नाथ सांप्रदाय

Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 10:32

हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.

[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. Happy ]

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आनन्द /जिद्दु यास

धागा पुनर्जीवित केल्या बद्दलधन्य्वाद, क्रुपया अजुन माहिती येउ द्या हि नम्र विनन्ति

कै. श्री रा. चिं. ढेरे यांनी ' नाथ पंथाचा इतिहास" किंवा अशाच काही नावाने एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. त्यात नाथपंथी साधूची लक्षणे, आचार, या पंथाचा उगम, प्रसार, अनेक गुरुशिष्य परंपरा, साहित्य, साधुचरित्रे याचा समावेश आहे. वाचले नसेल तर जरूर वाचावे. नवनाथ नक्की कोणते याविषयी मतमतांतरे आहेत. भर्तरिनाथ म्हणजे सुप्रसिद्ध संस्कृत कवी भर्तृहरी. पण काही परंपरांमध्ये ह्याची गणना नवनाथामध्ये करीत नाहीत. असो.

शंकर महाराजांना एकदा नवनाथ भक्तिसाराविषयी विचारलं असता ते म्हणाले ती सगळी पुराणातील वांगी आहेत Lol
अर्थात त्यांच्यासारखा नाथपंथी कोणत्या भूमिकेतून असं म्हणतो हे कळलं तरच काहीतरी खरा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला असं म्हणता येईल.

बाकी नाथपंथाविषयी माहिती -
प्रत्येक ज्योतिर्लिंगांपाशी एखादा नाथपंथी आखाडा असतोच. पूर्वी( सध्याच माहित नाही ) एखाद्या नाथपंथीयाला भ्रमणात काही अडचण आलीच तर ते जवळच्या एखाद्या आखाड्यात मदतीसाठी जात. या आखाड्यांत कोणालाही उठसूट प्रवेश नसे. तिथला महंत गुप्त संकेतांच्या मदतीने आलेला मनुष्य नाथपंथीच आहे याची खात्री करत असे आणि मगच त्याला आता घेतलं जाई. आताच्या काळात नाथपंथाची अवस्था पाहता कोण खरे साधू- ढोंगी साधू असा फरक काही जाणवत नाही. संन्यासी लोक मुख्यमंत्री- खासदार -आमदार होऊन ऐषारामात राहतात त्यामुळे एखादा गुप्त संकेत मी फोडला तर फार काही दोष मला येणार नाही अशी आशा करतो. तर वरील प्रसंगात तो नाथपंथी तिथल्या महंताला आदेश करतो त्यावर तो महंत आदेश-उपदेश म्हणजे सांकेतिक प्रश्न करतो -

"आओ साधू ! बैठो साथ- एक वचन सेवक भाव. कहा से आयो बाबा? कौन तुम्हारा ध्यान ? कौन तुम्हारी मुद्रा ?"

यावर तो व्यक्ती खरोखर नाथपंथी असेल तर उत्तर देतो -
" निरशून्य से आयो बाबा, शून्य हमारा ध्यान.
अलख हमारी मुद्रा, निरंजन हमारा ध्यान . "

हे उत्तर आल्यावरच आता प्रवेश मिळतो नाहीतर शिव्याखाऊन बाहेर रवानगी केली जाते. वरील संकेत एका ठराविक मठाचे आहेत . दुसऱ्या मठाचे संकेत खालीलप्रमाणे -
प्रश्न - " किसने दिया दंड-कमंडल ? किसने दिया जलधारी ? किसने दिया भगवा बाणा, गुरु-मुख काया हो ब्रह्मचारी ?"

उत्तर - " शिवजीने दिया दंड-कमंडल ब्रह्माने दिया दिया जलधारी, विष्णूने दिया भगवा बाणा, गुरु-मुख काया हो ब्रह्मचारी."

असे भरपूर संकेत असतात प्रत्येक गोष्टीसाठी. मला कुठून कळाले हे फक्त विचारू नका

आज बातम्यात पुण्याच्या पालख्यांची दृशे पाहून आळंदीच्या सळसळणाऱ्या अजाण वृक्षाची आठवण झाली.
मागे अमानवीय धाग्यावर सुवर्णसिध्दीसाठी उपयोगी नाथसिद्धांच्या समाधीजवळ असणाऱ्या वृक्षाचा उल्लेख केला होता तोच हा अजाण वृक्ष. नाथ संप्रदायात नवनाथांपैकी प्रत्येकाशी निगडित एक वनस्पती आणि काहींच्या बाबतीत प्राणी आहे तर इतर ८४ सिध्दांसाठी अजाण वृक्षाची नेमणूक आहे. काही अभ्यासक अजाण वृक्ष म्हणजे दतरंग/धतरंग मानतात पण ते चुकीचे आहे. या झाडाच्या योगाने अनेक सिद्धी कमी श्रमात प्राप्त होतात असे मानले जाते पण तो वृक्ष एकाद्या सिद्ध स्थानाजवळ असावा लागतो. याच्या प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या आजारांवर उपयोग होतो आणि सिद्धमंडळी हठयोगसाधना करताना याचाच वापर करत
.
संत एकनाथ महाराज - अजानवृक्षाची पाने जाण जो। भक्षून करील अनुष्ठान।। त्यासी साध्य होईल ज्ञान। तेथे संशय नाही।।

