आमच्या कडे टीव्ही नाही-

Submitted by अश्विनी शेंडे on 25 April, 2018 - 22:31

आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...
आजही त्याला टीव्ही घ्यावासा वाटलेला नाही- त्याचं क्रिकेट तो starsports.com वगैरे साईट्सवर बघतो. हॉलिवूडच्या सिरीज, जागतिक चित्रपट आम्ही युट्यूब वरून पाहातोच... पाहणं बंद नाही झालं, पण काय पाहावं ह्याचा रिमोट ख-या अर्थाने आमच्या हातात आलाय.जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो.. दैनंदिन मालिका, कुठल्या पार्टीला कोणी काय घातलं होतं, काय घातलं नव्हतं सारखी gossips, प्रेमी ने की खुद्खुशी, प्रेमिका बनी हत्यारन अश्या प्रकारच्या उठवळ बातम्या, सवंग राजकारणाचे बेचव तवंग आणि कानाचा कॅन्सर होईल असं संगीत असलेली नवी गाणी... हे सगळं आमच्या घरात ऐकू येत नाही... आमच्याकडे ऐकू येतं निलाद्री, अमित त्रिवेदी, किशोर कुमार, कुमार गंधर्व, आशा ताई, खळे काका, यान्नी, कॅथरिन macfee, रेहमान, भाईंचं हार्मोनियम, रशीद खान, झाकीर भाई, Kaushal S Inamdar , Vaishali Samant, कोक स्टुडीओ, नाच रे मोरा, कबीर, अबिदा, अभंग तुकयाचे, तलत, बीथोवन.... हे सगळं आमच्या घरात सुरु असतं... पेपर मध्ये आज काय वाचलं, Umesh Vinayak Kulkarni ने कसला अप्रतीम लेख लिहिला आहे एफटीआय वर.. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक आणि आजचा दिवस कसा गेला, जेवण कसं झालंय इथपासून आज काय किस्सा झाला... हे सगळे विषय येतात बोलण्यात... हां, बोलणं होतं... संवाद होतो... एकमेकांशी... ऑफलाईन संवाद... जिथे स्मायलीज आणि emoticon एकमेकांच्या चेह-यावर पाहतो आम्ही...
मी लहान होते, डेली सोप तव्हा नुकतेच पाय रोवू लागले होते... रोज एका विशिष्ट वेळी टीव्ही समोर बसायची सवय सगळ्यांमध्येच रुजायला लागली होती... शाळेतून घरी येऊन मी “रिश्तों के भी रूप बदलते है...नये नये सांचे मे ढलते है...” अशी सुरवात होणारं क्योंकी सांस भी कभी बहु थी अत्यंत आवडीने बघायला बसायचे... ducktales, small wonders आणि एकूणच टीव्ही बघत जेवणे, जेवता जेवता टीव्ही बघणे माझ्या दिवसातला महत्वाचा भाग बनून गेलं होतं... आईला त्याकाळी (आणि अजूनही) मी सहज गुंडाळायचे... त्यामुळे तिला जुमानत नव्हते- अखेर तिने बाबांकडे फिर्याद नोंदवली-
माझे बाबा म्हणजे सॉलिडच आहेत... सेन्सिबल freedom देणारे... ते म्हणाले मी बघतो... आई म्हणाली बघू नका... तो टीव्ही बंद करून टाका...
बाबा म्हणाले, नाही, आपण टीव्ही बंद केला तर ती तो पुन्हा लावणार... तिनेच तो बंद केला पाहिजे...एनीवे, मी बोलतो...
ते माझ्यापाशी आले, त्यांनी इथल्या तिथल्या गप्पा मारल्या... माझ्या सोबत बसून टीव्हीसुद्धा पाहिला... मग ब्रेक लागल्यावर म्युट केलेल्या टीव्हीकडे बघून म्हणाले...’’ ह्या जाहिराती तू सुद्धा लिहू शकतेस.. मालिकांचे हे संवाद तू सुद्धा लिहू शकतेस... इतकंच कशाला ह्यात अभिनय सुद्धा करू शकतेस....आवडेल तुला?” मी उठून उडीच मारली... ते हसले.. म्हणाले... “ मग तूच विचार कर... तुला इथे, टीव्ही समोर बसायचंय की समोर टीव्ही वर जायचंय...” मी त्यांच्याकडे बघितलं. ते उठून रूम बाहेर जात ते म्हणाले, “तुला टीव्हीच बघायचा असेल तर तुझं उत्तम चालू आहे. पण लोकांनी तुला टीव्ही वर बघावं अशी तुझी इच्छा असेल तर मात्र तुला काहीतरी वेगळं करावं लागेल.. आणि ते टीव्ही बघत राहिलीस तर नाही होणार....”
......................
............आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे.......... ठरवून घेतला नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋन्मेऽऽष ...काहिहि बोर...>> मी पण तसेच करते अहो. लॅप टॉपवर काहीही नेटफ्लिक्स वर लावून ठेवते. उदा विनीत भल्ला कुकरी सीरीज मग झोपून फोन वर नेट सर्फ, फेसबुक वाअ‍ॅ इन्स्टाग्राम सर्व करून झाले. की एक झोप पण काढते. मग डिनर बनवून आणते व मग व्हूट/ झी फाइव वर मालिका बघते. शनाया अमृता अक्षय इत्यादि. मग एक लास्ट सर्च माबो वर करून मग इ बूक वाचते नाहीतर ऐकते.

विनीत भल्ला शेफचे चुकीचे इंग्रजी व स्वैपाकातल्या चुका जाम विनोदी आहेत. इसको कौन दिया रे मिशेलिन स्टार हे माझे रोजचे वाक्य असते. पण हा व्हाइट नॉइज. टीव्ही आमचा गेम खेळायलाच उघडतो.

आशू२९
तुम्ही माझा तो दुसरा मोठा स्पष्टीकरणाचा प्रतिसाद वाचला का?
खरे तर ते आधी दोन ओळीत लिहिलेले नंतर एवढे विस्कटून लिहून होता होता मलाही वाटले एवढे कोणी वाचले तर बोअरच होईल Happy
तसदीबद्दल क्षमस्व !

असो, सांगायचा मुद्दा हा जर टीव्ही लॅपटॉप एकत्र जमत नसेल तर टीव्ही सोबत दुसरे काहीतर काम करत करत तो बघा. देन ईटस ओके, माझ्या घरात टीव्ही आहे हे सांगायला कोणाला काही कमीपणा वाटणार नाही Happy

Pages