अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?

Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24

Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.

१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.

२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!

तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, गव्हाचा चीक म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटले. तुम्ही काहीतरी दुसरेच ट्राय केले असेल. मस्त लागतो. आणि खुप पौष्टिक देखील असतो.

मला लग्नापूर्वी विरार स्टेशन वर मिळते तसे वाटाणा पातळ उसळ वर कांदा फरसाण हेच मिसळ म्हणून खायची सवय होती आणि तेच माहित होतं.
लग्नानंतर मला आवडते म्हणून खास मिसळ करण्यात आली तेव्हा मला शोध लागला की कांदा,टॉमेटो,कोथींबीर्,लसूण्,खोबरं वाटण परतून जास्तीत जास्त तवंग येईल अश्या लिक्वीड कंटेंट मध्ये फरसाण आणि उकडलेली मोडाची मटकी याला बाकी सगळ्या जगातलं पब्लिक मिसळ म्हणतं Happy पहिल्यांदा 'हे पाणी काय खायचं' म्हणून वैतागले होते.पण आता या खर्‍या दणदणीत पाणी+शेव्+दही+मोड मटकी+उकडलेला बटाटा वाल्या घरगुती आणि बाहेरच्या मिसळीची सवय आणि आवड निर्माण झालीय. मिसळीत बनवलेले कांदापोहे/ बनवलेली पिवळी बटाटा भाजी मात्र स्त्रिक्ट नोनो.
अजूनही महाराष्ट्रात नवी आलेली उत्तरप्रदेशीय माणसं 'ये क्या मिसल बोलके बाऊलभर स्पायसी पानी शेव डालके पाव के साथ देते है, खायेंगे कैसे' म्हणून वैतागतात तेव्हा माझी आठवण येते.

'अन्नपूर्णा' पुस्तकात एक रेसिपी वाचली होती. आमरस भरून केलेला पापलेट!!! Uhoh

वाचूनच कसंसं झालेलं. कधी करून पाहिला नाही. आणि कधी खाणारही नाही.

नुसत्याच बिया नाही किडेदेखील रगडलेले असतात. हाय प्रोटिन कंटेंट. >> बोलायच म्हणजे काहीही बोलाव का? अस तर मग बाजारात मिळणारे कुठलेही खाद्य पदार्थ तयार करताना त्यात किती "हाय प्रोटिन कंटेंट" असत असेल.

बोरकुट वाले केळकर हे माझे पणजोबा आहेत. }}}

केळकर सोडून इतरही अनेक जण बोरकूट बनवितात. बायदवे, केळकर बोरकुटाच्या रॅपरवर (https://www.pikcat.com/media/BaocOASngze) जसा एफएसएसएआय नंबर छापलेला दिसतोय तसा इथे (https://www.indiamart.com/shri-ramsuraj-agro/products.html#25-kg-ber-powder) राज बोरकुटाच्या रॅपरवर दिसत नाही. तेव्हा त्याच्या दर्जाबद्दल खात्री देता येत नाहीत. याशिवाय बाजारात विकल्या जाणार्‍या इतर फूड प्रॉडक्ट्सच्या कच्च्या मालाच्या तुलनेत बोरांमध्ये किडक्या फळाचे प्रमाण फार जास्त असते.

आमच्या शाळेबाहेर चणे, फुटाणे, हि असली बोरं, उकडून सोलून तिखट मीठ लावलेले बाळ बटाटे, कच्च्या चिंचा, गूळ शेंगदाण्याचे लाडू चिक्की अन रेअरली लिमलेटच्या अब गटागट च्या गोळ्या, अन हो, अस्सल खानदेशी अमुन्या विकायला एक आज्जी बसायची..

आ. रा. रा. कुठल्या शाळेत होतात तुम्ही??? कारण माझ्या शाळे समोर ही सेम कंडिशन.

अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे स्वतःचा बावळटपणा उघड करावा लागणार आहे. यातील बहुतेक गोष्टी उत्सुकता म्हणून नव्हे तर मूर्खपणा म्हणून माझ्या हातून घडल्या. शिवाय त्यातल्या काही अनेक वेळा घडून व्यवस्थित नुकसान झाल्यावर अक्कल ताळ्यावर आली.