संत नामदेव महाराज - अजानवृक्ष दंड आरोग्य अपार

समाधीसुख दिधले देवा।
ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा।।
अजान वृक्षी बीज वोल्हावा। भक्तजनी।।

आळंदी आणि पैठणबरोबरच मला नगरमध्ये सोनईजवळ एका गावात एका जुन्या समाधीजवळ हा वृक्ष सापडला.
याचे विविध भागांचे आयुर्वेदिक उपयोग माझ्याकडे आहेत पण किमयागिरी आणि इतर अमानवीय उपयोग प्रयत्न करूनही नाही भेटले(किंवा दिले).

झाडांच्या मुळांवर आलेले लोक कुणाचं तरी ऐकून दुर्मिळ असलेली झाडं संपवित आहेत. जे खरे साधू संत आहेत त्यांना या कुबड्यांची गरज नाही.

गोरखधंदा हा शब्द बहुतेकवेळा काहीतरी झोलझपाटे किंवा वाईटउद्योग ह्या अर्थाने ऐकण्यात/वाचण्यात येतो. पण प्रत्यक्षात नाथ संप्रदायात साधुलोक गोरखनाथाचे स्मरण करत त्यांची विविध योगक्रिया/कर्मकांडांत लागणारी जानवे, झोळ्या, शैली, अडबंद, भगवा बाणा, छड्या धागे विणत बनवत असतात. तसेच वेगवेगळ्या माळा, विविध धातूंची त्रिशूल, चिमटे, खप्पर, नागफण्या इत्यादी गोष्टी तयार करत असतात. या सर्वांची बनवण्याची एक खास पद्धत असते जी गुरु गोरक्षनाथांनी प्रमाणित करुन ठेवलेली आहे त्यामुळे तिला गोरखधंदा असे कलेक्टिव्ह नामकरण करण्यात आले.
प्रत्येक साधूला ह्या खप्पर, त्रिशूल, चिमटा ,झोळी यांची वेगवेगळी सिद्धी मिळवावी लागते त्यानंतरच ते वेगवेगळे चमत्कार दाखवू शकत वरील गोष्टींच्या साहाय्याने. पुढेपुढे बरेच लोक आत्मोन्नती सोडून ह्या चमत्कारांच्या नादी लागले आणि त्यांनी ह्या विविध सिद्धीचा दुरुपयोग सुरु केला त्यामुळे गोरखधंदा हा शब्द हळूहळू वाईट अर्थाने प्रचलित होऊ लागला.

माबो अवतारसमाप्तीची घटिका निकट आल्याने शेवटचं काही टाकून जातो.

मागे एका उडवलेल्या पोस्टमध्ये शाबरीविद्येत बावन्नवीर साधनेसाठी एक फोकाच्या रुईचा उल्लेख केल्ता तीच हा फोटो. एकनाथांनी भागवतात पंधराव्या अध्यायात चौतिसाव्या श्लोकावरील टीकेत गणेश सिद्धीसाठी मंदार सांगितलंय तो हाच असतो. दुसऱ्या आजूबाजूला सापडणाऱ्याचा कायबी उपयोग होत नाही. याचे तंत्राबरोबर आयुर्वेदासुद्धा खतरनाक प्रयोग आहेत.
rui

दुसऱ्या एका न उडालेल्या पोस्टमध्ये किमयागिरीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या पळसाचा उल्लेख केलाय त्या दुर्मिळ झाडाचा हे फोटो
pls1
pls3

याच्या बुंध्यात पारा भरून ठेवला होता. तो बाहेर काढताना
pls2

वीर सिद्ध केलेले दोन लोक महाराष्ट्रात माहित आहेत पण ते कोनात मिसळत नसल्याने त्यांचा सन्दर्भ देत नाही. मध्यप्रदेश मध्ये सोयत जवळ पिपलीया चौराया बालाजी म्हणून ठिकाण आहे. तिथं एक राधेशाम नावाचे नाथपंथी साधक आहेत. त्यांनी काही वीर सिद्ध केलेत पण ते वापर नाही करत बहुतेक त्यांचा. पण ते त्यांच्या इतर मंत्रविद्येचा वापर करून गोरगरीब लोकांना काही मोबदला न घेता रोगमुक्त करत आहेत. कोणाला फार हौस असेल तर जाऊन बगा. शाबरी विद्येचा वापर करतानाचा एक फोटो त्यांचा. वीर सिद्ध केल्यावर त्या व्यक्तीच्या बरोबरच असतात कायम त्यामुळे थट्टा-मस्करी करायला जाऊ नका तिथं नाहीतर उगा बोकांडी बसतील तुमच्या.
sbr1

वरच्या गोष्टी इथं कोणाच्या आवाक्यात असतील असं वाटत नाही त्यामुळे कोणालाही अनुभव घेता येईल असा एक भन्नाट नाथपंथी तोडगा सांगतो ज्याचा कोणी दुरुपयोग नाही करू शकत -
आंब्याला जेव्हा ताजा मोहोर येतो सुरुवातीला तो रोज हातावर घेऊन चोळत बसायचं जेणेकरून रस्स पूर्ण हातात जिरला जाईल. त्यावर हात धुवायचे नाहीत अजिबात(ते ऍडजस्ट कस करायचं ते तुमचं तुम्ही बगा) हा प्रोग्रॅम २५ दिवस चालू ठेवायचा. याने हातात विषनाशक गुण उतरतो जो ७-८ महिने टिकून राहतो. नंतर साधारण सर्प विष, विंचू आणि इतर विषारी कीटक चावल्यास दन्शस्थानावर काही काळ हात फिरवल्यास १५ मिनिटांत विष उतरते पण मोठ्या जहाल विषावर काही उपयोग होत नाही.

अनेक वेळा  माझ्या वाचनात हे आलंय  की  क्रियायोगाचे प्रणेते 'महावतार  बाबाजी ' हे पण नाथसांप्रदायचे आहेत . जाणकार यावर प्रकाश टाकतील काय?

नाथ पंथीयांकडे एक धंदारी नावाचे लाकडाचे कोडे असते. कोणी पाहिले आहे का ? किंवा फोटो आहे का?

"गोरखपंथी साधु लोहे या लकड़ी की सलाइयों के हेर फेर से एक चक्र बनाते हैं। उस चक्र के बीच में एक छेद करते हैं। इस छेद में से कौड़ी या मालाकार धागे को डालते हैं और फिर मन्त्र पढ़कर उसे निकाला करते हैं। इसी को गोरखधंधा या धंधारी कहते हैं। इसका उल्लेख योगियों के वेष में प्रायः सर्वत्र मिल जाता है।[5] गोरखधंधा या धंधारी में से क्रिया जाने बिना कौड़ी या डोरी निकालना बहुत कठिन कार्य है। इसीलिए गोरखधंधा शब्द का प्रचलन आजकल उलझन और झंझट वाले कार्यों का वाचक बन गया है।[6]"

नर्मदा किनारी एक तांत्रिकांचे गाव आहे. नाव आठवत नाही. पण एकदा जायचे आहे. मी शाबरी मंत्र सिद्ध करण्याचे प्रयत्न केले पण जमलं नाही. वशीकरण करणारी एक जख्खड म्हातारी आदिवासी भागात खूप प्रसिद्ध होती. तिने मला मंत्र शिकवला होता. एखाद्या व्यक्तीला वश करायचे असेल तर एक वनस्पती तळहातावर घेऊन दोऱ्याने स्पर्श करत मंत्र म्हणायचा. त्या व्यक्तीचं नाव टाकून मंत्र म्हणायचा. व्यक्ती वश होणार असेल तर दोऱ्याला वनस्पती चिकटते व वशीकरण यशस्वी होईल हे कळत होते.

हा धागा आज पाहिला.

नाथ संप्रदायातील ज्ञान हे परावाणीमधे उगम पावते व असते. असते असं मी म्हणतोय याचे कारण, परावाणीची स्पंदने ही हजारो वर्षे टिकणारी असतात. जर नामस्मरणाने कृपा प्राप्त करून आपले नामस्मरण जर परावाणीपर्यंत पोहोचू शकले तर मात्र हे ज्ञान खुले होऊ शकते. रेडिओचे एखादे स्टेशन लावण्यासाठी जसे त्या फ्रिक्वेन्सीशी आपला रेडिओ जोडायला लागतो तसेच हे आहे.

