Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20
बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.
परागिभवनात मदत करणार्या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोगरा आणि लसूण काढून जमिनीवर
मोगरा आणि लसूण काढून जमिनीवर उंचवटा करून - raised bed लावणे. मुळं काळी पडली आहेत, त्यांना हवा लागू दे.
(No subject)
यावेळी झेंडू छान आला आहे . हा मैत्रिणीला हाउसवार्मिंगला तोरणासाठी काढून ठेवलेला.

(No subject)
झेन्डु काय मस्त आलाय सीमा!
झेन्डु काय मस्त आलाय सीमा!
इथे वाचून गणेशवेल आणि
इथे वाचून गणेशवेल आणि गोकर्णाच्या बिया मागवल्या होत्या. दोन्ही वेल छान वाढले. गोकर्णाला भरपूर फुलं येतात. रोज एकतरी असतच. आज गणेशवेलीलापण पहिलं फुल आलं. भारी वाटलं.
पुढच्या वर्षी जरा अजून नीट लावू म्हणजे वेल व्यवस्थित पार्टीशनवर चढतील.



वर ज्यांनी ह्या बियांबद्दल लिहिलं होतं त्यांना धन्यवाद.
माझ्या बागेतली पिचेस आणि अँपल
माझ्या बागेतली पिचेस आणि अँपल.
पिचेस



अँपल अजून तयार होत आहेत .
पीचेस चा रंग कसला सुंदर
पीचेस चा रंग कसला सुंदर दिसतोय!!
वा ! लै भारी.
वा ! लै भारी.
आम्ही मागच्या वर्षी लावलेले दोन अॅपल ट्रीज हरणांनी पाने आणि बार्क कुरतडून परलोकी धाडले
पुढच्यावर्षी आधी फेंस आणि मग फळझाडे असा बेत आहे.
वॉव मस्त पिचेस
वॉव मस्त पिचेस
क्रिशा, तुमच्या बागेतील
क्रिशा, तुमच्या बागेतील पिचेस,सफरचन्द, गोकर्ण, गणेशवेल, एकदम सुन्दर!
अभिनन्दन.
पीचेस चा रंग कसला सुंदर
पीचेस चा रंग कसला सुंदर दिसतोय!! >>>> +१
पराग, गणेशवेल आणि गोकर्ण वेल फारच छान आलेत. विंटरला हे मरतात का डॉर्मंट होतात?
गणेशवेल फारच छान दिसते आहे.
गणेशवेल फारच छान दिसते आहे. पीचेस - एकदम छान रंग आहे.
आमच्या इकडे उन्हानं हर्ब्जची वाढ बर्यापैकी थांबली आहे. मोगरा, गवती चहा वाढताहेत.
पीचेस चा रंग कसला सुंदर
पीचेस चा रंग कसला सुंदर दिसतोय!! >>> +१
गणेशवेल पूर्ण सुकून जातो. बिया काढून घरात आणून ठेवल्या असतील तर पुन्हा लावता येतात. मी अनेक वर्ष गणेशवेल लावते आहे पण जमिनीत किंवा कुण्डीत पडलेल्या बिया पुढल्या वर्षी पुन्हा उगवल्या असं कधी झालं नाही. तुळस, चिनी गुलाब, सदाफुली, पेटुनिया, झेंडु सगळ्या प्रकारची रोपं उतरतात पण गणेशवेल नाही. तुमच्या भागात वेदर कसं आहे? जरा वॉर्म असेल तर कदाचित उतरतील रोपं.
I am in texas, for me
I am in texas, for me ganeshwel died last year but this year came again at many places, without planting seeds.
गणेशवेल बिया मागवल्या पण
गणेशवेल बिया मागवल्या पण आळसाने पेरण झालं नाही. आता लावू का पुढच्यावर्षीची वाट बघू?
मी कॅलिफोर्निया मध्ये आहे.
मी कॅलिफोर्निया मध्ये आहे >>>
मी कॅलिफोर्निया मध्ये आहे >>> बरं मग?
जोक नका करू. बिया पेरू का ते
जोक नका करू. बिया पेरू का ते सांगा. (पेरूच्या नाहीयेत गणेशवेलीच्या आहेत)
पण बिया (कसल्याही असेना)
पण बिया (कसल्याही असेना) पेरून त्यातून उगवणार्या रोपात इंटरेस्ट असेल तर खुशाल पेराव्यात की. आम्हाला कशाला विचारायचं?
जोक्स अपार्ट, सध्या आपल्या कॅलिफोर्नियात पाणी आहे भरपूर. समर (वॉर्मर टेम्परेचर्स अजून दोन महिने आरामात असतील) तर पेरून बघ की. अगदीच शंका असेल तर अर्ध्याच वापर.
कढीपत्ता, मोगरा, अबोली,
कढीपत्ता, मोगरा, अबोली, रातराणी , जास्वंद सर्व डेक वरुन घरात आणले. या वीकेंडला.
थाइम ची रोपं कुंड्यांमधे लावलि होती . पण ती घरात सुद्धा नीट टिकत नसत, काल एका मास्टर गार्डनरने सांगितले की अंगणातच लावावे आणो फर्स्ट फ्रॉस्टच्या आधी कोवळ्या फांद्या छाटून , स्ट्रॉ ने झाकून ठेवावे . या वर्षी ते करुन पहाणार.
जवळ राहणार्या दिराने त्याच्या मित्रासाठी एक कढीपत्त्याचे छोटे रोप मागून नेले होते. त्या मित्राने काल एक केळ्याचे रोप पाठवले आहे.
ज्ये ना म्हणे सुपारी आहेच, आता केळ पण आहे . नारळ, पान वेल आणि मिरीचे वेल पण मिळवा . एकदम कोकणी बागाइतदार शोभाल
मी अनेक वर्ष गणेशवेल लावते
मी अनेक वर्ष गणेशवेल लावते आहे पण जमिनीत किंवा कुण्डीत पडलेल्या बिया पुढल्या वर्षी पुन्हा उगवल्या असं कधी झालं नाही >>>>> आयला. मग आधी सांगायचस की. गणेशवेल इतका छान आला की आधी कधी का लावला नाही असं वाटतय आता.
शुगोल, भारतात तरी गणेशवेल आणि गोकर्ण पुढच्या पावसाळ्यात परत यायचे. इथे आम्ही पहिल्यांदाच लावले, त्यामुळे माहित नाही.
गोकर्णाला शेंगा यायच्या भारतात, त्या बिया आम्ही परत टाकायचो. इथे नाही आल्या अजून.
पीचेस चा रंग कसला सुंदर दिसतोय!! >>>> अनुमोदन !
हे बघा गणेशवेलाचे गणेशवेलाचे
हे बघा गणेशवेलाचे गणेशवेलाचे अजून दोन फोटो. अजून वाढला आहे. गणपतीच्या दिवशी खूप फुलं आली होती.



