"पाच जुनला लग्न आहे.."
केतनचा मेसेज होता, मी तेवढेच वाचू शकले, पुढचा मजकूर मला वाचायचा नव्हता.
मेसेज जरी बऱ्याच दिवसांनी आला असला तरी केतनची आठवण रोज येत असे, आठवण नाही, त्याची सवय लागली होती, माझ्यासारख्या सत्तावीस वर्षाच्या मुलीची, केतन एक चांगली, वाईट कशी का असेना, एक सवय होता, तुमचं नात संपत पण सवय नाही ना संपत!
रोजची एक सवय, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि मग कामाच्या मधूनच, त्याचा व्हाट्सअँप डीपी, स्टेटस बघायचा, त्याचा नंबर डिलिट करायचा, परत सेव्ह करायचा, ब्लॉक करायचा, अनब्लॉक करायचा, नंबर पाठ असला तरी!!
तो काय करत असेल याचा विचार करायचा, "माझी आठवण येत असेल का?" एक मन म्हणणार "येत असेल" आणि दुसर मन म्हणणार "कधीच विसरला असेल", कशीतरी स्वतःची समजूत काढायची, मग परत कसेतरी ऑफिस मधले काम रेटायचं, दुसऱ्याला कळू नये, म्हणून स्वतःच्या विनोदावर जास्त हसायच आणि एकटे असताना मनसोक्त रडायचं.
मला त्याच्या बरोबर लग्न करायच होत, त्याची बायको म्हणून मिरवायच होत, पण आम्ही नवरा बायको म्हणून आंनदी एकत्र राहू अशी खात्री नव्हती, थोडी अपेक्षा होती, पण ती पुरेशी नव्हती.
त्याने "लग्न करशील का?" विचारल, पहिल्यांदा, अगदी मजेत, सहज, हसत, कदाचित त्याला उत्तर माहित होत, पण मलाच उत्तर माहित नव्हतं. मग मी तो प्रश्नच टाळायचे, "नाही" म्हणायच धाडस नव्हतं आणि "हो" म्हणायची खात्री नव्हती, खरा घोळ तोच होता, केतन आवडायचा, खूप, मनापासून, हक्काचा होता, पण मला माझीच खात्री नव्हती, त्यामुळे मी त्याला कधी धड "नाही" किंवा "हो" म्हणू शकले नाही.
त्याने नंतर बऱ्याच विनवण्या केल्या, फोन केले, मेसेज केले, अचानक, घरी येऊन धडकला, मी मात्र तटस्थ राहिले, मला एवढ्या लवकर अडकायचं नव्हत आणि त्याला अडकवुन ठेवायच नव्हतं, नातं संपल असे जाहीर केलं आणि एक आठवण म्हणून दुर्लक्ष.
पण त्यानंतर आम्ही फेसबुक फ्रेंड्स होतो, मग तो काहीतरी "माय लव्ह विल नेव्हर एन्ड" असा मेसेज शेअर करायचा, मला उद्देशून, ते सर्व माझ्यासाठी होत, मला माहित होते, म्हणून मी ते वाचून हसायचे, मला त्याची दया येत असे, पण मी काही विचार बदलला नाही.
शेवटी त्याला समजावलं, रागावलं, रडवलं, ब्लॉक केलं मग कुठेतरी तो शांत झाला, मग त्याचे मेसेज, फोन कमी झाले, त्याचा क्रिसमस, न्यू इयरला मेसेज आला नाही, थोडे वाईट वाटल, मग वाटल आपणच एक हलकेच मेसेज करूयात, फक्त हॅलो म्हणून, बाकी काही नाही, पण भीती वाटली, त्याने आता रिप्लाय दिला नाही तर? मग? करू की नको?
थोडा अभिमान जपायचा होता, आवश्यक नसला तरी!
मला माहित होतं, जाणीव होती, अंधुक का असेना एक अशा होती की, तो परत लग्नासाठी विचारेल, मग मी वेड्यासारख परत "नाही" म्हणेल, मग तो शहाण्यासारखा मला समजून सांगेन, परत मी हळूच होकर सांगेन, मग तो आनंदाने जोरात ओरडेल, पण तसे काही झाले नाही आणि आता कधी होणार नव्हतं.
