Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 10:32
हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.
[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. ]
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाहाहा खरे आहे
हाहाहा खरे आहे
खरं आहे.
खरं आहे.
पण अचूक शब्दयोजना अशी असावी असे वाटते.
सत्ययुगात सात्विक विचार करून भागत नसे. प्रत्यक्ष पुण्यकर्म करूनच फलप्राप्ती होत असे. मात्र वाईट विचार जरी मनात आले तरी वाईट कर्म प्रत्यक्षात घडल्यासारखे कर्मफल मिळायचे.
कलियुगात बरोबर उलटे झालंय. चांगले विचार जरी मनात आले तरी ते लाभप्रद ठरतात. याउलट वाईट कर्म हातातून घडलं तरच त्याचे कर्मफल मिळते. मनात येणाऱ्या नुसत्या वाईट विचाराने त्याचे फळ भोगायला लागत नाही.
पण हेही लक्षात ठेवायला लागते की मनांत येणाऱ्या वाईट विचारांनी लागलीच फारसे बिघडत नसले तरी हे वाईट विचार वारंवार मनांत आल्याने कधीतरी एखाद्या बेसावध क्षणी वाईट कृत्य हातून घडून जायची शक्यता बळावते.
यासाठीच कलीयुगात सगळ्या प्रकारच्या उपासनांना प्रार्थनेची जोड द्यायला लागते. अगदी ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं कार्य पूर्ण झाल्यावर प्रार्थनेनीच (पसायदानानेच) सांगता केली आहे.
पण प्रार्थनेचे हे महत्वच लक्षात न आल्याने बऱ्याच जणांची उपासना अपेक्षेप्रमाणे फल देत नाही. मग उपासनेवरचाच विश्वास उडतो.
असं झालं की उपास्यदेवता बाजूला राहून कली प्रसन्न होत असावा.
मध्यंतरी एक संध्याकाळ 'शाबर
मध्यंतरी एक संध्याकाळ 'शाबर मंत्र' वाचण्यात सार्थकी घालविली. शाबर म्हणजे ग्राम्य, गावंढळ. तंत्र मार्गातील ही एक ग्राम्य शाखा आहे. भगवान शंकरांना आदिगुरु मानले जाते म्हणजे सर्व सिद्धांचे गुरु मागे बघत गेल्यास , उगम थेट शंभूशंकरापर्यंत जाउन थांबतो. तर पार्वतीस उदयगुरु म्हणतात. गुरु मच्छींद्रनाथ व गोरखनाथांना शाबर मंत्राचे जनक समजले जाते. सिद्ध आणि नाथ संप्रदायामध्ये संस्कृत् वगैरेला काट मारुन सरळ ग्रामीण भाषेतील श्लोकांना, मंत्रांचा दर्जा दिला गेलेला आहे. तर शाबर मंत्रांमध्ये शपथ आणि शाप दोन्हींचा उपयोग केला जातो, म्हणजे श्रद्धेला हात घातला जातो तर कधी धाकदपटशेने काम साध्य करुन घेतले जाते. होय मंत्रदेवतेला शिव्या, शापाची धमकी घालून वगैरे. म्हणजे इथे साधक जरी याचक असला तरी देवतेला धमकी देतो, अपशब्द बोलतो हे म्हणजे साधक जणू बालक आहे, व मंत्रदेवता जणू आई-वडील आहेत. बालकाने जर आईवडीलांना उद्देशुन अपशब्द बोलले तरी आईवडील रागावणार थोडेच आहेत? तर असे हे सरळ साधे नाते आहे. अनेक क्षेत्रिय भाषांच्या सरमिसळीने हे मंत्र बनलेत. सहसा मंत्रांचा शेवट - '‘शब्द साँचा पिण्ड काचा, फुरो मन्त्र ईश्वरी वाचा’ ' या ओळीनेही होतो. याचा अर्थ शब्द अक्षय आहे, तर देह नाशवंत आहे.
शब्द अक्षय आहे या उक्तीवरुन सहजच गुरबाणीमधील 'एक ओंकर, सत नाम, ...' कोणाला आठवेल. आणि ते तसे आठवले तर वावगे नाही.