१. एका नातेवाईकाला काम करत असलेल्या कंपनीतून ओळखीने कंप्युटर घेऊन दिला. नातेवाईकाने पैसे देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. उगाचच उशीरा पैसे देणारी माणसे असतात "कमा कमाके देंगे" कॅटेगरीतील. तशी ही व्यक्ती असेल असे आधी लक्षात आले नव्हते. प्रचंड मनस्ताप झाला होता. कंपनीत अब्रु जायची पाळी आली होती. इथे मात्र कानाला खडा लावला. पुन्हा कधीही ओळखीने कुणाला काही घेऊन द्यायच्या भानगडीत पडलो नाही.
२. काम इंटरेस्टींग वाटल्यामुळे एका एनजीओची साईट वर्ष दोन वर्ष फुकटात चालवली. पण त्यांनी काही रसच घेतला नाही. पुढे त्यांनी दुसर्‍या कंपनीला साईट देताना मी रजिस्टर केलेले डोमेन सरळ मागून घेतले. साधे आधी विचारायचे, सांगण्याचे सौजन्यही दाखवले नाही की आम्ही दुसर्‍या कुणाला देत आहोत वगैरे. अशा लोकांशी संबंध नको म्हणून डोमेन देऊन टाकले आणि पुन्हा "वरलिया रंगा" न भुलण्यासाठी कानाला खडा लावला.
३. गुणी विद्यार्थी म्हणून एकदोघांना स्वतःचे पैसे खर्च करून वेबसाईट बनविण्यासाठी मदत केली. पुढे त्यांनी काहीच केले नाही. माझे पैसे वाया गेले. इथेही कानाला खडा. आता मदत करतो पण स्वतःचे पैसे मात्र त्यासाठी खर्च करत नाही.
४. समाजशास्त्रात संशोधन करण्याआधी एका प्रोजेक्टवर काम करताना एका समाजावर डॉक्युमेंटरी फिल्म तयार करण्याचे ठरले होते.पुढे त्या फिल्मचे काय झाले कळले नाही. काही भाग मी शूट केला होता. शूटींगसाठी उत्साही असलेल्या त्या माणसांचा मी गुन्हेगार आहे असे मला वाटते. त्यांनी आपली फिल्म निघणार म्हणून हौसेने मदत केली होती. आता दुसर्‍या कुणाच्या सांगण्यावर विसंबून राहुन लोकांना कसलेही आश्वासन देणार नाही. कानाला खडा.
५. अतिशय उच्चभ्रू कॉलेजात शिकवायला लागल्यावर तेथले वातावरण बघून न्युनगंड यायचा. त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करून त्यांच्यातलं व्हावं असं वाटायचं. माकड झालं होतं माझं त्यावेळी. नंतर त्यातल्या काहींचे खरे चेहरे दिसल्यावर सारे प्रयत्न थांबवले आणि कानाला खडा लावला.
६. एखादी गोष्ट समजवून सांगितली, त्यामुळे किती नुकसान होते ते दाखवून दिले की माणसांना पटते असा गैरसमज मुक्तांगणमध्ये येणार्‍या व्यसनी मंडळींनी दूर केला. काही गोष्टी या त्या व्यक्तीलाच आतून पटाव्या लागतात. तेथे आपला काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आग्रहीपणाच्या बाबतीत कानाला खडा.
७. संशोधनाने दिलेला एक महत्वाचा धडा. आपल्याला जे योग्य आणि महत्वाचं वाटेल ते इतरांना वाटेलंच असं नाही. त्यामुळे पुन्हा आग्रहीपणाच्या नावाने कानाला खडा.

दुनियादारी आल्यापासून गेले कित्येक वर्षे माझी एकच रिंगटोन आहे.. आणि तीच माझी अलार्म टोन देखील आहे.. टिकटिक वाजते डोक्यात.. धडधड वाढते ठोक्यात.. ती एवढी डोक्यात बसली आहे की एक न सुटणारी सवयच झाली आहे.
एकदा कधीतरी म्हटले आता बस्स.. बदलूया.. आणि बदलली
त्यादिवशी ना कुठला कॉल आलेला कळला ना सकाळी अलार्म वाजल्यावर जाग आली..
बस्स मग ठरवले. आता पुन्हा कधी रिंगटोनशी छेडछाड नाही _/\_

मला ते गाणं भयंकर लहान मुलांचं बडबडगीत वाटतं.
शिंपल्याचे शोपीस नको वगैरे.
रोमँटिक गाणं जरा जास्त चांगलं असायला हवं होतं.

