Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20
बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.
परागिभवनात मदत करणार्या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>राज, किती छान फुललाय अनंत!
>>राज, किती छान फुललाय अनंत! आजोळच्या अंगणातला अनंत असाच सुरेख फुलायचा.<<
गेले काहि सिझन्स गार्डिनिया एकदम फुल्ल बहरात आहे. आणि हा आमच्या मातोश्नींनी स्वहस्ते लावलेला असल्याने त्याचा जरा जास्त लळा आणि कौतुक...
राज, मस्त आहे अनंत आणि
राज, मस्त आहे अनंत आणि फ्रंटयार्डपण.
काय म्हणतात अनंताला इथे?
राज, अनंत मस्त फुललाय.
राज, अनंत मस्त फुललाय.
सायो, अनंताला इथे गार्डेनिया म्हणतात.
वॉव कसला मस्त फुललाय
वॉव कसला मस्त फुललाय गार्डेनिया!! मागे माझ्याकडे कुंडीत होता, एक वर्ष खूप फुलं आली पण नेक्स्ट सीझन ला नुस्तीच पानं आली. मीही खत वगैरे जरा नीट घालयला हवं होतं. आता आणावासा वाटत आहे परत.
रेझ्ड बेड्स करण्यामागे काय
रेझ्ड बेड्स करण्यामागे काय हेतू असतो? >> भाज्यांकरता जास्त वापरले जातात रेझ्ड बेड्स. गवत आणि वीड्स खणून काढून, मग चांगली माती + कॉम्पोस्ट घालून मग भाजीचे वाफे करण्यापेक्षा गवतावर कार्डबोर्ड तावर पाणी शिंपडून मग त्यावर मल्च असे थर ऑक्टोबर मधे करायचे. स्प्रिंग पर्यंत गवताचा पत्ता कट ! मग त्या ६-८-१० इंच उंचीचे आयताकृती रेझड बेड बनवून त्यात चांगल्या प्रतीची माती + कॉंपोस्ट मिसळून भरायचे. वीड्स बर्यापैकी आटोक्यात रहातात. मातीचं टेक्स्चर आणि स्ट्र्कच्र चांगलं असलं की पाणी पण कमी द्यायला लागतं आणी मुळांची वाढ चांगली होते. ससे / मोल्स यांचा त्रास ही कमी होतो असं काही लोक म्हणतात.
हरणांसाठी मात्र ६-८ फुटी फेंस लागेलच.
पूर्ण यार्ड फेंस नसेल करायचे तरी भाजीच्या एरिया भोवती फेंस करावे लागेल.
राज, अनंत एकदम भारी
राज, काय सुंदर फुलला आहे अनंत
राज, काय सुंदर फुलला आहे अनंत!!!
छे छे! मत्सर जास्त वाटतो आहे की आनंद हे ठरवता येत नाहीये!
राज यांनी अनंताची तातडीने
राज यांनी अनंताची तातडीने दृष्ट काढावी ही नम्र विनंती
फारच भारी फुललाय.
माझा कुंडीत आहे पण आता जमिनीत लावावा असं वाटतय.
माझा कुंडीत आहे पण आता जमिनीत
माझा कुंडीत आहे पण आता जमिनीत लावावा असं वाटतय. > > शूंपी आपल्या frost period मधे burlap ने cover करायला विसरू नकोस पण.
सीमा असामी म्हनतो त्यापैकी
सीमा असामी म्हनतो त्यापैकी कोणत्या जातीचं जास्वंद आहे तुझ्याकडे? बाहेर जमिनीतच आहे असं वाटतय तुझ्या पोस्ट्वरून.>>>
मला नाही माहित गं कुठली जात आहे ते. हो जमीनीतच आहे. विंटर मध्ये मरते. मग आम्ही सगळ्या फांद्या कट करतो. स्प्रिंग मध्ये परत वाढायला सुरुवात होते. ऑगस्ट पर्यंत साधारण ७/८ फूट वाढते. पानं सेम अंबाडी सारखी आहेत आणि फांद्या लालसर रंगाच्या आहेत. फुल लाल रंगाची टिपिकल कॉमन जास्वंदीची.
राज, काय सुरेख फुललाय अनंत.
राज, काय सुरेख फुललाय अनंत. कित्ती मस्त वाटत असेल पायर्यांवर बसायला संध्याकाळी.