ॐ इक ओंकार, सत नाम करता पुरुष निर्मै निर्वैर अकाल मूर्ति अजूनि सैभं गुर प्रसादि जप आदि सच, जुगादि सच है भी सच, नानक होसी भी सच –मन की जै जहाँ लागे अख, तहाँ-तहाँ सत नाम की रख ।
चिन्तामणि कल्पतरु आए कामधेनु को संग ले आए, आए आप कुबेर भण्डारी साथ लक्ष्मी आज्ञाकारी, बारां ऋद्धां और नौ निधि वरुण देव ले आए ।
प्रसिद्ध सत-गुरु पूर्ण कियो स्वार्थ, आए बैठे बिच पञ्ज पदार्थ ।
ढाकन गगन, पृथ्वी का बासन, रहे अडोल न डोले आसन, राखे ब्रह्मा-विष्णु-महेश, काली-भैरों-हनु-गणेश ।
सूर्य-चन्द्र भए प्रवेश, तेंतीस करोड़ देव इन्द्रेश ।
सिद्ध चौरासी और नौ नाथ, बावन वीर यति छह साथ ।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ो गई भाग समुन्द्रों पार ।
अटुट भण्डार, अखुट अपार । खात-खरचत, कछु होत नहीं पार ।
किसी प्रकार नहीं होवत ऊना । देव दवावत दून चहूना ।
गुर की झोली, मेरे हाथ । गुरु-बचनी पञ्ज तत, बेअन्त-बेअन्त-बेअन्त भण्डार ।
जिनकी पैज रखी करतार, नानक गुरु पूरे नमस्कार ।
अन्नपूर्णा भई दयाल, नानक कुदरत नदर निहाल ।
ऐ जप करने पुरुष का सच, नानक किया बखान,
जगत उद्धारण कारने धुरों होआ फरमान ।
अमृत-वेला सच नाम जप करिए ।
कर स्नान जो हित चित्त कर जप को पढ़े, सो दरगह पावे मान ।
जन्म-मरण-भौ काटिए, जो प्रभ संग लावे ध्यान ।
जो मनसा मन में करे, दास नानक दीजे दान ।।”.
.हाच मंत्र घ्याना. यार गुरबाणीतील कितीतरी शब्दांच्या लडी समाविष्ट आहेत.
.
या मंत्राचा उगम असा आहे - द्वापारयुगात अर्जुनाने पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी शिवाची आराधना केली. शंकर प्रसन्न तर झाले पण त्यांनी अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. अर्जुनाने एक डुक्कर बाणाने मारले तेच डुक्कर त्याच वेळी एका पारध्याने मारले. आणि मग अर्जुनात व त्या पारध्यात झाले युद्ध सुरु. शेवटी कृष्णानेच अर्जुनास सावध केले की अरे जे तुझे आराध्य दैवत त्यावरच बाण चालवतोस? अर्जुनाने शंकरांना साष्टांग दंडवत घालुन माफी मागीतली व शंकरांनी त्याला पाशुपत अस्त्राचा वर दिला. आता झाले काय याच वेळी हे युद्ध पहात होती पार्वती. तिने भिल्लीणीचा वेश धारण केलेला होता. युध पहात असतेवेळी तिने अन्य भिल्ल जमातीबरोबरच मांसही ग्रहण केलेले होते. युद्धोपरांत ती आपल्या मूळ रुपात आली तेव्हा तिने त्या भिल्ल-पारध्यांना वर मागण्यास सांगीतले. तेव्हा ते ग्राम्य, अडाणी पारधी म्हणाले की माते ना आम्हाला व्याकरण येतं ना आमची भाषा शुद्ध आहे. संस्कृत तर दूरच. पण तेव्हा तू असे मंत्र दे की जे सोपे, आमच्या भाषेत असतील तसेच त्यांना सिद्ध करणे अत्यंत सोपे असेल. पार्वती प्रसन्न झाल्याने शंकर म्हणजे आदिनाथांनी हेच मंत्र भिल्लांना दिले. जे की नंतर मत्स्येंद्रनाथांनी विस्तारीले. कानिफनाथ, चर्पटीनाथांनीही विस्तार केला. या मंत्रांचे मुख्य ५ प्रकार आहेत - प्रबल, बर्भर, बराटी,डार आणि अढैय्या आणि प्रत्येका प्रकाराची काही विशेषता आहे.
खरंतर हे गुप्त/सुप्त मंत्र आहेत कारण सभेत बोलले तर ते प्रभावहीन होतात. पण मला नेटवर काही सापडले ब्वॉ.
|| मन्त्र ||
सत नमो आदेश! गुरूजी को आदेश ॐ गुरूजी ,ड़ार शाबर बर्भर जागे जागे अढैया और बराट
मेरा जगाया न जागेतो तेरा नरक कुंड में वास ,दुहाई शाबरी माई की,दुहाई शाबरनाथ की ,आदेश गुरु गोरख को,
आणि मग पुढे त्या मंत्राची सिद्ध करण्याची सोपी पद्धत वगैरे नेटवर आहे. आणि मग त्या मंत्रांच्या पुनरुच्चारणाच्या काळात घोंगडिवर झोपायचे, ब्रह्मचर्य पाळायचे वगैरे नियम आहेत. सिद्ध करण्याआधी गुरु व गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे. आठवा - गणपती ही मुख्यत्वे तांत्रिक देवता आहे.