पण साधारणतः नामस्मरणातले साधक हे परावाणीपर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा ते आपला अहं अथवा खोटा मी नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे त्यांना या प्रकारे ज्ञान मिळवण्यात रस नसतो. मात्र काही काही वेळा या साधकांच्या हातून त्यांच्या नकळत ही स्टेशने लागतात. त्यांचे इच्छित कार्य होऊनही जाते. पण ही शक्ती आपली नाही हेही त्यांना कळते. कृतज्ञतेने त्यांचे मन भरून जाते. पण ते त्या ज्ञानाच्या मागे लागत नाहीत. तर ते त्याला कृपा समजतात. वैखरी, मध्यमा व पश्यंती ह्या तीन वाण्यामधून नामस्मरण करणे माणसाला शक्य होते. पण परावाणी ही कृपा समजली जाते.

हठयोगात मात्र ही स्टेशने प्रयत्नपूर्वक लावण्याचे सामर्थ्य मिळवले जाते. मात्र ज्यांचे नाम परावाणीतून सुरू झालेले आहे व साधारणतः रोज ३ तासांची बैठक ज्यांची असते अशा नामस्मरणातील अधिकारी पुरूषांवर या हठयोगींची मात्रा चालू शकत नाही. कारण ह्या रेडिओ स्टेशनला जिथून शक्ती मिळते त्या शक्तीशीच थेट संबंध नामस्मरणाने जोडले जात असतात.

ज्ञानेश्वर माऊली तर नामस्मरण हे हठयोगातील सिध्दीप्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगताना हरिपाठात स्पष्टच म्हणतात की,
योग याग विधी येणे नोहे सिध्दि |
वायांचि उपाधी दंभ धर्म || ५.१ |

इतकेच नव्हे तर नामस्मरणातील अधिकारी पुरूषांची स्थिती कशी असते हे स्पष्ट करताना म्हणतात.
योग याग क्रिया धर्माधर्म माया |
गेले ते विलया हरिपाठे || २०.३ ||

नामस्मरणाचे महत्व शब्दांत सांगणे किती अवघड आहे हे जाणवून , शेवटी माऊली म्हणतात.
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी |
तें जीवजंतूंसी केवीं कळे || २५.३ ||

ज्ञानेश्वरांच्या काळात नामस्मरणाने होणारा शक्ती संचय टिकवण्यासाठी त्याला सकारात्मक विचारांची जोड दिली पाहिजे ह्याचे भान लोकांना असे.
कलीयुगात मात्र हे भान नाहिसे झाले आहे. प्रार्थना हा प्रकारच फारसा राहिलेला नाही. त्यामुळे कलीयुगात नामस्मरण करणारा इतका सहजपणे नकारात्मक विचारांच्या आहारी जातो व आपल्या शक्तीचा र्‍हास करून घेतो हे त्याच्या लक्षातच येत नाही.

अवांतर व्ह्यायला लागले. थांबतो.
असो.
_/\_

बर्‍याच गोष्टी वाचून/पठन करुन पाहील्यानंतर या निष्कर्षाप्रत पोचले आहे की - मनाचे श्लोक मनास सर्वाधिक शांती देतात.

मला तर राम नाम सगळ्यात गोड आणि जवळचं, करुणा करणारं वाटते. आणि रामनामाचा महिमा सांगणारे रामदास स्वामी आवडत नाहीत.

Happy
रामनाम आवडणे हेच तर महत्वाचं. रामदास आवडणं वगैरे फारसं महत्वाच नाही.

रामावर व रामनामावर रामदासांचे एवढे प्रेम होते की ते सुध्दा असंच म्हणाले असते.
Happy

भागवत परावाणी आणि अन्य वाणीबद्दल थोडं लिहा ना. माझ्या लक्षातच रहात नाही. वैखरी म्हणजे आपण कानाने ऐकतो ती वाचा बरोबर?

परा पश्यंती मध्यमा वैखरी ( हायर्ची )
------------------

नामी पेक्षा नाम श्रेष्ठ त्यामुळे रामनामावर एकदा का प्रेम जडले की तो आपल्या जीवनात कार्यरत होणारच आहे. मार्ग रामदास की तुलसीदास कुठलाही असो !

हो ना आणि तुमच्या आव्डण्या न आवडण्याने रामदासांना काय फरक पडतो?
Submitted by सामो on 7 October, 2019 - 11:05
>>रामदासाला नाही पण काही लोकांना फरक पडतो.

ढ मुलाने छोटा जरी प्रश्न सोडवला तरी गुरूजी त्याला जास्त मार्क देतो,

तसे सत्य युगात हजारो यज्ञ केले की छटाकभर पुण्य मिळायचे, कलियुग हे अध्यात्मिक ढ मुलांचे आहे, त्यामुळे नुसते नाम घेतले तरी गुरुजी पास करतो

Pages