त्याचे लग्न होणार, याची बातमी कळाली होती, पण ती बातमी खोटी वाटली, कारण त्याचे माझ्याबद्दलचे प्रेम खूप खरं वाटायचं, केतन माझ्याशिवाय कोणा दुसऱ्या मुलीचा विचार करू शकेल असे कधी त्याच्या स्वप्नात ही त्याला वाटलं नसेल, पण आज तो मेसेज आला आणि सगळा गोंधळ निघून गेला.
तो तरी किती दिवस थांबणार, चूक माझीच होती, मी योग्यवेळी, लगेच होकर दिला असता, तर हे सगळे झालेच नसते, पण ते मला जमल नाही.
मी सवयीप्रमाणे त्याचे फेसबुक प्रोफाईल चेक केल, माझ्या बरोबरचे सगळे फोटो डिलीट केले होते, पण मी काढलेले त्याचे फोटो अजून तसेच ठेवले होते, काही नवीन फोटो होते, प्रत्येक फोटोत एक मुलगी कायम दिसत होती, माझ्या पेक्षा नक्कीच बुटकी असेल, दिसायला जरा बरी होती, केतनला आवडली असेल आणि ती लगेच त्याला "हो" म्हणाली असेल.
अगदी सकाळी आलेल्या मेसेजला मग मी रात्री "कॉन्ग्रॅट्स" असा एवढाच रिप्लाय केला आणि वाट बघत बसले त्याच्या रिप्लायची!!
तो व्हाट्सअँप वर ऑनलाईन होता, त्याने माझा मेसेज लगेच बघितला, पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही, पण मी वाट बघत बसले.
"ए केतन परत विचार ना, मी यावेळेस नक्की हो म्हणेन"
पण मेसेज आला नाही की, मग मी झोपले, उशीला कवटाळून, डोळ्यातलं पाणी घट्ट पकडून.
करावा का त्याला फोन? काय बोलावे? तो काय बोलेल? मला अजिबात रडायच नव्हतं, म्हणून मी आधीच रडून घेतलं, मोबाईल हातात घेतला, रात्रीचे साडे बारा झाले होते, पाठ असलेला नंबर फिरवला, रिंग वाजली, केतन ने फोन उचलला.
"हॅलो"
मी काहीच बोलू शकले नाही, नेहमीसारख.
"हॅलो, चित्रा, अग..."
"हॅलो काय झाले, आवाज येतोय का?"
"हो..ए हाय, काय चालू आहे" मी अगदी खोट्या, पोक्त आवाजात म्हणाले.
"काही नाही झोपलो होतो" केतन झोपाळू आवाजात म्हणाला.
"ए सॉरी, तुला झोपेतून उठवले"
"काही झालय का?" केतन ने विचारले, मी फोन केला याचे त्याला आश्चर्य वाटले होते, त्याच्या आवाजात ते जाणवत होतं.
"काही झाल्यावरच फोन करायचा असतो का?" मी उद्धटपणे बोलले.
केतन काही बोलला नाही, शांत राहिला, त्याला माझे असे बोलणं आवडलं नाही, मी असे बोलायला नको होत, पण मनात एवढा सगळा गदारोळ असताना, नीटपणे व्यक्त नाही होता येत.
"बाय द वे, बेस्ट ऑफ लक"
"थँक्स" तो एवढच म्हणाला.
मग थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही, मला जाणवले, हा बदलला आहे, आधी असा नव्हता, फोन केला की तासान तास गप्पा मारायचा, अगदी कोणत्याही..
"तुझे काय चालू आहे?" त्याने शेवटी विचारले,
त्याचे इतके कोरडं बोलणं ऐकून, मला राहवले नाही, रडायला लागले, केतनला ते जाणवले,
"काय झालं?" त्याने परत विचारले.
मी काहीच बोलू शकले नाही, काही बोलताच येत नव्हते, मी खूप रडत होते, ओक्सबोक्शी, रात्री साडे बारा वाजता!
केतन ने मला शांत होण्याचा वेळ दिला.
"सॉरी" मी कसं बसं म्हणाले.
"इट्स ओके रे" केतन म्हणाला.