लक्ष्मी-पूजन मन्त्र
~~~~~~~~~~~~
“आवो लक्ष्मी बैठो आँगन, रोरी तिलक चढ़ाऊँ। गले में हार पहनाऊँ।। बचनों की बाँधी, आवो हमारे पास। पहला वचन श्रीराम का, दूजा वचन ब्रह्मा का, तीजा वचन महादेव का। वचन चूके, तो नर्क पड़े। सकल पञ्च में पाठ करुँ। वरदान नहीं देवे, तो महादेव शक्ति की आन।।”
.
.
.
महा-लक्ष्मी मन्त्र
~~~~~~~~~~
“राम-राम रटा करे, चीनी मेरा नाम। सर्व-नगरी बस में करुँ, मोहूँ सारा गाँव।
राजा की बकरी करुँ, नगरी करुँ बिलाई। नीचा में ऊँचा करुँ, सिद्ध गोरखनाथ की दुहाई।।”
वगैरे अनेक मंत्र आहेत.
मुख्यत्वे मी वाचल्यानुसार वशीकरण, जादू-टोणा नाश करण्याकरता, शारीरीक व्याधी नाहीशा व्हाव्या म्हणुन, किंवा इष्टदेवतेचे संरक्षण आपल्याला, आपल्या घरदाराला लाभावे म्हणुन असे हे मंत्र आहेत.
म्हणजे विद्न्यान प्रगत नसतेवेळी, मनुष्याला जे काही भय आधि (मानसिक), व्याधी (शारीरीक) होत्या त्या दूर करणासाठी तसेच धन-सौख्यप्राप्ती हेतू हे मंत्र आहेत असे दिसते.
नानक जी अन्नपूर्णा मन्त्र
ॐ सत्त नाम का सभी पसारा, धन गगन में जो वर तारा।
मन की जाय जहाँ लग आखा, तहँ तहँ सत्त नाम की राखा।
अन्नपूरना पास गई बैठाली, थुड़ो गई खुसाली।
… चिनत मनी कलप तराये। कामधेनु को साथ लियाये।
आया आप कुबेर भण्डारी, साथ लक्ष्मी आज्ञाकारी।
सत गुरू पूरन किया सवारथ, विच आ बइठे पाँच पदारथ।
राखा ब्रह्मा विशनु महेश काली भैरव हनु गनेस,
सिध चैरासी अरू नवनाथ बावन वीर जती चैसाठ।
धाकन गमन पिरथवी का वासन, रहे अम्बोल न डोले आसन।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ी भाग गई समुन्दरो पार।
अतुत भण्डार, अखुत अपार, खात खरचत कुछ होय न ऊना, देव देवाये दूना चैना।
गुरू की झोली मेरे हाथ, गुरू वचनी बँधे पँच तात।
वेअण्ट बेअण्ट भण्डार, जिनकी पैज रखी करतार।
मन्तर पूरना जी का संपूरन भया।
बाबा नानकजी का गुरू के चरन कमल को नमस्ते नमस्ते नमस्ते।
एकंदर भाषा वेगळीच वाटते.
तंत्राबद्दल वाचताना हे पदोपदी
तंत्राबद्दल वाचताना हे पदोपदी वाचले गेलेले आहे की या पंथात त्याज्य काहीही नाही, टाकाऊ, घृणास्पद काहीही नाही. किंबहुना ही घृणेची भावना मारण्यासाठिचे अघोरी उपाय पहाता या पंथाची भीतीच वाटते.
आज गणपतीबद्दल वाचता वाचता एका ब्लॉगवर जाउन पोचले. बरीच नवी माहीती कळली. काही अत्यंत गुप्त ठेवावे असे फोटो सापडले. मला या पंथाची फारशी माहीतीही नाही. इथे या ब्लॉगमधील काही उताऱ्यांचे भाषांतर दिलेले आहे.
ब्रह्म या संकल्पनेचे २ भाग करता येतील एक म्हणजे शून्य तर दुसरे शून्यातीत. हे जग शून्यामधुन उत्पन्न झाले असे म्हणतात. शून्यामधुन कशाचीही निर्मिती होउच कशी शकेल? या प्रश्नाचे उत्तर शोधु यात.
