इंपोर्टेड गुरु
मार्को च्या आणि माझ्या ओळखीला आता पाच वर्षे झाली डिसेंबर मध्ये. पहिल्या भेटीत जी गट्टी जमली ती तशीच आहे , किंबहुना अजून घट्ट झाली आहे. २०१२ हे माझ NIV (National Institute of Virology) तलं शेवटच वर्ष आणि शेवटच्या सेम मध्ये रिसर्च प्रोजेक्ट करायचा असतो. आता त्यावेळी प्रोजेक्ट्स च्या नावाच्या चिठ्ठ्या उचलून प्रोजेक्ट मिळायचा. पण मुळात मला ते human virology चे प्रोजेक्ट्स बोर व्हायचे, त्याचं त्या एलायझा टेस्ट्स, immunoblotting आणि काय काय ऍसेज. viral disease बरा करून अक्ख्या मानवजातीला मदत करावी वगैरे उदात्त हेतू कधीही नव्हता, त्यामुळे तिसऱ्या सेम पासूनच मनात विचार चालू होता कि काय करायचे. शिवाय सगळीकडे lab पार्टनर किऱ्या असल्याने मी चुकूनही कधी प्रक्टीकॅल्स केली नाहीत, सगळ तोच करायचा, त्यामुळे तो हि एक प्रश्नच होता. पण नेमक त्याच दरम्यान “7000 years of the Emiliania huxleyi viruses in the Black Sea” हा मार्को चा पेपर “सायन्स” मधून पब्लिश झाला. त्या पेपर ने माझ्यावर एवढी मोहिनी घातली कि काय सांगू. Marine virus, ancient DNA आणि Paleo-climate असे तीन एकदम आवडीचे विषय एकत्र आणणारा तो पहिला वहिला पेपर होता. मी लगेच मार्को ला इमेल केला कि “भाऊ, तो पेपर पब्लिश केलायस तसं काम मला बी करू देशील का?” लगेच त्याने skype मीटिंग घेतली आणि डायरेक्ट मला वूड्स होल ला Woods Hole Oceanographic Institution मध्ये रिसर्च प्रोजेक्ट करायला येण्यासाठी स्कॉलरशिप दिली.
मी म्हणजे आनंदाने खुळा झालो, प्रोजेक्ट साठी बाहेरच्या lab मध्येच नव्हे तर बाहेरच्या देशात जाणारा NIV त मी पहिलाच ठरलो. ह्या मनुष्याने माझे मार्क्स विचारले नाहीत कि काही नाही. त्याच्यासाठी रिस्क च होती ही. मी नंतर विचारल पण त्याला कि कस काय बुवा तू नुसत्या ईमेल वरून मला जज केल. मला म्हटला ”एक तर मार्कातून माणसाचा इंटरेस्ट दिसत नाही आणि इंटरेस्ट दिसला तर मार्क्स बघायची गरज काय? शिवाय हे अमेरिकेत मार्क्स बघून सगळ ठरवतात ते माझ्या डोक्यात जात”. म्हटल धन्य आहे. १५ डिसेंबर २०१२ ला संध्याकाळी ५ वाजता मी वूड्स होल ला दाखल झालो. तर मार्को न्यायला आलेला. त्याने लगेच माझी bag उचलली. आता भारतात supervisor ने तुमची bag उचलली तर गावजेवण घालावं लागत इतका तो विरळ प्रसंग असल्याने तशी सवय नव्हती. म्हणून बावचळून त्याला नको नको मी उचलतो वगैरे असं कायतरी बोललो, पण तो म्हणजे, ३० तास विमान प्रवास दमून आला असशील उचलतो मी, bag सोड तू, असं म्हणून अगदी हक्काने bag उचलून चालू लागला. एवढा मोठा माणूस हा आणि असा कसा. मार्को मुळात डच. त्यामुळे तो तसाच धिप्पाड. एकदम गोरा. पिंगट डोळे. चार माणसांच्या वाटणीच नाक एकालाच दिल्यासारखं जटायुच्या चोचीसारख मोठ बाणेदार नाक. आणि प्रोफेसर स्नेप सारखे मध्ये भांग पाडलेले कपाळावर रुळणारे केस. Ancient DNA च फिल्ड मार्को ने पहिल्यांदा establish केल. सेडिमेंट्स मध्ये जतन झालेला DNA जर isolate करून analyze केला तर त्यावेळच्या biological communities आणि त्यायोगे त्यावेळचे climate समजू शकते हे तर त्याने प्रुव्ह केलेच पण त्या समुद्री प्राण्यांना त्यावेळी कुठले कुठले infections होते याच जेनेटिक प्रूफ सुद्धा त्यानेच पहिल्यांदा दिला. जेव्हा miseq, hiseq अशी टेक्निक्स नव्हती तेव्हा सलग तीन तीन दिवस gel electrophoresis करून मिळणाऱ्या हजार तुकड्यातला प्रत्येक तुकडा individually analyze करायचा. सोप नाही ते पण त्यान ते केल. एवढा मोठा हा माणूस माझी bag उचलतो आहे.
