आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे..ठरवून घेतला नाही.. सुरुवातीला हा निर्णय किंवा विचार जयच्या गळी उतरवायला वेळ लागला... टीव्ही नाही म्हणजे आपल्या जगण्यातला एक महत्वाचा हिस्सा नाही, आपण इतरांपेक्षा मागे राहू, आसपासच्या जगामध्ये, आपण जिथे काम करतो त्या इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आपल्याला कळणार नाही, अशी काहीतरी भावना त्याच्या मनात असावी... त्याला मी समजावलं, ट्रायल बेस वर हे करून बघूया, काही अडलं तर घेऊ की टीव्ही.. असं म्हंटल्यावर तो तयार झाला...
आजही त्याला टीव्ही घ्यावासा वाटलेला नाही- त्याचं क्रिकेट तो starsports.com वगैरे साईट्सवर बघतो. हॉलिवूडच्या सिरीज, जागतिक चित्रपट आम्ही युट्यूब वरून पाहातोच... पाहणं बंद नाही झालं, पण काय पाहावं ह्याचा रिमोट ख-या अर्थाने आमच्या हातात आलाय.जे चाललंय ते पाहाण्यापेक्षा जे पाहायचं आहे तिथपर्यंत आम्ही पोचतो.. दैनंदिन मालिका, कुठल्या पार्टीला कोणी काय घातलं होतं, काय घातलं नव्हतं सारखी gossips, प्रेमी ने की खुद्खुशी, प्रेमिका बनी हत्यारन अश्या प्रकारच्या उठवळ बातम्या, सवंग राजकारणाचे बेचव तवंग आणि कानाचा कॅन्सर होईल असं संगीत असलेली नवी गाणी... हे सगळं आमच्या घरात ऐकू येत नाही... आमच्याकडे ऐकू येतं निलाद्री, अमित त्रिवेदी, किशोर कुमार, कुमार गंधर्व, आशा ताई, खळे काका, यान्नी, कॅथरिन macfee, रेहमान, भाईंचं हार्मोनियम, रशीद खान, झाकीर भाई, Kaushal S Inamdar , Vaishali Samant, कोक स्टुडीओ, नाच रे मोरा, कबीर, अबिदा, अभंग तुकयाचे, तलत, बीथोवन.... हे सगळं आमच्या घरात सुरु असतं... पेपर मध्ये आज काय वाचलं, Umesh Vinayak Kulkarni ने कसला अप्रतीम लेख लिहिला आहे एफटीआय वर.. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक आणि आजचा दिवस कसा गेला, जेवण कसं झालंय इथपासून आज काय किस्सा झाला... हे सगळे विषय येतात बोलण्यात... हां, बोलणं होतं... संवाद होतो... एकमेकांशी... ऑफलाईन संवाद... जिथे स्मायलीज आणि emoticon एकमेकांच्या चेह-यावर पाहतो आम्ही...
मी लहान होते, डेली सोप तव्हा नुकतेच पाय रोवू लागले होते... रोज एका विशिष्ट वेळी टीव्ही समोर बसायची सवय सगळ्यांमध्येच रुजायला लागली होती... शाळेतून घरी येऊन मी “रिश्तों के भी रूप बदलते है...नये नये सांचे मे ढलते है...” अशी सुरवात होणारं क्योंकी सांस भी कभी बहु थी अत्यंत आवडीने बघायला बसायचे... ducktales, small wonders आणि एकूणच टीव्ही बघत जेवणे, जेवता जेवता टीव्ही बघणे माझ्या दिवसातला महत्वाचा भाग बनून गेलं होतं... आईला त्याकाळी (आणि अजूनही) मी सहज गुंडाळायचे... त्यामुळे तिला जुमानत नव्हते- अखेर तिने बाबांकडे फिर्याद नोंदवली-
माझे बाबा म्हणजे सॉलिडच आहेत... सेन्सिबल freedom देणारे... ते म्हणाले मी बघतो... आई म्हणाली बघू नका... तो टीव्ही बंद करून टाका...
बाबा म्हणाले, नाही, आपण टीव्ही बंद केला तर ती तो पुन्हा लावणार... तिनेच तो बंद केला पाहिजे...एनीवे, मी बोलतो...