एक थिअरी अशी आहे की अगदी प्रारंभी आदिम अनादि नाद होताआणि नादातून जगाची उत्पत्ति झाली.पण नाद म्हणजे तर कंपन. कंपन हे तर अवकाशातच होऊ शकते. जर शून्य होते तर कंपन झाले तरी कोठे? अर्थातच नादापासून जगाची उत्पत्ती झाली ही थिअरी बाद ठरते. बायबलमध्ये म्हटले आहे की सर्वप्रथम शब्द होता व शब्द म्हणजे ईश्वर. पण आपण वरती पाहीले की ही थिअरी तर्काच्या कसोटिवरती उतरत नाही.
मग काहीही नसण्यामधुन कशाचेही अस्तित्व निर्माण होइलच कसे? हा मुलभूत प्रश्न आहे. काहीही नसण्यामधुन, फक्त काहीही नसण्याचाच जन्म होऊ शकतो.
शून्य-शून्य-शुन्य. शुन्यामधुन काही निघु शकते का? एखादी जोडी? हां हे शक्य आहे.
० = १-१
० - २-२
० = ३-३
० = १.५-१.५
० = ३.१४ - ३.१४
०= xyz - xyz
० = t - t
शून्यातून xyz म्हणजे अवकाश निघू शकले.
शून्यामधुन t म्हणजे काळ जन्म घेऊ शकला.
We have hit on the very clue to create a space and time, in which some thing can move, a vibration. Methinks, creation of space-time interval precedes the “word, the Naada” Physics tells us that space and time chasing each other creates matter which is a vortex of space-time.
अशा द्वंद्वाच्या धन-ऋण जोड्या निघाल्यानंतर शून्य थकले का तर नाही. अशा जोड्या निघतच राहू शकतात. अनंत जोड्या जन्मु शकतात.
शून्य आणि अनंत यांच्या गुणधर्मात काहीसे साम्य आहे. शून्यामधून शुन्य वजा जाता शून्य रहाते, तसेच अनंत ज्याला पूर्ण म्हणता येईल,
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवावशिष्यते|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मी आरशात पहाते तेव्हा मला माझे प्रतिबिंब दिसते. मी जो विचार करते तोच विचार माझे प्रतिबिंब करत असणार नाही का? पण थांबा माझ्या व माझ्या प्रतिबिंबाच्यामधील काळात सूक्ष्म अंतर आहे.
*पुढे किचकट झालेले आहे. माझ्या आकलनाचा किंचित पुढे गेलेले आहे*
________________________________________________________
शिष्य - आपले नाते काय?
गुरु - काहीही नाही. शिव आणि शक्तीने आमच्याकडे तुला सोपविले आहे. आम्ही फक्त ट्रस्टी. तुझ्या पालक. पालन पोषणाची जबाबदारी घेणारे.
शि - मग तुमचे कर्तव्य काय.
गु - आधी सांगीतले तेच. आम्ही ट्रस्टी. तुला पशूतुन, माणसात आणि माणसातून देवात रुपांतर करणारे.
शि - यासर्वामागचा हेतू काय?
गु - खेळ आहे हा सर्व आणि आम्ही केवळ या खेळातील, नाटकातील पात्रे.
शि - मग जर मी दुर्जन, वाईट, पापी होण्याचे ठरविले तर?
गु - तो तुझा विकल्प आहे. आम्ही कोण तुला अडविणारे!
शि - तुम्ही माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न नाही करणार?
गु - नाही
शि - का
गु - तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुझी साथ देऊ. तू जर पापी, दुर्जन,वाईट होण्याचे ठरविले तर आम्ही तुझी मदत करु. वाईट तर मग खलातील खल बनण्यास आम्ही तुला मदत करु.
शि - तुम्ही मला काय संदेश द्याल.
गु - तुला हवे ते कर. "कोहम" या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घे.
शि - ते उत्तर शोधण्यासाठी तुम्ही मला मदत नाही करणार?
गु - करु तर. ही घे हिंट - तुला वाटते त्याहून तू खूप मोठा आहेस, भव्यदिव्य आहेस. या विश्वाचा तू निर्माता आहेस.
शि - हे कसे शक्य आहे. हे विश्व तर अफाट आहे. माझ्या १०४८ पट विशाल आहे.
गु - होय आहे ना.
शि - लहानास मोठे कसे निर्माण करता येइल?
गु - लहान मोठे हा सारा भास आहे.
शि - ते कसे?
गु - आता मी तुला एक प्रश्न विचारतो. तू जन्माला येण्याआधी हे जग कुठे होते?
शि - मला माहीत नाही.
गु. - तुझ्यापश्चात हे जग कोठे असणार आहे?
शि - परत तेच उत्तर की मला माहीत नाही.
