Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20
बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.
परागिभवनात मदत करणार्या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्हीं वेगळे असल्यास क्षमस्व
दोन्हीं वेगळे असल्यास क्षमस्व. मला दोन्हीं एकच वाटायची. आणि इथेही गुलबक्षी चर्चेनंतर लगेच गुलबकावली आली त्यामुळेही तसंच वाटलं.
गुलबकावली फिक्टीशिअस आहे असं
गुलबकावली फिक्टीशिअस आहे असं समजतो मी.
मला तरी गुलबकावली आणि
मला तरी गुलबकावली आणि गुलबक्षी एकच वाटत होते. वरचे माझे पोस्ट एडीट करते आणि गुलबक्षी करते.
दोन Kwanzan Cherry, दोन
दोन Kwanzan Cherry, दोन स्वीट चेरीज ( फळ झाडे) . दोन लायलॅक, डझनभर कोरिऑप्सिस, कोन फ्लॉवर आणि ब्लॅक आयड सुझन अशी खरेदी झाली शुक्रवारी.
काल चेरी ची झाडं लावून झाली. आज पेरिनियल्स लावणार. लायलॅक बुशेसचा मात्र फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम झालाय - घराच्या जवळ, भरपूर उन लागेल, पण झाडं मोठी झाल्यावर व्ह्यू ब्लॉक होणार नाही अशी जागा दिसत नाही
अरे, गुलबाक्षीची बरीच चर्चा
अरे, गुलबाक्षीची बरीच चर्चा झालेली दिसते इथे
सीमा, मला वॉलमार्टात बिया मिळाल्या ह्या वेळी, मिक्स गुलबाक्षीच्या !
कोणाला तेरड्याची/ बालसम ची झाडे आवडत असल्यास ती पण लावता येतील.
सगळीकडे मिळतात गुलबक्षी. मी २
सगळीकडे मिळतात गुलबक्षी. २/३ वर्ष लावत आहे. सशांच्या तावडी तून तेच वाचतात फक्त. अॅमेझॉन वर जास्त प्रमाणात लावायची असेल तर स्वस्त मिळतात.
मी लावली आहेत तेरड्ञाची झाड . माझ्याकडे खड्याची गौर असते. आणि तेरड्या चा गुच्छ गौरी म्हणून असतो. आता चाफ्याची पाने/झाड मिळाल कि अगदी घरच्या सारखी गौर होईल. चाफ्याच झाड आणेन बहुदा. यावेळी वापरता येईल.
चार्ड, पालक, तांदळीची भाजी भरपूर आहे. बहुदा मे १५ पर्यंत मिळत राहील. काँन्स्टंट ८५ वर गेलं तापमान कि मग बंद होईल.
मला घरी तुळस लावायची आहे.
मला घरी तुळस लावायची आहे. भारतीय दुकानात अजून दिसत नाहीये, दिसली तरी ते रोपटे तुळशीचेच असेल याची खात्री वाटत नाही. त्यापेक्षा जर कुणाकडून जर तुळशीची एक फांदी आणून लावली तर ती उगवेल का? त्याची काही विशेष पद्धत असते का?
Mirabilis jalapa हे गुलबकावली
Mirabilis jalapa हे गुलबकावली नसावे. जे फुल शोधण्यावर 'राजपुत्र ठकसेन' सारख्या नायकावर अख्खी गोष्ट व्हायची ते आमच्या परसात मिळायचे? पटत नाही सशल..
गुगल प्रमाणे Ginger lily, Hedychium coronarium
नंद्या, तुळशीची फांदी लावून
नंद्या, तुळशीची फांदी लावून जगणार नाही. रोपटं लावा किंवा बी पेरले तर सहज उगवेल. साधारण मदर्स डे नंतर बाहेर कुंडीत बी टाकून रोज पाणी द्या. कुंडी ४-५ तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. भरपूर रोपं उगवतील.
शनिवारी आमचा गार्डन शो होता.
शनिवारी आमचा गार्डन शो होता. तिथून शेड गार्डनसाठी दोन लेन्टन रोझ आणि दोन ब्लिडिंग हार्ट आणली . बाकी यावर्षी स्नोसोईंग मधून दोन प्रकारची /रंगाची कोलंबाईन, शर्ली पॉपी, ओरिएंटल पॉपीज, पांढरी कोनफ्लॉवर , ब्लॅक आय सुझन ही नवी झाडे आणि जोडीला काही नेहमीची कोनफ्लॉवर, कोरीऑप्सिस, डेझी वगैरे नेहमीची मंडळी. फॉलपासून फाउंडेशन फ्लॉवर बेडस तसे बॉर्डर फ्लॉवर बेड्स वर नव्याने काम केले. तेच काम स्प्रिंगमधे सुरु आहे. डॅफोडिल्स ट्युलिप्स फुलून गेले. आता अॅलियम, ३-४ प्रकारचे कोलंबाईन, साल्विया, गुलाबी पिओनी आणि बाथ आणि ब्रिलियन्सी पिंक्स फुलतायत. क्रिपिंग फ्लॉक्सवर थोडी फुंलं अजून आहेत. जोडीला आयरिस फुलायला लागलेय. एका जातीच्या डेझीला फुलं आलेत. दुसर्या डेझीला अजून वेळ आहे. स्ट्रॉबेरीजना भरपूर फुलं आणि थोड्या हिरव्या स्टॉबेरीज आल्यात.
यावर्षी डेकचे काम त्यामुळे भाजीचे वाफे नाहीत.
स्वाती, फोटो टाका ना प्लीज,
स्वाती, फोटो टाका ना प्लीज, म्हणजे गार्डन डिझाइन साठी आयडिया मिळतील .
३-४ प्रकारचे कोलंबाईन, >> माझ्या पत्रिकेत बियांपासून कोलंबाइन रुजवायचा योग नाहीये बहुतेक. घरच्या बिया, मित्र मैत्रिणी<कडून आणलेल्या, लॉन्ग वूड मधून आणलेल्या - सर्व मातीमोल
मेधा,
मेधा,
स्नोसोइंग करुन बघ. जानेवारीत दुधाचे जग बाहेर ठेवले की फक्त मार्चपासून माती सुकत नाहीये ना एवढेच विकेंडला बघायचे. तसे असेल तर स्प्रे मारुन ओलसर ठेवायचे. एप्रिलच्या शेवटी खरी पानं आली की जग दिवसा उघडे ठेवायचे. बीया पेरताना ओल्या पॉटिंगमिक्स वर नुसत्या भुरभुरवायच्या. आणि वर थोडे सीड स्टार्टर भुरभुरवायचे. मी यावर्षी फ्रीजमधे ओल्या नॅपकिन+झिपलॉक अशा देखील बीया ठेवल्या होत्या. त्या एप्रिलच्या सुरवातीला फोमच्या कपात लावल्या. त्यांना आत्ता कुठे पानं फुटतायत आणि जर्मिनेशनचा रेटही बराच कमी आहे.
फ्लावर बेड्सचे फोटो/प्लांटिंग चार्ट टाकेन इथे.
माझ्या घराच्या दक्षिण बाजूला
माझ्या घराच्या दक्षिण बाजूला उन्हाळ्यात जवळ जवळ १०-११ तास उन येतं. त्यात माती क्ले आणि खडी मिश्रीत असल्यानं तिथली लॉन दरवर्षी मरायची, दरवर्षी आम्ही सीडींग करून, माती टाकून, कॉम्पोस्ट टाकून काही उपयोग होतोय का बघायचो. शेवटी दोन वर्षांपूर्वी तिथली लॉन काढून टाकून नुसते मल्च टाकून घेतले. तिथे फुलं लावायची, दुसरी काही झाडं लावायची की अजून काही करायचं कळत नव्हतं. हरीण, कोल्हा, खारी, ससे वगैरे भरपूर प्राणी असल्यानं भाज्या लावून उपयोग नव्हता. शेवटी हर्ब गार्डन केलं. पुदिना, इटालिअन ओरेगानो, हॉट अँड स्पाईसी ओरेगानो, मार्जोरीम, थाई बेसील, स्वीट बेझील, पर्पल बेझील, गार्डन सेज, पाईनापल सेज, लॅव्हेंडर, रोझमेरी, लेमनग्रास, ईग्लिश थाईम, लेमन थाईम लावले आहेत. पुदीना आणि ओरेगानो भल्या मोठ्या कुंडीत लावून त्या कुंड्या जमिनीत पुरल्या. ड्राईव्हेला लागून १२-१३ dianthus (perennials) लावले आहेत. हर्ब गार्डन पूर्ण वाढल्यावर कसं दिसेल याची उत्सुकता आहे.
मी मोठ्या साईज च्या कुंडी मधे
मी मोठ्या साईज च्या कुंडी मधे पॉटींग सॉईल मधे मेथी लावली आहे. पण ती बोट भर उंचीची होउन पिवळी पडली आहे.
मेथी कशी वाढवावी ह्या बद्द्ल कोणी माहीती देउ शकेल का? युट्युब मधे बघितल पण जास्त काही माहीती मिळाली नाही.
पिवळी पडली म्हणजे बहुधा पाणी
पिवळी पडली म्हणजे बहुधा पाणी जास्त दिलं जातंय किंवा सॉइल ड्रेन होत नाहीये.
हो पाणी जास्त होत असेल. कमी
हो पाणी जास्त होत असेल. कमी करते. किती देण योग्य आहे?