ते माझ्यापाशी आले, त्यांनी इथल्या तिथल्या गप्पा मारल्या... माझ्या सोबत बसून टीव्हीसुद्धा पाहिला... मग ब्रेक लागल्यावर म्युट केलेल्या टीव्हीकडे बघून म्हणाले...’’ ह्या जाहिराती तू सुद्धा लिहू शकतेस.. मालिकांचे हे संवाद तू सुद्धा लिहू शकतेस... इतकंच कशाला ह्यात अभिनय सुद्धा करू शकतेस....आवडेल तुला?” मी उठून उडीच मारली... ते हसले.. म्हणाले... “ मग तूच विचार कर... तुला इथे, टीव्ही समोर बसायचंय की समोर टीव्ही वर जायचंय...” मी त्यांच्याकडे बघितलं. ते उठून रूम बाहेर जात ते म्हणाले, “तुला टीव्हीच बघायचा असेल तर तुझं उत्तम चालू आहे. पण लोकांनी तुला टीव्ही वर बघावं अशी तुझी इच्छा असेल तर मात्र तुला काहीतरी वेगळं करावं लागेल.. आणि ते टीव्ही बघत राहिलीस तर नाही होणार....”
......................
............आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे.......... ठरवून घेतला नाही...
आमच्या कडे टीव्ही नाही-
Submitted by अश्विनी शेंडे on 25 April, 2018 - 22:31
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
टी व्ही च्या मालिका बघणं
टी व्ही च्या मालिका बघणं आजकाल फारच त्रासदायक होऊ लागलं आहे. तेच ते असतं सर्व ठिकाणी.पण त्यामुळे टी व्ही बघूच नये अस नाही. मना चा ब्रेक वाला सल्ला आवडला
मस्त लिखाण आवडलं
मस्त लिखाण आवडलं
वा वा छान ललित!
वा वा छान ललित!
लोकहो हा ललितलेख आहे. आपलं काय ठरलंय ? विसरलात इतक्यात ??
तुमच्या बाबांची शिकवण आवडली!
तुमच्या बाबांची शिकवण आवडली!
फक्त टीव्ही बघणेच नाही तर सगळ्याच पॅसिव्ह ॲक्टिव्हिटीज ना लागू होती ती!
अर्रे हो! विसरलेच!
अर्रे हो! विसरलेच!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान आहे ललित.
काही प्रकरणात हे मान्य आहे.
.
घरी टी. व्ही. नसने आणि टी.
घरी टी. व्ही. नसने आणि टी. व्ही. दाखवल्या जाणार्या गोष्टीन्पासून दूर राहाणे ह्या वेग-वेगळ्या बाबी आहेत असे मला वाटते.
मला एक व्यक्ती अशी घरी टी. व्ही. नसणारी व्यक्ती मा हीत आहे, जेव्हा
महाविद्यालयात बाकीच्य समवयस्क मित्रान्मध्ये मिसळायची वेळ आली तेव्हा मात्र त्या व्यक्तीस "नमूना" म्हणून ठरवण्यात आले.
ती व्यक्ती शाळेत असताना टी. व्ही. घरोघरी आले होते आणि इन्टेर्नेट आलेले नव्हते. त्यामुळे एखादी जनरेशन ज्ज्या समान धाग्यान्मुळे जोडली जाते किन्वा सम्वाद सुरू होतो त्या ठिकाणी ती व्यक्ती म्यूट होत असावी. उदा. शक्तीमान, मोगली चे सन्दर्भ
जर त्या जनरेशन मधल्या कोणाला हे माहीत नसतील तर सगळेच आश्च्र्याने बघू लागायचे...
कुठल्याही गोष्टीचा किती वापर
कुठल्याही गोष्टीचा किती वापर करायचा हे कळलं किंव्हा त्यावर नियंत्रण ठेवता आलं म्हणजे कशानेच काही फरक पडत नाही. आमच्याकडे तीन टीव्ही आहेत अगदी सेपरेट रुम असते तसे सेपरेट टीव्ही.. पण मला जेंव्हा टीव्ही बघायचा तेंव्हाच बघते. नाहीतर तिकडे टीव्ही सुरू असतो आणि इकडे माझं काम मला त्याचा कुठलाही त्रास होत नाही
छान लेख. विचार पटले. कशाला
छान लेख. विचार पटले. कशाला हवा तो टिव्ही. आम्ही सुद्धा घरातील इडियट बॉक्स देऊन टाकला....आणी घरात होम थिएटर करुन घेतले. डॉल्बी सराऊंड साऊंड चा थोडा त्रास होतो पण त्याविषयी ग्रामोफोन \ रेडिओ \ म्युसिक सिस्टीम यावर कधी लेख आला तर त्यावेळी लिहिता येईल.