*
*
आणि ही जास्वंद.
पराग, गणेशवेल फारच सुंदर
पराग, गणेशवेल फारच सुंदर दिसतोय.
लाल जास्वंद सुद्धा छान फुलली आहे.
सुंदर आला आहे गणेशवेल. मी
सुंदर आला आहे गणेशवेल. मी फेसबुकवर फोटो टाकले होते अरे. तू अनुल्लेख केला असशील
कढीपत्ता, मोगरा, अबोली,
कढीपत्ता, मोगरा, अबोली, रातराणी , जास्वंद सर्व डेक वरुन घरात आणले. या वीकेंडला.>>> एवढ्या लवकर? सप्टेंबरअखेर पर्यंत बाहेर राहू शकतात ना? इथे साधारण ऑक्टोबर तिसर्या आठवड्यात आत आणते मी. यावर्षी बर्याच कुंड्या आहेत. आठ मोगरा, दोन कडीपत्ता, एक गवती चहा. मोगर्याची छाटणी केल्यावर जून काड्या मातीत खोचल्या होत्या, त्याला पानं फुटली आहेत.
गणेशवेलाचे सर्व फोटो आवडले.
गणेशवेलाचे सर्व फोटो आवडले. अॅपल,पिच बहारदार. वाटतं ती तोडूच नये कोणी किती छान दिसताहेत झाडांवर!
पीचेस, गणेशवेल आणि गोकर्ण
पीचेस, गणेशवेल आणि गोकर्ण भारी!!!
माझ्याकडे गोकर्ण आणि प्राजक्त विशलिस्टवर आहेत - ते मिळाले आणि जगले की सुडोमि!
एवढ्या लवकर? सप्टेंबरअखेर
एवढ्या लवकर? सप्टेंबरअखेर पर्यंत बाहेर राहू शकतात ना? >> अजून दोन आठवडे पण चाललं असतं बाहेर. पण वेळ होता, फार पाउस नसल्याने कुंड्या ओल्या गच्च, डेकवर पाणी असं काही नव्हतं त्यामुळे आणून टाकल्या आत.
कढीपत्ता, बे लीफ, गवती चहा वगैरे एका क्रेप मर्टलच्या सावलीत होते थोडे थोडे.इतका कचरा भरला होता त्या पुलांचा. पुढच्या वर्षी त्या झाडाखाली काही ठेवणार नाही
प्राजक्त छान फुटला होता
प्राजक्त छान फुटला होता माझ्याकडे पण फार नाजूक झाड असतं ते. पाणी जास्त झालं माझ्याकडून तर जळाला
पिचेस, सफरचंद, गोकर्ण,
पिचेस, सफरचंद, गोकर्ण, गणेशवेल, जास्वंद, सगळेच मस्त!
काल एका मैत्रिणीने आठ दहा
काल एका मैत्रिणीने आठ दहा Paw Paw फळे आणि पंधरा वीस बिया दिल्या. त्यातल्या काही अंगणात थेट पेरल्या आहेत आणि काही मॉस मधे घालून फ्रीज मधे ठेवल्यात. मार्च मधे अंगणात पेरायला आठवण राहिली पाहिजे.
घराच्या वाटेवर इस्टर्न रेडबडची बरीच छोटी झाडं आहेत. तिथे ओक , पॉपलर आणि मेपल्सची दाट सावली असते. त्यामुळे ते रेड बड्स तिथे फुलायची शक्यता फार कमी. त्यातली ३-४ झाडं काढून घरासमोर , चांगलं उन येइल अशा जागी लावलीत.
हळद आणि आंबे हळद लावली आहे कुंडीत. केशराचे कंद मागवले होते ( एकदाचे). ते लावले आहेत. ट्रायल म्हणून ५० मागवले आहेत. ते जर नीट उगवले तर पुढच्या वर्षी शे दोनशे मागवायचा विचार आहे .
दोन लोबेलिआ( कार्डीनल फ्लॉवर्स) आणि एक हार्डी जस्मिन व्हाइन मिळालेत इतर गार्डनर्स कडून एक्स्चेंज मधे . ते लावायचे आहेत अजून. शिवाय काल २०-२५ अॅकॉर्न्स गोळा करुन आणलेत . तेही लावायचे आहेत
Pages