पण मार्को हा जात्याच विनम्र माणूस आहे. म्हणजे विनम्रता दोन प्रकारची असते, एक म्हणजे स्वयंभू आणि दुसरी म्हणजे आपण मोठे होईल तसे विनम्रता आत्मसात करतो तशी पांघरलेली विनम्रता. हि जात्याच विनम्र माणसे दुर्मिळ असतात. वूड्स होल मध्ये थंडीत बर्फ कोसळतो अगदी ब्लीझर्ड्स येऊन सगळ बर्फाखाली येत. आणि मला स्वेटर घ्यायचं होत, आता त्या स्वेटर ची किमत एवढी होती कि आयुष्यभर एका किडनीवर काम चालवावे कि थंडीत गोरठून जावे हा एक गहन प्रश्न मला पडला. मार्को ने ते स्वेटर घेतले माझ्यासाठी. म्हणजे असंच. अशाच कितीतरी गोष्टी त्याने दिल्या, त्याची सायकल, त्याचा कॉम्पुटर, त्याची lab..... हो. त्याची lab पण. “म्हणजे सुनबाई हे घे घराच्या चाव्या, आता सगळ तूच सांभाळ ग पोरी” च्या थाटात मला lab देऊन टाकली. आम्ही डिस्कस करायचो सकाळी प्रयोग आणि ते मी दिवसभर करायचो. कधीही lab मध्ये चुकूनही येऊन मी काम करतोय का वगैरे बघणे असले फडतूस प्रकार मार्को ने केले नाहीत. विश्वास टाकला म्हणजे पूर्ण च टाकला. एकेक sample ४,००० डॉलर्स च होत, आणि एकूण मिळून ५०,००० डॉलर्स ची samples मी हाताळत होतो, कुठेच त्याने अविश्वास दाखवलाच नाही कधी. मला रोज सकाळी lab ला जाताना हा माणूस Cathy च्या घरी जिथे मी राहायचो तिथे न्यायला यायचा आणि संध्याकाळी सोडायला. शिवाय ८ तासाचा कामाचा दिवस म्हणून आठ तास काम करणे ही माझ्या आणि त्याच्या प्रकृतीच्या बाहेर, त्यामुळे ८ तासच काम ४ तासात करून उरलेला चार तास “आळस” ह्या अतिगोड संकल्पनेला वाहून घेणे हे आम्ही करायचो. कधी थंडीत स्वच्ह सूर्यप्रकाश पडला तर म्हणयचा काम राहू दे. आणि मी मार्को आणि त्याची बायको कोर्नेलीया आम्ही फिरायला जायचो बीचवर. दरवेळी वेगवेगळा बीच. आजूबाजूचे scientist जिथे वीकेंड ला पण स्वतः काम करायचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडून करवून घ्यायचे तिथे वीकडे ला पण उंडारायला घेऊन जाणारा हा माझा गुरु आगळा च होता. म्हणून कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा होता का तर अजिबात नाही. त्यावेळी एकूण १२०० PCR आणि २५० Miseq केले होते मी. त्यला फार अभिमान होता त्या गोष्टीचा, सगळ्याना सांगायचा त्यबद्दल. माझ्या PCR ला वेळ लागणार असेल तर स्वतः थांबायचा मला रात्री सोडण्यासाठी.