त्या तुमच्याकडे ऐकू न येणार्
त्या तुमच्याकडे ऐकू न येणार्या दैनिक मालिकांपैकी काहींची शीर्षकगीतं आणि काहींचे संवाद तुम्ही लिहिता ना? >>>> लेखिकेचे नाव वाचूनच हे कुठेतरी वाचलंय असं सतत वाटत होतेच. स्वातीची पोस्ट वाचून लक्षात आले .
सायो आणि मैत्रेयीशी सहमत . टीव्ही पेक्षा डेंजरस स्मार्टफोनच व्यसन आहे . टीव्ही बंद केला तरी एवढं काय वाटत नाही . पण स्मार्टफोन सारखा टुय टुय वाजतो त्याने अडीक्ट व्ह्यायला होते. माझ्यापुरतं मी स्क्रिन टाइम ठरवून घेऊन त्यावर अंमल मिळवण्याचे प्रयत्न चालू केलेत . लवकरच फुल कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं.
बरं.
एक टीव्ही घ्या.
केबल कनेक्शन घेउ नका.
म्हणजे, तुमच्या मोबाईलात जे काय चालतं ते स्क्रीन कास्ट करून नीट पाहता येईल. उगंच निअर अॅकॉमोडेशन फटीग अन मायोपिक चष्मा वगैरे भानगडी नकोत.
काय?!
जरा उशीरानेच प्रतिसाद देतेय..
जरा उशीरानेच प्रतिसाद देतेय...
मी जवळपास दोन वर्षं टिव्ही न घेता घरात मस्त वेळ एंजॉय केला. त्यावेळी माझ्याकडे स्मार्टफोनही नव्हता. होता फक्त लॅपटॉप, ज्यावर मी माझ्या अभ्यासापुरतं आणि रोज वर्तमानपत्रं वाचायला म्हणून नेटपॅक घेतलं होतं. डी-लिंक चं डोंगल आणि वोडॅफोनचं कार्ड. जास्तीत जास्त १ जीबी वापर होत असे. इतर वेळी रेडिओ, घरकाम आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी दीड वर्षाची असलेली माझी मुलगी (आता ४ पूर्ण) यात माझा वेळ जात असे. नवरा सकाळी ऑफिसला गेला की रात्री दीड ला यायचा, त्याचा दोन जेवणं + संध्याकाळचं हलकं खाणं असा स ग ळा डबा मी घरून सकाळीच देत असे. (हे शेड्यूल ८ महिने होतं). मुलगी दुपारी झोपली की अभ्यास, संध्याकाळी तिला घेऊन ग्राऊंडवर फिरवून आणणे, रात्री तिला गोष्टी सांगत जेवण, गाणी आणि स्तोत्रं म्हणत रात्रीचं तिला झोपवणं, पुन्हा अभ्यास आणि उरलाच वेळ तर इतर कुणाशी फोनवर थोड्या गप्पा. थोडी मायबोली.
त्यामुळे बघितला जातो. कधीकधी अजिबात दोनदोन दिवस बंदच असतो! फोन शक्यतो एकदा तरी लँडलाईनवरून वाजवून शोधावा लागतो. रेडीओ लेकीलाही आवडतो. आवर्जून लावला जातो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयुष्यातला पहिला स्मार्ट्फोन घेऊन काही महिनेच होतायत. अजूनही पुस्तकं आणि रेडीओ लाडकेच आहेत. आता वर्षभरापूर्वी पुन्हा एकत्र राहतोय साबा-साबुंबरोबर, टीव्हीच्या घरात
लायब्ररी लावली त्यामुळे पुस्तकं असतात. असो.
वा वा छान ललित!
वा वा छान ललित!
लोकहो हा ललितलेख आहे. आपलं काय ठरलंय ? विसरलात इतक्यात ??
Submitted by अमितव on 26 April, 2018 - 23:42
अर्रे हो! विसरलेच! Proud
छान आहे ललित.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Submitted by स्वाती_आंबोळे on 26 April, 2018 - 23:57
>>
.आमच्या कडे टीव्ही नाही-
.आमच्या कडे टीव्ही नाही- म्हणजे.......... ठरवून घेतला नाही...++११११![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हीही ठरवून घेतला नाही.. सहमत आहे.. छान लेख
माझ्या लहानपणी TV नव्हता
माझ्या लहानपणी TV नव्हता आमच्याकडे. आजोबा दर महिन्याला चांदोबा चंपक आणायचे .अश्या पुस्तकांचे २-३ गठ्ठे होते घरी त्यामुळे आपसूकच त्याच्यातून पुस्तके वाचली जायची तसेच त्याकाळी वर्तमानपत्रांमधून पुरवण्याहि चांगल्या दर्जाच्या असायच्या.या सगळ्यांमुळे एक फायदा झाला तो म्हणजे कल्पनाशक्तीचा विकास.टीव्ही समोर असताना बऱ्याचदा समोर इतकं वायफळ चाललेलं असतं की फक्त आपल्या डोळ्यांवर ताण येतो मेंदूवर नाही .टीव्ही वयस्कांसाठी कामाहून आल्यावरचं मनोरंजन असेल पण मुलांसाठी ते शाररिक आणि मानसिक वाढ खुंटवणारं मशीन आहे.