Ditto - मी एकदाही पूर्ण ऐकू नाही शकलो. लहान मुलांचा कोरस डोक्यात जातो, सोनू चांगला गायलाय.

ते एक संदिप सलील चं गाणं आहे ते पण लिरीक्स मुळे डोक्यात जातं.
तसं ऐकायला चांगलं आहे. खूप शब्दांचं जगलिंग केलंय.

मीही हट्टी माझ्या कडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी(हा नक्की सी आय डी मधला डॉ साळुंके असेल Happy आणि मुलगी प्रेटी डॉ सारिका), बाणाच्या दिशेत उडणारे बगळे, विसरलेली संकेतस्थळे वगैरे वगैरे.

पण म्हटलंय मस्त.एकदम कळवळून.दु:खी असाल तर जाम भिडतं आणि नडतं.

अतुल ठाकुर, अगदी अगदी. सेम गोष्टी अनुभवल्यात पण अजुन अक्कल आलेली नाही. मी करतो या चुका परत परत. करत राहीन.
टिकटिक वाजते डोक्यात Biggrin

हो गाणे छानच आहे ऐकायला.स्मरणांच्या वाटांनी वाल्या ओळी ऐकताना अंगावर काटा येतो.ताना पण मस्त.
आमच्या काही पांचट नातेवाईकांनी त्या तुटले....... च्या आधी वेगळे काही शब्द लावून गाण्याची उडवल्याने गाण्यातला इंटेन्स पणा गेलाय माझ्यासाठी इतकेच Happy

काही प्रामाणिक प्रतिसाद आवडले. धाग्याचा विषयही आवडला.

मी एकदा ठाण्याहून स्कूटीने मुं.युनिव्हर्सिटी कलिना कॅम्पसला गेले होते. एल.बी.एस. रोडने !
परत कधी नाही जाणार. Proud

कोणीहि मसाज पार्लर, विवाह बाह्य साहस किंवा इतर डार्क साईड्स बद्धल लिहिले नाहीय. खूपच गोड गोड गोष्टी आहेत सर्वांच्या.

{{{ कोणीहि मसाज पार्लर, विवाह बाह्य साहस किंवा इतर डार्क साईड्स बद्धल लिहिले नाहीय. खूपच गोड गोड गोष्टी आहेत सर्वांच्या.
नवीन Submitted by कटप्पा on 13 July, 2018 - 18:46 }}}

कटप्पा पण मग ते धाग्याच्या शीर्षकाशी

{{{ अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?}}} मॅच होणार नाही.

१. सुपारी खाल्ली होती ,, कसंतरीच झालं .. नाही खाणार आता
२. बस मध्ये गाढ झोपले होते , माझा स्टॉप गेला , मग पुढे उतरावं लागलं , चालत घरी यावं लागलं दूर
त्यामुळे आता सावध झोपते बसमध्ये, किंवा मला उठव असं सांगून झोपते कुणालातरी
३.आधीच्या कंपनीमध्ये सहकर्मचाऱ्याबरोबर मैत्री केली होती , त्याचे वेगळेच भयावह परिणाम झाले
आता "फक्त प्रोफेशनल वागणे" असं ठरवलंय

मला ते गाणं भयंकर लहान मुलांचं बडबडगीत वाटतं.
शिंपल्याचे शोपीस नको वगैरे.
रोमँटिक गाणं जरा जास्त चांगलं असायला हवं होतं.
>>>

786 डिग्री उलटी आवड आणि मत Happy
मला तर त्या बडबड गीत टाईप्स शब्दांमुळे च जास्त आवडते.
नाहीतर तेच घिसेपीटे शब्द वापरून वर्षानुवर्षे प्रेमगीते लिहीली जातात जी निव्वळ चालींमुळे चालतात ईतकेच. हे गाणे खूप जवळचे वाटते. आवड्त्या मुलीला पाहताच साधेसोपे शब्द आणि साधीसोपी पण रोमांटीक चाल असलेले हे गाणे नकळत डोक्यात वाजू लागते. आणि गंमत म्हणजे भयंकर अवीट गोडी आहे याची. चाल आणि सोनूचा आवाजही.. एवढ्या वर्षात ना मी वैतागलो ना माझ्या आसपासचे कोणी
त्यातही गाण्यातील हळूवारपणा पर्रफेक्ट फॉर रिंगटोन आणि अलार्म. लहान मुलांचा कोरस वगैरे अर्थात रिंगटोनला येत नाही.

