Submitted by राजेश्री on 28 June, 2018 - 21:52
शब्दाविण नसते कविता
अन सुरांविण कसले गाणे
तसे तुजविण माझे असणे
अन तुजविण माझे जगणे...
श्वासांच्या मैफिलीत माझ्या
तुझेच सूर आळविते
जगण्याच्या तालामध्ये
तुझी चाल नित्य बांधते
तुझे हसणे माझी कविता
तुझे असणे माझे गाणे
तुजविण कसली कविता
तुजविन कसले गाणे
©राजश्री
२९/०६/२०१८
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुजविण करा ना!
तुजविण करा ना!
छान प्रयत्न!
छान प्रयत्न!
तुझविन, तुझविण, तुजविण या
तुझविन, तुझविण, तुजविण या तुजविन इसमेसे येकपे रेहना
छान आहे
छान आहे
शिर्षक जरा ऑकवर्ड आए.
शिर्षक जरा ऑकवर्ड आए.
सर्वांच्या सूचनेनुसार बदल
सर्वांच्या सूचनेनुसार बदल केला
सुचनाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार