Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे...पण जाऊ द्या Gf सोडून
अरेरे...पण जाऊ द्या Gf सोडून 3 लाख मुली फिदा असतील तुमच्यावर ...3 लाखातून 3 कमी झाल्या तर काय फरक पडतो ..
पिक्चरला नाव ठेऊ नका.. .इंग्लिशमध्ये बघितला असाल तुम्ही हिंदिमध्ये बघा जास्त मजा येईल..
मी आणि ईंग्लिशमध्ये
मी आणि ईंग्लिशमध्ये
मी तर आजवर हॅरी पॉटर सुद्धा कधी इंग्लिशमध्ये पाहिला नाही की कधी ईंग्लिश टायटॅनिकच्या वाटेला गेलो नाही. संवादच कळले नाहीत तर अर्थ काय पिक्चरला.
असो, चित्रपट चांगला होता की वाईट यापेक्षा तो वाह्यात होता. आणि तीन पोरींचे तिकीट पॉपकॉर्नचा खर्चा माझ्या खिश्यातून करायचे म्हणून साधाश्याच थिएटरला घेऊन गेलेलो. पण साध्याश्या थिएटरला पब्लिक खूप भारी येते आणि अश्या चित्रपटांना ते फार टवाळक्या करते. असो.. नको त्या आठवणी .. तुम्हाला आवडला तर एंजॉय.. कधी सम अनदर टाईम गेलो असतो तर कदाचित मलाही त्याचा मोकळेपणाने आस्वाद घेता आला असता, आणि कदाचित मलाही आवडला असता.... तसाही मी सुद्धा वाह्यातच आहे
वाह्यात पणा बंद कर आणि
वाह्यात पणा बंद कर आणि ट्रेलर विषयी लिही.
मुक्काबाज चं ट्रेलर बघितलं का?
मुक्काबाज चं ट्रेलर बघितलं का
मुक्काबाज चं ट्रेलर बघितलं का?>> मी बघीतल आत्ता.. स्टारकास्ट सॉल्लीड्ड वाट्टेय.. प्युअर एकदम..
अनुराग कश्यप नाव म्हटल्यावर पाहिलचं..
मुक्काबाज चं ट्रेलर बघितलं का
मुक्काबाज चं ट्रेलर बघितलं का >>>>
अत्ताच ट्रेलर बघितला.. एकदम टिपीकल मसाला बॉलिवुडीश वाटतोय सिनेमा..
१. तोच तो टिपीकल व्हिलन... त्याची तिच ती बाष्कळ डायलोक बाजी..
२. तेच ते पांचट प्रेम प्रकरण...
मुक्काबाजचा ट्रेलर चांगला
मुक्काबाजचा ट्रेलर चांगला वाटला.
ज्यांना खूपच आवडला त्यांनी ईथे पुर्ण पिक्चर बघून घ्या...
Mukkebaaz Full Hindi Movie
https://www.youtube.com/watch?v=2JaoeuUT8o4
वाह्यात पणा बंद कर आणि ट्रेलर
वाह्यात पणा बंद कर आणि ट्रेलर विषयी लिही. >> अरे अशाने तो एक नवीन बाफ उघडेल ना
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=-K9ujx8vO_A
PADMAN Official Trailer | Akshay Kumar | Sonam Kapoor | Radhika Apte | 26th Jan 2018
रीअल स्टोरी ... बहुतेक मायबोलीवरच एक लेखही होता यांच्यावर
ग्रेट. ह्या विषयावर, पद्मन वर
ग्रेट. ह्या विषयावर, पद्मन वर चित्रपट बनवणं खरंच ग्रेट.
अक्षयने हा पिच्चर केला हे पण आवडलंय.
माबोवर लेख आहे ह्यांच्याबद्दल.
मला वाटतं चिनुक्स नी लिहिलाय की शेअर केलाय.
पॅडमॅन चा ट्रेलर आवडला.
पॅडमॅन चा ट्रेलर आवडला. राधिका साधी गृहिणी छान दिसली आहे.
ह्याच विषयावर आधी फुल्लु नावाचा पण सिनेमा येऊन गेला आहे.अर्थात तगडी स्टारकास्ट नसल्यामुळे अनै मार्केटींग कमी झाल्यामुळे जास्त चालला नाही बहुधा.
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=wpUwdr4IRvs
बाळासाहेब ठाकरेंवरील चित्रपटाचा ट्रेलर
वॉव , नवाझुद्दिन आहे
वॉव , नवाझुद्दिन आहे बाळासाहेबांच्या रोल मधे , इंटरेस्टींग !
आई ग्ग कसला कडक ट्रेलर आहे !
आई ग्ग कसला कडक ट्रेलर आहे !
तो नवाझुद्दीन आहे.. कमाल आहे !!
मजा येणार .. फक्त चित्रपट प्रक्षोभक नसावा.. बहुतेक नसेलच.
नवाजुद्दिन भारी करेल काम .
नवाजुद्दिन भारी करेल काम . लूक तर जमला आहे. मराठी एक दोन वाक्य बोललेली ऐकली दुसर्या एका क्लिप मधे. चांगला प्रयत्न आहे त्याचा. पण अजून मेहनत घ्यावी लागेल. उदा. माझे आणि माझ्यावर या दोन शब्दातील झ चा उच्चार वेगवेगळा आहे हे माहित नसावे अजून त्याला.
मलाही माहीत नव्हते..
मलाही माहीत नव्हते..
मी याचकरीता आली होती..
मी याचकरीता आली होती..
काटा आला अंगावर.. काय खतरनाक गेटअप आणि बॉडी लँग्वेज आहे ना..
माझे आणि माझ्यावर या दोन
माझे आणि माझ्यावर या दोन शब्दातील झ चा उच्चार वेगवेगळा आहे हे माहित नसावे अजून त्याला. >> हं.. टिझर लाँच करतेवेळी ना..