गु - असे असू शकेल का की हे जग हा तुझ्या मनाचा खेळ आहे? फक्त तुझ्या डोक्यात हे जग आहे?
शि - शक्य आहे.
गु - मग तूच या जगाचा निर्माता नाहीस तर काय आहे? याचे अस्तित्व फक्त तुझ्या डोक्यात आहे.
शि - शक्य आहे. पण ....
गु - पण काय?
शि - मि इतका क्षुद्र आहे, जग इतके विशाल आहे...
गु - आठव मगाशी आपण काय ठरविले? लहान-मोठे हे भास आहेत, कल्पनेचा खेळ आहे.
शि - असेलही. पण ते माझ्यापुरते सत्य आहे.
गु - का?
शि - जर मी जगाचा निर्माता असेन, तर हे जग माझ्या मर्जीनुसार चालले पाहीजे पण तसे होताना दिसत नाही. मी या जगाचे नियंत्रण करु शकत नाही.
गु - ज्या आईने तुला जन्म दिला तिचे तू ऐकतोस का? मग तू जन्म दिलेल्या जगाने तुझे का ऐकावे?
शि - पण मला माझे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
गु - अगदी बरोबर, त्याच चालीवरती, तू निर्माण केलेल्या जगाला त्याचे स्वातंत्र्य आहे.
शि - ही तर शाब्दिक कसरत झाली.
गु - तसे समज.
शि - मला संपूर्ण विश्व होण्याचा अनुभव द्या. प्रचीती द्या.
गु - मी तो अनुभव तर तुला देऊ शकत नाही पण कसा मिळवायचा ते सांगू शकतो.
शि - बरं तर मग. सांगा.
गु - थोडे विस्तारीत आहे तुला ऐकण्याइतका वेळ-ऊर्जा आहे का?
शि - आहे.
गु - तुला ३ स्थिती तर माहीतच आहेत - जागृती, स्वप्न आणि निद्रा. तू जेव्हा जागा असतोस तेव्हा त्ला आचारविचार करता येतात, काळ हा एकसलग प्रवाही असतो.स्वप्नामध्ये तू विचार करु शकतोस, परंतु क्रूती करु शकत नाही. वेळ हा टप्प्याटप्प्यात उड्या घेत जातो. निद्रावस्थेत ना तू विचार करु शकतोस ना कृती. तेव्हा काळही निद्राधीन असतो. काळ हा अवकाश आहे. चेतना ,जीवन हा त्याचा गुणधर्म. जसे ऊर्जा-पदार्थ. काळ पदार्थाची मांडणी करतो. जेव्हा चेतना नसते तेव्हा काळ विस्कळीत होतो. जितकी चेतना जागृत तितका काळ सुस्थितीत. काळ पुढेपुढे धावतो. चेतना काळास बांधुन ठेवते. काळ हा पुरुष आहे तर चेतना आहे प्रकृती. काळ शिव आहे तर जीवन, चेतना ही आहे शक्ती. चेतना असेल तरच काळ विस्कळीत न होता, बद्ध आणि व्यवस्थित असतो हेच शिवशक्ती मिलन. हेच जीवन.
*पण पुढे हाच संवाद बराच क्लिष्ट झाल्याने कळला नाही. श्रीचक्र मधील चौकोन म्हणजे सॉलिड जागृतावस्था, १६ पाकळ्या म्हणजे स्वप्नावस्था, ८ पाकळ्या निद्रावश्तेतील अमूर्त स्थिती वगैरे ....*
http://amritananda-natha-saraswati.blogspot.com/p/sambhavi-mudra-p-mulle...
निवडक १० मध्ये.
निवडक १० मध्ये.
शाम भागवत यांचे विवेचन फार
शाम भागवत यांचे विवेचन फार आवडले.
खूप छान माहिती. आणखी माहिती
खूप छान माहिती. आणखी माहिती असेल तर पोस्ट करावी.
http://www.dattamaharaj.com/
एकंदर हे सर्व भयंकर रोचक आहे. नाथ, सिद्ध व जैन तसेच बुद्ध संप्रदायातील समानता, विषमता, तौलनिक अभ्यास. काय मस्त आहे हे सर्व.
http://www.dattamaharaj.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8...
-------------------
https://www.hindwi.org/sabad/gorakh-kahai-sunahu-re-avdhuu-gorakhnath-sa...
----------
https://www.forwardpress.in/2021/09/history-nath-panth-machchendranath-g...
--------------
http://saralmaterials.com/content.php?id=76#gsc.tab=0
https://freehindipustak.com
https://freehindipustak.com/nath-sampraday-pdf-hindi/
Pages