद्धा गेले होते.. पण नंतर आणखीन मुले येऊन संख्या वाढली नि मला नाईलाजाने (रात्री उशीर झालेला त्यामुळे रिक्षा शोधत बसण्यापेक्षा) पुढे बसायला लागले
मेझा 9 ला मी आणि मैत्रीण
मेझा 9 ला मी आणि मैत्रीण 'सॅलड खाऊ' तापात पालक पापडी चाट नावाची डिश घेतली.यात चार पालक पानांची तळलेली भजी, भरपूर खारे दाणे,10 ग्रॅम उकडलेले बटाटे आणि कांदे होते.आमच्या दोघींच्या दाताची कामं नुकतीच झाल्याने पुढचा अर्धा तास 'सिझलर घ्यायला हवं होतं' या हळहळीत 40 रु चे खारे दाणे 200 रु ला मूठभर खाऊन बाकी डिश टाकून देऊन काढली.तात्पर्य: ऑर्डर देताना मनात काही गृहीत न ठेवता घटक विचारणे.
एका अपरिचित व भिन्नलिंगी
एका अपरिचित व भिन्नलिंगी व्यक्तीशी संवाद साधायचा प्रयत्न केला होता. जाणीवपूर्वक केला होता. आयुष्यात एकदा हे पण करून पहायचं होतं म्हणून केला. एका बार मध्ये ह्या म्याडम भेटल्या होत्या. आपल्या मैत्रिणीसहित आल्या होत्या. ड्रिंक घेताना आमची नजरानजर होत होती. इकडून इंटरेस्ट होता तिकडून पण दिसत होता. दोन पेग झाल्यावर मैत्रीण शोर्ट ब्रेकसाठी गेली तेंव्हा मी धाडस केले आणि उठून जवळ गेलो आणि अदबीने म्हटले "आपल्याला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते". ती पट्कन म्हणाली "सॉरी नॉट इंटरेस्टेड". मी म्हणालो "इट्स ओके. चिअर्स". झाले इतकेच. पुन्हा येऊन जाग्यावर बसलो. पुन्हा बघितले सुद्धा नाही.
लग्न
लग्न
मसाज पार्लर.
मसाज पार्लर.
मायबोलीकरांवर विश्वास अन
मायबोलीकरांवर विश्वास अन प्रत्यक्ष भेट
लोल.. अहो परिचित, पिक अप लाईन
लोल.. अहो परिचित, पिक अप लाईन चांगली वापरायची ना.
लगता है आपको कोई देखा है, काय ☺️
दुरीयानचा नुसता आर्टिफिशियल
दुरीयानचा नुसता आर्टिफिशियल फ्लेवर असलेले क्रॅकर्स खाल्ले होते. खरा दुरियानपण नाही. एक खाऊन बाकीचे फेकून दिले.
दुरीयानचा वास ही गोष्ट शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.
मला एकदा डुरिअन खायचं आहे.
मला एकदा डुरिअन खायचं आहे. असंख्य लोकांकडून असंख्यवेळा घाण घाण गोष्टी ऐकल्या आहेत. कोरिअन, एशियन, जॅपनिज, थाय, व्हिएतमानी... कुण्णी कुण्णी चांगलं बोलत नाही. तर हे आहे काय फळ याची फार उत्सुक्ता आहे. टीएनटी ला आता एकदा मुद्दाम ते शोधायला जाणार आहे.
दुरियन काय असत ?
दुरियन काय असत ?
दुरियान खाऊन कॉन्फिडन्स वाढल
दुरियान खाऊन कॉन्फिडन्स वाढल असेल तर surstromming खाऊन बघा !
खाऊन!!! त्याचे व्हिड्यू बघुन
खाऊन!!! त्याचे व्हिड्यू बघुन पोटात ढवळायला लागलं!
ऑफिसमध्ये दुरिअन चिप्स आणलेले
ऑफिसमध्ये दुरिअन चिप्स आणलेले. खाऊन मोरोबा म्हणतात तस शब्दात चव सांगण अशक्य आहे. ज्याने आणलेला तो गोरा अमेरिकन ६० चा को वर्कर होता. त्याला ते प्रचंड आवडलेले आणि तो नेहमी आणतो अस म्हणाला.
