Submitted by Nikhil. on 3 February, 2018 - 01:25
स्वप्न ते खरे नव्हते
काल रात्री दिसले होते
हातात हात तुझा होता
नभी चांदणे भरले होते
पोर्णिमेचा चंद्र ही
फिका वाटत होता
तुझ्या चेहऱ्यास जेव्हा
मी हाती धरले होते.
वारा ही थंडगार
पण शांत वाहत होता
शहारल्याने मज तु
मग मिठीत भरले होते
पाणीदार डोळ्यांत जेव्हा
माझे काळीज गुंतले होते
तुझ्या लाजुन गोड हसण्याने
सहज त्यांस सोडवले होते.
अवचित तुझ्या आवाजाने
ते स्वप्न भंगले होते.
जेव्हा जागा झालो तेव्हा
तुज सामोरी पाहिले होते.
- निखिल ०३-०२-२०१८
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह ! मस्त
वाह ! मस्त
काहीही नाही आवडली
काहीही
नाही आवडली
वाह! सुंदर.
वाह! सुंदर.
अंबज्ञ,समाधी,अक्षय
अंबज्ञ,समाधी,अक्षय प्रतिसादाबद्दल धन्यवाद
समाधी पुढच्यावेळी चांगला प्रयत्न करेन धन्यवाद
खुप छान पंडितजी..
खुप छान पंडितजी..
नाव बदलय का तुम्ही?
धन्यवाद अजयजी.
धन्यवाद अजयजी.