लास्ट बट नॉट द लीस्ट...
स्वप्निल आणि सई .. और क्या Happy

"मित्रासाठी पदरमोड कर, परंतू जामीन राहू नको !"
हा अनंत फंदींचा फटका अगदी योग्य आहे.

एखाद्या मित्राला काही रक्कम उसनी देणे एकवेळ परवडले, फार तर ती रक्कम अक्कलखाती घालता येते.
पण जामीन ( मग तो कर्जाबद्दल असो वा उसनवारी बद्दल) हे गणितातल्या x tends to infinity सारखे कितीही रकमेला चुना लागू शकतो. मनस्ताप वेगळाच. आप्ल्या ओळखीने एखाद्या माणसाला उधारीत काँप्युटर, कार असल्या वस्तू घेउ देणे हाही जामीनच. दुर्दैवाने हा धडा आपण फटक बसल्यावरच घेतो.

विकु, हो. मी पूर्वी एका जवळच्या मित्राला स्पष्टपणे नाही म्हंटलो होतो जामीन राहायला. तसा दुरावा वगैरे आला नाही पण तात्पुरता तरी राग आला असेल त्याला.

मुळात ही दुसर्‍याची जबाबदारी तिसर्‍याने घ्यायची हा काय प्रकार आहे आपल्याकडे? इथे क्रेडीट स्कोअर वगैरे वर सगळे असल्याने ती भानगड नाही. पण भारतातही ज्या लोन देत आहेत त्याची परफेडीची कुवत आहे का हे पाहणे यात जो रिस्क आहे तो बँकेनेच पूर्ण का घ्यायचा नाही? त्यातील आर्थिक फायदा फक्त बॅंकेचाच असतो ना?

फा, विकु,
मुद्दाम डिटेल्स लिहिले नाहियेत.
पण हे नुसत्या नात्यात किंवा थोड्या मैत्रीत कधीच पुन्हा करू नये असे प्रकरण आहे हे नक्की.

बिपिन्चन्द्र,
बँकेत पैशाला जामीन बद्दल बोलतो आहे.

बँकेत पैशाला जामीन बद्दल बोलतो आहे.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 13 July, 2018 - 21:28

मग तिथे मॅक्सिमम लायेबिलिटी ही रिपेमेंट अमाउंट (शिल्लक मुद्दल + व्याज) इतकीच असणार ना? की अजून काही घोळ आहे. म्हणजे मी एखाद्याला २५००० ला जामीन राह्यलो तर त्याने जितके हप्ते भरल्यावर हात वर केले ते वजा जाता उरलेली रक्कम व्याज + दंड यासह भरणे ही माझी जबाबदारी असेल ना?

थोडक्यात हे आपण आपले २५००० त्याला उसने दिल्यासारखंच आहे त्याने बँकेला ते परत केले म्हणजे ते आपल्याला परत मिळाल्यासारखेच समजायचे की...

भारतातही ज्या लोन देत आहेत त्याची परफेडीची कुवत आहे का हे पाहणे यात जो रिस्क आहे तो बँकेनेच पूर्ण का घ्यायचा नाही? त्यातील आर्थिक फायदा फक्त बॅंकेचाच असतो ना?
Submitted by फारएण्ड on 13 July, 2018 - 21:08

मोबदला घेऊन जामीन राहणारेही पाह्यलेत. त्याशिवाय काही जण बँक जी वस्तू तारण म्हणून ठेवून घ्यायला तयार नसते अशी वस्तूही स्वतःकडे सिक्युरिटी म्हणून ठेवून घेत (उदा. जुनी गाडी, लॅपटॉप, टीवी, फ्रीज इत्यादी) त्या वस्तुच्या किंमती इतक्या कर्जालाही जामीन राहण्याचा प्रकार असतो. आमच्या कंपनीतल्या एका कामगाराने अशाच प्रकारे केवळ मित्राला जामीन राहून वर्षभर त्याच्या मिक्सर, फ्रिज, कुलर इत्यादी वस्तू स्वतःच्या घरात वापरल्या आणि लोन रिपेमेंट झाल्यावर परत केल्या. दोघांचाही फायदा झाला. संबंधही बिघडले नाहीत.

Pages