राज, अनंत बाहेर लावलाय का?
राज, अनंत बाहेर लावलाय का? आम्ही गेल्यावर्षी कुंडी थंडीत आत आणली. अगदी मार्च पर्यंत हिरवं होतं झाड आणि नंतर बाहेर नेल्यावर मेलच ते.
बाहेर रहात असेल तर चांगलं आहे.
माझ्याकडचा अनंत
माझ्याकडचा अनंत
मिनी, मस्त वाढलाय अनंत.
मिनी, मस्त वाढलाय अनंत.
राज आणि मिनी , तुमच्याकडचे
राज आणि मिनी , तुमच्याकडचे अनंत खरेच छान फुलले आहेत!
(स्वगत - इथे फोटो टाकायचे तंत्र काय ते एकदा बघायलाच हवे वेळ काढून.)
राज,
>>अनंत पण हार्डी आणि बुटका मिळतो. <<
बुटका म्हणजे कुठल्या संदर्भात? >> बुटका म्हणजे उंचीच्या संदर्भात. १ ते २ फूटच उंच वाढते ते रोप. फुलेसुद्धा आकाराने लहान असतात. माझ्याकडचे सध्या फूटभरच उंच आहे. कळी दिसत नाही अजून. सहा - आठ महिन्यापूर्वी विकत आणले तेव्हा त्यावर दोन फ़ुले होती. तुमच्याकडचे इतके बहरलेले बघून त्याला फुले कधी येतील अशी काळजी वाटू लागली आहे
(स्वगत - इथे फोटो टाकायचे
(स्वगत - इथे फोटो टाकायचे तंत्र काय ते एकदा बघायलाच हवे वेळ काढून.) >> तुम्हाला समजले तर मला पण सांगा प्लीज.
>>बुटका म्हणजे उंचीच्या
>>बुटका म्हणजे उंचीच्या संदर्भात. १ ते २ फूटच उंच वाढते ते रोप.<<
फक्त ८ महिने म्हणजे तुमचा अनंत अजुन खुप लहान आहे, वाढेल भराभर (लेट फॉलमध्ये प्रुन करा). आमचे दोन्हि १६-१७ वर्षांचे आहेत - एकदम गबरु जवान...
पराग, अगदि सुरुवातीपासुन दोन्हि अनंताची झाडं जमिनीतंच लावलेली आहेत. कौतुका बद्दल सगळ्यांचे आभार...
अरे सोप्पेय की फोटो टाकणे.
अरे सोप्पेय की फोटो टाकणे. इथे खाली "मजकुरात इमेज किंवा लिन्क द्या" असं लिहिलंय ना, त्यात इमेज वरक्लिच्क करा. ब्राउज आणि अपलोड इमेज चे ऑप्शन येतील. अपलोड केली की इन्सर्ट फाइल वर क्लिक करा. झाले!
ते नाही, तिथे साइझ छोटा
ते नाही, तिथे साइझ छोटा करा बगैरे भानगडी आहेत . आणि टोटल स्पेस पण लिमिटेड आहे . पिकासाच्या लिंक्स किंवा गूगल फोटोच्या लिंक्स कशा टाकायच्या ते हवंय
मोगर्याच्या माहीती बद्दल
मोगर्याच्या माहीती बद्दल थॅन्क्स.
राज, मिनी अनंत मस्त बहरलय. (विटांची घर काय सॉलीड दिसताहेत!! दोन्ही फोटोत)
धन्यवाद. आमचा पण अनंत पाच
धन्यवाद. आमचा पण अनंत पाच वर्षे जुना आहे. अजुन पुष्कळ कळ्या उमलायच्या आहेत.
अनंत मस्त.
अनंत मस्त.
आमच्याकडे कुंडीत बुटका आहे. त्या इवल्याश्या झाडाला २५-३० कळ्या आल्यात यावर्षी. पण फुलायचं एकाही नाव घेत नाहीये. गेले महिना दीड महिना नुसत्या कळ्याच आहेत. हेल्दी आहेत सो फुलतील पुढेमागे या आशेवर आहे.
हार्डि अनंत बुटका असतो. इथे
हार्डि अनंत बुटका असतो. इथे फॉल च्या आसपास फ्रॉस्ट फ्री हार्डी गार्डेनिया म्हणून विकायला येतात बरेच.
(No subject)
या वर्षी बर्यापैकी बागकाम केलं. मागच्या वर्षी नोव्हेंबरमधे काढलेला फोटो. अजून बरंच काम बाकी आहे, पण आता उन वाढतंय त्यामुळे जास्तवेळ बागेत काम करता येत नाही. शिवाय कोल्हीणबाईंचा धाक आहेच. उरलेलं काम बहुतेक पुढच्या वर्षी किंवा जमेल तसं.

हा मागच्या आठवड्यात काढलेला फोटो. Edging, Mulching करून दिड बाय दिड फुटाचे खड्डे खणून त्यात ऑर्गॅनिक माती घालून घेतली. थोडं कंपोस्ट घालून नीट करून घेतली.


दोन प्रकारचे dianthus, डे लिलीज लावले आहेत.



हर्ब्जमधे स्वीट बेझील, पर्पल बेझील. अजून एक स्वीट बेझीलचे रोप जमिनीत लावले आहे.

पुदिना. दोन मोठ्या कुंड्यामधे (साधारण १७ इंच व्यास असलेल्या आणि २० इंच उंच असलेल्या) पुदिना लावला आहे. मोठे खड्डे खणून कुंड्या जमिनीत लावल्या.

पायनापल सेज

थाई बेझील

इंग्लिश थाईम आणि गोल्डन लेमन थाईम

या खेरीज लॅव्हेंडर, गार्डन सेज, रोझमेरी, दोन प्रकारचे ओरेगानोपण आहेत.
मोगरा आणि त्याच्या शेजारच्या कुंडीत गवती चहा.


या वर्षी मोगर्याची आठ रोपं झाली आहेत. थंडीत आतबाहेर करायला बरीच उस्तवार होणार.

दर आठवड्याला यापेक्षा जास्त पुदिना निघतो.

पाणीपुरीची चटणी करून आईसट्रेमधे घालून फ्रीज केली. हवं तेव्हा पाणी घालून पाणीपुरीचे पाणी तयार.

वॉव अंजली सहीच. कुठल्या शहरात
वॉव अंजली सहीच. कुठल्या शहरात राहता तुम्ही? अगदी मस्त फुललेय बाग!
अरे मला एकही फोटो दिसत नाहीये
अरे मला एकही फोटो दिसत नाहीये.
धन्यवाद राया. मी नॉर्थ
धन्यवाद राया. मी नॉर्थ कॅरोलायना मधे रहाते.
अदिती, क्रोम मधे दिसतील फोटो.
अंजली मोगरा कसला मस्त आलायं.
अंजली, मोगरा कसला मस्त आलायं. तुझी बाग बघायला यायला हवं एकदा.
खरं तर नुसती बाग नाही, तुझ्याकडचा गणपती आणि दिवाळी पण.
हो अंजली. दिसलेत.
हो अंजली. दिसलेत.
सफारीने काय पाप केले आहे कुणास ठाउक!
मोगरा आणि गवती चाहा मस्त.
सुरेख बाग अंजली
सुरेख बाग अंजली
थँक्यू, थँक्यू
थँक्यू, थँक्यू
तुझी बाग बघायला यायला हवं एकदा. खरं तर नुसती बाग नाही, तुझ्याकडचा गणपती आणि दिवाळी पण. >>>> मिने, कधीही, कुठल्याही वर्षी
Pages