"मला नाही कळलं.." मी काही म्हणायच्या आत केतन म्हणाला, "जाऊ दे झाले गेलं विसरून जाऊ" तो म्हणाला, अगदी सहज, आरामात!
हाच का तो केतन? जो माझ्यासाठी एक मिनिट बोलण्यासाठी धडपडायचा!
"असं अचानक कसं ठरलं?" मी विचारलं
"अचानक नाही, तू ब्लॉक केल्यावर, मी काय करणार? थोडा दिवस खूप अवघड होत, पण मग ऋतू भेटली, आमचे जमल, मग एकदम तिनेच लग्नासाठी..."
"तिने विचारलं?" मी आश्चर्याने विचारले.
"हो ना, तिने विचारलं, मी ही लगेच "हो" म्हणालो, फॅमिलीला भेटलो आणि ठरलं" केतन म्हणाला.
मी डोळे मिटून घेतले, आता नाही रडायचं अस स्वतःला समजावल, "अरे भारी" असे काहीतरी म्हणून गेले.
थोडा वेळ मग त्याच्या लग्नाच्या गप्पा झाल्या, माझ्या अगदी तोंडावर आलं होतं, "प्लिज, लग्न करू नकोस" पण मी काही म्हणू शकले नाही, त्याचे बोलणं निमूटपणे ऐकून घेतलं, त्याने लग्नाला ये असे परत एकदा सांगितले, मी ही जमलं तर नक्की येईन असे म्हणाले.
"मग आता?" मी विचारलं, "आपल्या दोघांच काय" असं विचारायच होतं, पण नेहमीसारख, मला बोलता आलं नाही.
"आता.. आता..काही नाही.." केतन अडखळत म्हणाला.
"ओके, फ्रेंड्स म्हणून राहू" मी म्हणाले.
"नको"
"नको?"
"फ्रेंड्स म्हणून राहून, काय उपयोग?" केतन म्हणाला.
मी एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला परत सावरलं.
"मग तू लग्नाचा मेसेज का केलास?" मी चिडून विचारले.
"सगळ्यांना केला होता. तुला पण आला असेल" केतन लगेच म्हणाला.
मला राग आला, पण मी शांतपणे "ओके" म्हणाले, मला आता ओरडावसं वाटत होत.
केतन पुढे म्हणाला, "आय मिन, माझे लग्न होणार आहे, तुझ लग्न होऊन तीन वर्ष झाली आहेत, म्हणजे कशाला ना आता उगीचच कॉम्प्लिकेशन्स"
मी पटकन कॉल बंद केला, नेहमीसारखा, काही न बोलता.
-चैतन्य रासकर
https://www.facebook.com/chaitanya.raskar.5
मस्त, शेवट सुंदर, अनपेक्षीत
मस्त, शेवट सुंदर, अनपेक्षीत पण हुर हुर लावणारा़ ........
शेवटचा ट्विस्ट जमलाय
शेवटचा ट्विस्ट जमलाय
छान
छान
शेवट मस्त. भारी जमलीये.
शेवट मस्त. भारी जमलीये.
म्हन्जे ति अधिच मेर्रिद असते
म्हन्जे ति अधिच मेर्रिद असते का?
हम्म. होता है एसा भी.
हम्म. होता है एसा भी.
मस्त, आवडली
मस्त, आवडली
शेवट मस्त. भारी जमलीये. >> +१
शेवट मस्त. भारी जमलीये. >> +१
"शेवट मस्त. भारी जमलीये." -
"शेवट मस्त. भारी जमलीये." - सहमत.
तुमच्या कथांचा ट्विस्ट छान असतो. कीप ईट अप!!
मस्त आहे!
शेवटचा ट्विस्ट वाचताना मस्त वाटला. पण आता पुन्हा विचार केल्यावर लक्षात आले की तिचे जर आधीच लग्न झाले असेल तर वरची अनेक वाक्ये ती कशाला म्हणेल. म्हणजे हा सस्पेन्स वाचकांपासून उगाचच ठेवला आहे.
ओह लग्न झालय अस अजिबात वाटल
ओह लग्न झाल असेल अस अजिबात वाटल नाही.
कथा आवडली
कथा आवडली
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
मला लागलेला अर्थ असा की तिने केतनला नकार देउन मग काही काळानंतर लग्न केलं. आणि तो त्यानंतर ३ वर्षाने लग्न करतोय.
ट्विस्ट काही पटला नाही.....!!
ट्विस्ट काही पटला नाही.....!!!
मस्त आव्ड्ली कथा..........
मस्त आव्ड्ली कथा..........
शेवटच्या ट्वीस्टच प्रयोजन
शेवटच्या ट्वीस्टच प्रयोजन नाही कळ्ळ
कथा चांगली आहे.. शेवटच्या
कथा चांगली आहे.. शेवटच्या ट्वीस्ट चे कारण कळले नाही.. धक्कादायक शेवट म्हणून का?
मस्तच
मस्तच
@ऋतु_निक @जाई. @anilchembur
@ऋतु_निक @जाई. @anilchembur @rmd @राया @ऋन्मेऽऽष @असामी @फेरफटका @अदिति @चैत्रगंधा @सस्मित @कावेरि @urmilas
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया अशाच येत राहोत. धन्यवाद
मला लागलेला अर्थ असा की तिने
मला लागलेला अर्थ असा की तिने केतनला नकार देउन मग काही काळानंतर लग्न केलं. आणि तो त्यानंतर ३ वर्षाने लग्न करतोय. << अग मग ती त्याने विचारायची वाट कशी बघतेय?
@अदिती @सस्मित
@अदिती @सस्मित
चित्राने लग्न कधी केलं हा मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटत नाही, चित्राचे लग्न होऊन सुद्धा ती केतनच्या प्रेमात आहे, ही परिस्थिती मला जास्त महत्त्वाची वाटते.
तुम्ही जर प्रेमात असाल, तर त्याच व्यक्तीशी लग्न करून, संसार करावा अशी साधी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण चित्राचे लग्न तर आधीच झाले आहे, पण तरीही केतनबद्दल असलेल्या प्रेमामुळे, केतन ने लग्नासाठी विचारावे आणि आपणही त्याच्या बरोबर परत लग्न करावे, असे एक दिवास्वप्न, चित्रा नेहमी बघत आहे.
कथा आवडली. स्पेशली कथेचा शेवट
कथा आवडली. स्पेशली कथेचा शेवट मस्त झाला.
कथा आवडली. शेवटही आवडला.
कथा आवडली. शेवटही आवडला.
@अक्षयदुधाळ, @निर्झरा
@अक्षयदुधाळ, @निर्झरा
धन्यवाद
आवडलीच... शेवटचा ट्विस्ट छान
आवडलीच... शेवटचा ट्विस्ट छान होता..
चित्राने लग्न कधी केलं हा
चित्राने लग्न कधी केलं हा मुद्दा मला जास्त महत्त्वाचा वाटत नाही, चित्राचे लग्न होऊन सुद्धा ती केतनच्या प्रेमात आहे, ही परिस्थिती मला जास्त महत्त्वाची वाटते.
तुम्ही जर प्रेमात असाल, तर त्याच व्यक्तीशी लग्न करून, संसार करावा अशी साधी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण चित्राचे लग्न तर आधीच झाले आहे, पण तरीही केतनबद्दल असलेल्या प्रेमामुळे, केतन ने लग्नासाठी विचारावे आणि आपणही त्याच्या बरोबर परत लग्न करावे, असे एक दिवास्वप्न, चित्रा नेहमी बघत आहे. --मस्त शेवट बरा वाटला.
बाकीचं खूप छान जमलय.
@टीना @mr.pandit धन्यवाद
@टीना @mr.pandit
धन्यवाद
मस्त. शेवट तर खासच!
मस्त. शेवट तर खासच!
ही आजच्या काळातील कथा आहे,
ही आजच्या काळातील कथा आहे, खूप गोष्टी रिलेट होतात, खूप दिवसानंतर इतकी सुरेख कथा वाचली, शेवट वाचून सुन्न झाले.
धन्यवाद माधव
धन्यवाद माधव
@निस्तुला
आजच्या काळातील गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला होता, तो आपल्यापर्यंत पोहचला याचे समाधान वाटते. धन्यवाद
Pages