त्याला भाषेवर आणखी मेहनत घ्यावी लागेल हे मात्र खर.. इतक्या लवकर जीभ वळणार नाहीच.. 'ळ'चा उच्चार, 'च', 'ज' , 'झ' चा उच्चार असं बरच काही..
ठाकरे चा ट्रेलर कडक आहे.
ठाकरे चा ट्रेलर कडक आहे.
नवाजुद्दिन भारी काम करेलच ह्यात शंका नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=nS_pHr88_Rg - महाभारत येतोय म्हणे राजामौलीचा.. तोच तो बाहुबलीचा दिग्दर्शक..
https://www.youtube.com/watch?v=65S1S7EIQoM हा अजून एक.. पण हे बघितल्यावर खात्री होते की सब कुछ माया ही है.. ( दुसर्यामधे तर मस्त क्लिपिंग्स एकत्र केली आहेत)
मस्त फेक ट्रेलर
मस्त फेक ट्रेलर
>>नवाजुद्दिन भारी काम करेलच
>>नवाजुद्दिन भारी काम करेलच ह्यात शंका नाही.<<
मेकप, बॉडि लँग्वेजची कॉपी करुन तो जवळपास बाळासाहेबां सारखा दिसु शकेल पण फक्त तोंड उघडेपर्यंत...
संदिप कुल्कर्णि फिट झाला असता...
चांगला गेटप आहे नवाजुद्दिनचा.
चांगला गेटप आहे नवाजुद्दिनचा.
संदिप कुल्कर्णि फिट झाला असता
संदिप कुल्कर्णि फिट झाला असता...
>>> त्याला बघायला कोण जाणार थेटर मध्ये.. फुल्ल फ्लॉप झाला असता मोवी
संदिप कुलकर्णी कोण?
संदिप कुलकर्णी कोण?
डोंबिवली फास्ट, दमलेल्या बाबाची कहाणी का...
आणि हा चित्रपट हिंदी आहे ना, मग मराठीतला नुसता चांगला अभिनेता वा सूट होणारे व्यक्तीमत्व घेऊन काय फायदा.. हिंदीतला जानामाना चेहरा हवा ना
नवाज सुट होतोय!
नवाज सुट होतोय!
किती त्या बायोपीक ? नुसत पेवच फुटलय, धोनी, सन्जय दत्त, मिल्खा सिन्ग्,मेरि कोम , निरजा भानोत, सानिया मिर्झा ची पण करणार आहे म्हणे
सन्जय दत्त << मला वाटल सुनिल
सन्जय दत्त << मला वाटल सुनिल दत्त ची आहे आणि त्यात संजय दत्त्ची भुमिका.
नवझुद्दीन चा गेट अप खरच खुप छान झाला आहे...
संजय दत्त चा रोल रणबीर कपुर
संजय दत्त चा रोल रणबीर कपुर करतोय.
नवल नाही त्यावर सिनेमा निघतोय, त्याच्या आयुष्याच्या फेजेस एखाद्या मेलोड्रामॅटीक फिल्म सारख्याच आहेत.
स्टार आई वडिलांमुळे दुर्लाक्षित , वाया गेलेलं बालपण, लहानपणी आई वडिलांच्या पार्टीत येणार्या पाहुण्यांनी टाकलेल्या सिगारेट्स सोफ्याखाली लपून ओढणे, मोठं होताना टिपिकल गाड्या उडवणारा स्पॉइल्ड बॉय , सुरवातीचं नॉट सो सक्सेस्फुल करिअर, ड्रग अॅडिक्ट, रिहॅब्स, मग कमबॅक, माधुरीशी अफेअर, यशस्वी सिनेमे चालु असताना मग अचानक बाँब ब्लास्ट सारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात इन्फ्हॉलव्ह्मेन्ट, जेलच्या वार्या , मुन्नाभाय इमेज, वैयक्तिक आयुष्यातल्या त्याच्या ३ बायका, त्यातल्या एकीचा ट्रॅजिक मृत्त्यु , दुसरीचं नंतर लिअॅण्डर पेसशी लग्नं, तिसरी बी ग्रेड आयटेम गर्ल, तिच्याशी लग्नामुळे घरच्यांशी नातं तुटणे , घरच्यांची पॉलिटिक्स बॅक्ग्राउंड वगैरे मोठ्ठी अनएंडींग लिस्ट आहे !
संजय दत्तवर बायोपिक वगैरे
संजय दत्तवर बायोपिक वगैरे अजिबात करु नये कितीही त्याचं आयुष्य मेलोड्रामॅटिक असलं तरी. तो गुन्हेगार आहे आणि त्याला तसंच वागवायला हवं.
संजय दत्तवर बायोपिक वगैरे
संजय दत्तवर बायोपिक वगैरे अजिबात करु नये कितीही त्याचं आयुष्य मेलोड्रामॅटिक असलं तरी. तो गुन्हेगार आहे आणि त्याला तसंच वागवायला हवं. >>>>>> +11111
त्याला शिक्षा पण कमी मिळाली त्या मानाने.
संजय दत्तवर बायोपिक वगैरे
संजय दत्तवर बायोपिक वगैरे अजिबात करु नये कितीही त्याचं आयुष्य मेलोड्रामॅटिक असलं तरी. तो गुन्हेगार आहे आणि त्याला तसंच वागवायला हवं. >>>>>>
बायोपिक वगैरे अजिबात करु नये हे नाही पटलं.
फारतर जे जसं आयुष्य होतं तसं दाखवावं. त्याचं उदात्तीकरण करु नये आणि उगीच त्याची गुडी गुडी इमेज दाखवु नये.
Pages