दीपू भाऊंचे बरोबर आहे.
दीपू भाऊंचे बरोबर आहे.
घरी गेल्यावर जेवण/ स्नॅक, मग घराबाहेरील अअॅक्टिविटीज उदा. व्यायाम / मुलीबरोबर पार्क, थोडा वेळ मैत्रिणींबरोबर गप्पा (ब र्या पैकी रोज खाली जमून चांगल्या गप्पा होतात. बर्याच कन्स्ट्रक्टिव अॅक्टिविटिज सुद्धा सुरु झाल्यात यातून आणि चालू आहेत) , मग बाकीच्यांचे जेवण, गप्पा, ऑफिसचे थोडेफार काम, आवराआवरी, झोप.. ह्यात रोज वेळ नसतोच.. वीकेंड ला वेळ मिळाला तरी चांगलं काही चाललं असेल ह्याची गॅरंटी नसते. इतर फिरण,काम, नातेवाईक्/मित्रमंडळी वगैरे गोष्टी, पोरीबरोबर अॅक्टिविटिज कर णे ह्या त विकें ड ही संपतो. (सुखात, आनंदात)
आम्ही फारसा टीवी बघत नसूनही घरातले इतर बघत असल्याने बातम्या, पकाऊ सिरियल्स चा जेवढा मारा होतो, तो नकोसा होतो अगदी.
त्यांचाही दोष नाही.. त्यांनी त्यांची कामे पार पाडलेली असतात. संध्याकाळी आम्ही घरी असल्याने बाकीचे टेंशन नसते - आणि वेळही मिळतो निवांत.
पण हॉल मधे ते आवाज असले (आणि हॉल आणि किचन, डायनिंग जोडलेले असले) की आपल्यालाही)त्याचा त्रास होतोच. इस्पेशियली मिळालेल्या वेळात मुले नकळत टीवी कडे बघायला लागली, नको ते रेफरन्सेस (नवर्याची बायको वगैरे) द्यायला लागली की.
आम्ही फारसा टीवी बघत नसूनही
आम्ही फारसा टीवी बघत नसूनही घरातले इतर बघत असल्याने बातम्या, पकाऊ सिरियल्स चा जेवढा मारा होतो, तो नकोसा होतो अगदी.
त्यांचाही दोष नाही.. त्यांनी त्यांची कामे पार पाडलेली असतात. संध्याकाळी आम्ही घरी असल्याने बाकीचे टेंशन नसते - आणि वेळही मिळतो निवांत.
पण हॉल मधे ते आ वाज असले (आणि हॉल आणि किचन, डायनिंग जोडलेले असले) की आपल्यालाही)त्याचा त्रास होतोच. इस्पेशियली मिळालेल्या वेळात म टीवी कडे बघायला लागली, नको ते रेफरन्सेस द्यायला लागली की.>>>>>>>>>>>>> नानबा +१००
काही प्रतिसाद अगदी सध्याचा
काही प्रतिसाद अगदी सध्याचा अमिताभ बच्चन आहेत
(सस्मित, हे तुम्हाला नाही, नाहीतर तुमच्या पाठोपाठ प्रतिसाद आला म्हणून तसे वाटायचे)
सध्याचा अमिताभ बच्चन>> >>>
सध्याचा अमिताभ बच्चन>> >>> बच्चनचं खुपच मनाला लावुन घेतलंय तुम्ही वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे तुम्ही टीव्ही नाही पण
अरे तुम्ही टीव्ही नाही पण बघताय टीव्हीच... टीव्ही वर जेंव्हा आपण फ्री आहोत तेंव्हा फालतू शिरेल असेल तर आपण बंद तरी करू आणि दुसरे काम करू. इथं तुम्ही स्वतःच नेफली किंवा हुलू वर तासन्तास सिसन्स बघता.. कंट्रोल तुमच्या कडेच आहे.