तसच मी नवीन लावलेल्या ऑरेंजची पान पण पिवळी पडताहेत. भरपुर फुल आली आहेत पण पान पिवळी. त्यालाही पाणी जास्त हेच कारण असेल का?
झक्की ,इथून तुळशीच्या बीया
झक्की ,इथून तुळशीच्या बीया मागवल्या. तुमच्या गावत असल्याने लग्गेच मिळतील बहुदा पोस्टाने.
http://www.seedsofindia.com/
अदिती, इथे बघा.
अदिती, इथे बघा.
माझ्या लिंबा च्या झाडाच असचं झालेलं.
https://gardenofeaden.blogspot.co.uk/2015/01/why-are-my-orange-tree-leav...
अदिती, आर्यन घाला आणि
अदिती, आर्यन घाला आणि नायट्रोजन ( स्लो रेलीज) सगळं ठिक होइल.
सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित मी केलेला उपाय, कॉफी उकळून त्याच पाण्यात , एप्सम सॉल्ट विरघळवून मग त्यात स्लो रीलीज आर्यन ( ज्या मला दिलील्या डॉक ने आणि मी घेवून कंटाळले ) त्या घालून ते पाणी घालायचे.
लिंबाला अॅसीडीक खत लागतं.
ओके, आर्यन कमी पडतय वाटत.
ओके, आर्यन कमी पडतय वाटत. करुन बघते.
स्वती२, धन्यवाद.
स्वती२, धन्यवाद.
अदिति, तुमच्या प्रोफाइल मधे
अदिति, तुमच्या प्रोफाइल मधे सान होजे दिसतंय म्हणून
http://homeguides.sfgate.com/water-fertilize-orange-trees-43844.html ही सान फ्रान क्रॉनिकल मधल्या लेखाची लिंक. त्यांच्या साईट वर असे बरेच गाईड्स आहेत. तुमच्या झोन ला एकदम उपयुक्त माहिती आहे.
न्यू जर्सी मधे हर्ब सेल .
न्यू जर्सी मधे हर्ब सेल . http://www.delvalherbs.org/events/
Saturday
May 20, 2017
10:00 a.m. - 4:00 p.m.
Sunday
May 21, 2017
1:00 p.m. - 3:00 p.m. Herb Plant Sale
From Artemesia to Zataar, come find the unusual as well as your old favorites. Proceeds from the sale are used to provide scholarship money to Delaware Valley University students of horticulture.
Holcombe-Jimison Farmstead
Rt. 29 North of Lambertville
आणि फिलाडेल्फिया चॅप्टरचा सेल
आणि फिलाडेल्फिया चॅप्टरचा सेल या गुरुवारी
Thursday, May 11, 2017
10 a.m. to 1 p.m.
In the meadow at Historic Yellow Springs, 1685 Art School Road, Chester Springs, PA 19425
Featuring Culinary and Fragrant Herbs
Hard-to-find specialty plants, such as scented geraniums and salvias.
मेधा धन्यवाद
मेधा धन्यवाद
मी काल सीड्स ऑफ इंडियावर गेले
मी काल सीड्स ऑफ इंडियावर गेले होते. तिथे टेक्सासात जगतिल अशी डाळींबाची झाडे उपलब्ध आहेत. सीमा, तुझं काय मत आहे? मला जाम इच्छा होते आहे घ्यायची. शिवाय रातराणी पण. जगेल का दोन्ही खरच आपल्या इथे बाहेर जमिनीत लावले तर? पिंक जॅस्मिन पण घ्यायची आहे.
इथे टेक्सासात राहाणारे हौषी(शी?) माळी असतील आणखी कोणी तर प्लीज सांगा.
बर्पी रातराणीला झोन ९ मधे
बर्पी रातराणीला झोन ९ मधे पेरेनियल म्हणत आहेत
http://www.burpee.com/perennials/perennial-plants/night-blooming-jasmine...
तुमचा झोन काये ?
माझ्या इथे ( झोन ६ / ६ब ) रातराणी आत बाहेर करुन पेरेनियल आहे
गूगल ८बी सांगतय. बर्पी छान
गूगल ८बी सांगतय. बर्पी छान साइट वाटते आहे मेधा. तू घेतेस का तिथून झाडे?
मला आत्बाहीर नाही करायची आहे
मला आत्बाहीर नाही करायची आहे रातराणी. बाहेरच लावायचा प्लॅन आहे.
मी बर्पी मधून बिया नेहमी
मी बर्पी मधून बिया नेहमी घेते. झाडे कधी मागवली नाहीत. प्रसिद्ध कंपनी आहे.त्यांच्या बिया होम डेपो वगैरे मधे पण मिळतात
Pages