वागण्यात फुकटची गंभीरता कधीच नाही. आल्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच मला बाजूच्या lab मधल्या मुलीच्या नावाने चिडवायला सुरु केल होत साहेबांनी. दर वीकेंड ला पार्टी त्याच्या घरी. आयुष्यात जे काही थोडे चांगले मुव्हीज बघितले त्यातले बरेच मार्को आणि कॉर्नेलीया बरोबर बघितले. भारतीय जेवण जेव्हा मी करायचो तेव्हा माझ्या बरोबर हाताने खायचे आणि कधीही कमी तिखट कर आणि एवढ तेल घालू नको वगैरे टिपिकल फोरेनर टिप्पणी कधीही त्या दोघांनीही केली नाही. आणि सगळ च म्हणजे तळलेल्या पापलेट पासून साबुदाण्याच्या थालीपिठा पर्यंत आणि इडली पासून ढोकळ्या पर्यंत सगळ भारतीय चवीत खाल्लं. दोघांना मुलबाळ नाही पण दोघांनी मुलासारखी माझी काळजी घेतली. ५ महिने कधी संपले कळलच नाही.
आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी स्वत:ची म्हणून एक passion सापडते आणि यातच करीअर करायचं हे पक्क होत. ती passion मला तिथे सापडली. पुढे मार्को पर्थ ला शिफ्ट झाला आणि त्याचा पहिला PhD student म्हणून पण त्याने मलाच आधी बोलावण धाडलं. ज्या विषयात PhD करायची त्याचं विषयातला world expert तुम्हाला supervisor म्हणून मिळणे यासारखे भाग्य नाही. अजूनही आम्ही तसेच आहोत फक्त जागा बदलली. अजुनही आम्ही तिघे तसेच भटकायला जातो, वीकेंडला मुव्हीज बघतो कोर्नेलीया ने काही नवीन बनवल तर डबा भरून तो पदार्थ ठरल्यासारखा माझ्या डेस्क वर येतो. आताशा मार्को पेपर, प्रपोजल्स लिहिताना मला कडेला बसवून घेतो, काय लिहायचं आणि काय नाही हे शिकवतो अगदी मन लावून. नवीन कोणी विद्यार्थी आला तर त्याला ट्रेनिंग द्यायला मीच. बाकीच्या विद्यार्थ्यांना मार्को कडून काही हव असेल तर ते पण माझ्याच खांद्यावर बंदुक ठेवून विचारतात. आता PhD च शेवटच वर्ष. परवाच मीटिंग झाली. मला म्हटला “पुढच काय. आता यावर्षीच प्रपोजल जर accept झाल तर पोस्ट डॉक कर इथेच पण ते नाही झालं तर काय ठरवलयस? तुला भारतात कुठे जायचं आहे का? ज्या institutes मध्ये जायचं आहे त्यांची नावे मला सांग. त्यांच्याशी मी contact करतो. बघू आपण काय होतंय. तुझ career जोवर सेट होत नाही तोवर supervisor म्हणून मी शांत बसू शकत नाही” मी निशब्द! खर गुरु हा असाच असतो. गुरुंच्या बाबतीत मी फार फार लकी अआहे. सितारीचे सर आणि हा इकडे. आयुष्यात कधी तरी पैसा आणि passion अशी निवडायची तर passion च निवड हे ठासून सांगणारा हा माझा गोरा गुरु! मागच्याच वर्षी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला तेव्हा मी एक छोटीशी पार्टी दिली तेव्हा तो म्हणाला कि माझा मुलगा असता तर तुझ्यासारखाच असता!!! काय हवय अजुन. भविष्यात काय आहे हे मला माहित नाही पण गुरूची अशी साथ असेल तर सगळ आलबेल होईल यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
मस्त
मस्त
हैटस ऑफ!!