मी स्वतः गेम ऑफ थ्रोन्स hbo वर आठवड्याला एकदा एपिसोड बघायचो, कित्येक माझे परिचित असे आहेत की tv नाही hbo नाही, लॅपटॉप किंवा ipad वर बँक टू बॅक बघतायत एपिसोडेस, अक्खा विकेंड.
ठरवून tv घेत नाहीत, जास्तीत जास्त टाईम वाया जावा ऑनलाइन म्हणून.
ठरवून tv घेत नाहीत, जास्तीत
ठरवून tv घेत नाहीत, जास्तीत जास्त टाईम वाया जावा ऑनलाइन म्हणून >>> बेश्टेय हे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझ्या 65" टिव्ही आहे रात्री
माझ्या 65" टिव्ही आहे रात्री आयपीएलच्या मॅचेस लागतात. दिवसभर कोणी नसत बघायला. मग माझा कंट्रोल म्हणा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
च्रप्स, मी सुरुवातीच्या
च्रप्स, मी सुरुवातीच्या पानावर तेच म्हटलंय. टिव्ही बघत नाही पण लॅपटॉपवर किंवा आयपॅडवर युट्युब व्हिडीओज बघतो, बाकी प्रोग्रॅम्स बघतो म्हणजे टिव्ही न बघण्यातून जे साध्य करु पहाताय ते होत नाही आणि इथे लेख लिहून बाकीच्यांना तसं सांगण्याचं प्रयोजन लक्षात येत नाही.
नवीन Submitted by च्रप्स on 4
नवीन Submitted by च्रप्स on 4 May, 2018 - 17:25
^^^ जियो मेरे लाल! लौ यु फॉर दिस!
मस्त मनोरंजन झाले प्रतिसाद
मस्त मनोरंजन झाले प्रतिसाद वाचून.
मी आता टीव्ही लावून त्यावर
मी आता टीव्ही लावून त्यावर एक मस्त सौऊथ ईंडियन पण राष्ट्रभाषेत डब केलेला चित्रपट लावला आहे आणि लॅपटॉप उघडून मायबोलीवर ऑनलाईन आलो आहे. याला बोलतात टाईम मॅनएजमेंट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकावेळी माझी दोन्ही कामे होत आहेत, आणि एकावेळी माझी नजर एकाच स्क्रीनवर असणार आहे. डोळ्यांनाही त्रास निम्मा.
एकावेळी माझी नजर एकाच
एकावेळी माझी नजर एकाच स्क्रीनवर असणार आहे. डोळ्यांनाही त्रास निम्मा. << कस?
जर मी तो चित्रपट दोन तास
जर मी तो चित्रपट दोन तास पाहिला आणि त्यानंतर मायबोलीवर उनाडक्या करायला दोन तास लॅपटॉप वापरला, तर माझा दोन प्लस दोन चार तास वेळ जाणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसेच माझी नजर दोन तास त्या चित्रपटासाठी टीव्ही स्क्रीनवर आणि दोन तास मायबोलीसाठी लॅपटॉपवर अशी चार तास दुखणार.
आता मात्र मी दोन तासांतच चित्रपटही बघतोय आणि साईडबाय साईड ईथेही बागडतोय
जेव्हा क्रिकेटची मॅच असते तेव्हा तर हमखास असे करावे. कारण दर दोन चेंडूच्या मधला वेळ आपण उगाच टीव्हीची स्क्रीन बघत असतो. ज्याची काही गरज नसते. बॉलरने बॉल टाकला, काय तो शॉट मारला, रन्स धावले वगैरे झाले ईतपत ठिक आहे. त्यानंतर फिल्डरने घासून पुसून बॉलरला बॉल देणे, आणि त्याने लांबून धावत येत बॉल टाकताना बघत आपण फुकट डोळ्यांना त्रास करून घेत असतो.
तसेच मायबोली स्क्रीनही सतत बघायची गरज नसते. कुठेतरी लिंकवर क्लिक केल्यावर ती उघडताना, पेज रिफ्रेश करताना, स्क्रॉल करताना, एखादी पोस्ट लिहायच्या आधी काय लिहावे हा विचार करताना, शब्दांची जुळवाजुळव करताना, वगैरे आपण स्क्रीनकडे बघितलेच पाहिजे असे नसते. तसेच टाईपिंगवर हात बसला की एकीकडे टीव्हीवर चित्रपट वा मॅच बघताही दुसरीकडे टाईप करता येते.
सायो.. आपला प्रतिसाद सहमत आहे
सायो.. आपला प्रतिसाद सहमत आहे.
ऋन्मेऽऽष ...काहिहि बोर...
ऋन्मेऽऽष ...काहिहि बोर...
Pages