अमित H मार्ट आहे का तुमच्याकडे? कोरिअन दुकान ? तिथे बरेच दुरिअनचे प्रोडक्ट असतात आणि दुरिअन पण.
एच मार्ट ट्रांटोला आहे, गावात
एच मार्ट ट्रांटोला आहे, गावात नाही.
टीएनटीला मिळाले पाहिजेत. तिकडे चिप्स आणि केक्स इ. दिसताहेत. मला ते फळच खायचं आहे म्हणजे बकेट लिस्ट टिक होऊन जाईल.
शेपू आंबा खाववत नाही तर
शेपू आंबा खाववत नाही तर दुरिअन कुठे.
वनट्रीहिलपॉइंट बोरगावमार्गे करताना वाटेत भरपूर आंबे पडलेले दिसले. बस एकच चावा घेतला आणि मग कळले कुणी नेले का नाहीत. आंबटढस्स.
पुण्यात एक सुप्रसिद्ध थाळी
पुण्यात एक सुप्रसिद्ध थाळी नाव ऐकून खाल्ली, परत नाही खाणार, एकतर घरात तयार होणारे सगळे पदार्थ ते ही आई तर सोडाच बायकोही जब्बर चविष्ट बनवत असताना तसले पंधरा पदार्थ अर्धीही चव नसताना मोठ्या थाळीत घेऊन तिच्यासाठी ५००-५५० रुपये मोजणे हा मूर्खपणा परत होणे नाही आमच्याकडून.
अर्थात पहिले झालेली चूक म्हणून सोडतो, दुसऱ्यांदा जाणे मूर्खपणा असेल तो मी नक्कीच करणार नाही.
जेम्स वांड>>>
जेम्स वांड>>>
सेम अनुभव, आकुर्डी चौकात नैवेद्यम ची थाळी पहिली आणि शेवटचीच.
आज संकष्टी आहे बहुधा.
आज संकष्टी आहे बहुधा. त्यावरून आठवले. एकदा अंगारकीला सिद्धीविनायकच्या दर्शनाला गेलेलो. तिथल्या गर्दीत मरता मरता वाचलेलो. पण तेव्हा ठरवले. पुन्हा असला आगाऊपणा करायचा नाही. नंतर मी नास्तिकच झालो म्हणा. त्यामुळे तो मोहदेखील झाला नाही.
कदाचित ईथे लिहिलाही असेल किस्सा. नसेल तर कधीतरी फुरसतमध्ये लिहितो.
काश्मीर ला गुलमर्ग ला जाऊन
काश्मीर ला गुलमर्ग ला जाऊन हिमालयाच्या सेकंड लेव्हल ला जाऊन गाईड / स्लेज गाडी हायर करणे. मुळात परत गुलमर्ग ला जाईन असेही वाटत नाही. नुकतेच तिथून चेंगराचेंगरी झाली त्यातून कशीबशी बाहेर पडले. वर रुन्मेष ने लिहिलंय तसं चेंगराचेंगरीत मरता मरता वाचले.
अवांतर : हे सिद्धिविनायकचं रुन्मेष ने पान 2 वर ऑलरेडी भन्नाट भास्कर नावाने लिहिले आहे. रिपीट टेलिकास्ट.
वीकेंडला भुशी डॅम
वीकेंडला भुशी डॅम
पियु, गुलमर्ग सेम पिंच. मी तर
पियु, गुलमर्ग सेम पिंच. मी तर सेकंड फेजला पण नाही गेले. मूर्खपणा आहे सगळा तिथे.
मागे एक्दा आमच्या सुकडू
मागे एक्दा आमच्या सुकडू सुताराकडून कपाटाची दुरुस्ती करून घेतली होती. कपाट दुरुस्त करायचं सोडून ह्याच्या बाकीच्याच उचापत्या जास्त. म्हणे एष्टीनं धर्मा मांडवकराच्या म्हयशीला उडवलीन, ते बघायला गेलो होतो! असल्या कामचुकार लोकांकडून काम करून घेण्यापेक्षा मग स्वतःच आयटीआयचा कोर्स केला. त्यात उत्तेजनार्थ पदवी मिळवून ही कामं स्वतःच करायला लागलो.
Pages