हैटस ऑफ!!
खरोखर लक्की आहेस कुलु!! असे गुरु मिळायला भाग्यच लागते. अर्थात तु ही त्यान्ना साजेसाच शिष्य असणार हे नक्की!
सिंडरेला, हर्षल, मंदार, लंपन,
सिंडरेला, हर्षल, मंदार, लंपन, बोबो, नयना तुम्हा सर्वांचे खुप खुप धन्यवाद!
भाग्यवान आहात कुलू.
भाग्यवान आहात कुलू.
तुमच्या या गुरूला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो. __/\__
किती सुंदर..! भाग्यवान आहेस..
किती सुंदर..! भाग्यवान आहेस...!
पियू , फुल खूप खूप धन्यवाद
पियू , फुल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल!
नशिबवान आहेस मित्रा!
नशिबवान आहेस मित्रा!
मलाही आतापर्यंत खुप छान गुरु भेटलेत. अगदी IIT पासुन ते जॉबमध्येही.
छान लिहिलंय! विनम्रतेविषयी
छान लिहिलंय! विनम्रतेविषयी लिहिलंय ते अगदी पटलं. आपण बरेचदा म्हणतो, "इतका मोठा माणूस पण आजिबात गर्व नाही." मला वाटतं की गर्व नाही म्हणूनच तर अशी माणसं मोठी वाटतात! It's part of their DNA.
इंटरेस्टिंग विषय आहे संशोधनाचा.. यावर अजून वाचायला नक्की आवडेल! आणि हो, डॉक्टरेटसाठी आगाऊ अभिनंदन!
किती सुंदर लिहिले आहे!!
किती सुंदर लिहिले आहे!!
असे गुरु मिळायला भाग्यच लागते. अर्थात तुम्हीही त्यान्ना साजेसाच शिष्य असणार हे नक्की! >>+१
खुप छान लिहिलंयस , असा गुरू
खुप छान लिहिलंयस , असा गुरू मिळायला भाग्यचं लागतं , पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
मलाही आतापर्यंत खुप छान गुरु
मलाही आतापर्यंत खुप छान गुरु भेटलेत. अगदी IIT पासुन ते जॉबमध्येही>>>> अग्निपंख वाह! त्यांच्याविषयी लिहा न तुम्हीपण वाचायला आवडेल.
मला वाटतं की गर्व नाही म्हणूनच तर अशी माणसं मोठी वाटतात!>>>>>> अगदी अगदी. आजच कुठेतरी वाचल कि जी माणसे आपल्याला लहान वाटु देत नाहीत तीच माणसे मोठी खरी!
इंटरेस्टिंग विषय आहे संशोधनाचा.. यावर अजून वाचायला नक्की आवडेल>>> >> जिज्ञासा , मला लिहायची ईच्छा होते खुपदा याविषयी पण लिहिताना मध्येच सगळ्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द मिळत नाहीत मग तो अर्धा इंग्रजी होतो लेख!
श्री आणि sonalisl तुमच्या प्रतिसादांबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खुप खुप धन्यवाद!
कुल्या पोरा नाव काढलेस हो!
कुल्या पोरा नाव काढलेस हो!
तुझा इम्पोर्टेड गुरू बेहद्द आवडला.
खुप सुंदर लिहीलय अजुन वाचायला
खुप सुंदर लिहीलय अजुन वाचायला आवडेल.
पुढील लेखनासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
लिहित रहा.
कुल्या पोरा नाव काढलेस हो! >>
कुल्या पोरा नाव काढलेस हो! >>>>>>> लई लई धन्यवाद ! ☺️
Mr. Pandit >>> खरंच खूप खूप धन्यवाद। पुढील मार्गासाठी शुभेच्छा गरजेच्या आहेतच।
मस्त लिहीलंय! छान लेख.
मस्त लिहीलंय! छान लेख.
भाग्यवान आहातच पण त्याबरोबरीने मिळालेल्या संधीचे सोनेदेखील करत आहात त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक >> +१
लेख आवडला!!
लेख आवडला!!
अतिशय आवडला मार्को.
अतिशय आवडला मार्को.
तुम्हा दोघांनाही आयुष्याचं सोनं करायची संधी मिळो!
कुलु .. खुपच सुंदर लिहलयसं ..
कुलु .. खुपच सुंदर लिहलयसं .. भाग्यवान आहेस
मस्त लिहीलंय!
मस्त लिहीलंय!
भाग्यवान आहातच पण त्याबरोबरीने मिळालेल्या संधीचे सोनेदेखील करत आहात त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक >> +१
विद्याजी, बस्के, चिन्नु, चनस
विद्याजी, बस्के, चिन्नु, चनस आणि मॅगी सर्वांचे खुप खुप धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
कुलु मस्त लिहिलय तुम्ही. आणि
कुलु मस्त लिहिलय तुम्ही. आणि तुमचे गुरू तर त्याहून भारी. तुमच्या भाग्यात गुरू आहे अस म्हणायला हरकत नाही. पुढील संशोधनासाठी शुभेच्छा.
डायनासॉरच्या डीएनए वरून खराच डायनसॉर तर बनवनार नाही ना तुम्ही लोक. एक आपली शंका विचारून घेतो.
विक्रमसिंह तुमच्या
विक्रमसिंह तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
डायनासॉरच्या डीएनए वरून खराच डायनसॉर तर बनवनार नाही ना तुम्ही लोक>>>>> अजुन तरी नाही. तेवढा इन्टॅक्ट डीएनए मिळाला तर नक्कीच करु पण! शक्यता कमी आहे पण अशक्य नक्कीच नाही!
कुलु मस्त लिहिलय तुम्ही. आणि
कुलु मस्त लिहिलय तुम्ही. आणि तुमचे गुरू तर त्याहून भारी. तुमच्या भाग्यात गुरू आहे अस म्हणायला हरकत नाही. पुढील संशोधनासाठी शुभेच्छा>+१११
मस्त लिहीलं आहेस कुलु!
मस्त लिहीलं आहेस कुलु!
तुझी ph D योग्य मार्गाने सुरू आहे हे वाचून छान वाटले. तुला शुभेच्छा! मेलबर्नला येणार असशील तर आधी कळव.
बर्याच दिवसांनी काहितरी मस्त
बर्याच दिवसांनी काहितरी मस्त वाचलं.. खुप दिवसांनी लेख आला कुलू..
यू आर वन लकी फेलो..
फार मस्त ओळख दिलीएस..
भाग्यवान आहात! लिहिल्व्हि
भाग्यवान आहात! लिहिल्व्हि चांगलेच आहे.
काम करत आहातच, माझ्या शुभेच्छा. पण असे शुभेच्छा, गुड लक पेक्षा तुमचे कामच महत्वाचे नि तेच तुम्हाला यश देईल.
खूप छान परिचय तुमच्या
खूप छान परिचय तुमच्या गुरुन्चा ! खूप नशीबवान आहात. तुमच्या कामासाठी शुभेच्छा!
कुलु, खरंय. पण काही वेळा
कुलु, खरंय. पण काही वेळा इंग्रजी शब्द वापरण्याशिवाय पर्याय नसतो.
वत्सला, नन्द्या, निर्मल, टीना
वत्सला, नन्द्या, निर्मल, टीना आपल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!
पण काही वेळा इंग्रजी शब्द वापरण्याशिवाय पर्याय नसतो.>>> जिज्ञासा एकदम खरच! लिहिन एकदा अॅन्शंट डीएनए विषयी सविस्तर!
मेलबर्नला येणार असशील तर आधी कळव.>>>> अग मी परवा न्यु इयर ला सिडनीला येउन गेलो तिथुन तसंच येनार होतो मेलबर्न ला पण एकच आठवडा सुट्टी होती पण पीएच्डी सम्पली कि यायचा प्लॅन आहे. नक्की कळवेन. तुच ये पर्थ ला तोवर!
aavadesh! Mast mast!
aavadesh! Mast mast!
Pages